Posts

Showing posts from March 10, 2024

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या बळकटीकरणासाठी राज्यशासन कटीबद्ध ---महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे

रायगड(जिमाका)दि.12:- महिला व बाल विकास विभागामार्फत महिला व बालकांच्या विकासासाठी नियमितपणे विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिसांना बळकट करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले. कुरुळ येथील सुरुची हॉटेल सभागृहात एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद रायगड मार्फत आयोजित विविध योजना लाभ, साहित्य वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.यावेळी आमदार महेंद्र दळवी, माजी जि.स.श्रीमती दळवी, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी, सत्यजित बडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनित म्हात्रे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी निर्मला कुचिक, प्रकल्प संचालक,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रियदर्शनी मोरे, जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती मनिषा पिंगळे आदि उपस्थित होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या की, अंगणवाडी सेविकांसाठी राज्य शासनाने मार्फत पेन्शन योजना लागू करण्याबाबतची

राज्य शासनाच्या बँकामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनुदान योजना व बीज भांडवल योजनांमध्ये सुधारणा

रायगड(जिमाका)दि.11:- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे दि.28 फेब्रुवारी 2024 च्या परिपत्रकान्वये प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय (PM-AJAY) च्या मार्गदर्शक सुचनानुसार विविध योजनेंतर्गत प्रति लाभार्थी देण्यात येणारी अनुदान रक्कम रु. 10,000/- वरुन रु. 50,000/- करण्यात आली असल्याने राज्य शासनाच्या बँकामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनुदान योजना व बीज भांडवल योजनांमध्ये पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात आल्या आहेत. 50 टक्के अनुदान योजना :- प्रकल्प मूल्य, सद्य:स्थितीतील योजना रु. 50 हजार, वाढीव अनुदानानुसार योजना, रु. 50 हजार. महामंडळाचा सहभाग, रु. 10,000/- (अनुदान), प्रकल्प मुल्याच्या 50 टक्के (रु.25,000/-) अनुदान, बँकेचा सहभाग, रु. 40,000/- बँकेचे कर्ज, 50 टक्के (रु.25,000/-) बँकेचे कर्ज, व्याज दर, बँकेच्या नियमाप्रमाणे, परतफेडीचा कालावधी, 3 वर्ष. बीजभांडवल योजना :- महात्मा फुले महामंडळास प्राप्त होणाऱ्या भागभांडवलामधून बीजभांडवल योजना राबविण्यात येते. योजनेचे स्वरुप पुढीलप्रमाणे आहे. प्रकल्प मूल्य, सद्य:स्थितीतील योजना रु. 5 लाख, वाढीव अनुदानानुसार योजना, र

मातंग समाज बांधव व सत्सम बारा पोटजाती मधील इच्छूक पात्र विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करावेत

रायगड(जिमाका)दि.11:- मातंग समाजातील व तत्सम 12 पोट जातीतील विद्यार्थ्यांस प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी जातीच्या दाखला, शैक्षणिक दाखला, टीसी, आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड, पासपोर्ट आकाराचे दोन छायाचित्र, उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रांसह दि.6 मार्च ते दि.28 मार्च 2024 या कालावधीत विविध नमुन्यातील अर्ज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय रायगड-अलिबाग, श्रीराम समर्थ गृहनिर्माण संस्था, मर्या., सदनिका क्रमांक 2, तळमजला, मारुती मंदिराच्या मागे, चेंढरे,अलिबाग येथे अर्ज करावेत, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे, जिल्हा व्यवस्थापक अंगद कांबळे यांनी केले आहे. जिल्ह्यातील मातंग समाज बांधव व सत्सम बारा पोटजाती मधील इच्छूक पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. पात्रतेसाठी निकष व अटी पुढीलप्रमाणे- प्रशिक्षणार्थी मांतग समाजातील व तत्सम बारा पोटजातीतील असावा व त्याचे वय 18 ते 50 वर्ष असावे. यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. प्रशिक्षणार्थीने आधारकार्ड