विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई चालूच राहणार


अलिबाग,दि.11(जिमाका):- विनामास्क फिरणाऱ्या इसमांवर करण्यात येणारी दंडात्मक कारवाई बंद करुन विनामास्क केसेस करण्यात येवू नयेत, असे पोलीस अधीक्षक, रायगड यांच्या कार्यालयाकडून पाठविण्यात आलेले दि.07 मार्च 2022 चे पत्र समाजमाध्यमांव्दारे फिरत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.

तरी विनामास्क फिरणाऱ्या इसमांवर करण्यात येणारी दंडात्मक कारवाई बंद करण्याबाबत शासनाकडून कोणत्याही प्रकारचे निर्देश जारी करण्यात आलेले नाहीत,असे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी कळविले आहे.

विनामास्क केसेस दंड करण्याबाबतचे दि.07 मार्च 2022 रोजीचे पत्र अपर पोलीस अधीक्षक, रायगड यांनी त्यांच्याकडील दि.11 मार्च 2022 रोजीच्या पत्रान्वये मागे घेतले आहे.

तरी विनामास्क फिरणाऱ्या इसमांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल तसेच शासनाने कोविड-19 अनुरुप वर्तनासंदर्भात दिलेल्या अटी व शर्तीचे तंतोतंत पालन केले जाईल याची दक्षता घ्यावी,असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक