Posts

Showing posts from November 26, 2017

चिरनेर, दिघोडे ग्रा.पं.निवडणूक;स्वाधीन अधिकाऱ्यास अधिकार प्रदान

अलिबाग,जि.रायगड (जिमाका) दि.2-   ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सन 2017 चा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केल्यामुळे 24 नोव्हेंबर,   पासून आचारसंहिता अंमलात आली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत, परिमंडळ-2 पनवेल विभागातील उरण पोलीस ठाणे हद्दीत 1) चिरनेर, 2) दिघोडे ग्रामंपचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका होणार असून 26 डिसेंबर, रोजी मतदान व 27 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या कालावधीत तेथील कायदास सुव्यवस्था अबाधित रहावी व मतदान शांत, निर्भय व नि:पक्षपाती वातावरणात पार पडावे म्हणून नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 36 प्रमाणे    प्राप्त अधिकारानुसार नवी मुंबई पोलीस आयुकतालय हद्दीतील चिरनेर, दिघोटी या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका होणार असल्याने परिमंडळ-2 पनवेल मधील उरण पोलीस ठाणेचे स्वाधीन अधिकारी  मिरवणूकीचा मार्ग व वेळ निश्चित करणे, जमावाचे वागणे अगर कृत्य याबाबत आदेश देणे, ध्वनीक्षेपकाच्या ध्वनीची तीव्रता निश्चित करुन दिलेली वेळ यावर , जाहीर सभा घेण्याचे ठिकाण, दिनांक व वेळ याबाबत नियंत्रण करणे. यासंदर्भात ले

आधारभूत किंमत धान्य खरेदी योजना:अलिबाग व रोहा येथे भात खरेदी केंद्र सुरु

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.2-   आधारभूत किंमत भात खरेदी योजनेअंतर्गत मार्केटींग फेडरेशन मुंबई यांनी नियुक्त केलेल्या  या अभिकर्ता संस्थांमार्फत शासनाची भात खरेदी केंद्र अलिबाग व रोहा येथे  सुरु करण्यात आली आहेत. भात खरेदीच्या वेळी शेतकऱ्यांनी आपलेकडील जमिनीबाबतचा 7/12 चा उतारा आणणे आवश्यक आहे. उताऱ्यातील धान्य व धानाखालील क्षेत्र पाहून धान, भरडधान्य खरेदी करण्यात येईल. शेतकऱ्यांचे 7/12 उताऱ्यानुसार पीकाखाली क्षेत्र, या वर्षीची पीक   परिस्थिती (पैसेवारी), पीकाचे सरासरी उत्पादन या बाबी विचारात घेऊन धान, भरडधान्य खरेदी करण्यात येईल. 7/12 उतारा आवश्यक ऑनलाईन खरेदी या धानाची खरेदी ही ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने संबंधित शेतकऱ्यांची नोंदणी करणे आवश्यक राहील. यासाठी धान खरेदी केंद्रावर आणताना प्रत्येक शेतकऱ्यांने सोबत आपल्या आधारकार्डाची तसेच बँकेच्या पासबुकाची छायाप्रत आणणे आवश्यक आहे. रोज सायंकाळी खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर खरेदी केंद्रावर आणलेले, परंतु खरेदी न झालेले धान,भरडधान्य सांभाळण्याची जबाबदारी संबंधित शेतकऱ्यांचीच राहील. आधारभूत किंमत निश्चित भाताचा प्रकार-

सशस्त्र सेना ध्वजदिन -2017 निधी संकलन शुभारंभ 8 रोजी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.2- सशस्त्र सेना ध्व्जदिन -2017 निधी संकलन शुभारंभ सोहळा शुक्रवार दि.8 रोजी सकाळी साडे दहा वाजता राजस्व सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ.विजय सुर्यवंशी जिल्हाधिकारी  तथा अध्यक्ष, सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन समिती रायगड यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली   संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ प्र.जाधव (नि.) यांनी कळविले आहे. ०००००

जिल्हा रुग्णालयात मौखिक स्वास्थ्य तपासणी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 2 - येथील जिल्हा रुग्णालया मौखिक स्वास्थ मोहिमेनिमित्त मौखिक स्वास्थ्य तपासणीचे आयोजन दि.२ ते ३१ डिसेंबर या कालावधी करण्यात आले आहे. या मोहिमेचे उदघाटन  शनिवारी  जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास कोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई, डॉ. शैलेश धारवाडकर डॉ.मेहता, दंतशल्यचिकित्सक डॉ.ऋतुजा माळी, डॉ. प्रियंका पिंगळे, अधिसेविका श्रीम.मोरे, दंतरोग तज्ज्ञ जय प्रकाश वाघ आदी  उपस्थित हेाते. या मोहिमेद्वारे जनजागृती व मुख तपासणी करण्यासाठी  रायगड जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय अलिबाग  व आरोग्य विभाग जिल्हा परिषद यांच्या समन्वयाने ही मोहिम राबविण्यात येत आहे. 0000

ओखी चक्रीवादळः जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

अलिबाग,जि. रायगड, दि.2,(जिमाका)- प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्या 2 डिसेंबर रोजीच्या पूर्वसूचनेनुसार पुढील 72 तासांमध्ये ओखी चक्रीवादळामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस (अतिवृष्टी) पडण्याची व समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार असल्याची पूर्वसूचना दिली आहे. त्यामुळे मासेमारीसाठी खोल समुद्रात मच्छिमार गेले असल्यास त्यांना तात्काळ समुद्र किनाऱ्यावर परतण्याचा इशारा देण्यात येत आहे. तसेच चक्रीवादळाचा धोका कमी होईपर्यंत मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा तसेच किनाऱ्यावरील गावांमधील नागरीकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. पूर्वसूचना लक्षात घेवून आपल्या विभागाकडून च्रकीवादळामुळे व अतिवृष्टीमुळे जिवित व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या प्रमाणात उपाय योजना कराव्यात. तसेच अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी आपल्या विभागाकडील बचाव पथक, बचाव साहित्य, रुग्णवाहिका इत्यादी अत्यंत आवश्यक सुविधा तत्पर ठेवण्यात याव्यात. चक्रीवादळामुळे झाडे पडून वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता विचारात घेवून पूर्वतयारी करण्यात यावी. नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्य

उप अधिक्षक भूमि अभिलेख पनवेल कार्यालयाचे नवीन जागेत स्थळांतरण

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 02 :- उप अधिक्षक भूमि अभिलेख पनवेल हे कार्यालय भाडे तत्वावर उरण पनवेल आगरी समाज हॉल, पहिला मजला, कन्या शाळेसमोर पनवेल येथे यापूर्वी कार्यरत होता .परंतु आता ते नवीन जागेत स्थळांतरील झाले असून  त्याचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. सिडको समाज मंदीर, तळमजला, सेक्टर-18 बांठिया शाळेजवळ, नवीन पनवेल असे आहे.असे उप अधिक्षक भूमि अभिलेख पनवेल यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. 0000

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार;अर्जांसाठी 9 तारखेपर्यंत मुदतवाढ

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 2 - महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत प्रतीवर्षी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. यामध्ये राज्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, साहसी उपक्रम, दिव्यांग खेळाडूसह, संघटक, कार्यकर्ता यांचेसाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार तसेच जेष्ठ क्रीडा महर्षीकरीता शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यासंदर्भात सन २०१४-१५, सन २०१५-१६ व सन २०१६-१७  या तीन वर्षासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अर्ज मागविण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर, २०१७  पर्यंत मुदत होती. ती आता अंतिम मुदतवाढ दि. ९ डिसेंबर, २०१७ पर्यंत देण्यात आली आहे. या तीन वर्षासाठी मान्यता प्राप्त खेळांच्या अधिकृत राज्य संघटनेमार्फत त्या त्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील कनिष्ठ व वरिष्ठ गटातील पदक विजेते पुरूष व महिला खेळाडू, साहसी उपक्रम, दिव्यांग राज्य संघटनेच्या कार्यकारीणीच्या ठरावासह अर्जदाराने आपल्या कामगिरीचा तपशिल देऊन विहित नमुन्यात अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.mumbaidivsports.com  या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेल्या link वर अर्ज सादर करावेत. तर ऑनलाईन अर्जा

जिल्हास्तरीय युवा महोत्सव संपन्न

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.२ :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय , महाराष्ट्र राज्य , पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय , रायगड द्वारा व नेहरू युवा केंद्र रायगड-अलिबाग तसेच रूरल आणि यंग फाउंडेशन, स्वरविहार संगीत क्लासेस, निषाद अभिनव रंगछंदी सांस्कृतीक सामाजिक मंडळ व नमन नृत्य संस्थेच्या संयुक्त विद्यमाने  दि . २३ व २४ नोव्हेंबर, २०१७  या कालावधीत  जिल्हास्तर युवक महोत्सव कार्यक्रम उत्साहात पार पडले.             जिल्हास्तर युवा महोत्सवाचे उद्‍घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे व नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक प्रल्हाद सोनुने यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रूरल अण्ड यंग फाउंडेशनचे सामाजिक कार्यकर्ते सुशिल साईकर, राज्य युवा पुरस्कारार्थी प्रतिम सुतार उपस्थित होते.             जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये जिल्ह्यातील स्कुल ऑफ नर्सिंग,अलिबाग,नमन नृत्य संस्था, स्वरविहार संगीत क्लास, निषाद अभिनव रंगछंदी सांस्कृतीक मंडळ तसेच विविध तालुक्यांतील युवक युवतींनी सहभाग घेतला होता. जिल्हास्तर युवा महोत्सवातील स्पर्धांचे परिक्षण चेतन पाटील, विशाल अभंगे, संतोष वाघमारे

जिल्हा नियोजन समिती बैठक :सन 2018-19 चा जिल्हा विकास आराखडा मंजूर

Image
अलिबाग,जि. रायगड, दि.2,(जिमाका)- जिल्हा वार्षिक योजनेच्या सन 2018-19 या आर्थिक वर्षा करीता  रायगड जिल्ह्यासाठी 174 कोटी 70 लक्ष रुपयांच्या विकास आराखड्यास आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस मान्यता देण्यात आली. राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाश महेता यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक पार पडली. यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचे पालकमंत्र्यांनी स्वागत केले. जिल्हा नियोजन समितीची सभा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे गृहनिर्माण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाश महेता हे उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, विधानपरिषद सदस्य आ. जयंत पाटील, विभासभा सदस्य आ. सुरेश लाड, आ. भरत गोगावले, आ. सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, आ. धैर्यशिल पाटील, आ. मनोहर भोईर, आ. प्रशांत ठाकुर, जि.प. उपाध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील तसेच जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी,  अप्पर जिल्हाधिकारी  भरत शितोळे, जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधि

गृहनिर्माण मंत्री ना.प्रकाश महेता यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1– राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.प्रकाश महेता हे शनिवार दि.2 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.  त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे. शनिवार दि. 2 रोजी सकाळी अकरा वा. मांडवा जेटी येथे बोटीने आगमन व मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबागकडे प्रयाण.  सकाळी साडे अकरा वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती.  स्थळ : राजस्व सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग.  दुपारी दोन वा. शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण.  दु. दोन वा.पाच मिनिटानी शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.  दु.तीन वा. शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने मांडवाकडे प्रयाण.  दु. साडेतीन वा. मांडवा येथून बोटीने गेट वे ऑफ इंडिया मुंबईकडे प्रयाण. 00000

पनवेल येथे आजपासून स्व.खाशाबा जाधव राज्यस्तरीय ज्युनियर कुस्ती स्पर्ध : 1500 खेळाडुंचा सहभाग; जय्यत तयारी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30- पनवेल च्या कर्नाळा स्पोर्टस ॲकेडमी मध्ये  शुक्रवार दि.1 ते  रविवार दि.3 डिसेंबर दरम्यान राज्यस्तरीय ज्युनियर व सब ज्युनियर कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. रायगड जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या सौजन्याने व  महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने आयोजित ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा हि 40 वी स्पर्धा आहे. आमदार बाळाराम पाटील हे या स्पर्धेचे निमंत्रक आहेत. या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद चे अध्यक्ष अजित पवार,विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे आमदार जयंत पाटील, आमदार धैर्यशील   पाटील, कर्नाला स्पोर्टस  ॲकेडमीचे अध्यक्ष विवेक पाटील,महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद चे कार्याध्यक्ष नामदेव राव मोहिते,सरचिटणीस बाळासाहेब लांडगे,उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे,खजिनदार सुरेश पाटील उपस्थित राहणार आहेत.   1 डिसेंबर रोजी खेळाडूंचे कर्नाळा स्पोर्टस ॲकेडमीमध्ये आगमन  होईल, त्यांचे वजन केल्यानंतर आरोग्य तपासणी केली ज

माझे आरोग्य माझा अधिकार

एचआयव्ही एडस जनजागृतीसंदर्भात विशेष लेख             एड्स हा आजार जागतिक समस्या आहे. भारतात एड्स आजाराच्या रुग्णाकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टीकोन ही एक मोठी समस्या आहे. कॉलरा, विषमज्वर, मलेरिया, क्षयरोग, कर्करोग इ. आजार हे उपचार व शस्त्रक्रियेद्वारे पूर्णपणे बरे होतात अशा रुग्णांकडे आपण सहजतेन पाहतो. मात्र तितक्याच सहजतेने एड्स रुग्णाकडे पाहण्याचा दृष्टीकोन ठेवला तरच समस्या सुटू शकेल. त्यासाठी आपण आपल्या धोरणात नवी दिशा, नवी गती, सामाजिक व मानसिक दृष्टीकोन ठेवून मानवतावादी चेहरा दिला पाहिजे. मानवी आरोग्य व जगण्याचा अधिकार मिळावा आणि एड्स या जिवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी यासाठी 1 डिसेंबर जागतिक एड्स दिवस म्हणून पाळला जातो. ऑगस्ट 1987 मध्ये जेम्स डब्लू बॅन आणि थॉमस नेटर या दोघांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाझेशन जिनेव्हा (स्वित्झरलँड) येथील जागतिक कार्यक्रमात याची संकल्पना मांडली. डॉ.जॉनथन मान (एड्स ग्लोबलचे संचालक) यांच्या सहमती नंतर 1 डिसेंबर, 1988 पासून जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. या वर्षाचे शासनाचे घोषवाक्य आहे. माझे आरोग्य माझा अधिकार. 1981 मध्ये एड्स या आजाराची

पोलादपूर येथे 28 डिसेंबर रोजी आमसभा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30 - महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाकडील परिपत्रकानुसार पंचायत समिती कार्याचा आढावा घेण्यासाठी  पोलादपूर पंचायत समितीची  सन 2016-17 ची आमसभा गुरुवार दिनांक 28 डिसेंबर रोजी  आयोजित करण्यात आली आहे. महाड-पोलादपूर माणगांव विधानसभा मतदार संघाचे आमदर भरतशेठ गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होईल. गुरुवार दिनांक 28 रोजी सकाळी अकरा वाजता कॅप्टन् विक्रमराव मोरे सभागृह, ता.पोलादपूर येथे या आमसभेचे आयोजन  करण्यात आले आहे. या आमसभेस उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे. ०००००

जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2017 संपन्न

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30- क्रीडा व युवक सेवा संचालनालय , महाराष्ट्र राज्य , पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय , रायगड द्वारा व नेहरू युवा केंद्र रायगड-अलिबाग तसेच रूरल आणि यंग फाउंडेशन, स्वरविहार संगीत क्लासेस, निषाद अभिनव रंगछंदी सांस्कृतीक सामाजिक मंडळ व नमन नृत्य संस्थेच्या सहकार्याने  जिल्हास्तर युवक महोत्सव स्पर्धेचे दि . 23  व 24 नोव्हेंबर, 2017 या कालावधीत आयोजन करण्यात आले होते.             जिल्हास्तर युवा महोत्सवाचे उद्‍घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.महादेव कसगावडे व नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक श्री. प्रल्हाद सोनुने यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रूरल अण्ड यंग फाउंडेशनचे सामाजिक कार्यकर्ते सुशिल साईकर, राज्य युवा पुरस्कारार्थी प्रतिम सुतार उपस्थित होते.             जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये जिल्ह्यातील स्कुल ऑफ नर्सिंग,अलिबाग,नमन नृत्य संस्था, स्वरविहार संगीत क्लास, निषाद अभिनव रंगछंदी सांस्कृतीक मंडळ तसेच विविध तालुक्यांतील युवक युवतींनी सहभाग घेतला होता. जिल्हास्तर युवा महोत्सवातील स्पर्धांचे परिक्षण श्री.चेतन पाटील, श्री.विशाल अ

दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांक मालिका

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे दुचाकी वाहनांच्या नोंदणी क्रमांकाची मालिका संपत असल्याने दुचाकी वाहनांसाठी MH-06/BX ही नवीन मालिका सोमवार दि.4 डिसेंबर, पासून सुरु करण्यात येत आहे. ज्या वाहन धारकांना आपल्या वाहनांसाठी या मालिकेतून आकर्षक वा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करावयाचा असेल त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज पत्याचा पुरावा, फोटो ओळखपत्र, पॅनकार्ड व पसंतीच्या क्रमांकासाठीच्या उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण यांचे नावे काढलेल्या फी च्या राष्ट्रीयकृत बँकेच्या धनाकर्षासह दि.4 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी अडीच या कालावधीत सादर करावे. जनतेच्या माहितीसाठी उपलब्ध क्रमांक व आकारले जाणारे शुल्क याची माहिती कार्यालयात इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे दर्शविण्यात येत आहे. एकाच नोंदणी क्रमांकासाठी एका पेक्षा जास्त अर्ज आल्यास महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार नियमित फी व्यक्तिरिक्त सर्वात जास्त रकमेचा धनाकर्ष सादर करण्याऱ्यास सदर नोंदणी क्रमांक देण्यात येईल. दुचाकी मालिकेतून इतर वाहनांसाठी तिप्पट शुल्क भरुन आकर्षक व पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी अर्

जागतिक एड्स नियंत्रण पंधरवाड्यास जनजागृती रॅलीने प्रारंभ

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30- जागतिक एड्स नियंत्रण दिन (1 डिसेंबर 2017) व पंधरवाड्याचा  प्रारंभ जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करुन करण्यात आला. जिल्हा रुग्णालयापासून निघालेल्या या रॅलीने अलिबाग शहरातील प्रमुख मार्गांवरुन जनजागृती केली. या जनजागृतीपर   रॅलीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी , पोलीस उपअधिक्षक निगो,   जिल्हा माहिती अधिकारी   डॉ. मिलिंद   दुसाने यांचे शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून   करण्यात आले. यावेळी   जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य ) डॉ. सुहास कोरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभा आधी   जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी उपस्थितांना एचआयव्ही एडस निर्मूलन व एचआयव्ही ग्रस्थांच्या मानवाधिकारांचे रक्षण करण्याबाबत शपथ दिली. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रांगणातून रॅलीची सुरुवात   करण्यात आली. शहरातील   महावीर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक बालाजी नाका यामार्गे पुन्हा   जिल्हा सामान्य रुग्णालय प्रांगण येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये नर्सिंग स्कूल व जा.र.ह. कन्या