गोवर रुबेला लसीकरण मोहिम:जिल्ह्यात आजअखेर 6 लाख 77 हजार बालकांना लसीकरण


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 6- भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या गोवर रुबेला लसीकरण अभियानात रायगड जिल्ह्यात मंगळवार (दि. 5 फेब्रुवारी) अखेर जिल्ह्यातील 6 लाख 77 हजार 824  बालकांना लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
 जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत प्राप्त अहवालानुसार काल (मंगळवार दि.5) दिवसाअखेर जिल्ह्यातील 5 शाळांमध्ये लसीकरण राबविले. काल दिवसभरात  एकूण 969 बालकांना लसीकरण करण्यात आले.  तर मोहिम सुरु झाल्यापासून आज अखेर एकूण 3 लाख 51  हजार 506 मुले  व 3 लाख 26 हजार 318 मुली असे एकूण 6 लाख 77 हजार 824 बालकांना लसीकरण करण्यात आले, अशी  माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ.सचिन देसाई यांनी दिली आहे.  या अभियानांतर्गत जिल्हा आरोग्य यंत्रणा 6249 शाळांपर्यंत पोहोचली आहे. या शिवाय आतापर्यंत 3942 ठिकाणी बाह्यसत्र घेऊन लसीकरण करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक