Posts

Showing posts from February 3, 2019

पर्यटन मंत्री ना.जयकुमार रावल यांचा जिल्हा दौरा

      अलिबाग, जि. रायगड, (जिमाका)दि.8 :- राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री ना.जयकुमार रावल हे सोमवार दि.11 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम   पुढील प्रमाणे.             सोमवार दि.11 रोजी सकाळी साडे दहा वा. किल्ले रायगड येथील दुर्गपरिषद या कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :-हत्तीखाना, किल्ले रायगड. सोयीनुसार शासकीय निवासस्थान मलबार हिल, मुंबई कडे प्रयाण. 00000

होमगार्ड नोंदणीव भरती कार्यक्रम 11 पासून घाटकोपर येथे

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.7 (जिमाका)- महासमादेशक, होमगार्ड महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्फत रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील उमेदवारांसाठी होमगार्ड सदस्य नोंद्णी व निवड कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सदर नोंदणी व भरती कार्यक्रम 11 ते 16 फेब्रुवारी या कालावधीत लोहमार्ग आयुक्तालय, मुख्यालय घाटकोपर, मुंबई येथेआयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक इच्छुक महिला व पुरुष उमेदवारांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधिक्षक सचिन गुंजाळ यांनी केले आहे.   यासंदर्भात जिल्हा समादेशक होमगार्ड यांच्या कार्यलयाकडून प्राप्त माहितीनुसार, होमगार्ड अधिनियम 1947 मधील तरतुदीनुसार स्वयंसेवी, मानसेवी होमगार्ड संघटनेमध्ये   भारतीय नागरिक असलेल्या पुरुष व महिला नागरिकांकरिता बृहन्मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील नागरिकांकरिता नवीन होमगार्ड सदस्य नोंदणी प्रक्रिया दि.11 ते 16 फेब्रुवारी रोजी लोहमार्ग आयुक्तालय मुख्यालय घाटकोपर या ठिकाणी कार्यालयीन वेळेत राबविण्यात येणार आहे.   सदरची नोंदणी ही बृहन्मुंबई, ठाणे व रायगड या जिल्ह्यातील उमेदवारांसाठीच लागू आहे.

‘आपत्ती प्रतिसाद निधी’उभारणारा ‘रायगड’ ठरला पहिला जिल्हा

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.7 (जिमाका)-   विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीप्रवण असणाऱ्या रायगड जिल्ह्याला आपत्ती प्रसंगी मदत व बचावासाठी स्वतःचा निधी असावा, ही संकल्पना जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मांडली. त्यानुसार जिल्ह्याचा स्वतःचा ‘आपत्ती प्रतिसाद निधी’ उभारण्याचे ठरले. जिल्ह्यातील विविध उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायीत्व निधी अर्थात ‘सीएसआर’ फंडातून हा निधी उभारण्यात जिल्ह्याला यश आले असून प्रारंभीच 15 लाख रुपये निधी जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी जमा ही झाला आहे. ही सुरुवात आहे. परंतू अशाप्रकारे स्वतःचा आपत्ती प्रतिसाद निधी उभारणारा रायगड जिल्हा हा राज्यातला पहिलाच जिल्हा ठरला आहे हे विशेष! ऐतिहासिक महत्त्व व विविध निसर्ग सौंदर्याने नटलेला रायगड जिल्हा हा तसा विविध आपत्तीप्रवण जिल्हाही आहे. जिल्ह्यात पूर, दरड कोसळणे, तसेच समुद्र किनारा लगत असल्याने चक्री वादळ, त्सुनामी इ. नैसर्गिक आपत्ती व विविध मानवनिर्मित आपत्तींच्या घटनांचा धोका संभवत असतो. अशा वेळी जिल्ह्यातील नैसर्गिक व मानव निर्मित आपत्ती प्रवणता विचारात घेऊन सक्षम प्रतिसाद आणि धोके सौम्यीकरणासाठी जिल्ह्यातील विवि

एचआयव्ही जनजागृतीसाठी मॅरेथॉन स्पर्धाःपेणची ऋतुजा सकपाळ तर उरणचा करण माळी प्रथमःसहभागी स्पर्धकांना जिल्हा प्रशासनातर्फे दाखवणार ‘उरी’चा विशेष शो

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.7 (जिमाका)- राष्ट्रीय युवा दिन व पंधरवडा निमित्त, मा- प्रकल्प संचालक महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, वडाळा, मुंबई यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग यांच्यामार्फत अलिबाग समुद्र किनारा येथे आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत पेण ची ऋतुजा सकपाळ तर उरण येथील करण माळी यांनी अनुक्रमे महिला व पुरुष गटातील विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या युवक युवतींना प्रोत्साहन मिळावे यासाठी ‘ उरी’ हा देशभक्तीपर चित्रपट विशेष शो आयोजित करुन दाखवण्यात येईल,असे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी यावेळी जाहीर केले. अलिबाग समुद्र किनाऱ्यावर आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन हिरवा झेंडा दाखवून  जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, लायन्स क्लब श्रीबागचे अध्यक्ष विजय वनगे, डॉ. ॲड.निहा राऊत, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने हे उपस्थित होते.             युवक युवतींमध्ये एचआयव्ही- एड्स जनजागृती व्हावी या उद्देशाने जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामा

गोवर रुबेला लसीकरण मोहिम:जिल्ह्यात आजअखेर 6 लाख 77 हजार बालकांना लसीकरण

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 6- भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या गोवर रुबेला लसीकरण अभियानात रायगड जिल्ह्यात मंगळवार (दि. 5 फेब्रुवारी) अखेर जिल्ह्यातील 6 लाख 77 हजार 824  बालकांना लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.   जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत प्राप्त अहवालानुसार काल (मंगळवार दि.5) दिवसाअखेर जिल्ह्यातील 5 शाळांमध्ये लसीकरण राबविले. काल दिवसभरात   एकूण 969 बालकांना लसीकरण करण्यात आले.   तर मोहिम सुरु झाल्यापासून आज अखेर एकूण 3 लाख 51   हजार 506 मुले   व 3 लाख 26 हजार 318 मुली असे एकूण 6 लाख 77 हजार 824 बालकांना लसीकरण करण्यात आले, अशी   माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी   डॉ.सचिन देसाई यांनी दिली आहे.   या अभियानांतर्गत जिल्हा आरोग्य यंत्रणा 6249 शाळांपर्यंत पोहोचली आहे. या शिवाय आतापर्यंत 3942 ठिकाणी बाह्यसत्र घेऊन लसीकरण करण्यात आले आहे.

सैनिकी मुलांच्या वसतिगृह अधिक्षक पदासाठी अर्ज मागविले

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 6- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग  कार्यालयाच्याअखत्यारित सैनिकी मुलांचे वसतिगृह महाड येथे  वसतिगृह अधिक्षक पदावर  एकत्रित मासिक मानधनावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करावयाची आहे.  यासाठी सैन्यातून  नायब सु भे दार व पुढील हुद्या वरुन निवृत्त झालेले माजी सैनिक, शैक्षणिक अर्हता एस.एस.सी. पास असलेल्या इच्छूक उमेदवारांनी आपल्या  बायोडाटासह  अर्ज करावेत. आपले अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड अलिबाग येथे स्वहस्ते किंवा कार्यालयाचा   ई-मेल आयडी zswo_raigad@mahasainik.com   वर दि. 15 फेब्रुवारी 2019 पुर्वी कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे अवाहन मेजर प्रांजळ   जाधव   (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी केले आहे. उशीरा प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी,असेही कळविण्यात आले आहे.

पेण येथे आजपासून (दि.7) जिल्हास्तरीय कृषी, पशु प्रदर्शन व शेतकरी मेळावा

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.6 (जिमाका)- रायगड जिल्हा परिषद व कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने  गुरुवार दि. 7 पासून जिल्हास्तरीय भव्य  कृषी, पशुप्रदर्शन,विक्री , चर्चासत्र व शेतकरी मेळाव्याचे आयोजन पेण येथे करण्यात आले आहे. हे प्रदर्शन हॉटेल मॉर्क्वीस मंथन शेजारी, मुंबई- गोवा महामार्ग पेण येथे होणार आहे, या प्रदर्शनाचा जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन व शेतकरी मेळावा दि. 7 ते 11 फेब्रुवारी असे पाच दिवस चालणार असून या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन सोहळा   या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार दि.7 रोजी दुपारी चार वाजता होणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी   राज्याचे महसूल, सार्वजनिक बांधकाम, मदत व पूनर्वसन व कृषी मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील हे राहणार असून   मुख्य उद्घाटक म्हणून   जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे या उपस्थित राहणार आहेत तर मेळाव्याचे उद्घाटक म्हणून विधान परिषद सदस्य आ. जयंत पाटील,   पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटक विधानसभा सदस्य आ. सुभाष उर्फ पंडीतशेट पाटील, रानमेवा बाह

मतदार हेल्पलाईन (1950) कार्यान्वित

Image
          अलिबाग, जि. रायगड, दि.5 (जिमाका)- आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार मतदारांना माहिती उपलब्धतेसाठी   1950 या टोल फ्री क्रमांकावर मतदार हेल्पलाईन   (District Contact Centre (District Voter Helpline) विनामूल्य सेवा कार्यान्वीत करण्यात आली आहे.             राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून दि. 25 जानेवारी, 2019 रोजी   जिल्ह्यात 1950 हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वीत करण्यात आला आहे. हा टोल फ्री क्रमांक सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कार्यान्वीत असेल.या क्रमांकासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, रायगड यांचेमार्फत एका जिल्हा संपर्क अधिकारी (District Contact Officer) व दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.   या क्रमांकावरुन मतदारांना त्यांचे मतदार यादीतील तपशीलाबाबत व मतदान केंद्राबाबत इत्यादी माहिती उपलब्ध करुन देण्यात येईल.   या क्रमांकावर मतदारांकडून प्राप्त तक्रारीची नोंद ही NGSP (National Grievance Services Portal) वर घेण्यात येईल. तसेच सदर तक्रार ही संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांना NGSP (National

लोकसभा निवडणूक 2019 जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारी आढावा

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.5 (जिमाका)- आगमी लोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक यंत्रणा तयारी करत आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पूर्वतयारीचा आढावा एका संयुक्त बैठकीत घेतला. या बैठकीस जिल्हा निवडणूक यंत्रणेतील सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी व अन्य यंत्रणा प्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या समवेत  अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, अपर पोलीस अधिक्षक सचिन गुंजाळ यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार, पोलीस निरीक्षक, प्रभारी आदी उपस्थित होते.  जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी जिल्ह्यातील  कायदा सुव्यवस्था, निवडणूक आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी तयार करावयाची भरारी पथके, संवेदनशिल, अतिसंवेदनशिल मतदान केंद्रांची वर्गवारी करणे, मतदान केंद्रांवरील सुविधांची समिक्षा आदींचा आढावा घेतला. यासाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी व पोलीस अधिकारी यांन

रायगड जिल्ह्याची मतदार यादी प्रसिद्ध : 22 लाख 1 हजार 326 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.5 (जिमाका)- आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी   महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार दि. 1 जानेवारी 2019   या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार यादी दि. 31 जानेवारी. 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आली. ही मतदार यादी जिल्ह्यातील 2693 मतदान केंद्रांवर, मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवरही प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान या मतदार यादीनुसार जिल्ह्यात एकूण 22 लाख 1 हजार 326 मतदार नोंदणी झालेली असून हे मतदार येत्या निवडणूकीत आपला मतदानाचा हक्क बजावतील. या संदर्भात अधिक माहिती अशी की, दि. 01.09.2018 रोजी प्रसिध्द झालेल्या प्रारुप मतदार यादीनुसार जिल्ह्यात 10 लाख 98 हजार 727 पुरुष मतदार,   तर 10 लाख 55 हजार 641 महिला मतदार व 04 इतर मतदार होते. त्यानंतर राबविण्यात आलेल्या पुनरिक्षण कार्यक्रमात जिल्ह्यात मतदार नोंदणी जी 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर करण

माथेरान सनियंत्रण समितीची बैठक शुक्रवारी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.5 - माथेरान इको सेन्सेटिव्ह झोन संनियंत्रण समितीची दहावी बैठक शुक्रवार दि.8 रोजी सकाळी 10 वा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.  या क्षेत्रात करावयाच्या विकास कामांचे प्रस्ताव  तसेच या समितीकडे करावयाच्या तक्रारींसाठी नागरिकांनी आपले अर्ज या समितीचे सदस्य सचिव जिल्हाधिकारी रायगड यांचेकडे तात्काळ सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात भारत सरकार, पर्यावरण भवन, नवी दिल्ली यांच्या परिपत्रकान्वये सेवा निवृत्त भा. प्र. से अधिकारी वासुदेव जी.गोरडे यांच्या अध्यक्षतेखाली एकूण 9 सदस्यांची सनियंत्रण समिती दोन वर्षाकरीता गठीत करण्यात आली असून जिल्हाधिकारी रायगड हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. या समितीची दहावी बैठक  येत्या शुक्रवार दि.8  रोजी सकाळी दहा वा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या संदर्भात भारत सरकारच्या पर्यावरण  विभागाकडील दि.01 मार्च 2017  च्या अधिसूचनेन्वये रायगड व ठाणे जिल्हयातील एकूण 89 (काही पूर्ण व काही भागत:) गावांचा प्रदेश संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना : अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवा-जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.5 (जिमाका)- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची अंमलबजावणी करुन  दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यासाठी शुक्रवार दि. 8 पासून गावनिहाय शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. रविवार दि.10 तारखेपर्यंतमाहिती संकलनाचे काम पूर्ण करावे व जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज अधिकाऱ्यांना दिले. केंद्र शासनाच्या  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजने अंतर्गत दोन हेक्टरपेक्षा कमी  धारण क्षेत्र असलेल्या अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना उत्पन्न मिळण्याकरिता प्रती शेतकरी कुटुंबाला प्रती वर्ष रु. 6,000/- इतके आर्थिक सहाय्य 3 टप्यांमध्ये उपलब्ध करुन देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.  या संदर्भात राज्य शासनाने कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागामार्फत  परिपत्रक जारी करुन प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना(PM-KISAN) ही ज्या कुटुंबाचे सर्व ठिकाणचे मिळून लागवडीलायक एकुण कमाल धारण क्षेत्र दोन हेक्टरपर्यंत असेल त्यांना अनुज्ञेय असल्याच

लोकशाही दिनी दोन अर्ज दाखल

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4 -    या महिन्याचा लोकशाही दिन आज   निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांच्या अध्यक्षतेखाली   जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. यावेळी   एकूण 2 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 2 अर्ज कारवाईसाठी संबंधित विभागांकडे सूपूर्द करण्यात आले. विभागनिहाय प्राप्त अर्ज संख्या याप्रमाणे-   महसूल विभाग-1,   जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख रायगड-1 असे एकूण 2 अर्ज प्राप्त झाले आहेत. 00000

दिव्यांग व्यक्तींना बुधवार पासून वैश्विक ओळखपत्र वितरण तालुकास्तरावर विशेष शिबीराचे आयोजन

अलिबाग, जि. रायगड, दि.4 :- राज्याचे अपंग कल्याण आयुक्त पुणे यांच्या सुचनेनुसार “ दिव्यांग व्यक्ती अस्मीता अभियान ” अंतर्गत   दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र वितरण करण्यासाठी तालुकास्तरावर शिबीरे आयोजित करण्यात येत आहेत.   त्यानुसार जिल्ह्यात तालुकास्तरावर दिव्यांगासाठी UDID (वैश्विक ओळखपत्र) देण्यासाठी शिबीर आयोजनाचे वेळापत्रक याप्रमाणे.             बुधवार दि.06 रोजी पंचायत समिती अलिबाग,   गुरुवार दि. 7 रोजी मल्टी परपज हॉल, जे.एन.पी.टी.उरण,      सोमवार दि.11   रोजी पंचायत समिती पेण,      बुधवार दि.13 रोजी पंचायत समिती पनवेल,     शुक्रवार दि.15   रोजी   पंचायत समिती कर्जत,     शनिवार दि.16   रोजी पंचायत समिती खालापूर,     सोमवार दि.18   रोजी पंचायत समिती सुधागड,       बुधवार दि.20   रोजी पंचायत समिती रोहा,      गुरुवार दि.21   रोजी पंचायत समिती मुरुड,     शुक्रवार दि.22 रोजी पंचायत समिती माणगाव,     सोमवार दि.25 फेब्रुवारी रोजी पंचायत समिती तळा,   मंगळवार   दि.26 रोजी पंचायत समिती म्हसळा,     बुधवार दि.27 रोजी पंचायत समिती श्रीवर्धन,      गुरुवार दि.28   रोजी पंचायत समिती