Posts

Showing posts from July 4, 2021

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने "छतावरील पाऊस पाणी संकलन व भूजल पुनर्भरण" आणि "पाणी गुणवत्ता" विषयावरील वेबिनार संपन्न

       अलिबाग,जि.रायगड,दि.8 (जिमाका) :- भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या स्थापनेला यावर्षी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने यंत्रणेकडून जनसामान्यांपर्यंत भूजला बाबत जाणीव जागृती निर्माण व्हावी व भूजल पुनर्भरण ही एक लोकचळवळ निर्माण होऊन, पाणी टंचाई वर मात करण्याच्या दृष्टीने भूजल साक्षरता अभियान हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत दिनांक 5 व 6 जुलै 2021 रोजी सकाळी 11.30 ते 1.30 वाजेपर्यंत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा रायगड व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने खास शेतकर्‍यां करिता वेबिनार आयोजित करण्यात आले होते.     या कार्यशाळेच्या अध्यक्षा श्रीमती उज्वला बाणखेले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यांनी सांगितले की, पाणी हा खरतर सर्वांच्या जिव्हाळयाचा विषय आहे. पण पिण्याच्या पाण्याच्या टंचाई बरोबरच सिंचनासाठी आवश्यक असणा-या   पाण्याच्या टंचाईवर सुध्दा मात करणे अत्यावश्यक आहे. यावेळी त्यांनी अनेक शेतक-यांना या वेबिनारमध्ये   सहभागी होण्याचे आवाहन केले. नैसर्गिक तसेच मानवाच्या   कृतीमुळे तयार झालेले खड्डे किंवा खाण

भारतीय डाक विभागासोबत काम करण्याच्या सुवर्णसंधीचा होतकरू तरुण, तरुणींनी लाभ करून घ्यावा--डाक अधीक्षक ए.जी.पाखरे

    अलिबाग,जि.रायगड,दि.8 (जिमाका) :- केंद्र सरकारच्या ग्रामीण डाक जीवन व डाक जीवन विम्याच्या ग्रामीण व शहरी क्षेत्रांमध्ये विमा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी आता सुशिक्षित तरुण, तरुणींना त्यासोबत वय 18 ते 50 वर्षामधील सर्वाना उपलब्ध झाली आहे.यासाठी डाक विमा प्रतिनिधी (डायरेक्ट एजंट) म्हणून निवड प्रक्रिया रायगड डाक विभागात सुरु करण्यात आली आहे.      विमा प्रतिनिधींची   नेमणूक अधीक्षक डाकघर,रायगड विभाग, अलिबाग यांच्यामार्फत थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी अर्ज पाठविताना उमेदवाराने सोबत जन्मतारखेचा दाखला, शैक्षणिक पात्रता, आधार कार्ड, पॅनकार्ड, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी तसेच या क्षेत्रातील अनुभव असल्यास त्याबाबतची कागदपत्रे पाठवावीत. पाच हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या   भागात राहणारा उमेदवार हा 10 वी पास असावा तसेच पाच हजार व त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भागात राहणारा उमेदवार हा 12 वी पास असणे आवश्यक आहे.      कोणत्याही कंपनीचे माजी विमा प्रतिनिधी/ माजी जीवन विमा सल्लागार, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ सदस्य-कर्मचारी, स्वयंसेवी संघटना चालक, माजी सैन

कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असल्याने नागरिकांना दक्ष राहण्याचे जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांचे आवाहन

    अलिबाग,जि.रायगड,दि.8 (जिमाका):- केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुढील काही दिवसात कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे.       रायगड जिल्ह्याचा सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांपेक्षा खाली आहे . परंतु कोविड-19 निर्देशांचे पालन न केल्यास हा पॉझिटिव्हीटी दर वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे, बाजारपेठांमध्ये गर्दी करणे, अनावश्यक बाहेर पडणे, मास्क न वापरणे यामुळे जिल्हयातील रुग्णांची संख्या वाढू शकते, ती वाढू नये,यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या वतीने कोविड-19 नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे.       या कारवाईमध्ये 1 एप्रिल 2021 ते 30 जून 2021 या कालावधीत पोलिस प्रशासनाकडून रक्कम रुपये 1 कोटी 32 लाख व ग्रामपंचायत तसेच नगरपालिका यासारख्या स्थानिक प्रशासनाकडून रु.21 लाख 56 हजार 450 अशी   एकूण रु.1 कोटी 53 लाख 56 हजार 450 एवढी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे.       तसेच पुढील काही दिवसात कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असल्याने नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु

भूजल संवर्धनासाठी लोकसहभाग महत्वाचा--मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील

    अलिबाग,जि.रायगड,दि.8 (जिमाका):- पाणी ही मानवाची मूलभूत गरज आहे त्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी सर्वांनी सक्रीय सहभाग घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी   आज येथे केले. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांच्या निमित्ताने भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, अलिबाग रायगड व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित   रायगड जिल्ह्यातील भूस्तरीय रचना व पाऊस पाणी संकलन व पाणी गुणवत्ता या विषयांवरील जिल्हास्तरीस ऑनलाईन वेबिनार मध्ये ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील म्हणाले की, रायगड जिल्हा हा जरी जास्त पर्जन्यमानाच्या विभागात मोडत असला तरीही येथील भौगोलिक रचनेमुळे पावसाचे पाणी वाहून जाते. परिणामी दुष्काळ व पाणी टंचाई प्रश्नास सामोरे जावे लागते. पावसाळ्यात पडणाऱ्या प्रत्येक थेंब जमिनीत जिरवून पाण्यांचे संकलन करणे व त्याव्दारे भूजल पुनर्भरण करणे आवश्यक आहे. यासाठी तालुकास्तरांवर गटविकास अधिकारी यांनी योग्य नियोजन करावे. पाणी बचत त

प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत येथील शास्त्रज्ञांचा शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला

    अलिबाग,जि.रायगड,दि.7 (जिमाका):-   पावसाने खंड दिल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतातूर झालेला आहे. काही ठिकाणी भात पिकाची लावणी खोळंबली. अपुऱ्या पाण्यामुळे काही ठिकाणी जमिनीला भेगाही पडल्या आहेत. रोग व किडीचा प्रादूर्भाव झाल्यास काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पुढील सल्ला मार्गदर्शक ठरेल.       भात रोपवाटिकेत ताण बसत असल्यास बाह्यस्त्रोतातून विहीर/बोअरवेल इत्यादी पाणी देण्याची व्यवस्था करावी तसेच पुर्नलागवड केलेल्या भात खाचरामध्ये पहिल्या 30 दिवसापर्यंत पाण्याची पातळी 2.5 ते 5 से.मी. पर्यंत गरजेनुसार बाह्य स्त्रोतातून पाण्याची उपलब्धता करून नियंत्रित करावी.      पुढील पाच दिवस मध्यम स्वरूपाच्या पावासाची तसेच दि.09 व 10 जुलै 2021 रोजी जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता पावसाचा अंदाज घेऊनच भात लागवडीची कामे हाती घ्यावीत. शक्य असल्यास बाह्यस्त्रोतातून पाण्याची उपलब्धता करून भात पुर्नलावगड करावी अन्यथा पुढे ढकलावी.पुर्नलागवड केलेल्या भात खाचरामध्ये लष्करी अळीचा प्रादूर्भाव दिसून येण्याची शक्यता असल्याने किडीच्या प्रादूर्भावाचे न

जिल्ह्यामध्ये दि.01 ऑगस्ट रोजी होणार राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

    अलिबाग,जि.रायगड,दि.7 (जिमाका):-   महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्याकडील पत्रानुसार संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये दि. 01 ऑगस्ट 2021 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती दिवाणी न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग श्री. संदीप वि. स्वामी यांनी दिली आहे.       या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, 138 एन.आय.ॲक्ट खालील प्रकरणे,दिवाणी अपिले, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे व अपिले ठेवली जाणार आहेत. तसेच नगरपालिका व ग्रामपंचायत यांच्या घरपट्टी व पाणीपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, वीजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था यांच्याकडील थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे या लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.       राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रकरणे तडजोडीने निकाली केल्यास लोकांचा पैसा आणि वेळ यांचा अपव्यव होत नाही, पक्षकारांना तात्काळ न्याय मिळतो. त्यामुळे दि. 01 ऑगस्ट 2021 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालत

रोहा वनविभागातील महाड वन परिक्षेत्रातील रायगड किल्ला परिसर येथे (दि.01 जुलै) रोजी हवाई बी पेरणी कार्यक्रम संपन्न

    अलिबाग,जि.रायगड,दि.7 (जिमाका):-   रोहा वनविभागातील महाड वन परिक्षेत्रातील रायगड किल्ला परिसर येथे (दि.01 जुले) रोजी हवाई बी पेरणी कार्यक्रमाचा उदघाटन समारंभ पार पडला. कार्यक्रमाचे उदघाटन मुख्य वनसंरक्षक (प्रा.) ठाणे   श्री.एस.व्ही.रामाराव यांच्या हस्ते करण्यात आले.      या वेळी उप वनसंरक्षक रोहा श्री.अप्पासाहेब निकत, सहाय्यक वनसंरक्षक रोहा श्री. विश्वजीत जाधव, वनक्षेत्रपाल महाड श्री.प्रशांत शिंदे, वनक्षेत्रपाल म्हसळा श्री.निलेश पाटील, वनक्षेत्रपाल मुरुड श्री.प्रशांत पाटील, वनक्षेत्रपाल श्रीवर्धन श्री.मिलिंद राऊत तसेच महाड वन परिक्षेत्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. जागतिक पातळीवर पर्यावरण विषयक बदलत्या परिस्थितीमुळे राष्ट्रीय वननीती 1988 नुसार 33 टक्के क्षेत्र वनाच्छादित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जे क्षेत्र अतिदूर्गम आहे तसेच ज्या ठिकाणी पोहोचणे सुध्दा शक्य होत नाही, अशा ठिकाणी मातीची धूप होऊ नये म्हणून जैविक आच्छादन करणे गरजेचे असल्याने मुख्यमंत्री   उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांच्या परिसरातील अतिउताराच्या तसेच अतिदूर्गम क्षेत्रामध्ये हवाई बी पेरणीच

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 2 मि.मी. पावसाची झाली नोंद

      अलिबाग,जि.रायगड,दि.7 (जिमाका):-   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 2.82 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 1008.49 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.      आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-       अलिबाग- 8.00 मि.मी., पेण- 0.00 मि.मी., मुरुड- 0.00 मि.मी., पनवेल- 1.40 मि.मी., उरण-0.00 मि.मी., कर्जत- 0.00 मि.मी., खालापूर- 0.00 मि.मी., माणगाव- 0.00 मि.मी., रोहा- 5.00 मि.मी., सुधागड-0.00 मि.मी., तळा- 20.00 मि.मी., महाड- 1.00 मि.मी., पोलादपूर- 9.00 मि.मी, म्हसळा- 0.00 मि.मी., श्रीवर्धन- 2.00 मि.मी., माथेरान- 0.70 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 45.10 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 2.82 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 32.09टक्के इतकी आहे. 00000