तिनविरा येथे वनरक्षकांसाठी साप आणि अन्य वन्यजीव बचावकार्य कार्यशाळा संपन्न

 

अलिबाग,दि.03 (जिमाका):- वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग (WWA) आणि ऑर्गनायझेशन फॉर वाईल्ड लाईफ स्टडीज (OWLS) यांच्या संयुक्त विद्यमानाने वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून अलिबाग वनविभागाच्या वनरक्षकांसाठी साप आणि अन्य वन्यजीवांचे बचावकार्य कसे करावे, याबाबतची कार्यशाळा तिनविरा येथील वनविभागाच्या केंद्रामध्ये डॉ.प्रसाद दाभोळकर यांच्याद्वारे घेण्यात आली.

वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग (WWA) आणि ऑर्गनायझेशन फॉर वाईल्ड लाईफ स्टडीज (OWLS) या संस्था गेली अनेक वर्षे वन्यजीव बचाव आणि जनजागृतीसाठी कार्यरत आहेत.

अलिबाग आणि भोवतालचा परिसर हा नैसर्गिक जैवविविधतेने नटलेला आहे, त्यामुळे साप आणि अन्य वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर इथे आढळून येतो. अशा वेळी मनुष्य-वन्यप्राणी संघर्ष हा स्वाभाविक आहे, अशा प्रसंगी वनविभागाची भूमिका फार महत्वाची असते. म्हणूनच वनरक्षकांना बचावकार्याचे योग्य प्रशिक्षण देणे आवश्यक असते, जेणेकरुन वन्यजीवांचे संरक्षण होईल तसेच सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती होईल, असे डॉ. प्रसाद दाभोळकर यांनी सांगितले.

या कार्यशाळेसाठी अलिबाग वनविभाग, वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग चे अदिती सगर, ओमकार कामतेकर, पारस घरत, सुजित लाड, रुपेश गुरव, समीर पालकर आणि ऑर्गनायझेशन फॉर वाईल्ड लाईफ स्टडीज च्या सभासदांनी विशेष मेहनत घेतली.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक