भात पीक कीड रोग नियंत्रण वेळीच करणे महत्वाचे


             अलिबाग दि.10 (जिमाका)  आपल्या देशातील बहुसंख्य लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश असतो. भाताची प्रति हेक्टरी उत्पादकता फारच कमी आहे. ती वाढविण्यासाठी अधिक उत्पन्न देणाऱ्या जाती, रासायनिक, जैविक सेंद्रिय खतांचा योग्य वापर या बरोबरच किडी रोगांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी पीक संरक्षणाची एकात्मिक उपाय योजना करणे आवश्यक आहे.  किडरोग सर्व्हेक्षण व सल्ला प्रकल्प अंतर्गत किड रोगांचे सर्व्हेक्षण सुरु आहे. किड रोगांचा प्रादुर्भाव अढळल्यास तसे सल्ला पत्रके ग्रामपंचायत कार्यालयात लावली जाणार आहेत तरी शेतक-यांनी त्याचा लाभ घ्यावा व त्याप्रमाणे उपाययोजना कराव्यात.
भातपिकांवर खालापू, पनवेल, कर्जत व उरण या तालुक्यात साधारणत: खोडकीडा, पाने गुंडाळनारी अळी, तसेच कडाकरपा अल्प प्रमाणात आढळून येत आहे. तरी त्यांचे नियंत्रण करण्यासाठी काही मूलभूत गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. तसेच सुरळीतील अळी, लष्करी अळी या किडींच्या नियंत्रणासाठी पीक संरक्षणाच्या निरनिराळ्या पद्धतीचे ज्ञान, किडींचा प्रादुर्भाव, उपायांची योग्य वेळ, योग्य किटकनाशकांची निवड, पिकांची अवस्था इत्यादीची माहिती खालील प्रमाणे. 
) खोडकिडा : या किडीचे पतंग पिवळसर असून मादी नरा पेक्षा आकाराने मोठी असते. मादीच्या पुढील पंखांच्या जोडीवर मध्य भागी एक एक काळा ठिपका असतो.  अळी प्रथम पानाच्या कोवळ्या भागावर उपजिवीका करते आणि नंतर खोडामध्ये शिरून आतील भाग खाण्यास सुरुवात करते. किडीचा प्रादुर्भाव जर पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत म्हणजेच पीक पोटरीवर येण्यापूर्वी झाला तर मधला गाभा वरून खाली सुकत येतो, याला 'गाभाजळणे' असे म्हणतात. कीड जर पीक पोटरीवर आल्या नंतर पडली तर दाणे भरलेल्या पांढऱ्या ओंब्या बाहेर पडतात, त्याला 'पळीज' किंवा पांढरी पीशीम्हणतात. खोड किडीचे नियंत्रण कोणत्याही एका उपायाने होणे अशक्यआहे. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा एकत्रितपणे अवलंब करावयास हवा. त्यापैकी पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिकाच्या काढणी नंतर शेतातील धसकटे काढून ती जाळून टाकावीत. तसेच पिकाची कापणी करताना शक्य तो जमिनी लगत करावी. कापणी साठी कोकण कृषि विद्यापीठाने तयार केलेला 'वैभव' विळा वापरावा. लावणी नंतर शेतात टक्के कीड ग्रस्त फुटवे आढळल्या किंवा एक चौरस मीटर क्षेत्रात किडीचा एक अंडी पुंज आढळल्यास किंवा प्रकाश पिंजऱ्यात या किडीच्या पतंगांची संख्या सतत पाच दिवस वाढत्या क्रमाने आढळल्या निम गरव्या आणि गरव्या जातींसाठी दाणेदार किटकनाशकाची एक मात्र लावणी नंतर २५ दिवसांनी द्यावी अथवा लावणी नंतर शेतात टक्के कीड ग्रस्त फुटवे आढळल्या किंवा एक चौरस मीटर क्षेत्रात किडीचा एक अंडी पुंज आढळल्यास किंवा प्रकाश पिंजऱ्यात या किडीच्या पतंगांची संख्या सतत पाच दिवस वाढत्या क्रमाने आढळलयास निम गरव्या आणि गरव्या जातींसाठी दाणेदार किटकनाशकाची एक मात्र लावणी नंतर २५ दिवसांनी द्यावी अथवा दोन फवारण्या कराव्यात. गारव्या जातींसाठी लावणीनंतर २५ आणि ५० दिवसांनी अशा दाणेदार किटकनाशकाच्या दोन मात्र द्याव्यात अथवा एकूण चार फवारण्या कराव्यात. वेळोवेळी कीडग्रस्त फुटवे अथवा पळीज काढून टाकावेत.
किटकनाशकांचा वापर :-  शेतात कडुनिंबयुक्त किटकनाशके वापरावीत. दाणेदार 10% फोरेट 4 किलो किंवा 5 टक्के क्विनॅालफॅास 6 किलो किंवा 3 टक्के कार्बोफ्युरा 6.6 किलो प्रती एकरी टाकावे. 25 टक्के प्रवाही क्विनॅालफॅास 640 मीली किंवा कारटॅप हायड्रोक्लोराईड 50 टक्के 240 ग्रॅम किंवा ट्रायफॅास 40 टक्के 540 मिली 200 लिटर पाण्यात मिसळुन प्रती एकरी फवारावे.वरील औषधे फुलोरा अवस्थेपर्यंत वापरता येतात.
2) निळेभुंगेरे : भुंगेरे गर्द निळ्या रंगाचे असून अळी भुरकट रंगाची असते. या किडीची अळी व्यवस्था आणि प्रौढावस्था या दोन्ही हानिकारक आहेत. ही कीड पानाचा हिरवा भाग कुरतडून खाते. शेवटी संपूर्ण पीक वाळते. 
या किडीच्या नियंत्रणासाठी क्विनाल फॅास 25 टक्के प्रवाही 800 मिली किंवा ट्रायझोफॅास 40 टक्के प्रवाही 250 मिली प्रति एकरी 200 लिटर पाण्यातून करावी. ही कीड भात पिका नंतर बांधावरील गवतांवर उपजिवीका करते आणि पुढील हंगामात भात पिकास उपद्रव कारक होते म्हणून बांधावरील गवतांचा भातलावणी नंतर नायनाट करावा. या किडीचा सतत प्रादुर्भाव होत असलेल्या भागात कापणीनंतर शेताची नांगरट करून चोथ्याचा नाश करावा, म्हणजे पाणथळ जमिनीत फुटवा येणार नाही आणि कीड प्रसारास प्रतिबंध होईल. जमिनीत पाणी जास्त काळ साठता निचरा होईल याची काळजी घ्यावी. 
3)पानेगुंडाळणारीअळी
            या अळ्या आपल्याला  पानाच्या दोन्ही कडा लांबीच्या दिशेने एकत्र चिकटवून गुंडाळी करून आत मध्ये लपून रहातात. पानातील हिरवा भाग (हरितद्रव्य) कुरतडून खातात. त्यामुळे गुंडाळी युक्त पानावर पांढरे चट्टे पडतात. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते, पीक निसवण्यासव दाणे भरण्यावर परिणाम होतो. प्रत्येक चुडात 1 ते 2 नविन कीड ग्रस्त पाने दिसल्यास प्रति एकरी मोनोक्रोटोफॅास 36 टक्केप्रवाही 280 मिली. किंवा ॲसिफेट 76 टक्के 200 ग्रॅम प्रवाही किंवा कारटॅप हायड्रोक्लोराईड 50 टक्के200 ग्रॅम किंवा क्लोरोपायरी फॅास  20 टक्के 750 मिली किंवा क्विनालफॅास 25 ईसी 400 मिली 200 लिटर पाण्यात फवारावे.
4) सुरळीतीलअळी.
अळी कोवळे पान कापुन त्याची सुरळी करुन त्यात राहते पानातील हिरवा पापुद्रा खाते. बाहेरील पापुद्रा शिल्लक ठेवते. अशा सुरळ्या पानाला लटकुन राहतात किंवा पाण्यावर तरंगतात.
गरज पडल्यास पाने गुंडाळणारी अळी प्रमाणे उपाययोजना करावी.
) भात पिकां वरील रोग आणि त्यांचे नियंत्रण : 
पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी ज्या प्रमाणे चांगले बी-बियाणे, नव्या लागवड पद्धती, पिकांची योग्य काळजी आवश्यक आहे, त्याच प्रमाणे पिकाचे रोगांपासून संरक्षण कसे करावे या विषयी माहिती शेतकऱ्यांना असणे तेवढेच महत्त्वाचे आहे. 
) कडाकरपा (बॅक्टेरियलब्लाइट) : या रोगाचे जीवाणू रोपे उपटताना मुळांना होणारी इजा, नैसर्गिक कारणां मुळे पानांना होणारी इजा, लावणी पूर्वी रोपांची पाने खुडण्याची प्रथा आणि त्यामुळे पानांना होणारी इजा आणि पानांवरील नैसर्गिक छिद्रे इत्यादींमुळे रोपांच्या शरीरात प्रवेश करतात आणि रोगाची लागण होते. रोगाची लक्षणे दोन प्रकारात मोडतात. पहिल्या प्रकारात लावणी नंतर साधारणत: एक महिन्याने रोगाची सुरुवात चुडातील खालच्या पानांवर होते आणि कालांतराने रोगवरच्या पानांवर पसरतो. प्राथमिक अवस्थेत रोगग्रस्त पानांच्या एका किंवा दोन्ही कडांवर शेंड्याकडून खोडाकडे फिकट पिवळसर हिरवट रेषा निर्माण होतात. कालांतराने ह्या रेषावरून खाली आणि पानाच्या आतील बाजूला मध्य शिरेकडे वाढतात आणि पानांवर राखाडी किंवा तांबूस रंगाचे पट्टे निर्माण होतात. अशा पट्ट्यांच्या कडा नागमोडी असतात. पुढे पाने करपून वाळतात.
दुसऱ्या प्रकारात रोगाचे जीवाणू तुटलेल्या मुळांतून किंवा खुडलेल्या पानांतून अन्ननलिकेत प्रवेश करतात आणि अणूजीव आंतर प्रवाही होतात. रोगग्रस्त चुडांची पाने हिरवट करड्या रंगाची होऊन दोन्ही कडांकडून आतील भागाला पुंगळी सारखी मोडतात. चुडातील संपूर्ण पाने करपून फाटतात आणि संपूर्ण चुडाचीमर होते, याला रोगांची 'केसेक' अवस्था म्हणतात. 
) करपा : करपा हा बुरशीजन्य रोग आहे. रोगाची लक्षणे झाडांच्या पानांवर, पेरांवर आणि ओंबीच्या देठांशी दिसून येतात. रोगाची सुरुवात पानांवर बारीक हिरवट पिवळसर आणि भिजट ठिपके पडून होते. कालांतराने ठिपक्याचे आकारमान वाढत जाते. पूर्ण वाढलेले ठिपके हे आकाराने लांबट गोल, भिंगाकृती असून त्यांच्या कडा गर्द तपकिरी रंगाच्या असतात.  ठिपक्यांचा आतील भाग राखाडी रंगाचाअसतो. रोगास जास्त बळी पडणाऱ्या जातींवर ठिपक्यांची संख्या आणि आकार मोठा असून दोन किंवा अधिक ठिपके एकत्र मिसळून पानांवर राखाडी रंगाचे चट्टे पडतात आणि संपूर्ण पान करपते. 
) शेंडे करपा (लिफस्काल्ड) : हा बुरशीजन्य रोगआहे. रोगग्रस्त पानांचे शेंडेवरून खाली करपतात आणि रोगग्रस्तपाने सूर्यप्रकाशात धरल्यास रोगट भागावर गर्द तपकिरी पट्टे ठराविकअंतराने दिसतात. दोन पट्ट्यांमधील भाग फिक्कट तपकिरी रंगाचा असतो. रोगग्रस्त भागावर सुपारी कातरल्या सारखी नक्षी दिसते. रोगाची लक्षणे कधी कधी पानांच्या पृष्ठ भागावर कडेला धरून कुठेही उद्भवतात आणि रोगग्रस्त भागा वरवरील प्रमाणेच सुपारी कातरल्या सारखे नक्षीदार लांबट गोलाकार डाग दिसतात.
भाता वरील रोगांच्या नियंत्रणासाठी पीकसंरक्षणाचे उपाय 
रोगाचे नाव/रोग येण्याच्या 
वेळेस
पिकाची अवस्था
उपाययोजना
करपा/ शेंडेकरपा 
(रोपावस्थातेपीकफुलोऱ्यावरयेईपर्यंत )
 पानांवर सुरवातीला करड्या रंगाचे ठिपके दिसतात नंतर ते वाढत जाउन  दोन्ही बाजुला निमुळते व मध्ये फुगीर होतात.
कॅापर ऑक्सिक्लोराइड 20 ग्रॅम, किंवा प्रोपीकोनॅाझॅाल 10 मिली, किंवा आयप्रोबीन 20 मिली, किंवा इडीफेनफॅास 10 मिली. 10 लिटर पाण्यात लक्षणे दिसताच फवारावे. आवश्यकता भासल्यास 15 ते 20 दिवसांच्या अंतराने 3 फवारणी केल्यास रोग नियंत्रण करता येते. नत्रखताचायोग्यवापरकरावा अतिरीक्त वापर टाळावा.
कडाकरपा
(फुटवेआणिफुलोरा)
 
) धसकटे गोळा करून नष्ट करावीत. ) बांध बंदिस्ती आणि बांधावरील गवत इतर तणे काढावीत. ) भात खाचरात पाणी साठुन राहणार नाही याची काळजी घ्यावी. ) नत्र खताचा योग्य वापर करावा अतिरीक्त वापर टाळावा. पीक फुलो-यात असताना रोग अढळुन आल्यास द्यावयाची खताची मात्रा उशिरा द्यावी.

एकात्मिक कीड नियंत्रण जैविक नियंत्रण 
शेतात पक्षी थांबे / मचान, प्रकाश सापळे, कामगंध सापळे या व्दारे किडींचे नियंत्रण चांगल्या प्रकारे होउ शकते.
आपल्या शेतात असलेल्या मित्र कीटकांचे संवर्धन करावे. उदा. कोळी, चतुर, नाकतोडे, ट्रायकोग्रामा इत्यादी मित्र कीटकांस हानिकारक कीटकनाशक वापरू नये. खोड किडीचे अंडी पुंज गोळा करून बांबूच्या टोपलीत ठेवावेत, त्यामुळे मित्र कीटक आकर्षित होऊन अंडी घालतात. मित्र कीटकांची संख्या वाढते. बेडूक हा प्राणी भाताचा खोड किडा, लष्करी अळी, पाने गुंडाळणारी अळी, स्कीपर, पाने खाणारी अळी इत्यादी किडींवर उपजीविका करतो. म्हणून भात खाचरां मध्ये बेडकांचे जतन करावे. तसेच बेडकामुळे खेकड्यां पासून होणारे भाताचे नुकसानही कमी होऊ शकते. तांत्रिक पद्धतीने नियंत्रण करताना खोड किडीचे अंडी पुंज काढून त्यांचा नायनाट करावा. दोरीच्या साहाय्याने सुरळीतील अळ्या खाली पाडाव्यात.
जर किडीने आर्थिक नुकसानीची पातळी गाठली असेल किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाण असेल, तरच शिफारस केलेल्या कीटकनाशकांचा गरजे नुसार वापर करावा. निळेभुंगेरे, तुडतुडे, काटेरी भुंगेरे या किडींचा प्रादुर्भाव जिथे पाणी साठते, अशा पाणथळ खोलगट जमिनीत मोठ्या प्रमाणात होतो. म्हणून खोलगट जमिनीत पाणी जास्त काळ साठवता त्याचा योग्य निचरा होईल याची काळजी घ्यावी. त्यासाठी सामुदायिक चर काढता येतील. निळे भुंगेरे, काटेरी भुंगेर आणि ढेकण्या हे बांधावरील गवतावर उपजीविका करतात म्हणून बांध स्वच्छ ठेवावेत. भात पीक कापणी नंतर गवताचा नायनाट करावा. भात कापणी करताना वैभव विळ्याचा वापर करावा. किडीचे वेळीच नियंत्रण केल्यास निश्चितच होणारे नुकसान टाळता येणे शक्य आहे. तसेच बांधावर झेंडु, भेंडी, तुर, तिळ, कारळा इ. पिके लावावीत. उत्पन्नात वाढ होईल. अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषि अधिकारी खोपोली यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी खोपोली   पांडुरंग सिगेदार यांनी केले आहे

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक