मातंग समाज बांधव व सत्सम बारा पोटजाती मधील इच्छूक पात्र विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करावेत

रायगड(जिमाका)दि.11:- मातंग समाजातील व तत्सम 12 पोट जातीतील विद्यार्थ्यांस प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी जातीच्या दाखला, शैक्षणिक दाखला, टीसी, आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड, पासपोर्ट आकाराचे दोन छायाचित्र, उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रांसह दि.6 मार्च ते दि.28 मार्च 2024 या कालावधीत विविध नमुन्यातील अर्ज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय रायगड-अलिबाग, श्रीराम समर्थ गृहनिर्माण संस्था, मर्या., सदनिका क्रमांक 2, तळमजला, मारुती मंदिराच्या मागे, चेंढरे,अलिबाग येथे अर्ज करावेत, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे, जिल्हा व्यवस्थापक अंगद कांबळे यांनी केले आहे. जिल्ह्यातील मातंग समाज बांधव व सत्सम बारा पोटजाती मधील इच्छूक पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. पात्रतेसाठी निकष व अटी पुढीलप्रमाणे- प्रशिक्षणार्थी मांतग समाजातील व तत्सम बारा पोटजातीतील असावा व त्याचे वय 18 ते 50 वर्ष असावे. यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. प्रशिक्षणार्थीने आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) जिल्हा कार्यालय रायगड-अलिबाग प्रशिक्षण योजनेचे 100 टक्के उद्दिष्ट मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील कुटूंबाच्या सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावेत याकरिता सन-2024-25 या आर्थिक वर्षाकरिता प्राप्त झाले आहे. दि.28 मार्च 2024 नंतर कोणतेही प्रशिक्षणाचे अर्ज स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी. ०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक