Posts

Showing posts from September 17, 2023

जिल्हा रुग्णालयात प्रत्येक बुधवारी होणार दिव्यांगांची तपासणी

      रायगड(जिमाका),दि.20:-  नैसर्गिक अथवा अपघाताने आलेल्या दिव्यंगत्वाची तपासणी करून शारीरिक व मानसिक दृष्ट्या दिव्यांग असणाऱ्या बांधवाना जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून शासन निर्णयाच्या अनुषंगाने दिव्यांग प्रमाणपत्र वितरीत करण्यात येते. ज्या प्रमाणपत्राच्या सहाय्याने विविध शासकीय योजनांचा लाभ दिव्यांग लाभार्थ्यांना मिळतो. या प्रमाणपत्र वितरणाच्या अनुषंगाने जिल्हा रुग्णालय रायगड-अलिबाग येथे सध्या अस्थिव्यंग व भिषक याविभागाकरिता बुधवार व नेत्र, मानसिक आणि कर्ण-मुकबधीर या विभागांकरिता गुरुवार रोजी कामकाज सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने दिली आहे. परंतु अनेक रुग्णांना एकाधिक अपंगत्व असल्याने बुधवार व गुरुवार या दोन्ही दिवशीच्या समितीतील तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी करून घेण्याकरिता उपस्थित राहावे लागत होते. तसेच ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन असल्याने  अनावधानाने मिळालेल्या माहितीनुसार रुग्ण व त्याचे नातेवाईक चुकीच्या दिवशी प्रमाणपत्राकरिता रुग्णांना घेऊन आल्यास, तपासणी समितीचे बोर्ड त्या दिवशी अद्ययावत नसल्याने तपासणी करून देखील प्रमाणपत्र वितरीत करण

सहकारी संस्थांनी सन 2022-23 चे लेखापरीक्षण अहवाल मुदतीत सादर करण्याचे जिल्हा विशेष लेखापरीक्षकांचे आवाहन

  रायगड (जिमाका),दि.20 :-  जिल्हा कार्यक्षेत्रात मुख्यालय असणाऱ्या सर्व सहकारी संस्थांना आणि गृहनिर्माण सहकारी संस्था (हाउसिंग सोसायटी) या सर्व सहकारी संस्था तसेच सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पॅनल वर नोंदणीकृत असलेल्या सर्व सहकारी प्रमाणित, सनदी लेखा परीक्षांनी या सहकारी संस्थांचे सन 2022-23 अखेरीचे लेखापरीक्षण पूर्ण करुन लेखापरीक्षण अहवाल विहीत मुदतीमध्ये सादर होईल याची दक्षता घ्यावी असे आवाहन रायगड जिल्हयाचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-1 सहकारी संस्था उमेश तुपे यांनी केले आहे. सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण आर्थिक वर्ष समाप्तीपासुन ४ महिन्यांचे आत म्हणजे दिनांक 31 जुलैपर्यंत पूर्ण होणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे लेखापरीक्षकाने आपला लेखापरीक्षा अहवाल लेखापरीक्षण पूर्ण झाले पासून दि.31 ऑगस्टपर्यंत आणि कोणत्याही परिस्थितीत वार्षिक साधारण सभेच्या बैठकीची नोटीस देणेपूर्वी सहकारी संस्थाना आणि निबंधकाला 1 महिन्याचे कालावधीचे आत सादर करणे बंधनकारक आहे. सहकारी कायदयान्वये सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणाबाबतची अनिवार्यता वरील प्रमाणे अधोरेखित करणेत आली आहे