Posts

Showing posts from April 18, 2021

लॉकडाऊन काळात पात्र लाभार्थ्यांना मिळणार मोफत अन्नधान्य तसेच शिवभोजन केंद्रावरून मोफत जेवण

    अलिबाग,जि.रायगड,दि.22 (जिमाका):-करोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावास प्रतिबंध व्हावा, याकरिता महाराष्ट्र राज्यामध्ये   टाळेबंदी तसेच संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे.        या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या आर्थिक सहाय्यातर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम,2013 अंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्य मिळण्यास पात्र असलेल्या लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजनेच्या व प्राधान्य कुटुंब योजनेच्या सुमारे 7 कोटी लाभार्थ्यांना 1 महिन्याकरीता मोफत अन्नधान्य (गहू व तांदूळ) वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा जिल्ह्यातील सुमारे 17 लक्ष लाभार्थ्यांना   होणार आहे.   या शासन निर्णयानुसार रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजनेतील पात्र लाभार्थ्यांना 1 महिन्याकरीता प्रति शिधापत्रिका 35 किलो अन्नधान्य (तांदूळ 25 किलो व गहू 10 किलो) मोफत वितरण करण्यात येणार आहे. प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिकाधारकांना प्रति व्यक्ती 05 किलो अन्नधान्य   (तांदूळ 3 किलो व गहू 2 किलो)   1 महिन्याकरीता मोफत वितरण करण

पेण येथील जेएसडब्लू कंपनीकडून लवकरच उभे राहणार जवळपास आठशे बेड्सचे अद्ययावत जम्बो कोविड केअर सेंटर

    अलिबाग,जि.रायगड,दि.22 (जिमाका):- जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध असलेल्या पेण-डोलवी येथील जे.एस.डब्ल्यू कंपनी या ठिकाणी सर्व सुविधायुक्त अद्ययावत जम्बो कोविड केअर सेंटर सुरू करणेबाबत मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी विनंती केली होती. त्यानुषंगाने ही विनंती तात्काळ मान्य करीत याबाबतचे आदेश शासनाकडून निर्गमित करण्यात आले आहेत.                जिंदाल गृपचे संचालक श्री.सज्जन जिंदाल यांनी देखील कोविड केअर सेंटरसाठी आवश्यक ते सर्व प्रकारचे सहकार्य करण्याच्या सूचना येथील कंपनी प्रशासनास दिल्या आहेत.              आज सकाळी या ठिकाणी पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी प्रत्यक्ष भेट देवून माहिती घेतली व संबंधितांना आवश्यक त्या सूचनाही केल्या. जवळपास 700 ते 800 बेडस् चे आरोग्यविषयक सर्व सुविधायुक्त हे जम्बो कोविड केअर सेंटर सुरू होऊन नागरिकांना आरोग्यसंबंधी  सर्व सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.                यावेळ

चला दक्षता घेवून करोनाला हरवू या..!

  विशेष लेख क्र.24                                                        दिनांक :- 22 एप्रिल 2021               करोनाच्या महामारीने जगातील सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे. करोनाची वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब ठरत आहे. शासनाने लॉकडाऊन जाहीर केला असून आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर शासन भर देत आहे. त्यादृष्टीने पालकमंत्री कु.आदिती तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, जिल्ह्यातील अन्य लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी,उपाध्यक्ष सुधाकर घारे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, प्र.निवासी उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे व सर्व जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा अहोरात्र परिश्रम घेत आहेत.आपणही त्यांच्या या प्रयत्नांना आवश्यक साथ देत दक्षता घेवून करोनाला हरवू शकतो. लक्षणे :- v   करोना या आजारात न थांबणारा खोकला, v   शरीराचे तापमान 37.8c म्हणजे 100.4 f   पेक्षा जास्त असणे, v   तोंडाची चव व वास बदलणे, ताप व थकवा, v   श्वास घ्यायला त

अन्... जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह ..

    अलिबाग,जि.रायगड,दि.22 (जिमाका):- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती उज्वला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या माध्यमातून अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे बालविवाह   थांबविण्याबाबतची यशस्वी कार्यवाही करण्यात आली.   मापगाव येथे बालविवाह होत असल्याची माहिती चाईल्ड लाईनच्या माध्यमातून मिळाल्यावर प्रत्यक्ष गावात भेट देवून एकूण चार बालकांचे बालविवाह होत असताना बालकांचे आई-वडील व नातेवाईकांना समज देण्यात आली व योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.त्या सर्वांचे समुपदेशन करण्यात आले.   मापगाव येथील रहिवासी असलेली भावंडे, त्यापैकी मुलीचे वय 16 वर्षे व मुलाचे वय 19 वर्षे होते. मुलीचा विवाह निश्चित करण्यात आलेल्या मुलाचे वय 19 वर्षे व मुलाचा विवाह निश्चित करण्यात आलेल्या मुलीचे वय 17 वर्षे इतके होते. हे सर्वजण पोयनाड नागझरी आदिवासी वाडी येथील रहिवासी आहेत. एकंदरीत चारही   नियोजित वधू-वर अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 अन्वये अल्पवयीन बालकांचे बालविवाह होणार नाही, याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या असून पालकांकडून जबाबनामा

मोटार वाहन निरीक्षक संदीप कित्ते यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती

    अलिबाग,जि.रायगड,दि.22 (जिमाका):- Implementation of iRAD (Intergrated Road Accident Database) करिता पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आस्थापनेवरील मोटार वाहन निरीक्षक संदीप कित्ते यांची प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल येथे नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा मोबाईल व्हॉटस्अप क्रमांक   7507776467 (ई-मेल आयडी- mh46@ mahatranscom.in) असा आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल अनिल पाटील यांनी कळविले आहे. ००००००

“एक देश एक रेशन कार्ड” योजनेचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा

    अलिबाग,जि.रायगड,दि.22 (जिमाका):-: "एक देश एक रेशन कार्ड" या योजनेची सुरुवात सन 2018 मध्ये Integrated Management of public Distribution System (IM-PDS) म्हणून करण्यात आली.केंद्र शासनाच्या या योजनेंतर्गत संबंधित रास्तभाव दुकानात आधार प्रमाणीकरण करून लाभार्थ्याला पोर्टेबिलिटीद्वारे देशातील कोणत्याही राज्यातील, कोणत्याही रास्तभाव दुकानातून तसेच राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून धान्य उचलण्याची सोय उपलब्ध आहे.               माहे ऑगस्ट 2019 मध्ये क्लस्टरच्या स्वरुपात महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश व तेलंगणा या चार राज्यांमध्ये “ एक देश एक रेशन कार्ड ” ची अंमलबजावणी प्रायोगिक स्वरुपात करण्यात आली.   या दोन क्लस्टरपैकी एका क्लस्टरमध्ये महाराष्ट्रासह गुजरात राज्य होते.                माहे जानेवारी 2020 पासून “ एक देश एक रेशन कार्ड ” ची अंमलबजावणी 12 राज्यात (महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश, केरळ, कर्नाटक, झारखंड, हरियाणा, त्रिपुरा व गोवा)   करण्यात आली आहे.                   माहे डिसेंबर 2020 पासून एकूण 32 राज्य/केंद्रशासित प्रदेशांमध्ये

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खत, बियाणे व कीटकनाशकांचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी "कृषी निविष्ठा सनियंत्रण कक्ष" सुरु

    अलिबाग,जि.रायगड,दि.22 (जिमाका):-   सन 2021-22 खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खत, बियाणे व कीटकनाशकांचा सुरळीत पुरवठा होणे अत्यंत गरजेचे असल्याने करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी घ्यावयाची खबरदारी लक्षात घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तसेच कृषी सेवा केंद्रचालकांना कृषी निविष्ठा पुरवठयाबाबत कोणतीही अडचण येऊ नये,यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग व कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद रायगड येथे "कृषी निविष्ठा सनियंत्रण कक्ष" सुरु करण्यात आले आहेत.     हे सनियंत्रण कक्ष दररोज सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या कालावधीत सुरू राहतील.        शेतकरी तसेच निविष्ठा विक्रेते यांच्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथील तक्रार निवारण कक्षात   जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक म्हणून विजय तुपसौंदर्य (व्हॉटस्अप)   मो.क्र. 8830704499 यांची तर   कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, रायगड येथील तक्रार निवारण कक्षात मोहीम अधिकारी, जिल्हा परिषद, श्री.मुनीर बाचोटीकर, (व्हॉटस्अप)   मो.क्र.9823411386 यांची नियुक्ती करण्य

अलिबाग नगरपरिषदेचे कोविड साखळी रोखण्याकरिता महत्वाचे पाऊल वेळेत निदान..वेळेत उपचार

Image
  अलिबाग,जि.रायगड,दि.22 (जिमाका):- अलिबाग नगरपरिषदेने कोविड प्रतिबंधक उपाययोजनेंतर्गत करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी   खाजगी प्रयोगशाळा एरोहेड सर्व्हिसेस पनवेल, यांच्या सहकार्यातून अलिबागमधील ज्येष्ठ नागरिक हॉल, येथे आज गुरुवार, दि. 22 एप्रिल पासून कोविड चाचणी केंद्र सुरु केले आहे.                अलिबाग नगरपरिषद अध्यक्ष   प्रशांत नाईक यांच्या पुढाकारातून आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी , अलिबाग नगरपालिका प्र. मुख्याधिकारी गोविंद वाकडे यांच्या सहकार्यातून हा उपक्रम आजपासून सुरु करण्यात आला आहे.               या केंद्रातून शासनाने ठरवून दिलेल्या दरात रॅपिड अँटीजेन, आरटीपीसीआर, कोविड अँटीबॉडी अशा विविध वैद्यकीय तपासण्या नागरिक करून घेऊ शकणार आहेत.             तरी नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हाधिकारी निधी चौधरी व अलिबाग नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी गोविंद वाकडे यांनी केले आहे. ०००००००