Posts

Showing posts from February 6, 2022

कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना विविध दाखल्यांचे वाटप

Image
  अलिबाग,दि.10(जिमाका):- आदिवासी कातकरी उत्थान कार्यक्रम व स्वातंत्र्याच्या अमृत वर्ष महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आज कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना जातीचे दाखले, शिधापत्रिका, ई-श्रम कार्डचे वाटप करण्यात आले.    यावेळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद डॉ.किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुषमा सातपुते, तहसिलदार सचिन शेजाळ, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार उपस्थित होते. ०००००००

रायगड जिल्हा माहिती भवन उभारण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची मंजूरी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा यशस्वी पाठपुरावा

    अलिबाग,दि.10(जिमाका):- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या 'मुख्यालयाचे बळकटीकरण व विभागीय, जिल्हा माहिती कार्यालय, माहिती भवन इमारत बांधकाम' योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. त्यानुषंगाने रायगड येथे सुसज्ज असे जिल्हा माहिती भवन लवकरच साकारण्यात येणार आहे.     जिल्ह्यात विकास संवादाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना व संकल्पना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यास मदत होणार आहे. या अद्ययावत जिल्हा माहिती भवनामध्ये जिल्हा माहिती कार्यालय, मिनी थिएटर, मिनी स्टुडीओ, माहिती व तंत्रज्ञान कक्ष, प्रदर्शन दालन,   विविधोपयोगी सभागृह, डिजीटल वाचनालय, मिडीया संनियंत्रण कक्ष, प्रसारमाध्यम प्रतिनिधींकरीता अद्ययावत प्रसारमाध्यम कक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र असणार आहे.      रायगड जिल्हा हा औद्योगिक व पर्यटनाच्यादृष्टीने पसंतीचा आहे. जिल्ह्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, कोंकण रेल्वे, सागरी वाहतूक या माध्यमातून येणारे पर्यटक व लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यातील बहुतांश जनता शेती व पारंपरिक मासेमारी व्यावसायिक असून ग्रामीण, डोंगराळ

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विस्तारीकरण कामाचा भूमीपूजन समारंभ पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते संपन्न

Image
  अलिबाग,दि.10(जिमाका):- रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विस्तारीकरण कामाचा भूमीपूजन समारंभ पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात संपन्न झाला.      यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती योगिता पारधी, कोकण विभागीय आयुक्त श्री. विलास पाटील, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील,पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ .महेंद्र कुरा, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुषमा सातपुते, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. मेहेत्रे, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, कार्यकारी अभियंता जे.ए.सुखदेवे, तहसिलदार विशाल दौंडकर, सचिन शेजाळ, सतिश कदम, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, तहसिलदार मीनल दळवी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 000000