Posts

Showing posts from March 6, 2022

पद्मश्री डॉ.हिम्मतराव बावस्कर यांची पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी घेतली सदिच्छा भेट

Image
  अलिबाग , दि. 13( जिमाका):- विंचूदंशावरील औषधोपचारासाठी संशोधनात्मक उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाड येथील डॉ.हिम्मतराव बावस्कर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे , त्यानिमित्त आज पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी डॉ. बावस्कर यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आणि डॉ. बावस्कर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.   या भेटीत पालकमंत्री कु.तटकरे यांनी पद्मश्री डॉ.बावस्कर यांचा विंचूदंशावरील औषधोपचाराचा संशोधनात्मक प्रवास जाणून घेतला आणि आपण रायगडकर असल्याचा अभिमान वाटतो , या शब्दात आनंद व्यक्त केला. यावेळी महाड नगराध्यक्ष स्नेहल जगताप , सुप्रसिद्ध निवेदक संजय भुस्कुटे , डॉ. बावस्कर यांचे कुटुंबीय उपस्थित होते. 00000  

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वादपूर्व व दाखल अशी एकूण 30 हजार 288 प्रकरणे निकाली

Image
  अलिबाग , दि. 13 ( जिमाका):- न्यायालयात वर्षानुवर्षे वाद करीत बसून वेळ , पैसा आणि ताकद खर्च करण्यापेक्षा दोन्ही पक्षांनी सामंजस्याची भूमिका घेवून लोक न्यायालयात समेट घडवावा , असा प्रवाह भारतीय न्यायालयांच्या इतिहासात गेल्या दशकात प्रकर्षाने रूढ झालेला आहे. दि. 12 मार्च 2022 रोजी रायगड जिल्हयात झालेल्या लोकन्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून वादपूर्व व दाखल अशी एकूण 30 हजार 288   प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात यश आले आहे , अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश संदीप स्वामी यांनी दिली आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण , सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण भारतभर राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये न्यायालयांतील प्रलंबित प्रकरणे तसेच न्यायालयात दाखल होण्यापूर्वीची प्रकरणे ठेवण्यात आली होती. रायगड जिल्ह्याच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा प्र. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील दाखलपूर्व व प्रलंबित अशी एकूण 88 हजार 767 प्रकरणे

"विकासाची पंचसूत्री" कार्यक्रमांतर्गत राज्याचा अर्थसंकल्प सादर

Image
  ‘विकासाची पंचसूत्री’ कार्यक्रम राज्यास विकासात मोलाची भूमिका बजावणार -पालकमंत्री कु.आदिती तटकरे   अलिबाग,दि.11(जिमाका):- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी विधानसभेमध्ये केलेल्या भाषणामध्ये पृथ्वी,जल,अग्नी, वायू आणि आकाश पंचतत्वांप्रमाणे राज्याच्या विकासामध्येही कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या विकासाच्या प्रक्रीयेतील महत्त्वाच्या पाच घटकांचा समावेश असणारा ‘विकासाची पंचसूत्री’ या अंतर्गत राज्याचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर केला. 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प ‘विकासाची पंचसूत्री’ कार्यक्रमानुसार रायगडसह कोंकणातील जैवविविधता दर्शविणारे उद्यान रायगड जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे. थोर अर्थतज्ज्ञ पद्मविभूषण डॉ.चिंतामणराव देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मौजे जामगाव, ता.रोहा येथे “ डॉ. चिंतामणराव देशमुख् जैवविविधता वन व वनस्पती उद्यान ” उभारणीची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री ना.श्री.अजित दादा पवार यांनी आज अर्थसंकल्पाच्या भाषणात केली. रायगड जिल्ह्यात भुवनेश्वर ता. रोहा येथे महिला व नवजात शिशू रुग्णालयांचे काम लवकर हाती घेण्यात येणार आहे. रायगड किल्ला व

विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई चालूच राहणार

अलिबाग , दि. 11( जिमाका):- विनामास्क फिरणाऱ्या इसमांवर करण्यात येणारी दंडात्मक कारवाई बंद करुन विनामास्क केसेस करण्यात येवू नयेत , असे पोलीस अधीक्षक , रायगड यांच्या कार्यालयाकडून पाठविण्यात आलेले दि. 07 मार्च 2022 चे पत्र समाजमाध्यमांव्दारे फिरत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. तरी विनामास्क फिरणाऱ्या इसमांवर करण्यात येणारी दंडात्मक कारवाई बंद करण्याबाबत शासनाकडून कोणत्याही प्रकारचे निर्देश जारी करण्यात आलेले नाहीत , असे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी कळविले आहे. विनामास्क केसेस दंड करण्याबाबतचे दि. 07 मार्च 2022 रोजीचे पत्र अपर पोलीस अधीक्षक , रायगड यांनी त्यांच्याकडील दि. 11 मार्च 2022 रोजीच्या पत्रान्वये मागे घेतले आहे. तरी विनामास्क फिरणाऱ्या इसमांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल तसेच शासनाने कोविड- 19 अनुरुप वर्तनासंदर्भात दिलेल्या अटी व शर्तीचे तंतोतंत पालन केले जाईल याची दक्षता घ्यावी , असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे. 00000

कौटुंबिक न्यायालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष चर्चासत्राचे यशस्वी आयोजन

    अलिबाग, दि.10 (जिमाका):- कौटुंबिक न्यायालय, रायगड-अलिबाग आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने कौटुंबिक न्यायालय येथे दि.08 मार्च 2022 रोजी दुपारी 2.00 वाजता आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष चर्चासत्राचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची मूळ संकल्पना “ निरोगी कौटुंबिक नातेसंबंध-काळाची गरज आणि आव्हाने ” अशी होती. या चर्चासत्रात “ कौटुंबिक वादासंबंधी कायदे आणि कुटुंब व विवाहसंस्था ” या विषयावर अॅड.मानसी म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले. तसेच “ कौटुंबिक वादाचे लहान मुलांवर होणारे परिणाम ” या विषयावर अॅड.झेमसे यांनी मार्गदर्शन केले. “ निरोगी कौटुंबिक नातेसंबंध काळाची गरज आणि आव्हाने ” या विषयावर श्रीमती सुचेता मेहंदळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कौटुंबिक न्यायालय, रायगड-अलिबाग न्यायाधीश श्रीमती ए.ए. शिंदे यांनी कौटुंबिक न्यायालयाची भूमिका आणि दृष्टीकोन याबाबत आपली मते मांडली. त्याचबरोबर वैकल्पिक वाद निवारण केंद्राची भूमिका याबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग सचिव श्री.एस.व्ही स्वामी यांनी आपली भूमिका मांडली. या कार्य

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते माणगाव तहसिल कार्यालय येथे “गरुडझेप” स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन अभ्यासिकेचे उद्घाटन

Image
  अलिबाग, दि.10 (जिमाका):- जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या “ गरुडझेप स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन ” केंद्रांतर्गत दि.09 मार्च 2022 रोजी माणगाव तहसिल कार्यालय येथे अभ्यासिकेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांच्या हस्ते पार पडले. या अभ्यासिकेच्या माध्यमातून सर्व महाविद्यालयीन तसेच स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना विविध पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. तसेच ही अभ्यासिका पूर्ण आठवडाभर 24 तास सुरु राहणार असल्याबाबत जाहीर करण्यात आले. या कार्यक्रमास माणगाव उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रशाली जाधव-दिघावकर, श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी श्री.अमित शेडगे, माणगाव तहसिलदार प्रियांका आयरे, तळा तहसिलदार श्री.ए.एम.कलशेट्टी तसेच माणगाव तालुक्यातील इतर अधिकारी वर्ग आणि द.म.तटकरे महाविद्यालयातील प्राध्यापक श्री.बबन शिनगारे व विद्यार्थी, नागरिक, पत्रकार हजर होते. तसेच जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या आगमनाचे औचित्य साधून महाराजस्व अभियान कातकरी उत्थान अंतर्गत जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सप्तसूत्री कार्यक्रमांतर

पोषण महिना अभियान लोकसहभागात रायगड जिल्हा प्रथम

Image
    अलिबाग,दि.08 (जिमाका):- देशातील कुपोषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारतर्फे   सप्टेंबर 2021 मध्ये पोषण महिना अभियान राबविण्यात आला होता. रायगड जिल्ह्याने या अभियानात उत्कृष्ट कामगिरी बजावली, तसेच या अभियानाला उत्तम लोकसहभाग मिळाल्याने राज्यात लोकसहभागामध्ये रायगड जिल्ह्याने अव्वल स्थान पटकाविले असून या कामगिरीबद्दल मंगळवार (दि.08 मार्च रोजी) महिला दिनानिमित्त राज्य शासनातर्फे मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे रायगड जिल्हा प्रशासनास प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर, राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर, महिला व बालविकास विभाग प्रधान‌ सचिव आय.ए. कुंदन, आयुक्त रुबल आग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. रायगड जिल्ह्यातर्फे जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, जिल्हाधिकारी तथा पोषण अभियान अध्यक्ष डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, महिला व बालकल्याण सभापती गीता जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी

दोन वर्ष जनसेवेची…“महाविकास” आघाडीची. जिल्ह्यात उद्यापासून होणार लोककलापथकांच्या माध्यमातून विकासकामांचा जागर.

  अलिबाग,दि.08 (जिमाका):- राज्यातील महाविकास आघाडी शासनाला नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाली असून त्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये लोककलेच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जाणार असून यासाठी शासनमान्य यादीवरील लोककला पथकांमधील तीन पथकांची निवड करण्यात आली आहे.       ‘दोन वर्ष जनसेवेची, 'महाविकास' आघाडीची’ या घोषवाक्यासह जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या रायगड-अलिबाग जिल्हा माहिती कार्यालयामार्फत व्यापक जनजागृती केली जाणार आहे.          गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडी शासनाने केलेली कामे, राबविलेल्या योजना यांची माहिती जनतेला व्हावीत, यासाठी लोककलेच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातीलच कलाकारांना यासाठी संधी देण्यात आली आहे. याद्वारे रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील वेगवेगळ्या गावांमध्ये विविध लोककलापथकांच्या माध्यमातून विकासाचा जागर होणार आहे. उद्या दि.09 मार्च 2022 पासून ही मोहीम सुरू होणार आहे.      जिल्ह्यातील विविध गावांमध्ये लोककलापथकांच्या कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. त्यात ज

मुख्य निवडणूक अधिकारी व जिल्हा निवडणूक कार्यालयद्वारा आयोजित “स्त्रिया आणि लोकशाही” परिसंवाद कार्यक्रम संपन्न

Image
पुरुषप्रधान समाजामध्ये महिलांच्या समस्यांवर  उत्तर शोधण्याचे काम पुरुषांचे सुद्धा - मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे   अलिबाग,दि.08 (जिमाका):- ज्या समाजामध्ये स्त्रिया आहेत, त्या समाजाचे घटक पुरुष आहेत. या पुरुषप्रधान समाजामध्ये महिलांच्या समस्यांवर उत्तर शोधण्याचे काम पुरुषांचे सुद्धा आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज येथे केले. जागतिक महिला दिनानिमित्त आज (दि.08 मार्च) रोजी मुख्य निवडणूक अधिकारी व जिल्हा निवडणूक कार्यालय, जे.एस.एम महाविद्यालयाद्वारा अलिबाग येथील पी.एन.पी नाट्यगृह येथे “ स्त्रिया आणि लोकशाही – लोकशाही गप्पा (भाग 5) ” या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले की, मी आजच्या जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. मी सर्वांना हा शब्द जाणीवपूर्वक वापरलेला आहे. डॉ.दीपक पवार यांनी सांगितले की, हा कार्यक्रम जरी महिला दिनाचा तरी तो केवळ महिलांसाठी नाही आहे तर हा सगळ्यांचा कार्यक्रम आहे. त्यामुळेच सर्वांना हा शब्द मी जा

रायगड भूषण हा मानाचा पुरस्कार. पुरस्कारप्राप्त व्यक्तींनी आणखी जोमाने काम करावे - पालकमंत्री कु.आदिती तटकरे

Image
    अलिबाग,दि.06 (जिमाका):- आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून, समाजासमोर आदर्श ठेवणाऱ्या व्यक्तींचा रायगड जिल्हा परिषदेतर्फे रायगड भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येत आहे. रायगड भूषण पुरस्कार अत्यंत मानाचा पुरस्कार असून, हा पुरस्कारप्राप्त व्यक्तींची जबाबदारी आणखी वाढली असल्याने त्यांनी यापुढे आणखी जोमाने काम करावे, असे आवाहन रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज (दि.06 मार्च) रोजी अलिबाग येथे आयोजित रायगड भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमात केले. रायगड जिल्हा परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या रायगड भूषण पुरस्कारांचे वितरण पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते रविवारी अलिबाग येथील पी.एन.पी. नाट्यगृहात करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी माजी मंत्री मीनाक्षी पाटील, आमदार बालाराम पाटील, माजी आमदार पंडित पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, अर्थ व बांधकाम सभापती नीलिमा पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती गीता जाधव, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बबन मनवे, विरोधी पक्षनेते

अलिबाग येथील वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ संपन्न

Image
  संविधानाने नागरिकांना दिलेल्या अधिकारांचे रक्षण  व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध                                          -मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता     अलिबाग,दि.06 (जिमाका):- भारतीय संविधानाने सर्वांना स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वांवर आधारित विविध प्रकारचे अधिकार प्रदान केले आहेत, यापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी आपण सर्वांनी न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून कटिबद्ध राहायला हवे, असे प्रतिपादन उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री.दिपांकर दत्ता यांनी आज येथे केले. रायगड-अलिबाग वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ आज (रविवार, दि.06 मार्च) रोजी न्याय सेवा सदन, जिल्हा व सत्र न्यायालय, रायगड-अलिबाग येथे उत्साहात संपन्न झाला, त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई तथा कार्यकारी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई श्री.ए.ए.सय्यद, न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई तथा पालक न्यायमूर्ती, रायगड-अलिबाग श्री.गिरीश कुलकर्णी, उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक श्री.महेंद्र