Posts

Showing posts from September 18, 2022

“राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता..सेवा पंधरवडा”, जिल्हा प्रशासनाचा शून्य प्रलंबिततेचा संकल्प

Image
  नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा स्थानिक पातळीवर  जलदगतीने निपटारा करण्यासाठी विशेष मोहीमेची आढावा बैठक संपन्न अलिबाग,दि.22 (जिमाका):-  जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात दि.17 सप्टेंबर ते दि.02 ऑक्टोबर 2022 या कालावधीत  “ राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा ”  निमित्ताने आपले सरकार, नागरी सेवा केंद्र व इतर वेबपोर्टलवरील नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा स्थानिक पातळीवर जलदगतीने निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने शून्य प्रलंबिततेचा संकल्प केला आहे. त्यानुषंगाने या मोहिमेच्या कार्यवाहीबाबतच्या सद्य:स्थितीचा आढावा दूरदृष्यप्रणालीद्वारे अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातून घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, तहसिलदार विशाल दौंडकर, सचिन शेजाळ, जिल्हा प्रशासन अधिकारी शाम पोशट्टी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते. या विशेष मोहिमेंतर्गत विविध विभ

बेरोजगारांच्या सहकारी सेवा सोसायट्यांनी कंत्राटी काम मिळण्याबाबतचे प्रस्ताव दि.3 ऑक्टोबर पर्यंत सादर करावेत

अलिबाग,दि.22 (जिमाका):-   बेरोजगारांच्या सहकारी सेवा सोसायट्यांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्याच्या उद्देशाने  रु.3 लाख पर्यंत इतक्या रक्कमेची कामे विनानिविदा उपलब्ध करुन देण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार विभाग, शासन निर्णयान्वये जिल्हास्तरावर काम वाटप समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुषंगाने काम वाटप समितीकडे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांकडून कंत्राटी कामांकरिता पत्र प्राप्त झाले आहे. ज्या सेवा सोसायट्यांचे कार्यक्षेत्र पेण तालुक्याकरिता आहे, अशा सेवा सोसायट्यांना कामाची आवश्यकता असल्यास उपरोक्त कंत्राटी काम मिळण्याबाबतचे त्यांचे प्रस्ताव दि.03 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग या कार्यालयात स्वहस्ते सादर करावेत. आवश्यक अटी व शर्तींची पूर्तता करणे अनिवार्य असून उशिरा प्राप्त झालेले, अपूर्ण स्वरूपातील प्रस्ताव अपात्र ठरवून स्विकारण्यात येणार नसल्याची नोंद घ्यावी तसेच अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा अथवा कार्यालयाच्या 02141-22202

अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या प्रि-मॅट्रिक व बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेचे ऑनलाईन अर्ज 30 सप्टेंबर पूर्वी भरावेत

  अलिबाग,दि.22 (जिमाका):-     शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता केंद्र शासन पुरस्कृत अल्पसंख्याक समाजातील इयत्ता 1 ली ते 10 वी या वर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता यावा यासाठी नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज तसेच इयत्ता 9 वी ते 12 वी मधील फक्त मुलींसाठी असलेल्या बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता यावा यासाठी नवीन विद्यार्थीनींचे ऑनलाईन अर्ज दि.30 सप्टेंबर 2022 पूर्वी भरण्याचे आवाहन शिक्षण संचालक श्री.कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे. मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी आणि जैन या धार्मिक अल्पसंख्यांक समाजातील आर्थिक दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांनी  www.scholarship.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन संचालक श्री.पाटील यांनी केले आहे. 00000

शासकीय मागासवर्गीय वसतिगृहातील स्वयंपाकी, मदतनीस व इतर कर्मचाऱ्यांकरीता स्वयंपाकाच्या गॅस वापर व सुरक्षिततेबाबत प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

Image
  अलिबाग,दि.22 (जिमाका):-   “ सेवा पंधरवडा ”  कार्यक्रमांतर्गत आज दि.22 सप्टेंबर 2022 रोजी मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अलिबाग येथे वसतिगृहातील स्वयंपाकघरात गॅस वापरताना कुठल्याही प्रकारची दूर्घटना घडू नये, याकरिता हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या सहकार्याने वसतिगृहातील गृहपाल, स्वयंपाकी, मदतनीस व इतर कर्मचारी यांच्याकरिता  “ एलपीजी सिलेंडर, शेगडी इत्यादीचा शास्त्रशुध्द वापर कसा करावा? ”  याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या कार्यशाळेत श्री.निशाद पाटील व कु.सायली मोरे यांनी स्वयंपाकघरात गॅस सिलेंडर वापरताना कोणती काळजी घ्यावी? कोणकोणत्या चुका टाळाव्यात याविषयीची माहिती दिली. त्यामुळे आपण आपल्या वसतिगृहात तसेच प्रत्येकाच्या घरातही सुरक्षित राहू शकतो. दोनही वसतिगृहातील स्वयंपाकी व मदतनीस यांना उपयुक्त अशी माहिती दिली. या प्रशिक्षणासाठी समाज कल्याण, सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यालय अधीक्षक श्रीमती माधुरी पाटील यांनी केले. तर श्रीमती उषा गुजेला यांनी उपस्थित अधिकारी/कर्मचारी यांचे आभार मानले. 00000

चला, मतदार ओळखपत्रासोबत आधारकार्ड जोडू, मतदारयादीतील स्वतःची ओळख प्रमाणित करू..!

Image
  अलिबाग,दि.22 (जिमाका):-  भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार दि.1 ऑगस्ट 2022 पासून सर्व मतदारांना आपल्या मतदार ओळखपत्रासोबत आधारकार्ड संलग्न करण्याबाबत निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखालील रायगड जिल्ह्यातील मतदारांची मतदार ओळखपत्रासोबत आधार जोडणी करण्यासाठी जिल्हा अंतर्गत विविध उपक्रम व विशेष शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. तसेच जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी जिल्ह्यातील सर्व हौसिंग सोसायटीमध्ये आधारकार्ड मतदार कार्डसोबत लिंक करणे यासाठी शिबिराचे आयोजन करण्यासाठी हौसिंग सोसायटीमधील नागरिकांना आवाहन केले आहे. ज्या नागरिकांना आपल्या हौसिंग सोसायटीमध्ये आधार जोडणी शिबीर आयोजित करावयाचे आहे त्यांनी आपल्या जवळील मतदार नोंदणी कार्यालय (तहसील/ उपविभागीय अधिकारी कार्यालय) येथे संपर्क साधावा. कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक:- 188 पनवेल विधानसभा मतदारसंघ- 022-27452328 / 022-27469134 189 कर्जत विधानसभा मतदारसंघ- 02148-223499 190 उरण विधानसभा मतदारसंघ- 022-27222129 91 पेण विधानसभा मतदारस

मधमाशा पालन व्यवसाय जनजागृतीकरिता दि.27 सप्टेंबर रोजी मोफत प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन

  अलिबाग,दि.22 (जिमाका):-   महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, विशेष घटक योजना राबविल्या जातात. या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील गरजू सुशिक्षित बेरोजगार, बलुतेदार, फळ बागायतदार, यांच्या कौशल्यास वाव देण्यासाठी, अर्थसहाय्य देणे, तयार मालाच्या विक्रीस मदत अशा प्रकारचे सहाय्य शेतकऱ्यांना, व्यावसायिकांना केले जाते. याबाबतच्या मोफत प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन दि.27 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता मु.पो.वारे, ता.कर्जत, जि.रायगड येथे करण्यात आले आहे. मध केंद्र योजनेंतर्गत शेतकरी फळबागायतदार यांच्या शेतमालाचे परागीभवनामुळे 40 टक्के पर्यंत कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी पूरक उद्योग स्थापनेसाठी साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूकीद्वारे उद्योग स्थापन करता येतात. याकरिता 10 व 20 दिवसांचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. वाया जाणाऱ्या जंगल व फळबागायतीच्या फुलोऱ्यामुळे मधमाशा पाळून निसर्गाचे संरक्षण व संवर्धनासाठी तसेच त्यातून मिळणाच्या मध, मेण, विष, पराग इ. उप उत्पादने मिळू शकतात.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत 108 प्रकरणांना बँकेची मंजूरी

  अलिबाग,दि.22 (जिमाका):-  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग या अंमलबजावणी यंत्रणेस रायगड जिल्ह्याकरिता 800 प्रकरणांचे उद्दिष्ट वाटप करण्यात आलेले आहे. या योजनेंतर्गत एकूण 108 प्रकरणांना बँकेची मंजूरी मिळाली असून त्यातील प्रकल्प किंमत रक्कम रु.173.88 लाख इतका आहे. सन 2022-23 या आर्थिक वर्षात अमलबजावणी यंत्रणेद्वारे एकूण 740 प्रकरणे जिल्हा कार्यबल समितीच्या मंजूरीद्वारे बँकेकडे शिफारस करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात सन 2019 पासून अद्यापपर्यंत एकूण 157 प्रकरणात प्रत्यक्ष अनुदान वाटप करण्यात आले असून त्यातील अनुदान रक्कम रु.331.85 लाख इतकी आहे, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस. हरळय्या यांनी दिली आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील सुशिक्षित बेरोजगारांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करण्याकरिता कर्ज पुरवठा करण्यात येतो. या योजनेंतर्गत उत्पादन उद्योगाकरीता रु.50 लाख व सेवा उद्योगाकरीता रु.10 लाख मर्यादीत

शारीरिक विकास व रोगांवर मात करणारे बालक हे सुदृढ बालक पोषण अभियानांतर्गत बोर्ली येथे बालक स्पर्धेचे आयोजन

      अलिबाग,दि.21(जिमाका):-   संपूर्ण शारीरिक विकास व रोगांवर मात करणारे बालक हे सुदृढ बालक म्हणून ओळखले जाते. बाळाच्या संपूर्ण शारीरिक विकासासाठी पालकांनी शून्य वयोगटापासून विविध लसीकरण करून घेऊन त्यांना सकस आहार द्यावा, जेणेकरून त्यांची रोगावर मात करण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढेल,असे प्रतिपादन बोर्लीचे सरपंच चेतन जावसेन यांनी केले.   पोषण अभियानांतर्गत आयोजित बोर्ली ग्रामपंचायत सभागृहात बालक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ग्रामपंचायत सदस्य भारती बंदरी,ग्राम विकास अधिकारी पांडुरंग गाडेकर,आरोग्य सेविका संध्या भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.     उपस्थितांना मार्गदर्शन करताना सरपंच डॉ. चेतन जावसेन यांनी सांगितले की,राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात पोषण अभियान अंतर्गत पोषण महिना राबविला जात आहे. पोषण अभियान अधिकाधिक व्यापक होवून या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप यायला हवे. याकरिता घराघरात जनजागृती होणे आवश्यक आहे. शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांसाठी ‘सुदृढ बालक स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.   लहान मुलांना नेहमी काही तरी खाण्य

गुंतवणूक वृध्दी, व्यवसाय सुलभीकरण, निर्यात व एक जिल्हा एक उत्पादन विषयांशी निगडीत दोन दिवशीय चर्चासत्र व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

    अलिबाग,दि.21 (जिमाका):-   जिल्हा निर्यात प्रचलन समिती यांच्या निर्देशानुसार व मार्गदर्शनाखाली गुंतवणूक वृध्दी (Investment Promotion), व्यवसाय सुलभीकरण (Ease of Doing Business), निर्यात व एक जिल्हा एक उत्पादन (One District One Product) या विषयांशी निगडीत जिल्हा नियोजन भवन   येथे सोमवार, दि.26 सप्टेंबर व मंगळवार, दि.27   सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10.00   ते सायं.5.00   या वेळेत दोन दिवसीय चर्चासत्र व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रामध्ये गुंतवणूक वृध्दी (Investment Promotion), व्यवसाय सुलभीकरण (Ease of Doing Business), निर्यात व एक जिल्हा एक उत्पादन (One District One Product) या मुद्यांवर भर देण्यात आला आहे. या दोन दिवशी प्रदर्शनाकरिता जिल्ह्यातील 20 निर्यातक्षम उद्योग घटकाने नोंदणी केलेली आहे. तसेच या कार्यक्रमाकरिता जिल्ह्यातील मोठे, लघ, व मध्यम उद्योग आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गतच्या लाभार्थ्यांस सहभागाकरिता आमंत्रित करण्यात आले   आहे, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री.जी.एस.हरळया यांनी कळविले आहे. ००००००

“राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता..सेवा पंधरवडा” नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा स्थानिक पातळीवर जलदगतीने निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम

      अलिबाग,दि.21 (जिमाका):-   जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात दि.17 सप्टेंबर ते दि.02 ऑक्टोबर 2022 या कालावधीत “ राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा ” निमित्ताने आपले सरकार, नागरी सेवा केंद्र व इतर वेबपोर्टलवरील नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा स्थानिक पातळीवर जलदगतीने निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.  यामध्ये विविध विभागांच्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नवीन शासन निर्णयानुसार मदत निधीचे वितरण, पंतप्रधान किसान सन्मान निधीचा प्रलंबित पात्र लाभार्थ्यांना लाभ,  फेरफार नोंदीचा निपटार, शिधापत्रिकांचे वितरण, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरण नोंद, नव्याने नळ जोडणी, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र, प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजूरी, मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडणीमध्ये नवीन मालमत्ताधारकांचे नाव, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत सिंचन विहिरीकरिता अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी, अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वन हक्कपट्टे मंजूर करणे, दिव्यांगांना प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअ

इच्छुकांनी कर्जत येथील मुलांचे निरीक्षणगृहातील निमवैद्यकीय कंत्राटी तत्वावरील पदासाठी अर्ज करावेत

    अलिबाग,दि.21 (जिमाका):-   जिल्हा प्रादेशिक परीविक्षा अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे निरीक्षणगृह, बालगृह कृषी उत्पन्न बाजार समिती आवार कर्जत मुरबाड रोड, एच.पी.पेट्रोल पंपासमोर दहिवली कर्जत या ठिकाणी निमवैद्यकीय कर्मचारी हे एक पद 11 महिन्याच्या कंत्राटी तत्वावर भरावयाचे आहे. याकरिता दि. 28 मार्च 2022 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु निमवैद्यकीय या पदासाठी अल्प प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार निमवैद्यकीय या पदासाठी पुन:श्च पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मात्र दि.28 मार्च 2022 रोजीच्या जाहिरात नुसार निमवैद्यकीय कर्मचारी या पदासाठी अर्ज केले आहेत, त्यांनी अर्ज पुन:श्च सादर करू नयेत.   निमवैद्यकीय कर्मचारी कंत्राटी पदसंख्या 1 असून यासाठी रु.9 हजार मासिक मानधन आहे. याकरिता मान्यताप्राप्त संस्थेची ए.एन.एम./जी.एन. एम.पदवी अशी शैक्षणिक अर्हता आहे.   तर वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष असून   वैद्यकीय क्षेत्रात कामकाजाचा अनुभव असल्यास   त्यास प्राधान्य दिले जाणार आहे.   इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज दि.21 सप्टेंबर ते द

राज्यस्तरापर्यंत शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनास शासनाची मान्यता

    अलिबाग,दि.21 (जिमाका):-   कोविड-19 प्रादूर्भावामुळे सन 2020-21 व 2021-22 या कालावधीत शालेय क्रीडा स्पर्धांचे तालुकास्तर ते राष्ट्रीयस्तर आयोजन होऊ शकले नव्हते. सन 2022-23 या वर्षात भारतीय शालेय खेळ महासंघद्वारा राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत अनिश्चितता दिसून येत असल्याने राज्यातील विविध खेळ प्रकारातील खेळाडूंना विविध प्रकारांमध्ये राज्यस्तरापर्यंतच्या क्रीडा स्पर्धांमधील सहभागाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यस्तरापर्यंतच्या शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनास शासनाने दि.16 सप्टेंबर 2022 रोजी मान्यता दिली आहे.सन 2022-23 मध्ये शासनाने मान्यता दिल्यानुसार एकूण 93 खेळ प्रकारांचे आयोजन राज्यस्तरावर करण्यात येणार आहे. या खेळांमध्ये पुढील खेळ प्रकारांचा समावेश आहे :- अनुदानित व क्रीडा गुण सवलत अनुज्ञेय असलेले खेळ- आर्चरी, ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉल बॅडमिंटन, बेसबॉल, बास्केटबॉल, बॉक्सिंग, कॅरम, बुद्धिबळ, क्रिकेट, सायकलिंग, डॉजबॉल, तलवारबाजी, फूटबॉल, जिम्नॅस्टिक, हँडबॉल, हॉकी, ज्युदो, कबड्डी, कराटे, खो-खो, किक बॉक्सिंग, लॉन टेनिस, मल्लखांब, नेहरू हॉकी नेटबॉल, रायफल

कोकण विभागातील ड्रोनद्वारे फवारणीचे माणगाव येथे प्रात्यक्षिक संपन्न

  अलिबाग,दि.21 (जिमाका):-   कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा माणगाव व डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि.20 सप्टेंबर रोजी कृषी संशोधन केंद्र रेपोली ता.माणगाव येथे कोकण विभागातील ड्रोनद्वारे फवारणी चे   पहिले प्रात्यक्षिक घेण्यात आले.   यावेळी विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणे अंकुश माने व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले   उपस्थित होत्या.   यावेळी बायर क्रॉप सायन्स कंपनीचे प्रमुख सुशील देसाई, श्री.खांबेटे व सर्व टीम यांनी ड्रोनद्वारे फवारणी चे प्रात्यक्षिक करुन दाखविले. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून तयार केलेल्या ड्रोनद्वारे फवारणी कशी फायदेशीर आहे, मजूरांवर अवलंबून न राहता ड्रोनद्वारे फवारणीचा पर्याय वापरावा, असे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी दापोली कीटकशास्र विभागाचे डॉ.नरेंगलकर यांनी कीटकनाशक फवारणी करताना काय काळजी घ्यावी, याबद्दल मार्गदर्शन केले. ड्रोनद्वारे फवारणी करताना 5-7 मिनिटांमध्ये   एक एकर क्षेत्रावर फवारणी करण्यात आली.   कर्जत कीटकशास्र विभागाचे डॉ.जळगावकर, संशोधन संचालक शिवराम भगत

दिव्यांगाकरिता उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

    अलिबाग,दि.21 (जिमाका):-   भारतीय उद्योजकता विकास संस्था व टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड मुंबई द्वारा आयोजित अलिबाग जिल्हा उद्योग केंद्र येथे दिव्यांगाकरिता उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम मंगळवार, दि.20 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री. जी.एस.हरळय्या यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भारतीय उद्योजकता विकास संस्थेचे प्रकल्प अधिकारी शशिकांत दनोरीकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री.हरळय्या यांनी प्रशिक्षणाथींना जिल्हा उद्योग केंद्र द्वारा राबविण्यात येणाऱ्या योजनांविषयी मार्गदर्शन करुन प्रशिक्षणात शिकविण्यात येणाऱ्या विषयांची सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शशिकांत दनोरीकर यांनी केले. प्रशिक्षणाकरिता अलिबाग तालुक्यातील दिव्यांग प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ०००००००

पनवेल येथे जात वैधता प्रमाणपत्र वाटप शिबिराचे यशस्वी आयोजन एका दिवसात 60 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वाटप

  अलिबाग,दि.21 (जिमाका):-   उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील सर्व ज्युनिअर कॉलेजमध्ये जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष शिबिर घेण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्याकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार मंगळवार, दि.20 सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी श्री.राहुल मुंडके, तहसिलदार पनवेल विजय तळेकर,  उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे, रायगड जिल्हा जात पडताळणी समिती अध्यक्ष डॉ.भरत बास्टेवाड, उपाध्यक्ष  रवि किरण पाटील, सदस्य वासुदेव पाटील, पोलीस उपअधीक्षक श्रीमती साधना पाटील  यांच्या उपस्थितीत पनवेल तालुक्यात जात वैधता प्रमाणपत्र वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 60 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर त्यांना त्याच दिवशी जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आले. या शिबिराच्या नियोजनाकरिता नायब तहसिलदार विनोद लचके, निवासी नायब तहसिलदार श्री.संभाजी शेलार, मंडळ अधिकारी मनोज मोरे, श्री.कांबळे, श्री.भरत जगदाळे, रायगड जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालयाचे वरिष्ठ लि

अलिबाग जिल्हा रुग्णालयामध्ये सीटी स्कॅन मशिन रुग्णसेवेसाठी कार्यान्वित

    अलिबाग,दि.21 (जिमाका):-   रायगड-अलिबाग जिल्हा रुग्णालयामधील सी.टी. स्कॅन मशिन तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दि.28 जुलै 2022 पासून बंद अवस्थेत होती. त्यामुळे रुग्णसेवेत अडचणी निर्माण होत होत्या.   परंतु आता या मशीनची दुरुस्ती करण्यात आली असून ही मशीन रुग्णसेवेसाठी कार्यान्वित करण्यात आली आहे, असे जिल्हा रुग्णालयाकडून कळविण्यात आले आहे. ०००००००

गौण खनिज उत्खनन परवानगीची कार्यवाही दि.1 ऑक्टोबर 2022 पासून ऑनलाईन “महाखनिज” ही संगणक प्रणाली लागू

  अलिबाग,दि.20 (जिमाका):-  शासनाने गौण खनिज उत्खनन परवानगीची कार्यवाही दि.1 ऑक्टोबर 2022 पासून ऑनलाईन करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने राज्यात गौण खनिजाचे उत्खनन व वाहतुकीचे संनियंत्रण व देखरेख करण्यासाठी  “ महाखनिज ”  ही संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये खाणपट्टा मंजूरीबाबत खाणपट्ट्याच्या नूतनीकरण तसेच अल्पमुदतीचे तात्पुरत्या गौण खनिज उत्खनन परवान्याबाबतचे अर्ज ऑनलाईन स्विकारण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. राज्यात महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम, 2013 लागू करण्यात आला. या नियमामधील तरतुदीनुसार गौण खनिजाचा खाणपट्टा/नूतनीकरणाच्या मंजूरीबाबत तसेच अल्प मुदतीचे तथा तात्पुरत्या स्वरुपाचे गौण खनिज उत्खनन परवाने देण्याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार सद्यःस्थितीत संबंधित अर्जदारांकडून क्षेत्रीय कार्यालयामध्ये खाणपट्टा/नूतनीकरणाच्या मंजूरीसाठी तसेच अल्प मुदतीचे तथा तात्पुरत्या स्वरुपाचे परवान्यासाठी अर्ज ऑफलाईन स्वरुपात स्विकारण्यात येतात. तरी खाणपट्टा मंजूरीबाबत, खाणपट्ट्याचे नूतनीकरण तसेच अल्पमुदतीचे / तात्पुरत्या गौण खनिज उत्खनन प

सामाजिक न्याय विभागाकडून विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी यांच्याकरिता सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन

  अलिबाग,दि.20 (जिमाका):-  समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय यांच्यामार्फत दि.17 सप्टेंबर ते दि.2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत  “ सेवा पंधरवडा ”  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयांमध्ये समान संधी केंद्राच्या माध्यमातून जात पडताळणी प्रमाणपत्र, भारत सरकार शिष्यवृत्ती डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, करियर मार्गदर्शन इत्यादीबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी अलिबाग व रोहा येथे नगरपरिषदेच्या सहकार्यातून आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापनाचे व्याख्यान व आरोग्य तपासणी शिबिर अशा विविध कार्यक्रमांचे या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. तरी ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी, महाविद्यालयातील विद्यार्थी/विद्यार्थीनी व शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी/विद्यार्थीनींनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण, सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे. 00000

लम्पी आजाराबाबत आढावा व त्यावरील उपाययोजनांबाबत अलिबाग तहसील येथे समितीची बैठक संपन्न

    अलिबाग,दि.20 (जिमाका):-  अलिबाग तहसिलदार मीनल दळवी यांच्या अध्यक्षतेखालील समितीची लम्पी आजाराबाबतचा आढावा व त्यावरील उपाययोजनांबाबत सोमवार, दि.19 सप्टेंबर रोजी अलिबाग तहसिलदार कार्यालय येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत अलिबाग पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शुभांगी नाखले, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, अलिबाग डॉ.राजेश लाळगे, पंचायत समिती अलिबाग पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ.प्रिया काळे, नायब तहसिलदार व मंडळ अधिकारी उपस्थित होते. यावेळी तहसिलदार मीनल दळवी यांनी या समितीच्या स्थापनेबाबत शासनाच्या भूमिकेबाबत माहिती दिली. पंचायत समिती अलिबाग पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ.प्रिया काळे यांनी लम्पी आजाराची लक्षणे व त्यानुषंगाने करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ.राजेश लाळगे यांनी लम्पी आजाराचा माणसांमध्ये प्रसार होत नाही तसेच दुग्धजन्य पदार्थ सेवन केल्यासही लम्पी आजार होऊ शकत नाही, अशी माहिती दिली. अलिबाग पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शुभांगी नाखले यांनी लम्पी आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या ग्रामपंचायत व पशुवैद्यकीय अधिकारी यांना संपर्क साधावा

दि.30 सप्टेंबर रोजी डाक अदालतीचे आयोजन

  अलिबाग,दि.19 (जिमाका):-  अधीक्षक डाकघर रायगड विभाग, अलिबाग या कार्यालयाद्वारे दि.30 सप्टेंबर 2022 रोजी, सकाळी ठीक 11 वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. या डाक अदालतीत रायगड विभागातील डाक सेवेसंबंधीत तक्रार/ समस्या ज्याचे निवारण 6 आठवडा कालावधीत झालेले नाही, अशा टपाल, स्पीडपोस्ट, काऊंटर सेवा, बचत बँक, मनिऑर्डर संबधित तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांक, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा इ. असणे आवश्यक आहे. इच्छुक ग्राहकांनी आपली तक्रार 2 प्रतीत डॉ.संजय लिये, अधीक्षक डाकघर रायगड विभाग, 402201 यांच्याकडे दि.29 सप्टेंबर 2022 पर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी, असे आवाहन अधीक्षक डाकघर रायगड विभाग डॉ.संजय लिये यांनी केले आहे. 00000

जिल्हा व सत्र न्यायालयातील ऑल-इन-वन संगणकांच्या देखभालीसाठी वार्षिक देखभाल कराराकरिता इच्छुकांनी निविदा सादर करण्यास दि.26 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

                  अलिबाग,दि.18 (जिमाका):- उच्च न्यायालय, मुंबई यांच्यामार्फत रायगड-अलिबाग मुख्यालय, पनवेल, माणगाव, कर्जत, खालापूर, मुरूड, पाली, पेण, रोहा, श्रीवर्धन, उरण येथे सन 2016 मध्ये एच.पी. ऑल-इन-वन संगणक पुरविण्यात आलेले आहेत. एकूण 172 ऑल-इन-वन संगणकांची एकूण मूळ किंमत 68 लाख 39 हजार 107 रुपये आहे.               या ऑल-इन-वन संगणकांच्या देखभालीसाठी वार्षिक देखभाल करार (Comprehensive Annual Maintenance Contract) करण्याकरिता विहित नमुन्यातील मोहरबंद निविदा / दरपत्रक प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रायगड-अलिबाग या नावाने सीलबंद लखोट्यामध्ये दि.23 सप्टेंबर 2022 पूर्वी सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रबंधक, जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांच्याकडे सादर करावीत अथवा व्यक्तिश: आणून द्यावीत. त्यानंतर प्राप्त निविदांचा /दरपत्रकांचा विचार केला जाणार नाही. याशिवाय कोणतेही कारण न सांगता प्राप्त झालेल्या मोहरबंद निविदा/दरपत्रके स्वीकारण्याचे किंवा नाकारण्याचे सर्व अधिकार जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांच्याकडे राखून ठेवण्यात आले आहेत, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे रायगड-अलिबाग जिल्हा न्याय