जिल्हास्तरीय युवा महोत्सव संपन्न
अलिबाग,जि.
रायगड (जिमाका) दि.२:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड द्वारा व नेहरू युवा केंद्र रायगड-अलिबाग तसेच रूरल आणि यंग फाउंडेशन, स्वरविहार संगीत क्लासेस,
निषाद अभिनव रंगछंदी सांस्कृतीक सामाजिक मंडळ व नमन नृत्य संस्थेच्या संयुक्त
विद्यमाने दि. २३ व २४ नोव्हेंबर, २०१७
या कालावधीत जिल्हास्तर युवक
महोत्सव कार्यक्रम उत्साहात पार पडले.
जिल्हास्तर
युवा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे व नेहरू युवा
केंद्राचे जिल्हा समन्वयक प्रल्हाद सोनुने यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी
रूरल अण्ड यंग फाउंडेशनचे सामाजिक कार्यकर्ते सुशिल साईकर, राज्य युवा पुरस्कारार्थी
प्रतिम सुतार उपस्थित होते.
जिल्हास्तर
युवा महोत्सवामध्ये जिल्ह्यातील स्कुल ऑफ नर्सिंग,अलिबाग,नमन नृत्य संस्था,
स्वरविहार संगीत क्लास, निषाद अभिनव रंगछंदी सांस्कृतीक मंडळ तसेच विविध
तालुक्यांतील युवक युवतींनी सहभाग घेतला होता. जिल्हास्तर युवा महोत्सवातील
स्पर्धांचे परिक्षण चेतन पाटील, विशाल अभंगे, संतोष वाघमारे, अमोल कापसे, देवेंद्र
केळुसकर, सुशिल साईकर, श्रीमती हर्षदा माणगांवकर यांनी केले. युवा महोत्सवात
लोकनृत्य, पखवाज, तबला, हार्मोनियम, कथ्थक, भरतनाट्यम, वक्तृत्व स्पर्धेत
स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. वक्तृत्व स्पर्धेत कविता ढाकवळ,माणगाव - प्रथम
क्रमांक, गीता कातकरी,मुरूड - द्वितीय क्रमांक, पखवाज स्पर्धेत विराज म्हात्रे,
मानी, अलिबाग - प्रथम क्रमांक, कुणाल टेमकर, शहाबाज, अलिबाग - द्वितीय क्रमांक,
हार्मोनियम स्पर्धेत विशाल पाटील, आवास, अलिबाग - प्रथम क्रमांक, सौरभ भोईर,
भिलजी, अलिबाग - द्वितीय क्रमांक, तबला
वादन स्पर्धेत प्रसाद वैशंपायन,खानाव,अलिबाग - प्रथम क्रमांक, कुणाल
टेमकर,शहाबाज,अलिबाग - द्वितीय क्रमांक, लोकनृत्य स्पर्धेत नमन गृप,अलिबाग - प्रथम
क्रमांक , एस. ओ. एस. बालग्राम युवा गृप - द्वितीय क्रमांक, कथ्थक स्पर्धेत
देवेश्री थळे,थळ-अलिबाग - प्रथम क्रमांक, सलोनी पाटील, चेंढरे,अलिबाग - द्वितीय
क्रमांक तर भरतनाट्यम स्पर्धेत तेजल धनावडे, अलिबाग - प्रथम क्रमांक, कृपा नाईक,
थळ,अलिबाग - द्वितीय क्रमांक प्राप्त केला. जिल्हास्तर युवा महोत्सवामधील प्रथम
क्रमांक मिळविलेल्या स्पर्धकांनी मुंबई येथे होणाऱ्या विभागस्तर युवा
महोत्सवाकरीता पात्रता मिळविली असून स्पर्धेमधील प्राविण्य प्राप्त स्पर्धकांना
माळरान,कृषी पर्यटन केंद्र,राजमळा, अलिबाग येथे आयोजित कार्यक्रमात नेहरू युवा
केंद्राचे जिल्हा समन्वयक प्रल्हाद सोनुने व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते
प्राविण्य प्रमाणपत्र व चषक प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशिल
साईकर यांनी केले व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे वतीने विशाल बोडके यांनी
उपस्थितांचे आभार व्यक्त करून विभागस्तर स्पर्धेकरीता स्पर्धकांना शुभेच्छा
दिल्या.
०००००
Comments
Post a Comment