Posts

Showing posts from October 25, 2020

“बेटी बचाओ बेटी पढाओ” योजनेंतर्गत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे हस्ते धनादेशाचे वितरण

Image
  अलिबाग,जि.रायगड,दि.29 (जिमाका) :- केंद्र शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या “ बेटी बचाओ बेटी पढाओ ” योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी मध्ये तालुक्यातून प्रथम क्रमाकांने उत्तीर्ण   झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थींनींना त्यांच्या शैक्षणिक उन्नतीकरिता व शिक्षणास प्रोत्साहन देण्याकरिता जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याहस्ते रु. 5 हजारच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.   यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक, विस्तार अधिकारी (सां.) श्रीमती रंजिता थळे तसेच यशस्वी विद्यार्थींचे पालक व विद्यार्थी उपस्थित होते. ००००००

स्वयंसहायता महिला समूहातील महिलांनी तयार केलेल्या परसबागेस ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट

  अलिबाग,जि.रायगड,दि.29 (जिमाका) :-अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायत खंडाळे येथे ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दौऱ्यादरम्यान स्वयंसहायता महिला समूहातील महिलांनी तयार केलेल्या परसबागेस भेट दिली व उपस्थित महिलांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेऊन महिलांना मार्गदर्शनही केले.      यावेळी अलिबाग-मुरुड   मतदारसंघातील आमदार महेन्द्र दळवी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, प्रकल्प संचालक रामदास बघे, गटविकास अधिकारी श्रीमती दिप्ती पाटील, तहसिलदार सचिन शेजाळ,   सहायक गटविकास अधिकारी श्री.चौलकर, जिल्हा व्यवस्थापक सचिन चव्हाण, संकेत पाटील, प्रभाग समन्वयक अमोल माळी हे उपस्थित होते. ००००००

भ्रष्टाचार विरोधात जनजागृतीसाठी दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन

    अलिबाग,जि.रायगड,दि.29, (जिमाका):- भ्रष्टाचार विरोधात जनजागृतीसाठी दि.27 ऑक्टोबर ते दि. 02 नोव्हेंबर 2020 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. घोषवाक्य :- लाच देणे व घेणे दोन्ही कायद्याने गुन्हा आहे, कुठलाही सरकारी दाखला लाचेशिवाय मिळणे तुमचा हक्क आहे, मग हक्कासाठी लाच का?,   योजना सरकारची आपल्या भल्यासाठी, मग लाच कशासाठी?, कष्ट तुमचे, हक्क तुमचा मग त्याकरिता लाच का?, भ्रष्टाचार टाळा, देश मजबूत करा, लाचेची नशा करते जीवनाची दुर्दशा, कायदेशीर व्यवहार, दूर ठेवी भ्रष्टाचार, भ्रष्टाचार निर्मूलनाचा विचार, करे लोकशाही सरकार, लाचखोरीला कंटाळलात ? कळवून   तर पहा, भ्रष्टाचार रोखणे तुमच्या हाती, तुम्ही भ्रष्टाचार रोखू शकता, योजना सरकारची आपल्या भल्यासाठी मग लाच कशा कशासाठी? नागरिकांना भ्रष्टाचारासंदर्भात तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1064, व्हॉटस्अस क्र.9930997700, संकेतस्थळ-acbmaharashtra.gov.in, मोबाईल ॲप-www. Acbmaharashtra.net, ई-मेल-acbwebmail@mahapolice.gov.in, व्टिटर-@ABC_maharashtra, फेसबुक-www.facebook.com/maharashtraABC/ असा आहे. जिल्ह्यातील नाग

हे शासन शेतकऱ्यांचे, शासनाचे धोरण शेतकऱ्यांना मदतीचे --महसूल राज्यमंत्री ना.अब्दूल सत्तार

  वृत्त क्रमांक :- 1318                                                  दिनांक :-28 ऑक्टोबर 2020                            अलिबाग,जि.रायगड,दि.27 (जिमाका):- या वर्षात राज्यावर करोना, अतिवृष्टी अशी विविध नैसर्गिक संकटे आली. मात्र सर्वांनी संयम बाळगून शासनाला उत्तम सहकार्य केले आहे. हे शासन शेतकऱ्यांचे असून शासनाचे धोरण शेतकऱ्यांना मदतीचेच आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी आज येथे केले. जिल्ह्यातील करंजा जेट्टी, रेवस जेट्टी येथील बांधकामाची पाहणी तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी ते रायगड जिल्हा दौऱ्यावर आले होते, त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, तहसिलदार विशाल दौंडकर, तहसिलदार सतिश कदम,

महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानांतर्गत बचतगटातील महिलांना बँक सखी होण्याची सूवर्णसंधी

        अलिबाग,जि.रायगड,दि.27 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बँक सखी निवड ही स्वयंसहाय्यता समूहातील महिलांना बँक संबंधित कामामध्ये योग्य मार्गदर्शन व मदत मिळवून देण्यासाठी म्हणून उचललेले एक मोठे पाऊल असून त्यांना ही एक सूवर्णसंधी आहे.       बचतगट समूहातील महिलांच्य बँक संबधित येणाऱ्या छोट्याछोट्या अडचणी दूर करून   त्यांची कामे सहजरित्या पार पाडणे, हा बँक सखी नियुक्तीमागील हेतू आहे.       बँक सखी निवडीचे निकष- 1) शैक्षणिक पात्रता किमान 12 वी पास आहे. 2) वय किमान 18 ते 35 वर्ष असावे. 3) समूह/बचतगट सदस्य असावी. 4) SC/ST/VJ.NT/Minority/अपंग,इ.मा.व. इ.प्रवर्गातील महिलांना प्राधान्य असेल. 5) समूहाचे/बचतगटाचे लेखे/पुस्तक लिहिण्याचा अनुभव असावा. 6) महिला बँक शाखा सेवा कार्यक्षेत्रात राहणारी असावी. 7) चांगले संभाषण कौशल्य असावे. 8) कोणत्याही बँक कर्ज प्रकरणात थकबाकीदार नसावी.     जबाबदारी व भूमिका- 1) बँक शाखेत समूहासाठी माहिती कक्ष सांभाळणे. 2) समूहाचे/संघाचे/समूहातील महिलांचे बँक खाते उघडणे. 3) समूहातील महिलांना कागदपत्रांची पूर्तता

महसूल, ग्रामविकास, बंदरे,खार जमिनी विकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांचा दौरा

    अलिबाग,जि.रायगड दि.27 (जिमाका) :- राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे....               बुधवार दि.28 नोव्हेंबर 2020   रोजी दुपारी 1.30 वा. कोकण भवन, सी.बी.डी.बेलापूर येथून शासकीय वाहनाने करंजा, ता.उरणकडे प्रयाण. दुपारी 2.15 वा. करंजा ता.उरण येथे आगमन व करंजा जेट्टी बांधकामाची पाहणी. दुपारी 3.00 वा. करंजा जेट्टीवरुन बोटीने समुद्रमार्गे रेवस जेट्टीकडे प्रयाण. दुपारी 3.15 वा. रेवस जेट्टी ता.अलिबाग येथे आगमन व जेट्टीचे बांधकामाची पाहणी. सायं.4.30 वा. रेवस जेट्टीवरुन शासकीय वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग येथे आगमन. साय.4.45 वा. रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टीने झालेले नुकसान, महा राजस्व अभियान व माझे कुटूंब-माझी जबाबदारी अंतर्गत आढावा बैठक. स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग. सायं. 7.15 वा. शासकीय विश्रामगृह अलिबाग येथे आगमन व राखीव. गुरुवार दि.29 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 9.30 वा. शासकीय विश्रामगृह अलिबाग येथून प्रयाण. दुपारी 1.00 वा. आमदार महेंद्र दळवी यांचे नियोजित कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.30 व

मोटार वाहन निरीक्षकांचा नोव्हेंबर महिन्याचा शिबीर कार्यक्रम जाहीर

  अलिबाग,जि.रायगड दि.27 (जिमाका) :-   उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पेण कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा नोव्हेंबर-2020  महिन्याचा शिबीर कार्यक्रम जाहीर झाला असून शिबीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे- सोमवार, दि.09 व दि.23 नोव्हेंबर 2020 रोजी ता. महाड.  मंगळवार, दि.10  व दि.24 नोव्हेंबर  2020  रोजी ता.श्रीवर्धन.  बुधवार, दि. 11  व दि.25 नोव्हेंबर 2020  रोजी माणगाव.   शुक्रवार, दि.13, दि.20  व दि.27 नोव्हेंबर 2020 रोजी ता.अलिबाग.  मंगळवार, दि.17 नोव्हेबर 2020 रोजी ता.रोहा. बुधवार, दि.18 नोव्हेंबर 2020 रोजी ता.मुरुङ ००००००

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत करोना नियमांचे पालन करीत श्री धावीर महाराजांचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न रायगड पोलिसांनी दिली श्री धावीर महाराजांना सशस्त्र मानवंदना

Image
      अलिबाग, जि.रायगड, दि.26 (जिमाका):- रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्यास आज (दि.26 ऑक्टोबर) पहाटे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत करोना नियमांचे पालन करीत मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी रायगड पोलिसांच्या वतीने पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर व पोलीस पथकाने श्री धावीर महाराजांना सशस्त्र मानवंदना दिली. या सोहळ्यासाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, प्रांताधिकारी डॉ.यशवंत माने, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी, तहसिलदार कविता जाधव, ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, कार्यवाह मकरंद बारटक्के, उत्सव समितीचे अध्यक्ष सूर्यकांत कोलाटकर, कार्यवाह सचिन चाळके, नगराध्यक्ष संतोष पोटफोड़े, उपनगराध्यक्ष महेश कोलाटकर, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, माजी नगराध्यक्ष समिर शेडगे, लालता प्रसाद कुशवाह, संजय कोनकर, विश्वस्त नितिन परब, विजयराव मोरे, सुभाष राजे, समिर सकपाळ, आनंद कुलकर्णी, महेश सरदार, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र जैन, महेंद्र दिवेकर, आप्पा देशमुख, हेमंत कांबळे, अमित उकडे, राजेश काफरे, नगरसेवक दिवेश जैन आदींसह ट

सावित्री खाडीवरील म्हाप्रळ-आंबेत पुलावरुन अवजड वाहतुकीस 31 जानेवारी पर्यंत बंदी

    अलिबाग, जि.रायगड, दि.26 (जिमाका):- म्हाप्रळ-आंबेत पूल रस्त्यावरील सावित्री खाडीवरील आंबेत पूल कमकुवत झाल्यामुळे या पुलावरुन दुचाकी, सहा आसनी रिक्षा, चार चाकी कार, जीप व्यतिरिक्त बस, ट्रक, टेम्पो यासारख्या सर्व अवजड वाहनांची वाहतूक दिनांक 31 जानेवारी, 2021 पर्यंत बंद करण्याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत. सद्य:स्थितीत पुलाच्या Pier Cap Bracket च्या दुरुस्तीचे काम पूर्णत्वाच्या टप्प्यात आहे. पुलाच्या बेअरिंग बदलणे व पेडस्टलची दुरुस्ती करण्यासाठी पुलाच्या गर्डर सहित स्लॅब उचलणे आवश्यक आहे. या बेअरिंग बदलणे, पेडस्टलची दुरुस्ती करणे, एक्स्पान्शन जॉईंट बदलणे, या कामासाठी सुमारे चार महिने इतका कालावधी आवश्यक आहे. त्यामुळे या कालावधीत पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णत: बंद करणे गरजेचे आहे.   त्याचप्रमाणे पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद केल्यानंतर प्रवाशी व विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये, म्हणून आंबेत पुलाजवळ सावित्री खाडीमध्ये पर्यायी जलवाहतूक सेवा सुरु करण्यासाठी, पर्यायी प्रवासी/ रो- रो जल वाहतूक सेवा सुरु करण्यासाठी सावित्री खाडीच्या दोन्ही बाजूस उतरत्या धक्क्

विसराळूपणा वाढलाय का…? तर मग स्मृतीभ्रंश (डिमें‍शिया)बाबत जाणून घ्या…

  विशेष लेख क्र.34                                                                                          दिनांक :- 26 ऑक्टोबर 2020     वाढत्या आयुर्मानाबरोबरच वयोवृद्धांच्या आरोग्यविषयीच्या समस्याही वाढत आहेत.   जसे की मधुमेह, उच्च रक्तदाब, डिमेंशिया इत्यादी.   आज भारतात 4.1 दशलक्ष लोक या आजाराने ग्रस्त आहेत. असे असले तरीही स्मृतीभ्रंश डिमेंशिया हा एक असा आजार आहे,ज्याची पुरेशी माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचली नसल्याने असे रुग्ण उपचारापासून वंचित राहतात व पर्यायाने रुग्णांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना सामाजिक, मानसिक तसेच आर्थिक हानीला सामोरे जावे लागते.   स्मृतीभ्रंश हा असा आजार आहे ज्यात व्यक्तीच्या मानसिक व बौद्धिक क्षमतांचा उत्तरोत्तर अधिकाधिक ऱ्हास होत जातो आणि त्याचा व्यक्तीच्या दैनंदिन कामावर विपरित परिणाम होतो. नेमका काय आहे हा आजार, काय आहेत याची लक्षणे, काय आहेत यावरील उपचार? समजून घेऊ या लेखाद्वारे…   स्मृतीभ्रंशाची लक्षणे : विसर पडणे. विशेषत: नवीन गोष्टींचा विसर पडतो, सुरुवातीला जुन्या गोष्टी चांगल्या आठवतात. वारंवार त्याच गोष्टी विच

मरावे परी देहरुपी उरावे..! अवयवदान करा..अवयवदान करा..!

  विशेष लेख क्र.33                                                                                         दिनांक :- 26 ऑक्टोबर 2020   अवयवदान म्हणजे काय ? जिवंतपणी अथवा मृत झाल्यानंतर आपले अवयव दुसऱ्या व्यक्तीला देणे म्हणजे अवयवदान होय. अवयवदान श्रेष्ठदान असून ज्याद्वारे आपण मृत्यूनंतर आपले अवयवदान करून अंतिम स्वरूपी ज्यांचे अवयव निकामी झाले आहेत, अशा अनेक रुग्णांचे प्राण वाचवू शकतो.   ज्या रुग्णांचे अवयव कायमस्वरूपी निकामी झाले आहेत, अशा अनेक रुग्णांसाठी अवयवदान हाच एक आशेचा किरण आहे.   अवयवदान प्रत्यारोपण प्रतिरूप म्हणजे काय ? मानवी अवयव प्रत्यारोपण म्हणजे आधुनिक वैद्यकीय शास्त्राची एक मोठी उपलब्धी आहे.   या उपचाराचे एखाद्या जिवंत वा मृत व्यक्तीचा अवयव अथवा अवयवाचा काही भाग शस्त्रक्रियेद्वारे विलग करून तो एखाद्या गरजवंत रुग्णांमध्ये प्रत्यारोपित करतात.   ज्यांचा एखादा अवयव कायमस्वरूपी निकामी झाला आहे अशा रुग्णांसाठी ही प्रमाणित व उपलब्ध अशी उपचार पद्धती आहे.   आपण कोणत्या अवयवांचे दान करू शकतो? Ø   मेंदू स्तंभ मृत्यू (Brain Death)-   मृत व्यक्तीची हृदयक्रिया चालू आहे प