जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, दुर्ग/किल्ले, स्मारके, संग्रहालये पर्यटक/नागरिकांसाठी खुले मात्र कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनासंबंधीच्या नियमांचे पालन आवश्यक -- जिल्हाधिकारी निधी चौधरी

 


अलिबाग,जि.रायगड दि. 12 (जिमाका) :- कोविड-19 प्रादूर्भावाच्या अनुषंगाने पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखालील ऐतिहासिक वास्तू, दुर्ग/किल्ले, स्मारके, संग्रहालये इत्यादी दि.31 मार्च 2020 पासून बंद केले होते. मात्र आता शासनाने Easing of Restriction & Phasewise opening of lockdown - MISSION BEGIN AGAIN अंतर्गत लॉकडाऊन शिथिल करुन, विविध बाबींना निर्बंधातून वगळले आहे. तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखालील स्मारके, संग्रहालये इ. खुले करण्यासंदर्भात दि.04 जून 2020 रोजी मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure) लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक वास्तू, दुर्ग/ किल्ले, स्मारके, संग्रालये इ. मध्ये पर्यटक नगारिक यांच्या प्रवेशास मान्यता देणे आवश्यक असल्याची खात्री झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक वास्तू, दुर्ग/किल्ले, स्मारके, संग्रहालये इ. पर्यटक/नागरिक इ. साठी कोविड-19 संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अटी व शर्तीसह खुले करण्यास जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मान्यता दिली आहे. 

या ठिकाणी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्याद्वारे निर्गमित केलेल्या व शासन, सार्वजानिक आरोग्य विभाग तसेच पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत निर्गमित केल्या जाणाऱ्या मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure) अवलंब करणे बंधनकारक राहील. तसेच या ठिकाणी आवश्यक शारिरीक अंतर (Physical distance) बाळगणे, मास्क घालणे व वेळोवळी Handwash / Sanitization करणे सर्व संबधितांवर बंधनकारक राहणार आहे. 

रायगड जिल्ह्यास विविध ऐतिहासिक वास्तूंचा वारसा लाभलेला आहे. जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक वास्तू, दुर्ग/किल्ले, स्मारके, संग्रहालये इ. ठिकाणी दरवर्षी मोठया प्रमाणात दुर्गप्रेमी, पर्यटक भेटी देत असतात. या पर्यटकांमुळे मोठ्या प्रमाणावर स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत असतो. कोविड-19 विषाणूच्या प्रादूर्भावाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, दुर्ग/किल्ले, स्मारके, संग्रहालये इ. ठिकाणी नागरिकांना तसेच पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आलेला होता. जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, दुर्ग/ किल्ले, स्मारके, संग्रालये पर्यटकांसाठी/नागरिकांसाठी खुले करण्याबाबत वारंवार विविध संघटना, संस्था, दुर्गप्रेमी यांच्याकडून सातत्याने मागणी केली जात होती. 

ही वस्तुस्थिती विचारात घेता जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक वास्तू, दुर्ग/किल्ले, स्मारके, संग्रहालये इ. पर्यटक/नागरिक इ. साठी कोविड-19 संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अटी व शर्तीसह खुले करण्यास जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मान्यता दिली आहे. 

मात्र कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनासंबंधी दिलेल्या आदेशाचे व सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188,269,270,271 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 सह अन्य तरतूदीनुसार फौजदारी शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळविले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक