सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील सामाजिक न्याय विभागाच्या अलिबाग येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु

 

 

अलिबाग,दि.30(जिमाका):- सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थीनींकरिता मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, दिव्या अपार्टमेंट, अपार्टमेंट, आर.सी.एफ गेटसमोर वेश्वी, अलिबाग येथे कार्यरत आहे.

    या वसतिगृहामध्ये इ.8 वी पासून गरीब, हुशार, होतकरू, मागासवर्गीय अनुसूचित जाती 80 टक्के, अनुसूचित जमाती 3 टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती 5 टक्के, आर्थिक मागास व इतर मागासवर्गीय दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील विद्यार्थी 5 टक्के, विशेष मागास प्रवर्ग 2 टक्के, अनाथ 2 टक्के, अपंग 3 टक्के यांना गुणवत्तेनसार प्रवेश दिला जातो.    

    वसतिगृहात विद्यार्थ्याकरिता मोफत निवास व्यवस्था असून नाष्टा-दररोज पोहे/शिरा/उपीट इ. पैकी एक, उकडलेली दोन अंडी, सफरचंद, ऋतुमानानुसार एक फळ व दूध तसेच भोजन व्यवस्थेमध्ये जेवण (डाळ, भात, चपाती, भाजी/उसळ, लोणचे पापड इ.सह आठवडयातून दोन वेळा मांसाहार) देण्यात येते.

  अभ्यासाकरिता लागणारी वह्या, पुस्तके शैक्षणिक व लेखन साहित्य देखील विनामूल्य पुरविले जाते. तसेच दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता म्हणून दरमहा रू.600/- निर्वाह भत्ता दिला जातो. शालेय व गणवेश पात्र विद्यार्थीनींना दोन संचाकरिता गणवेश भत्ता/रेनकोट/छत्री भत्ता दिला जातो. या व्यतिरिक्त संगणक, ग्रंथालय सुविधा, क्रीडा साहित्य,मनोरंजन इ. अनेक सुविधा उपलब्ध आहेत.

  प्रवेशपात्र विद्यार्थीनींच्या पालकांचे सर्व मार्गानी मिळून वार्षिक उत्पन्न अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती विद्यार्थीनींकरिता रूपये 2 लाख 50 हजार च्या आत व विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष विद्यार्थीनींकरिता रू.1 लाखाच्या आत असावे.

   ऑनलाईन प्रवेश अर्जासोबत तहसिलदार यांच्या सहीचा सन 2021-22 मधील उत्पन्नाचा दाखला, जातीचे मुलकी अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, मागील इयत्ता पास झाल्याचे गुणपत्रक,आधारकार्ड, शाळा/कॉलेजचे बोनाफाईड या कागदपत्रांच्या सत्यप्रती जोडणे आवश्यक आहेत.

   सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता वसतिगृह प्रवेश अर्ज हे ऑफलाईन फॉर्म भरण्याकरिता व वसतिगृहाच्या अधिक माहितीकरिता गृहपाल, मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागास मुलींचे  शासकीय वसतिगृह,अलिबाग सौ. उज्वला गुजेला (मो.9545390255) यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन गृहपाल सौ. उज्वला गुजेला यांनी केले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक