गुंतवणूक वृध्दी, व्यवसाय सुलभीकरण, निर्यात व एक जिल्हा एक उत्पादन विषयांशी निगडीत दोन दिवशीय चर्चासत्र व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

 


 

अलिबाग,दि.21 (जिमाका):- जिल्हा निर्यात प्रचलन समिती यांच्या निर्देशानुसार व मार्गदर्शनाखाली गुंतवणूक वृध्दी (Investment Promotion), व्यवसाय सुलभीकरण (Ease of Doing Business), निर्यात व एक जिल्हा एक उत्पादन (One District One Product) या विषयांशी निगडीत जिल्हा नियोजन भवन  येथे सोमवार, दि.26 सप्टेंबर व मंगळवार, दि.27  सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10.00  ते सायं.5.00  या वेळेत दोन दिवसीय चर्चासत्र व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या चर्चासत्रामध्ये गुंतवणूक वृध्दी (Investment Promotion), व्यवसाय सुलभीकरण (Ease of Doing Business), निर्यात व एक जिल्हा एक उत्पादन (One District One Product) या मुद्यांवर भर देण्यात आला आहे. या दोन दिवशी प्रदर्शनाकरिता जिल्ह्यातील 20 निर्यातक्षम उद्योग घटकाने नोंदणी केलेली आहे. तसेच या कार्यक्रमाकरिता जिल्ह्यातील मोठे, लघ, व मध्यम उद्योग आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गतच्या लाभार्थ्यांस सहभागाकरिता आमंत्रित करण्यात आले  आहे, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री.जी.एस.हरळया यांनी कळविले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक