Posts

Showing posts from October 2, 2022

जंतापासून मुक्त.. होतील मुले सशक्त; 10 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम

  अलिबाग,दि.07(जिमाका):-  जिल्ह्यातील एक वर्ष ते 19 वर्ष वयोगटातील मुलांना व मुलींना सोमवार, दि.10 ऑक्टोबर 2022 रोजी जंतनाशक गोळ्या नि:शुल्क देण्यात येणार आहेत. या गोळ्या सर्व मुलामुलींना अंगणवाडी व शाळा स्तरावर उपलब्ध असतील. या गोळ्या चावून किंवा लहान मुलांना पाण्यामध्ये विरघळवून देणे आवश्यक आहे, असे जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी कळविले आहे. जंतनाशक गोळी खाल्ल्याने रक्तक्षय कमी होतो, बालक आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे शाळेतील उपस्थिती वाढते, मुले क्रियाशील बनतात व मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते, आरोग्य चांगले राहते, अल्बेडझोल च्या एका गोळीमुळे जंताचा नाश होण्यास मदत होते, असे लाभ होतात. ग्रामीण भागामध्ये एकूण 4 लाख 60 हजार 1 ते 19 वर्ष वयोगटातील मुलामुलींना या गोळ्या सर्व शाळा व अंगणवाडीच्या ठिकाणी दि.10 ऑक्टोबर 2022 रोजी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याकरिता 4 लाख 70 हजार अल्बेडॅझोल गोळ्या ग्रामीण भागात वितरीत करण्यात आलेल्या आहेत. ग्रामीण भागातील 3 हजार 468 अंगणवाडी केंद्र, 3 हजार 92 शाळा तसेच 758 इतर शैक्षणिक संस्थांमधून झील गोळ्या देण्याचे नि

स्टार्टअप व नाविन्यता यात्रेत नवकल्पनांचे सादरीकरण करण्याकरिता नवउद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे -जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

 “ स्टार्टअपच्या नवकल्पना सुचवा आणि बक्षीस मिळवा ” सहाय्यक आयुक्त श्रीमती अ.मु.पवार यांचे आवाहन   अलिबाग,दि.07(जिमाका):-  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीकडून स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचा प्रारंभ दि.15 ऑगस्ट 2022 रोजी विभागस्तरावर करण्यात आला आहे. नागरिकांनी  www.msins.in  किंवा  www.mahastartupyatra.in  या संकेतस्थळावर आपली नाविन्यपूर्ण नवकल्पना नोंदवावी, स्टार्टअप व नाविन्यता यात्रेत नवकल्पनांचे सादरीकरण करण्याकरिता जिल्ह्यातील नवउद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे. तसेच   स्टार्ट अपच्या नवकल्पना सुचवा आणि बक्षीस मिळवा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त श्रीमती अ.मु.पवार यांनीही केले आहे. नोंदणीकृत नवकल्पनांचे सादरीकरण करण्याकरिता दि.13 ऑक्टोबर 2022 रोजी माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे एकदिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात येणार आहे. यात पहिल्या सत्रामध्ये सकाळी 9.30

रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींकरिता पनवेल येथे कायदेविषयक मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न

  अलिबाग,दि.07(जिमाका):-  महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, वडाळा, मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार एआरटी केंद्र लोधिवली, खालापूर येथे तालुका विधी सेवा प्राधिकरण, खालापूर यांच्या सहकार्याने दि.28 सप्टेंबर 2022 रोजी कायदेविषयक मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यक्रमास रिलायन्स हॉस्पिटल, लोधीवलीचे संचालक डॉ.रणजित खंदारे, डापकुचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री.संजय माने हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री.संजय माने यांनी रायगड जिल्ह्यामधील एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या शासकीय सेवा सुविधांबाबत सविस्तर माहिती देऊन एचआयव्ही सह जगणाऱ्या व्यक्तींना शासकीय सेवा सवलती सहज मिळाव्यात याकरिता संजय गांधी निराधार योजना, जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी योजना सुरु करून शासकीय सेवा देण्यात येणार असून याकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड यांची मदत घेण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी एआरटी केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.पर्णा बार्डोलोई यांनी एआरटीविषयी  सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमास खालापूर न्यायालयातील दिवाणी

