Posts

Showing posts from August 28, 2022

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त नेहरू युवा केंद्राच्या वतीने क्रीडा स्पर्धा संपन्न

    अलिबाग,दि.30 (जिमाका) :- राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त नेहरू युवा केंद्र युवा केंद्र, रायगड अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने वरसोली समुद्रकिनाऱ्यावर  क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.              या स्पर्धांमध्ये गोळा फेक, 100 मीटर धावणे, 800 मीटर धावणे, लांब उडी अशा विविध स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता. या क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनास ज्येष्ठ विधीतज्ञ ॲड.डॉ.निहा अनिस राऊत, ॲड.कला ताई पाटील- सेन्टेनियस लायन्स क्लब ऑफ श्रीबाग प्रेसिडेंट, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक निशांत रौतेला, तालुका क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी,  स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तथा स्पर्धा विश्व अकॅडमी च्या संचालिका सुचिता साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.                 या स्पर्धेत युवक- युवतींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला व सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 000000

पर्यावरणपूरक, निर्मल गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी व्हावे -मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील

  अलिबाग,दि.30(जिमाका):- गणेशोत्सव पर्यावरण पूरक व पर्यावरण स्नेही व्हावा, या उद्देशाने रायगड जिल्हा परिषदेतर्फे यावर्षी ऑनलाईन गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव कालावधीत दि.31 ऑगस्ट  ते दि.09 सप्टेंबर 2022 या कालावधीत स्पर्धा होतील.              रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील मंडळे, व्यक्ती, संस्था, घरगुती पातळीवरील गणपती तसेच ग्रामपंचायतींनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.              यासाठी  bit.ly/raigadganpati  या गुगल लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे. गुगल लिंकवर गणेशोत्सव कालावधीत राबविलेल्या उपक्रमाचे फोटो व व्हिडीओ अपलोड करावयाचे आहेत, फोटो व व्हिडीओ स्पष्ट असावेत, सहभागी मंडळानी निर्माल्य व्यवस्थापन, पाणी व स्वच्छता विषयी जनजागृती साठी स्लोगन, प्लास्टिक बंदीची जिंगल्सद्वारे तसेच पोष्टर व बॅनरद्वारे जनजागृती करणे. श्रमदानातून परिसर स्वच्छता, वृक्षलागवड, प्लास्टिक संकलन, गणेश मूर्तीचे विसर्जन हे कृत्रिम तलावात करणेसाठी प्रोत्साहन देणे आदी उपक्रम अपेक्षित आहेत.              य

उरण तालुक्यातील विंधने कातकरीवाडीमधील सर्व कुटुंबांना देण्यात आली विजेच्या मीटरची अधिकृत जोडणी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतील कातकरी उत्थान अभियानाच्या "सप्तसूत्री" उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

Image
    अलिबाग,दि.30(जिमाका):-  उरण तालुक्यातील विंधने कातकरीवाडी येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सोमवार, दि. 29 ऑगस्ट  रोजी तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या हस्ते विजेच्या मीटर चे वाटप करण्यात आले.  जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतील कातकरी उत्थान अभियानाच्या "सप्तसुत्री" उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम पनवेल प्रांताधिकारी राहुल मुंडके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता.  याप्रसंगी सरपंच निसर्गा डाकी, उपसरपंच, वीज वितरण कंपनीचे अभियंता श्री.मिश्रा, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, बी.एम.ठाकूर, सुनील जोशी, रायगड भूषण दत्ता गोंधळी, नामदेव ठाकूर, एकनाथ घरत, माजी सदस्य शक्ती घरत, तलाठी बलभीम लाटे, शिक्षक श्री.पाटील आणि श्री.चोगले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना करताना प्रा.राजेंद्र मढवी यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि हे विजेचे मीटर देण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांनी केलेल्या मदतीबाबत विस्तृत माहिती उपस्थितांना दिली.     यावेळी तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांनी श

गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल या योजनेसाठी इच्छुकांनी अर्ज सादर करावेत

  अलिबाग,दि.30(जिमाका):- महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या गटई कामगारांची आर्थिक उन्नती व्हावी, याकरिता 100 टक्के अनुदानावर पत्र्याचे स्टॉल पात्र लाभार्थ्याना शासनामार्फत मंजूर करण्यात येते. ही योजना सहाय्यक आयुक्त, समाज समाज कल्याण यांच्यामार्फत राबविण्यात येते. जेणेकरुन लाभार्थ्यांना गटई व्यवसाय चांगल्या प्रकारे करता येऊन उदरनिर्वाहाचे साधन प्राप्त होईल. या योजनेसाठी अनुसूचित जाती गटई कामगारांकडून गटई स्टॉल मागणीचे अर्ज मागविण्यात आले आहेत. याबाबत यापूर्वीही प्रसारमाध्यमांमार्फत आवाहन करण्यात आले होते.  अनुसूचित जाती प्रवर्गातील गटई कामगारांना हा व्यवसाय करताना ऊन, वारा, पावसापासून संरक्षण मिळावे व त्यांची आर्थिक उन्नती व्हावी आणि  त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी शासनाने ही योजना सन 1997 पासुन सुरु केली आहे.   या योजनेच्या अटी पुढीप्रमाणे आहेत :- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, अर्जदार हा अनुसूचित जातीतील गटई कामगार असावा, वय 18 ते 50 असावे, वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागात रु. 40 हजार,  शहरी भागात रु. 50 हजार पेक्षाजास्त नसावे, गटई स्टॉलसाठी मागणी केलेली जागा ही ग्राम

सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील सामाजिक न्याय विभागाच्या अलिबाग येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु

    अलिबाग,दि.30(जिमाका):- सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थीनींकरिता मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, दिव्या अपार्टमेंट, अपार्टमेंट, आर.सी.एफ गेटसमोर वेश्वी, अलिबाग येथे कार्यरत आहे.     या वसतिगृहामध्ये इ.8 वी पासून गरीब, हुशार, होतकरू, मागासवर्गीय अनुसूचित जाती 80 टक्के, अनुसूचित जमाती 3 टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती 5 टक्के, आर्थिक मागास व इतर मागासवर्गीय दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील विद्यार्थी 5 टक्के, विशेष मागास प्रवर्ग 2 टक्के, अनाथ 2 टक्के, अपंग 3 टक्के यांना गुणवत्तेनसार प्रवेश दिला जातो.         वसतिगृहात विद्यार्थ्याकरिता मोफत निवास व्यवस्था असून नाष्टा-दररोज पोहे/शिरा/उपीट इ. पैकी एक, उकडलेली दोन अंडी, सफरचंद, ऋतुमानानुसार एक फळ व दूध तसेच भोजन व्यवस्थेमध्ये जेवण (डाळ, भात, चपाती, भाजी/उसळ, लोणचे पापड इ.सह आठवडयातून दोन वेळा मांसाहार) देण्यात येते.   अभ्यासाकरिता लागणारी वह्या, पुस्तके शैक्षणिक व लेखन साहित्य देखील विनामूल्य पुरविले जाते. तसेच दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता म्हणून दरमहा रू.600/- निर्वाह भत्ता दिला जातो. शालेय व

पनवेल येथे एच.आय.व्ही. संक्रमित महिलांसाठी संमेलन संपन्न

Image
    अलिबाग,दि.30(जिमाका) :- आधार विहान प्रकल्प, पनवेल यांच्या वतीने व युनायटेड वे इंडियाच्या सह्योगाने, पंचायत समिती हॉल, पनवेल येथे (दि.26 ऑगस्ट) रोजी एच.आय.व्ही. संक्रमित महिलांसाठी संमेलन आयोजित करण्यात आले होते.   या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कार्यक्रम अधिकारी, रायगड जिल्हा, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था   संजय माने, पनवेल पंचायत समितीचे   गटविकास अधिकारी संजय भोये, वैद्यकीय अधिकारी, धीरूभाई अंबानी ए.आर.टी सेंटर,पनवेल डॉ.पर्णा बारडोलोई, समोपदेशक, धीरूभाई अंबानी ए.आर.टी.सेंटर,पनवेल, समोपदेशक, आय.सी.टी.सी.सेंटर, पनवेल, सौ. तारा इंगळे, श्री. विकास कोंपले, प्रकल्प संचालक, विहान प्रकल्प, पनवेल, दिलीप विचारे, अध्यक्ष, आधार संस्था सौ. श्रद्धा जाधव, वरिष्ठ अधिकारी, युनायटेड वे इंडिया जुही जस्वाणी   आदि उपस्थित होते.   कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रकल्प व्यवस्थापक, आधार विहान प्रकल्प, पनवेल   सुनील पटेल यांनी विहान प्रकल्पाबद्दल थोडक्यात माहिती दिली व आजपर्यंत केलेल्या कामाचा लेखाजोखा प्रमुख अतिथींसमोर मांडला. त्यानंतर या कार्यक्रमात प्रमुख अतिथींनी आपले विचार व

शासनाच्या सूचनांचे पालन करुन उत्साहाने गणेशोत्सव साजरा करू या - अपर जिल्हाधिकारी अमोल यादव

Image
    अलिबाग,दि.29 (जिमाका) :- कोकणातील महत्वाचा सण गणेशोत्सव दि.31 ऑगस्ट 2022 पासून सुरु होत आहे.गणेशोत्सवासाठी कोकणात राज्याच्या विविध शहरातून नागरिक येत असतात. गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यात येणाऱ्या गणेश भक्तांनी शासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी आज येथे केले. येथील जिल्हा नियोजन भवन बैठक सभागृहात “ गणेशोत्सव 2022 ” बाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, पोलीस विभाग, राष्ट्रीय मार्ग विभागांचे विभागप्रमुख, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, विविध शासकीय विभागांचे कार्यालय प्रमुख, शांतता कमिटीचे सदस्य आदी उपस्थित होते. अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी गणेशोत्सव 2022 च्या तयारीच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, राज्य परिवहन महामंडळ, पोलीस, अन्न व औषध प्रशासन, कोकण रेल्वे, रस्ते वाहतूक अशा विविध विभागांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रत्येक विभागाने काय तयारी केली आहे, हे जाणू

गणेशोत्सवानिमित्त शांतता कमिटीची आढावा बैठक संपन्न

Image
    अलिबाग,दि.29 (जिमाका) :- कोकणातील महत्वाचा सण गणेशोत्सव दि.31 ऑगस्ट 2022 पासून सुरु होत आहे. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासन व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन भवन बैठक सभागृहात " गणेशोत्सव 2022 " निमित्त शांतता कमिटीची आढावा बैठक अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.       यावेळी शांतता कमिटीचे सर्वश्री सदस्य श्री.प्रशांत नाईक (अलिबाग), श्री.सुरेश म्हात्रे (अलिबाग), श्री.निलेश घाटवल (मुरुड), श्री.अरुण शिवकर (पेण),   श्री.राजू पिचिका (पेण), श्री.रमेश कदम (कर्जत), कृष्णा पारंगे (खालापूर), श्री.अमित शहा (खालापूर), श्री.पानसरे (नागोठणे), शेख अब्दुल सलीम (म्हसळा), चंद्रकांत लाड (महाड), रामदास कळंबे (पोलादपूर), श्री.प्रदिप देशमुख (रोहा), अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, पोलीस विभाग, राष्ट्रीय मार्ग विभागांचे विभागप्रमुख, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, विविध शासकीय विभागांचे कार्यालय प्रमुख आदी उपस्थित होते.    यावेळी अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी सांगितले की, गण

गणेशोत्सव-2022 कालावधीत जिल्ह्यातील मिठाई उत्पादक,विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांनी दक्षता घ्यावी

    अलिबाग,दि.29(जिमाका) :- सणासुदीच्या कालावधीमध्ये जनतेकडून मिठाई व इतर अन्न पदार्थ जसे खवा मावा, घी, रवा, मैदा, आटा,   वनस्पती, खाद्य तेल इत्यादीची मागणी मोठया प्रमाणात केली जाते. त्यानुषंगाने   जिल्हयातील मिठाई उत्पादक/ विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांनी दक्षता घेण्याविषयी अन्न औषध प्रशासन विभागाचे   सहाय्यक आयुक्त (अन्न) लक्ष्मण दराडे यांनी केले.        त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार आस्थापनेचा परिसर हा पर्यावरणीय दृष्टीने किटकापासून संरक्षित व स्वच्छ असावा, कच्चे अन्न पदार्थ परवानाधारक/ नोंदणीधारक अन्न व्यावसायिकाकडून खरेदी करण्यात यावेत, पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा, तयार अन्न पदार्थ हे स्वच्छ व सुरक्षित ठिकाणीच व्यवस्थित झाकून ठेवावेत, आजारी व्यक्तीने अन्न पदार्थ हाताळू नयेत, मिठाई तयार करताना केवळ फूडग्रेड खाद्यरंगाचा अत्यल्प प्रमाणात वापर करावा (100 PPM पेक्षा कमी), बंगाली मिठाई ही 24 तासांच्या आत खाण्याबाबत ग्राहकांना स्पष्ट निर्देश देण्यात यावेत, मिठाई बनविताना तसेच हाताळणाऱ्या व्यक्तींनी नेहमी डोक्यावर टोपी, मास्क, हातमोजे व स्वच्छ ॲप्रन वापरावेत