Posts

Showing posts from August 6, 2017

पालकमंत्री प्रकाश महेता यांचा रायगड जिल्हा दौरा

            अलिबाग दि.11 (जिमाका) गृहनिर्माण मंत्री  तथा पालकमंत्री रायगड जिल्हा मा.ना.प्रकाश महेता हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार दि.14 ऑगस्ट, 2017 रोजी सायंकाळी 6.00 वा. घाटकोपर मुंबई येथून अलिबाग, जि.रायगड कडे प्रयाण.  रात्रौ 9.00 वा. शासकीय विश्रामगृह अलिबाग येथे आगमन व मुक्काम.  मंगळवार दि. 15 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 8.50 वा. शासकीय विश्रामगृह येथून पोलीस परेड ग्राऊंड  अलिबागकडे प्रयाण.  8.55 वा. पोलीस परेड ग्राऊंड येथे आगमन.  9.05 वा. भारतीय स्वातंत्र्याच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. 10.00 वा.रायगड जिल्ह्यातील गणेशोत्सवानिमित्त करावयाच्या उपाययोजना, जिल्हा शांतता समिती बैठक, कायदा व सुव्यवस्था आणि विभागप्रमुखांची आढावा बैठक, रायगड जिल्ह्यातील सर्व कंपनी व्यवस्थापनाच्या प्रतिनिधी समवेत बैठक.  (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग.)  दुपारी 12.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथून शासकीय विश्रामगृह अलिबाग कडे प्रयाण. 12.15 वा. ते 1.00 वा. राखीव. दुपारी 1.00 वा. अलिबाग येथून म

शासनाच्या विविध योजना कातकरी समाजपर्यंत पोहचविणे आवश्यक - कोकण विभागीय आयुक्त –डॉ.जगदीश पाटील

Image
               अलिबाग दि 11 (जिमाका): कातकरी समाजाच्या उन्नतीसाठी असलेल्या शासनाच्या कल्याणकारी विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहचविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कोकण विभागाचे आयुक्त डॉ.जगदीश पाटील यांनी आज येथे केले.  कातकरी उत्थान अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित केलेल्या कार्यशाळेत ते  बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, प्र.जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पी.डी.सिगेदार, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण प्रसाद खैरनार, अनुलोमचे लोकराज्य महाअभियानचे माहिती ज्ञान अधिकारी स्वानंद ओक, कोकण विभागाचे प्रमुख सदाशिव चव्हाण रायगडचे प्रमुख रविंद्र पाटील  आदि उपस्थित होते.   यावेळी मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की, कृषी विभाग, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक,  अशा चार जणांची काही पथके यासाठी तयार करण्यात आली आहेत.   ही पथके प्रत्यक्ष कातकरी  कुटुंबाना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतील.   भात काढणी झाल्यानं

ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा रायगड जिल्हा दौरा

  अलिबाग दि.11 (जिमाका) ना. चंद्रशेखर बावन कुळे मंत्री ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्य उत्पादन शुल्क  यांचा रायगड जिल्ह्यातील दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. बुधवार दि.23 ऑगस्ट, 2017 रोजी सकाळी 8.30 वा. मुंबईहून मोटारीने पनवेलकडे प्रयाण. 10.30 वा. शासकीय विश्रामगृह पनवेल येथे आगमन व राखीव. 11.00 ते दुपारी 1.00 वा. जनतेच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी राखीव. स्थळ :- अधिक्षक अभियंता महावितरण यांचे कार्यालयाचे प्रांगण. दुपारी 1.00 ते 2.00 वा. राखीव. 2.00 ते सायंकाळी 4.00 वा. लोकप्रतिनिधी समवेत बैठक. 4.00 ते 4.30 वा. पत्रकार परिषद. सांय. 4.30 वा. पनवेल येथून मुंबईकडे मोटारीने प्रयाण. 000000

राष्ट्रीय विमुक्त जाती व भटक्या जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकू इदाते यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

         अलिबाग दि. 11:- (जिमाका)    राष्ट्रीय विमुक्त जाती व भटक्या जमाती आयोगाचे अध्यक्ष, भिकू इदाते हे दिनांक 15 एप्रिल 2017 रोजी रायगड जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.              शनिवार दिनांक 12 ऑगस्ट 2017 रोजी सांय. 5.00 वा. कल्याण येथून मोटारीने पनवेलकडे प्रयाण. पनवेल शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. रविवार दिनांक 13 ऑगस्ट, 2017 रोजी सकाळी 6.00 वा. पनवेल येथून मोटारीने पुणे कडे प्रयाण. 00000

शालेय व इतर क्रीडा स्पर्धा आयोजनात खेळप्रकारांच्या नवीन वयोगटांचा समावेश

अलिबाग दि.11, (जिमाका), क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय खेळ महासंघाने खालील नमूद खेळ प्रकारांच्या नवीन वयोगटांचा समावेश सन 2017-18 या वर्षापासून केला आहे. कुस्ती फ्री स्टाईल , - सन 2017-18 मध्ये आयोजित होणारे वयोगट 14, 17, 19 वर्षे मुले व मुली. कुस्ती ग्रिकोरोमन-17, 19 वर्षे मुले सन 2017-18 मध्ये नव्याने समावेश झालेला वयोगट 14 वर्षे मुली.  रग्बी  सन 2017-18 मध्ये आयोजित होणारे वयोगट 14, 17, 19 वर्षे मुले व मुली सन 2017-18 मध्ये नव्याने समावेश झालेला वयोगट 14 वर्षे मुले व मुली.  रस्सीखेच  सन 2017-18 मध्ये आयोजित होणारे वयोगट 14, 17, 19 वर्षे मुले व मुली सन 2017-18 मध्ये नव्याने समावेश झालेला वयोगट 14 वर्षे मुले व मुली. पॉवरलिफ्टींग  सन 2017-18 मध्ये आयोजित होणारे वयोगट  17, 19 वर्षे मुले व मुली सन 2017-18 मध्ये नव्याने समावेश झालेला वयोगट 17 वर्षे मुले व मुली.  डॉजबॉल   सन 2017-18 मध्ये आयोजित होणारे वयोगट 17, 19 वर्षे मुले व मुली सन 2017-18 मध्ये नव्याने सम

समान व असमान निधी योजनेसाठी अर्ज सादर करावेत

अलिबाग दि.11, (जिमाका) भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकत्ता अंतर्गत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांसाठी कार्यान्वित असलेल्या अर्थसहाय्याच्या समान निधी व असमान निधी योजनांमधून ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य,  नगर भवन, मुंबई यांच्या मार्फत दरवर्षी अर्थसहाय्य देण्यात येते. त्या संदर्भातील नियम, अटी व आर्जचा नमुना  www.rrrl f.nic.in  या प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी तो या संकेतस्थळावरून उपलब्ध करून घ्यावा. समान निधी योजना 2016-17 साठी राज्य शासनाच्या 50 टक्के व प्रतिष्ठानच्या 50 टक्के अर्थसहय्य. सार्वजनिक ग्रंथालयांना इमारत विस्तार/बांधणीसाठी अर्थसहाय्य (कमाल मर्यादा 10 लक्ष) असमान निधी योजना 2016-17 व 2017-18 साठी ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन साम्रगी, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य (यामध्ये प्रतिष्ठानचे 75 टक्के व इक्ष्छूक ग्रंथालय 25 टक्के हिस्सा). सार्वजनिक ग्रंथालयातील बाल विभाग, महिला विभाग, जेष्ठ नागरीक विभाग, नवसाक्षर विभाग, स्वतं

जिल्ह्यातील रस्ते व पुलाच्या सद्यस्थितीबाबत आढावा बैठक संपन्न

अलिबाग दि. 10:- (जिमाका) जिल्ह्यातील रस्ते व पुलाच्या सद्यस्थितीबाबतबत जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात  दि. 8 ऑगस्ट 2017 रोजी बैठक संपन्न झाली.         या बैठकीला   मुख्य कार्यकारी अधिकारी  रा.जि.प.अलिबाग डॉ.अविनाश गोटे, जिल्हा पोलीस अधिक्षक रायगड-अलिबाग अनिल पारसकर, प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पनवेल, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग विलास पाटील, महाड व्ही.आर.सातपुते, व पनवेल आर.एस.मोरे,  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण राजेंद्र मदणे व पनवेल लक्ष्मण दराडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, जेएसडब्ल्यू, वेलस्पन, रिलायन्स कंपन्याचे प्रतिनिधी इत्यादी अधिकारी, प्रतिनिधी  उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये   मान्सून कालावधी व आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्ग व इतर प्रमुख रस्त्यावरील खड्डे व धोकादायक पुलांच्या सद्यस्थितीचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. आढाव्यानंतर दि.20 ऑगस्ट 2017 पूर्वी राष्ट्रीय महामार्गावरील व इतर प्रमुख रस्त्यावरील खड्डे भरुन रस्ता वाह

भात पीक कीड रोग नियंत्रण वेळीच करणे महत्वाचे

Image
               अलिबाग दि.10 (जिमाका)   आपल्या देशातील बहुसंख्य लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश असतो . भाताची प्रति हेक्टरी उत्पादकता फारच कमी आहे . ती वाढविण्यासाठी अधिक उत्पन्न देणाऱ्या जाती , रासायनिक , जैविक सेंद्रिय खतांचा योग्य वापर या बरोबरच किडी व रोगांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी पीक संरक्षणाची एकात्मिक उपाय योजना करणे आवश्यक आहे .   किडरोग सर्व्हेक्षण व सल्ला प्रकल्प अंतर्गत किड रोगांचे सर्व्हेक्षण सुरु आहे . किड रोगांचा प्रादुर्भाव अढळल्यास तसे सल्ला पत्रके ग्रामपंचायत कार्यालयात लावली जाणार आहेत तरी शेतक - यांनी त्याचा लाभ घ्यावा व त्याप्रमाणे उपाययोजना कराव्यात . भातपिकांवर खाला पू र , पनवेल , कर्जत व उरण या तालुक्यात साधारणत : खोडकीडा , पाने गुंडाळनारी अळी , तसेच कडाकरपा अल्प प्रमाणात आढळून येत आहे. तरी त्यांचे नियंत्रण करण्यासाठी काही मूलभूत गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे . तसेच सुरळीतील अळी, लष्करी अळी या किडींच्या नियंत्रणासाठी पीक संरक्षणाच्या निरनिराळ्या पद्धतीचे ज्ञान , किडींचा प्रादुर्भ