Posts

Showing posts from November 8, 2020

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी स्वत:चा व्यवसाय करण्यासाठी ऑनलाईन वेबिनारचे आयोजन

                अलिबाग,जि.रायगड, दि.13   (जिमाका):-   जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने   दि .17 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 12.00   या कालावधीत ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या वेबिनारमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजना संदर्भात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या   जिल्हा समन्वयक सौ.अंजली पाटील या मार्गदर्शन करणार आहेत. या वेबिनारमध्ये भाग घेण्यासाठी CISCO WEBEX   हे ॲप प्लेस्टोअर वरुन डाऊनलोड करुन https://mh-dit.webex.com/mh-dit/j.php?MTID=mc66530bd48633715be86645df7bde8b9 या लिंकचा वापर करुन दि.17 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11.00   पूर्वी 10 मिनिटे अगोदर सहभाग घ्यावा. सहभाग करताना आपले माईक व व्हिडिओ म्युट/बंद ठेवावेत. आपणांस प्रश्न विचारावयाचा असेल त्याच वेळी आपला माईक अनम्युट करुन प्रश्न विचारावेत.   जिल्हयातील मराठा समाजातील बेराजगार उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जि

नव्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपक्रेंद्रांसाठी शासकीय जागा हस्तांतरित

  वृत्त क्रमांक:- 1362                                                                   दिनांक :- 13 नोव्हेंबर 202 0   अलिबाग,जि.रायगड, दि.13   (जिमाका):- महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या दि.17 जानेवारी 2013   च्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यामधील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच बांधण्याकरिता   मान्यता देण्यात आली होती. तरीही यापैकी अनेक आरोग्य केंद्राना जागा देण्याच्या प्रस्तावास काही कारणास्तव गती मिळाली नव्हती. त्यानुषंगाने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना शासकीय जमीन महसूल मुक्त व सारामाफीने जागा प्रदान करण्यात आली आहे. पालकमंत्री कु.आदिती तटकरे   तसेच सर्वपक्षीय आमदारांनी कोविडच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आढावा बैठकीत याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करीत प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना शासकीय जमीन महसूल मुक्त व सारामाफीने जागा प्रदान केली आहे.             शासकीय जमीन प्रदान करण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची नावे पुढीलप्रमाणे :- प्राथमिक आरोग्य केंद्

फटाकेमुक्त, प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करीत प्रत्येक कुटुंबाने एक तरी झाड लावावे --- मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील

    अलिबाग,जि.रायगड दि. 12 (जिमाका) :- करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी तसेच सणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कुटुंबाने एक तरी झाड लावावे, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सुरुवातीपासूनच जिल्हा परिषद प्रशासनातर्फे शासनाने दिलेल्या सूचनांची योग्य अंमलबजावणी करण्यात आली. जिल्ह्यात करोना विषाणू संसर्ग आटोक्यात आला असल्याचे चित्र दिसून येते. ही परिस्थिती कायम राहावी, यासाठी हवेतील प्राणवायूचे प्रमाण अधिक असणे आवश्यक आहे. नागरिकांनी येणाऱ्या सणांमध्ये प्रदूषण टाळावे, असे जिल्हा परिषद प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे. करोना विषाणू संसर्ग श्वसन प्रक्रियेसंदर्भात निगडित असल्याने हवेची गुणवत्ता उत्तम राहण्यासाठी, वायूप्रदूषण रोखण्यासाठी फटाक्यांशिवाय सण साजरा करावा व सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करावा, घरातील ओल्या व सुक्या कचऱ्याचे घरगुती पातळीवर वर्गीकरण करावे, उघड्यावर कचरा टाकू नये, प्लास्टिकचा वापर न करता कापडी अथवा कागदी पिशवीचा वापर क

जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, दुर्ग/किल्ले, स्मारके, संग्रहालये पर्यटक/नागरिकांसाठी खुले मात्र कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनासंबंधीच्या नियमांचे पालन आवश्यक -- जिल्हाधिकारी निधी चौधरी

  अलिबाग,जि.रायगड दि. 12 (जिमाका) :- कोविड-19 प्रादूर्भावाच्या अनुषंगाने पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखालील ऐतिहासिक वास्तू, दुर्ग/किल्ले, स्मारके, संग्रहालये इत्यादी दि.31 मार्च 2020 पासून बंद केले होते.   मात्र आता शासनाने Easing of Restriction & Phasewise opening of lockdown - MISSION BEGIN AGAIN अंतर्गत लॉकडाऊन शिथिल करुन, विविध बाबींना निर्बंधातून वगळले आहे. तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखालील स्मारके, संग्रहालये इ. खुले करण्यासंदर्भात दि.04 जून 2020 रोजी मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure) लागू केली आहे.   या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक वास्तू, दुर्ग / किल्ले, स्मारके, संग्रालये इ. मध्ये पर्यटक नगारिक यांच्या प्रवेशास मान्यता देणे आवश्यक असल्याची खात्री झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक वास्तू, दुर्ग/किल्ले, स्मारके, संग्रहालये इ. पर्यटक/नागरिक इ. साठी कोविड-19 संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अटी व शर्तीसह खुले करण्यास जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मान्यता दिली आहे.   या

आनंदाने शासकीय नियमांचे पालन करु अन् उत्साहाने दिवाळी साजरी करु..! कोविडच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी शासन सज्ज

  विशेष लेख क्र.37                                                                          दिनांक :- 12 नोव्हेंबर 2020 सध्या राज्यात ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोविड रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. परंतु जागतिक स्तरावरील कोविड उद्रेकाचे अवलोकन केले असता युरोपमधील अनेक देशांमध्ये कोविड आजाराची दुसरी लाट आलेली दिसून येत आहे. युरोपियन देशांच्या उदाहरणावरून आपल्याकडे दुसरी लाट येण्याची शक्यता जानेवारी, फेब्रुवारीमध्ये आहे, असे दिसते. या पार्श्वभूमीवर शासनाकडून काही महत्वाच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. प्रत्येक जिल्हा आणि महानगरपालिकेने आपल्या कार्यक्षेत्रात या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. काय आहेत या सूचना जाणून घेऊ या पुढील लेखातून..! प्रयोगशाळा तपासणी आयसीएमआर मार्गदर्शक सूचनांनुसार सुरू ठेवण्याची आवश्यकता - करोना उद्रेकाच्या सध्याच्या उतरणीच्या काळातही प्रयोगशाळा सर्वेक्षण सक्षमपणे सुरू ठेवण्याची आवश्यकता आहे. प्रयोगशाळा सर्वेक्षणामध्ये कोणताही हलगर्जीपणा न करता आय.सी.एम.आर संस्थेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार संशयित रुग्णा

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी वाहनांच्या ब्रेक टेस्ट ट्रॅकसाठी जमीन हस्तांतरण मंजूर पालकमंत्री आदिती तटकरेंचा महत्वपूर्ण निर्णय

Image
        अलिबाग,जि.रायगड,दि.10 (जिमाका):-  नागरिकांकरिता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय हे अत्यंत महत्त्वाचे कार्यालय असून या कार्यालयांतर्गत नागरिकांना विनासायास त्यांची वाहनविषयक तसेच अन्य तत्सम कामांविषयी शासकीय सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. याचे महत्त्व ओळखून व गरज लक्षात घेऊन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी माणगाव तालुक्यातील जावळी येथे वाहनांच्या ब्रेक टेस्ट ट्रॅकसाठी  जमीन देण्याबाबत जिल्हा प्रशासनाला योग्य त्या कार्यवाहीचे निर्देश दिले होते.         त्यास अनुसरून जिल्हाधिकाऱ्यांनी माणगाव तालुक्यातील जावळी येथे ब्रेक टेस्ट ट्रॅक बनविण्याच्या दृष्टीने प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल यांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, पेण करिता केलेल्या मागणी नुसार 2 हेक्टर आर शासकीय जागा हस्तांतरित करण्याचे आदेश पारित केले आहेत तसेच पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेशही संबंधितांना  दिले आहेत.            शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक प्रादेशिक अधिकारी कार्यालयास जवळपास किमान 250 मीटर लांबीचा ट्रॅक उपलब्ध करणे आवश्यक होते. त्याच बरोबर जिल्ह्यातील प्रादेशिक / उप प्रादेशिक परिवहन