Posts

Showing posts from February 28, 2021

अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींनी अंतिम प्रमाणपत्र पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून घेऊन जावे

    अलिबाग,जि.रायगड,दि.04 (जिमाका):- अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा 105 वी (एप्रिल 2017), 106 वी (ऑक्टोबर 2017) आणि 107 वी (एप्रिल 2018) शिकाऊ उमेदवार योजनेंतर्गत मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, पनवेल येथे झालेल्या परीक्षेचे अंतिम प्रमाणपत्र मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, पनवेल येथे डीजीईटी, नवी दिल्ली यांच्याकडून प्राप्त झाले आहेत. तरी संबंधित प्रशिक्षणार्थींनी आपले अंतिम प्रमाणपत्र कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत स्वतः उपस्थित राहून प्राप्त करून घ्यावेत, सोबत मूळ गुणपत्रक आणावे, असे आवाहन अंशकालीन प्राचार्य, मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगीक सूचना केंद्र, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल यांनी केले आहे. ००००००

आरटीई अंतर्गत 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 21 मार्चपर्यंत जिल्ह्यात पात्र शाळा 272 पूर्व प्राथमिक वर्गासाठी 228 तर प्राथमिक वर्गासाठी 4 हजार 08 जागा राखीव

                  अलिबाग,जि.रायगड,दि.04 (जिमाका):- जिल्हयात बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (1) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित व स्वंय अर्थसहाय्यित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25 टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकांकरिता आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दि. 3 मार्च ते 21 मार्च 2021 या कालावधीमध्ये रायगड जिल्हयात सुरु होत आहे. आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत जिल्ह्यातील 272 पात्र शाळा आहेत. या शाळांमध्ये पूर्व प्राथमिक वर्गासाठी 228 व प्राथमिक वर्गासाठी 4 हजार 08 जागा राखीव आहेत.                               तरी पालकांनी 25 टक्के ऑनलाईन प्रवेशाकरिता अर्ज भरण्यास सुरुवात करावी, तसेच याबाबत सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी व सर्व पात्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी पालकांना आरटीई ऑनलाईन प्रवेशाबाबत मार्गदर्शन करावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती शीतल पुंड यांनी केले आहे. 0000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त अर्ज करावेत -- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखेले

    अलिबाग,जि.रायगड, दि.4,(जिमाका) :- महाराष्ट्र राज्य हे फलोत्पादनामध्ये अग्रेसर असून राज्यात मोठया प्रमाणात फळे व भाजीपाला पिकांचे व्यावसायिक पध्दतीने लागवड करून उत्पादन घेतले जाते.   तसेच त्याची निर्यातही मोठया प्रमाणात करण्यात येते.   मागील 2 ते 3 वर्षांमध्ये भाजीपाला पिकांचे निर्यातक्षम व विषमुक्त उत्पादन करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.   त्यामुळे भाजीपाला बियाणांच्या चांगल्या जाती व चांगली रोपे यांची मागणी वाढत आहे. त्यादृष्टीने नियंत्रित वातावरणामध्ये तयार झालेली किड व रोगमुक्त भाजीपाला रोपांची मागणी मोठया प्रमाणावर वाढत आहे. जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात दर्जेदार किड व रोगमुक्त रोपे तयार करणाऱ्या लहान रोपवाटिका उभारण्यास वाव आहे. या उद्देशाने शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना नव्याने सुरु केली आहे. रोपवाटिकेमुळे स्थानिक शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाची संधी उपलब्ध करुन देणे व पिक रचनेत बदल घडवून आणणे तसेच नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न व भाजीपाला उत्पादनात वाढ करण्यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह

शासनाचा मत्स्यव्यवसाय विभाग मच्छिमार, मत्स्यसंवर्धन लाभार्थ्यांसाठी तत्पर

  विशेष लेख क्र.9                                                                                    दिनांक :- 03 मार्च   2021   रायगड जिल्ह्याला समुद्रकिनाऱ्याचे नैसर्गिक वैभव प्राप्त आहे.   या समुद्रकिनाऱ्यावर येथील मच्छिमारांची उपजीविका अवलंबून आहे. या मच्छिमारांच्या सहाय्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. कोणत्या आहेत या योजना… जाणून घेऊ या पुढील लेखातून…!     किसान क्रेडिट कार्ड :- “ किसान क्रेडीट कार्ड ” या योजनेंतर्गत मच्छिमारांना त्यांच्या उपलब्ध नौकांच्या आधारावर नवीन अल्प मुदत कर्ज देण्यात येते.   डिझेल तेलावरील मूल्यवर्धित कर प्रतिपूर्ती :- या योजनेंतर्गत मच्छिमारांनी खरेदी केलेल्या डिझेल तेलावरील कराची किंमत कर प्रतिपूर्ती म्हणून मच्छिमारांना परत देण्यात येते. या संस्थेच्या यांत्रिक नौका सभासदांना, मासेमारी नौकांना डिझेल प्रतिपूर्तीसाठी तरतूद प्राप्त झाल्यावर प्राप्त तरतूदीच्या अधीन राहून मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थाच्या यांत्रिक नौका सभासदांच्या खाती डिबीटी व्दारे रक्कम वाटप करण्यात येते.   आधारकार्ड अपडेशनबाबत कार्यवाही :- मच्छिमारांकर

मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा तहसिल कार्यालय यांच्याशी संपर्क साधून e-EPIC डाऊनलोड करून घ्यावे

  अलिबाग,जि.रायगड,दि.3 (जिमाका) :- मा.भारत निवडणूक आयोगाद्वारे ज्या मतदाराने त्याचा एकल (Unique) मोबाईल क्रमांक नोंदविलेला आहे, अशा मतदारांना e-EPIC डाऊनलोड करण्याची सुविधा राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल व मतदार सहाय्यता ॲपद्वारा उपलब्ध करून दिली आहे.   यानुसार दि.01 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमांतर्गत एकूण प्राप्त मतदारांनी त्यांचा एकल (Unique) मोबाईल क्रमांक नोंदविलेला आहे.   यापैकी ज्या मतदारांनी e-EPIC डाऊनलोड करून घेतलेले नाही, अशा सर्व मतदारांनी e-EPIC डाऊनलोड करून घेण्याकरिता आवश्यक त्या प्रभावी उपाययोजना करण्याबाबत आयोगाचे निर्देश आहेत.   यानुषंगाने जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रातील सर्व मतदान केंद्रांवर व तहसिल कार्यालयात शनिवार, दि. 6 मार्च 2021 व रविवार, दि.7 मार्च 2021   या दोन दिवशी e-EPIC डाऊनलोड करण्याबाबत विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच ज्यांनी आपला एकल (Unique) मोबाईल नंबर नोंदविलेला आहे, अशा मतदारांनी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा तहसिल कार्यालय यांच्याशी संपर्क साधून e-EPIC

दि.21 फेब्रुवारी ते दि.2 मार्च या कालावधीत कोविड-19 बाबत नियमांचे उल्लंघन झालेल्या ठिकाणी प्रशासनाची दंडनीय कारवाई करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे नागरिकांना आवाहन

    अलिबाग,जि.रायगड, दि.3,(जिमाका) :- जिल्ह्यात दि.21 फेब्रुवारी ते दि.2 मार्च 2021 या कालावधीत कोविड-19 बाबत नियमांचे उल्लंघन झालेल्या ठिकाणी व सार्वजनिक ठिकाणी विनामास्क आढळलेल्या नागरिकांवर केलेल्या दंडनीय कारवाईची माहिती जिल्हा प्रशासनाकडून पुढीलप्रमाणे देण्यात आली आहे.             भेटी दिलेल्या ठिकाणांची एकूण संख्या-4 हजार 507, उल्लंघन आढळलेल्या ठिकाणांची एकूण संख्या-501, दंड आकारलेल्या ठिकाणांची एकूण संख्या-307, दंडाची एकूण रक्कम-रु.1 लाख 48 हजार 240, सार्वजनिक ठिकाणी विना मास्क आढळलेल्या नागरिकांची एकूण संख्या-482, विना मास्क आढळलेल्या नागरिकांपैकी दंड आकारलेल्या नागरिकांची एकूण संख्या-256, विना मास्क आढळलेल्या नागरिकांकडून वसूल दंड एकूण रक्कम-रु.1 लाख 17 हजार 942.             करोना विषयी उद्भवलेल्या परिस्थितीनुसार प्रत्येक नागरिकाने मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, वारंवार साबणाने हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे या गोष्टींचे स्वत:साठी , स्वत:च्या कुटुंबासाठी तसेच समाजासाठी काटेकोर पालन करणे, ही गरज बनली आहे. तरी नागरिकांनी शासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांच

शासकीय माध्यमिक आश्रमशाळा साईसाठी पनवेलमधील मौजे डोलघर येथील जागा हस्तांतरित

    अलिबाग,जि.रायगड, दि.3,(जिमाका) :- पनवेल तालुक्यातील मौजे डोलघर येथील स.नं.82/1 क्षेत्र 53-21-00 हेक्टर आर. पैकी क्षेत्र 70 एकर सरकारी परीघ जमीन एकलव्य रेसिडन्सी स्कूल, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी क्रीडा प्रबोधिनी सुरु करणे, लिडरशीप डेव्हलपमेंट ॲकडमी व शासकीय माध्यमिक आश्रमशाळा साई या शाळेसाठी उपलब्ध व्हावी, याकरिता विनंती करण्यात आली होती. शासकीय माध्यमिक आश्रमशाळा साई ही भाडे तत्वावरील जागेत सुरु होती. मात्र शासकीय आश्रमशाळांची स्वत:ची इमारती असावी, या उद्देशाने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या विषयाचा पाठपुरावा करुन जिल्हा प्रशासनास त्याप्रमाणे निर्देश दिले.             त्यानुषंगाने या आश्रमशाळेसाठी   पनवेल तालुक्यातील मौजे डोलघर येथील स.नं.82/1 क्षेत्र 53-21-00 हेक्टर आर. पैकी क्षेत्र 2-00-00 हेक्टर आर सरकारी परीघ जमीन महसूल मुक्त व सारामाफीने जागा हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी नुकतेच पारित केले आहेत.              शासकीय कार्यालये, शासकीय शाळा यांच्यासाठी स्वतःची शासकीय वास्तू असावी,यासाठी गेल्या काही महिन्यांपासून पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी

“वॉर रूम” हेच घर --अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर

Image
  विशेष लेख क्र.8                                                                                     दिनांक :- 02 मार्च   2021 महापालिकेचे नियमित चालणारे काम प्रचंड असते त्यातच हे करोनाचे संकट ओढवल्याने खूप मोठी जबाबदारी पालिकेवर येऊन पडली. पनवेल महापालिकेची स्थापना होऊन थोडाच काळ झाल्याने कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित असल्याने कामाचे नियोजन करणे अवघड होत होते. असे असताना देखील पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन अधिक गांभीर्याने करोना काळात आघाडीच्या सैन्यफळीसारखे लढायला लागले. त्यातच प्रामुख्याने नव्याने रूजू झालेल्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनीही कामाला जोमाने सुरुवात केली. याआधीचा कल्याण–डोंबिवली आणि नवी मुंबई महानगरपालिकेतील प्रशासकीय अनुभव त्यांच्या गाठीशी   होता, तो या ठिकाणी उपयोगी आला.              आयुक्तांच्या सूचना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवत त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी जातीने लक्ष दिले. एका बाजूला नियम राबवायचे त्याचबरोबर नागरिकांत असंतोष पसरू नये, याची काळजी घ्यायची, अशा दुहेरी भूमिका त्यांना पार पाडाव्या लागत होत्