1000 महाविद्यायलयांमध्ये “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे (ACKVK) उद्घाटन

 

 

रायगड (जिमाका) दि.17:- राज्यातील एक हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उदघाटन दि.20  सप्टेंबर 2024 रोजी मा. प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते वर्चुअल ऑनलाईन पद्धतीने करण्याचे निश्चित झाले आहे. रायगड जिल्ह्यातील 16 महाविद्यालयामधील केंद्राचा समावेश आहे. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रामधून युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीकोनातून नामांकित महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण,2020 मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व देण्यात आलेले आहे. त्या धोरणाच्या अमंलबजावणीला सकारात्मक वातावरण निर्मिती होण्यासाठी तसेच युवक युवतींना कौशल्य विकासाची संधी महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ही नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे. महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्र स्थापन करून 15 ते 45 वयोगटातील युवक-युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी संधी उपलब्ध होणार आहेत.

रायगड जिल्हयातील 16 महाविद्यालयामध्ये एकूण 08 क्षेत्रामध्ये 16 जॉबरोल (कोर्स) कौशल्य प्रशिक्षणासाठी उपलब्ध आहेत.Gardener cum Nursery Raiser, Vermicompost Producer, Fishing Boat Maintenance Worker, Al & Data Scientist, Media Developer, Guest Service Executive (Front Office), Front Office Assistant, Front Office Manager, Accounts Assistant, Jr. Technician (Smart Energy Meter), Graphic Designer, Drone Manufacturing and Assembly Techncician, Solar Panel Installation Technician, Multi Skill Technician (Household and Small Establishment)

सोबत महाविद्यालयाची नावे.

1.Dr. Babasaheb Ambedkar College of Arts, Commerce and Science 2. Smt. Geeta D. Tatkare Polytechnic 3. S.E.S's, SHIKSHAN MAHARSHI DADASAHEB LIMAYE ARTS, COMMERCE & SCIENCE COLLEGE, KALAMBOLI 4. Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Lonere 5. Sheth J.N. Paliwala Commerce College, Science and Art College Pali-Sudhagad 6. Anjuman-I-Islam's Kalsekar Technical Campas 7. Yadornas Tasgaonear Polytechnic 8. Yadavrao Tasgaonkar Institue of Engg & Tech 9. Anjuman-I-Islam's Kalsekar Technical Campas School of Engineering and Technology 10. Asha Marine Technical College & Research 11. Abhinav Jnyan Mandir Arts, Science & Commerce College 12. Pillai College of Arts, Commerce & Science(Autonomous) 13. M.S.P.M's D.G.Tatkare Mahavidyalaya mangaon 14. M.M. Jagtap college of art's commerce and science mahad 15. K.T.S.P. Mandal's K.M.C. college of art's science and commerce 16. Matoshree sumati chintamani tipnis college of arts and commerce,सदर आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रामधून उमेदवारांना मोफत कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड