Posts

Showing posts from September 15, 2024

1000 महाविद्यायलयांमध्ये “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे (ACKVK) उद्घाटन

    रायगड (जिमाका) दि.17:-   राज्यातील एक हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास  केंद्राचे  उदघाटन दि.20  सप्टेंबर 2024 रोजी मा. प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते वर्चुअल ऑनलाईन पद्धतीने करण्याचे निश्चित झाले आहे. रायगड जिल्ह्यातील 16 महाविद्यालयामधील केंद्राचा समावेश आहे. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रामधून युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीकोनातून नामांकित महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण,2020 मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व देण्यात आलेले आहे. त्या धोरणाच्या अमंलबजावणीला सकारात्मक वातावरण निर्मिती होण्यासाठी तसेच युवक युवतींना कौशल्य विकासाची संधी महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने  “ आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ”  ही नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे. महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्र स्थापन करून 15 ते 45 वयोगटातील युवक-युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी संधी उपलब्ध होणार आहेत. रायगड जिल्हयातील 16 महाविद्यालयामध्ये एकूण 08 क्षेत्रामध्ये 16

इयत्ता 6 वी च्या निवड परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्यास दि.23 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

    रायगड(जिमाका)दि.17:-  पी. एम. श्री. स्कूल जवाहर नवोदय विद्यालय, रायगडच्या सत्र 2025-26 करीता इयत्ता 6 वी च्या निवड परीक्षेचे ऑनलाईन अर्ज  https://navodaya.gov.in  या संकेतस्थळावर सादर करण्याची प्रक्रिया सुरु असून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 23 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व परीक्षार्थी, पालक, सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रभारी प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय मनोज राऊत यांनी केले आहे. अधिक माहित्तीसाठी श्री.संतोष आर.चिंचकर मो.9881351601, श्री.अर्जुन गायकवाड मो.9862793640 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ०००००००