Posts

Showing posts from April 14, 2024

रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणूक 2024 साठी 21 उमेदवारांचे अर्ज वैध 7 उमेदवारांचे अर्ज अवैध

    रायगड(जिमाका) दि.20:-  32- रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 28 उमेदवारांनी 40 नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. आज पार पडलेल्या छाननी प्रक्रियेत 21 उमेदवारांचे 27 नामनिर्देशन पत्रे वैध ठरले असून 7 उमेदवारांचे 13 नामनिर्देशनपत्रे अवैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली. निवडणूक आयोगाचे निरीक्षक संजीव कुमार झा यांच्या उपस्थितीत सर्व उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया पार पडली. 7 उमेदवारांचे अर्ज अवैध 1)श्री.अनिकेत सुनील तटकरे, ( नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी,) 2)श्री.नरेश गजानन पाटील,(अपक्ष) 3) श्री.मुजफ्फर जैनुद्दीन चौधरी, (बहुजन समाज पार्टी) 4)श्री.उस्मान बापू कागदी,(अपक्ष) 5) श्री.अनिल बबन गायकवाड,(बहुजन समाज पार्टी) 6) श्री.भुपेंद्र नारायण गवते,(अपक्ष) 7)   श्री.घाग संजय अर्जुन,(अपक्ष)

32-रायगड लोकसभा मतदार संघात शेवटच्या दिवशी 19उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी एकूण 28 उमेदवारांचे 40 नामनिर्देशनपत्र

  रायगड,दि.19(जिमाका) :-  32 रायगड लोकसभा मतदार संघांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी (दि.19 एप्रिल) 19 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले असून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी मतदार संघात एकूण 28 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली. 32-रायगड लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे. प्राप्त सर्व नामनिर्देशनपत्रांची छाननी प्रक्रिया दिनांक 20 एप्रिल रोजी होणार आहे. माघार घेण्याची दिनांक 22 एप्रिल 2024  आहे. आज अखेरच्या दिवसापर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या सर्व उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे .. 1) श्री.अनंत गिते, (अपक्ष) (1 अर्ज ), 2)श्री.अनंत बाळोजी गिते, (अपक्ष)) (1 अर्ज ), 3) श्री. अनंत गंगाराम गिते, (1+ 3 अर्ज) (शिवसेना)उद्धव बाळासाहेब ठाकरे), 4) श्री. नितीन जगन्नाथ मयेकर, अपक्ष (1), 5)श्री. आस्वाद जयदास पाटील, अपक्ष (1). 6)श्री. मंगेश पद्माकर कोळी, (अपक्ष)(1अर्ज), 7)श्री.प्रकाश बाळकृष्ण चव्हाण,3 अर्ज,(भारतीय जवान किसान पार्टी) 8) श्री.पांडुरंगदामोदर चौले,1

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी राज्यात विशेष मोहिम मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अर्ज दाखले करण्याचे आवाहन

  रायगड (जिमाका) दि.15:-  सामाजिक न्याय व विशेष  सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यात दि.10 ते दि. 25 एप्रिल 2024 या कालावधीत समता पंधरवडयात जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिम सुरु करण्यात आली आहे.  इ.11 वी व इ. 12 वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या, तसेच अभियांत्रिकी पदविका शिक्षण घेत असलेल्या व पुढील उच्च शिक्षणाकरिता व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळावे. जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यापासून वंचित राहू नये, याकरिता विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.      ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी त्वरीत अर्ज सादर करावेत.  ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत, परंतु अद्याप वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही. अशा विद्यार्थ्यांनी दि.22  ते 26 एप्रिल 2024 या कालावधीत समिती कार्यालयात हजर राहून त्रुटींची पूर्तता करावी.  वेळेत वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा. तसेच वेळेत जात व