कर्जत वनपरिक्षेत्रातील साळोखवाडी येथे रानडुकराची शिकार करून मांस विक्री करणाऱ्यांवर वनविभागाने केली यशस्वी कारवाई

Image
  अलिबाग,दि.06(जिमाका):-  कर्जत वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दि.4 ऑक्टोबर 2022 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वनपरिक्षेत्र कर्जत पूर्व परिमंडळ हुमगाव, मौजे साळोखवाडी येथील रहिवासी   श्री.मारुती पवार यांच्या घरासमोर असलेल्या बकऱ्यांच्या बेड्यावर धाड टाकण्यात आली. यावेळी आरोपी दशरथ बाळू वाघमारे, शरद रघुनाथ वाघमारे, सोमनाथ पप्पू पवार, साळोखवाडी, दिपक लहानू पवार (सर्व आरोपी राहणार मौजे साळोखवाडी) यांनी रानडुकराची शिकार करून त्याच्या अवयवाचे व मांसाच्या विक्रीसाठी कोयत्याने तुकडे करीत असताना आढळून आले. त्यांनी वनकर्मचाऱ्यांना पाहून घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र वनकर्मचाऱ्यांनी या गुन्ह्यातील आरोपी क्र.1 दशरथ बाळू वाघमारे यांना ताब्यात घेतले. या आरोपीने सांगितलेल्या जबानीवरुन आरोपी क्रमांक 5 रविंद्र मुका वाघमारे, वय वर्ष 52, रा.डोनेवाडी ता.कर्जत यास अटक करण्यात आले. तसेच वनकर्मचाऱ्यांनी संबंधित ठिकाणावरुन रानडुकराचे 39.120 किलोग्राम मांस व अवयव हस्तगत केले तसेच 4 कोयते, तराजू काटा हे साहित्य जप्त केले. अटक करण्यात आलेले आरोपी क्र.1 दशरथ बाळू वाघमारे व आरोपी क्र.5 रविंद्र मु

कर्जत वनपरिक्षेत्रातील खांडस येथे वागूरची तस्करी करणाऱ्यांवर वनविभागाने केली यशस्वी कारवाई

Image
  अलिबाग,दि.06(जिमाका):-  कर्जत वनपरिक्षेत्र अधिकारी यांना खांडस येथे दि. 5 ऑक्टोबर 2022 रोजी काही शिकारी लोक जंगलात गेल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुषंगाने राऊंड स्टाफ मौजे-खांडस गावाच्या पुढे जंगलाच्या दिशेने गस्त करीत असताना त्यांना MH-02 CP-2667 या क्रमांकाची पांढऱ्या रंगाची ईको गाडी संशयित वाटल्याने या गाडीचा 3 ते 4 मीटर पाठलाग करून थांबविली. या गाडीत वागूर नग-4, वागूर उभे करण्यासाठी 28 बांबूच्या काठ्या व दोन ठासनीच्या बंदुका मिळाल्या. चालक देवानंद विठ्ठल खांडवी, रा.वडाचीवाडी नांदगाव, ता.कर्जत, यांच्यासह आरोपी रविंद्र रावजी वारगुडे व विशाल धोंडू बांगारे दोघेही रा.पेठारवाडी, ता.कर्जत असे एकूण तीन आरोपींना गाडी व मुद्देमालासह ताब्यात घेतले. कर्जत (पूर्व) वनपरिक्षेत्र अधिकारी पुढील तपास करीत आहेत. वनपाल खांडस (अतिरिक्त कार्यभार) श्री.काळुराम दगडू लांघी, खांडस वनरक्षक श्री.प्रकाश वैजनाथ मुंढे, चाफेवाडी वनरक्षक श्री.माधव शंकर केंद्रे व जामंरुग वनरक्षक श्री.विठ्ठल बळीराम खांदाजे हे या कारवाईत सहभागी झाले होते. या कारवाईकरिता अलिबाग उपवनसंरक्षक आशिष ठाकरे व पनवेल सहाय्यक वनसंरक्ष

श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय येथे दिव्यांग प्रमाणपत्र वाटप संपन्न

Image
दिव्यांगांच्या अडीअडचणींचे निराकरण करणे, प्रशासनाचे कर्तव्यचं -श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे     अलिबाग,दि.03 (जिमाका):-  दिव्यांग बांधव समाजातील एक महत्त्वाचा घटक आहे. दिव्यांग बांधवांच्या अडीअडचणीचे निराकरण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सदैव तत्पर आहे, ही प्रशासनाचे कर्तव्यचं आहे, असे प्रतिपादन श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे यांनी केले. श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय येथे दिव्यांग अस्मिता कार्यक्रमांतर्गत श्रीवर्धन तालुक्यातील दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी अमित शेडगे म्हणाले की, श्रीवर्धन तालुक्यातील दिव्यांगांची संघटना अतिशय उच्च दर्जाची कामगिरी बजावत आहे. आपल्या तालुक्यातील बांधवांना प्रमाणपत्रासाठी अलिबाग या ठिकाणी जावे लागत होते. मात्र संघटनेच्या प्रयत्नांनी व डॉक्टरांच्या सहकार्याने आपण आपल्या बांधवांना श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात प्रमाणपत्राचे वितरण करीत आहोत. दिव्यांग बांधवांच्या समस्यांचे निराकारण करण्याच्या हेतूने शासनाने विविध उपक्रमांची सुरुवात केली आहे. रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या

ओबीसी समाजातील विद्यार्थी /विद्यार्थिनींनी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घ्यावा

  अलिबाग,दि.03 (जिमाका):-  ओबीसी महामंडळाकडून समाजातील ओबीसी विद्यार्थ्यांकरिता शासनाने राज्यांतर्गत, देशांतर्गत शिक्षणासाठी रुपये 10 लक्ष व परदेशात शिक्षणासाठी रुपये 20 लक्ष मर्यादेत कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या योजनेमध्ये उमेदवाराला बँकेकडील भरलेल्या व्याजाच्या 12 % पर्यंत परतावा मिळणार आहे. या योजनेच्या लाभाकरिता उमेदवाराचे वय 17 ते 30 वर्ष असावे. महाराष्ट्र राज्य रहिवासी असल्याचा पुरावा, ओबीसी असल्याचा जातीचा दाखला, तहसिलदार यांनी दिलेला कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु.8 लक्ष  पर्यंतचा दाखला किंवा नॉन क्रिमीलेअर च्या मर्यादेत, 12 वी मध्ये 60%गुणांसह उत्तीर्ण पाहिजे, उमेदवार व त्याचे पालक यांचे आधारकार्ड, फोटो इत्यादी, आधार लिंक बचत खाते पासबुक, वयाचा पुरावा, शैक्षणिक अभ्यासक्रमाबाबत आवश्यक कागदपत्रे इ. ही योजना ऑनलाईन असून महामंडळाच्या  www.msobcfdc.org  या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज सादर करावेत. राज्य, देशांतर्गत तसेच परदेशी अभ्यास मध्ये येणारे अभ्यासक्रम:- 1.आरोग्य विज्ञान - सर्व पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम, 2. अभियांत्रिकी - सर्व पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम,3. व्यवसायि

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रयरेषेखालील भूमीहीन शेतमजूरांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अर्ज करण्याचे समाजकल्याण विभागाचे आवाहन

  अलिबाग,दि.03 (जिमाका):-  अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना सन 2004-05 पासून राज्यामध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रयरेषेखालील भूमीहीन कुटूंबांना चार एकर जिरायती (कोरडवाहू) जमीन किंवा दोन एकर बागायती (ओलिताखालील) जमीन उपलब्ध करून देण्यात येते. लाभाचे स्वरुप:-  अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील भूमीहिन शेतकऱ्यांना 4 एकर जिरायत किंवा 2 एकर बागायत शेत जमीन देणे.    ही योजना 100% शासन अनुदानित आहे. या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांची पात्रता अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील भूमीहिन शेतकरी असावा, लाभार्थी वय 18 वर्षे वरील व 60 वर्षाखालील असावा अशी असून त्यांनी सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे   लाभार्थी जातीच्या दाखल्याची सत्यप्रत, उत्पन्नाच्या दाखल्याची सत्यप्रत, भूमीहिन शेतमजूर असल्याचे प्रमाणपत्र, दारिद्रयरेषेखाली असल्याबाबतचे प्रमाणपत्र, महिलांसाठी विधवा/परित्यक्ता/ घटस्फोटीत असल्याचा दाखला/पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञापत्र, रहिवासी दाखला, रेशनकार्डची सत्यप्रत, वयाबाबतचा

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे समाज कल्याण कार्यालयाकडून विद्यार्थ्यांना आवाहन

  अलिबाग,दि.03 (जिमाका):-  सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता देण्यात येणाऱ्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी चालू शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता नवीन आणि नूतनीकरणासाठी अर्ज करता येणार आहे.  https://mahadbtmahait.gov.in/ Home/Index  या लिंकच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून महाडीबीटी पोर्टल या प्रणालीद्वारे भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, राज्य शासनाच्या शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, राजर्षी शाहू महाराज मॅट्रिकोत्तर गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या अनुसूचित जातीच्या मुलामुलींना निर्वाह भत्ता इत्यादी योजना राबविण्यात येतात. या शैक्षणिक वर्षापासून महाडीबीटी पोर्टलवरून प्रामुख्याने भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच राज्य शासनाच्या शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत प्रतिवर्षीची अर्ज संख्या लक्षात घेता हे अर्ज विहित वेळेत निकाली काढण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील शिष्यवृत्तीसाठी प्राप्त झालेले नवीन अर्

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण तर्फे सेवा पंधरवड्यानि‍मित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Image
  अलिबाग,दि.03 (जिमाका):-  जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या   मार्गदर्शनाखाली व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव यांच्या पुढाकारातून रविवार, दि.2 ऑक्टोबर 2022 रोजी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा वरवणे, हेटवणे कॉलनी येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती तसेच आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण, अलिबाग वन विभागातर्फे वन्यजीव सप्ताह असे विविध कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी तरुण भारत वृत्तपत्राचे ज्येष्ठ पत्रकार श्री.आनंद जाधव, आपत्ती व्यवस्थापन तज्ञ जयपाल पाटील, वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. श्री.पाटील यांनी उपस्थितांना प्रात्यक्षिकासह आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण दिले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणे,गीते सादर केली. याप्रसंगी गांधीजी व शास्त्रीजी यांची वेशभूषा केलेल्या इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 00000

तिनविरा येथे वनरक्षकांसाठी साप आणि अन्य वन्यजीव बचावकार्य कार्यशाळा संपन्न

Image
  अलिबाग,दि.03 (जिमाका):-  वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग (WWA) आणि ऑर्गनायझेशन फॉर वाईल्ड लाईफ स्टडीज (OWLS) यांच्या संयुक्त विद्यमानाने वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून अलिबाग वनविभागाच्या वनरक्षकांसाठी साप आणि अन्य वन्यजीवांचे बचावकार्य कसे करावे, याबाबतची कार्यशाळा तिनविरा येथील वनविभागाच्या केंद्रामध्ये डॉ.प्रसाद दाभोळकर यांच्याद्वारे घेण्यात आली. वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग (WWA) आणि ऑर्गनायझेशन फॉर वाईल्ड लाईफ स्टडीज (OWLS) या संस्था गेली अनेक वर्षे वन्यजीव बचाव आणि जनजागृतीसाठी कार्यरत आहेत. अलिबाग आणि भोवतालचा परिसर हा नैसर्गिक जैवविविधतेने नटलेला आहे, त्यामुळे साप आणि अन्य वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर इथे आढळून येतो. अशा वेळी मनुष्य-वन्यप्राणी संघर्ष हा स्वाभाविक आहे, अशा प्रसंगी वनविभागाची भूमिका फार महत्वाची असते. म्हणूनच वनरक्षकांना बचावकार्याचे योग्य प्रशिक्षण देणे आवश्यक असते, जेणेकरुन वन्यजीवांचे संरक्षण होईल तसेच सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती होईल, असे डॉ. प्रसाद दाभोळकर यांनी सांगितले. या कार्यशाळेसाठी अलिबाग वनविभाग, वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग चे अदिती