चला दक्षता घेवून करोनाला हरवू या..!

 

विशेष लेख क्र.24                                                       दिनांक :- 22 एप्रिल 2021


 

            करोनाच्या महामारीने जगातील सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे. करोनाची वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब ठरत आहे. शासनाने लॉकडाऊन जाहीर केला असून आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर शासन भर देत आहे. त्यादृष्टीने पालकमंत्री कु.आदिती तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, जिल्ह्यातील अन्य लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी,उपाध्यक्ष सुधाकर घारे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, प्र.निवासी उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे व सर्व जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा अहोरात्र परिश्रम घेत आहेत.आपणही त्यांच्या या प्रयत्नांना आवश्यक साथ देत दक्षता घेवून करोनाला हरवू शकतो.

लक्षणे :-

v  करोना या आजारात न थांबणारा खोकला,

v  शरीराचे तापमान 37.8c म्हणजे 100.4 f  पेक्षा जास्त असणे,

v  तोंडाची चव व वास बदलणे, ताप व थकवा,

v  श्वास घ्यायला त्रास होणे, घसा खवखवणे,

v  स्नायूदुखी ही लक्षणे तीव्रपणे जाणवू लागली की ताबडतोब अँटीजन वा आरटीपीसीआर चाचणी करावी.

गृह विलगीकरण :-

Ø  ज्या व्यक्तीची चाचणी  पॉझिटीव्ह  आली असेल त्यांनी अलगीकरणात  राहावे.

Ø   तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढच्या प्रक्रिया तात्काळ कराव्यात.

Ø  घरातील इतरांनाही विलगीकरणात राहावे.

Ø  अन्य लोकांत मिसळू नये.

      करोना हा संसर्गजन्य आजार आहे. बोलताना, शिंकताना, खोकताना  उडणाऱ्या सूक्ष्म  तुषारापासून हा आजार पसरू शकतो. म्हणून कोविड संशयित व बाधितांनी वेगळे राहावे. त्यामुळे इतरांना करोना व्हायरसची बाधा होणार नाही.

दक्षता:-

v  गृह विलगीकरणात (आयसोलेट) असणाऱ्या व्यक्तीकडे पल्स ऑक्सिमीटर, थर्मामीटर, फेस मास्क, ग्लोव्हज या गोष्टी असाव्यात.

v  अशा रुग्णांची काळजी घेणारी एकच व्यक्ती असावी. अशा व्यक्तीला नगरपालिका, महानगरपालिका, आरोग्य यंत्रणा तसेच IVR कडून येणाऱ्या फोनला उत्तर द्यावे लागते.

v  गृह विलगीकरणातील व्यक्तीने घरातील ज्येष्ठ नागरिकांपासून, गर्भवती महिला, लहान मुले व इतर व्याधी असणाऱ्यांपासून दूर राहावे.

v  वैयक्तिक स्वच्छता पाळावी.

v  औषधे नियमित घ्यावीत.

v  घरातील वावर कमी ठेवावा.

v  घरात वावरतानासुध्दा मास्क आवश्यक आहे.

v   घराबाहेर पडू नये, लोकांत मिसळणे पूर्णत: बंद करावे.

v   रुग्णांच्या वापरातील जेवणाचे ताट, पेला, तांब्या वेगळा ठेवावा, रुग्णाचे कपडे, बेडशीट, टॉवेल, ताट,पेले वेगळे धुवा.

v   जेवण देताना अंतर ठेवा, खोली स्वच्छ करताना मास्क, क्लोज वापरा. एका वापरानंतर त्याची विल्हेवाट लावावी.

v   रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होत असेल, छातीत दुखत असेल, शुद्ध हरपणे, चेहरा किंवा ओठ निळे पडणे अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यावी, हॉस्पिटलला जावे.

v   रुग्णाची खोली, दररोज 1 टक्के सोडियम हायपोक्लोराईडच्या सोल्युशनने साफ करावी, टॉयलेट व इतर पृष्ठभाग ब्लीचच्या सोल्यूशनने साफ करावा.

            मानसिक संतुलनासाठी पुरेसा आहार, पुरेशी झोप, पुरेसा व्यायाम करून प्रतिकारशक्ती वाढवावी. योगासने, प्राणायाम, ध्यानधारणांची जोपासना करावी, करमणूक व विरंगुळा म्हणून आवडत्या व्यक्तींशी फोन व समाजमाध्यमांद्वारे संवाद साधावा.  नकारात्मक बातम्या, नकारात्मक संदेश, नको ते अनाहूत सल्ले देणारी मंडळी या सगळ्या गोष्टी टाळाव्यात.

            शेवटी महत्त्वाचे आवाहन आहे की, मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे,हात सतत साबणाने धुणे या सूत्राचे पालन करु या, गर्दीत जाणे टाळू या अन् शासनाच्या आदेशाचे, सूचनांचे वेळोवेळी पालन करून करोनाला हद्दपार करण्यासाठी कटिबद्ध होऊ या…!

 

लेखन:-                                                                                                                   संपादन:-                                                                                                          

श्री.सुरेश राजाराम पाटील                                                                                      मनोज शिवाजी सानप                                                                                  

माहिती शिक्षण व संवादतज्ज्ञ, जिल्हा परिषद, रायगड                                            जिल्हा माहिती अधिकारी,                                        

(मो.क्र :-9881712585)                                                                                  रायगड-अलिबाग

 

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक