Posts

Showing posts from March 25, 2018

'माविम' रायगडची सर्वोत्कृष्ट कामगिरी;राज्यात प्रथम क्रमांक

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.30 (जिमाका)- महिला आर्थिक विकास महामंडळाची तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण योजने अंतर्गत राज्यस्तरीय वार्षिक आढावा बैठक नुकतीच (दि.२४ व२५) अलिबाग येथे पार पडली. या बैठकीत झालेल्या राज्यस्तरीय आढाव्यानंतर सन २०१७-१८ मध्ये १९ जिल्ह्यामधून रायगड जिल्ह्यास विविध घटकनिहाय उत्कृष्ट काम केल्या   बद्दल प्रथम पारितोषिक देऊन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालक इंद्रा मालो (भा.प्र.से.) यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अन्य जिल्ह्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र   देऊन गौरविण्यात आले. महिला आर्थिक विकास महामंडळाची तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण योजने अंतर्गत राज्यस्तरीय वार्षिक आढावा व नियोजन बैठक दि. २४ व २५ मार्च २०१८ रोजी हॉटेल रॅडिसन ब्ल्यू, अलिबाग या ठिकाणी पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी (भा.प्र.से.), माविमच्या   उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक इंद्रा मालो, (भा.प्र.से.), महाव्यवस्थापक (प्रकल्प) कुसुम बाळसराफ, व महाव्यवस्थापक (वित्त व प्रशासन) राजस कुंटे यांची प्रमुख उपस्थिती

महागावच्या 'स्त्री शक्ती' चे एलईडी दिव्यांचे उत्पादन सुरु अंधारल्या झोपडीत उजाडले 'स्वप्न प्रकाशाचे'

Image
        अलिबाग, जि. रायगड, दि.30 (डॉ.मिलिंद दुसाने)- 'ती' आणि 'तिच्यासारख्या' अनेकींची जिद्द, चिकाटी आणि प्रयत्नांना शासनाने पाठबळ दिले आणि महागावच्या 'स्त्री शक्ती' बचतगटाच्या महिलांनी एलईडी दिव्यांचे उत्पादन सुरु केले.   एका दुर्गम खेड्यात, अंधारल्या झोपडीत हे उत्पादन सुरु होऊन प्रकाशाचे स्वप्न उजाडले आहे. ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानाच्या पाठबळातून रायगड जिल्ह्याला अभिमान वाटावा असे हे परिवर्तन घडले आहे. जिल्ह्यातील 56 गावांचा समावेश              राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियान राबविले जात आहे. रायगड जिल्ह्यातही 22 ग्रामपंचायतींमधल्या 56 गावांमध्ये या अभियानाची अंमलबजावणी सुरु आहे. या अभिनात समावेश असलेली राज्यात सर्वाधिक गावे रायगड जिल्ह्यातली आहेत हे विशेष.त्यातलीच एक ग्रामपंचायत महागाव. सुधागड तालुक्यातल्या दुर्गम डोंगराळ भागात 12 वाड्यांनी बनलेली ही ग्रामपंचायत आणि लोकवस्ती 1800 जणांची. अशा या लहानशा आणि टुमदार   गावाला दुर्गमतेचा शाप आणि निसर्गाचं वरदानही लाभलेलं. विकासाचे अन

पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड, (जिमाका)दि.28- राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड हे शुक्रवार दि.30 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे- शुक्रवार दि.30 रोजी दुपारी दीड वा. खरकवाडी, ता. महाड जि. रायगड येथे आगमन व श्री हनुमान जयंती सप्ताह कार्यक्रमास उपस्थिती.दुपारी दोन वा. आंब्याचा माळ, ता.महाड, या गावास भेट व गावकऱ्यांशी चर्चा.दुपारी अडीच वा. आंब्याचा माळ ता. महाड येथून किल्ले रायगडकडे प्रयाण. दुपारी साडेतीन वा. जिल्हा परिषद विश्रामगृह, किल्ले रायगड, पाचाड येथे आगमन व शिवपुण्यतिथी कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा. शनिवार दि.31 रोजी पहाटे पाच वाजता जगदीश्वर पुजा,किल्ले रायगड. सकाळी सहा वाजता श्री हनुमान जयंती उत्सव, किल्ले रायगड, या कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी आठ वाजता श्री शिव समाधी महापुजा. सकाळी नऊ वाजता श्री शिवप्रतिमा पूजन व शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार व गडारोहण स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम.सकाळी सव्वा अकरा वा. श्री शिवप्रतिमा पालखी मिरवणूक (राजदरबार ते शिवसमाधी, किल

राष्ट्रीय लोकअदालत 14 ऐवजी 22 एप्रिल रोजी

अलिबाग,जि. रायगड,(जिमाका)दि.28- राष्ट्रीय लोकअदालत शनिवार दिनांक 14 एप्रिल   आयोजित करण्यात आली होती. तथापि या तारखेत बदल करण्यात आला असून आता लोकअदालत रविवार दि.22 एप्रिल रोजी जिल्ह्यात सर्व न्यायालयामध्ये होईल, असे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश   तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष मु. गो. सेवलीकर यांनी कळविले आहे.   या लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली भूसंपादन प्रकरणे,मोटार अपघात प्रकरणे,दिवाणी प्रकरणे 138 एन.आय ॲक्ट् खालील प्रकरणे,दिवाणी अपिले, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे व अपिले ठेवली जाणार आहेत. तसेच विज वितरण विभाग, नगरपालिका,ग्रामपंचायत, भारत दूर संचार निगम यांच्या पाणीबिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे सदर लोकअदालती मध्ये ठेवली जाणार आहेत. याबरोबरच राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था यांचेकडील थकबाकीबाबत वादपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. या लोकन्यायालयात प्रकरणे तडजोडीने निकाली केल्यास लोकांचा पैसा आणि वेळ यांचा होणारा अपव्यय वाचतो. पक्षकारांना तात्काळ न्याय मिळतो तसेच जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे तसेच   य

केंद्रीय मंत्री ना.अनंत गिते यांचा जिल्हा दौरा

अलिबाग, जि. रायगड, दि.28 (जिमाका)- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते हे शुक्रवार दि.30   रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. शुक्रवार दि.30 रोजी सकाळी नऊ   वा.मुंबईहून   महाड एमआयडीसी, ता. महाड जि.रायगड प्रयाण.दुपारी दीड वा. महाड एमआयडीसी,विश्रामगृह ता. महाड जि.रायगड येथे आगमन.   दुपारी तीन वाजता महाड एमआयडीसी, ता. महाड जि.रायगड येथून ता.दापोली जि. रत्नागिरीकडे प्रयाण. ०००००

जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी सुविधांची निश्चिती करा- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

Image
        अलिबाग, जि. रायगड, दि.28 (जिमाका)-   प्रत्येक दिव्यांग व्यक्तीस आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 2567 मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी आवश्यक सुविधा असल्याची निश्चिती करा. त्याच अहवाल येत्या 15 दिवसांत देऊन जेथे सुविधा नाहीत तेथे त्या सुविधा निर्माण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे दिले.   दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर सेवा सुविधा पुरविण्यासंदर्भात निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांसंदर्भात निवडणूक यंत्रणेस मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. या कार्यशाळेस   जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी श्रीधर बोधे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, अपंग संघटनेचे साईनाथ पवार, प्रिझम सामाजिक सेवा संस्थेच्या प्रणिता गोंधळी यांच्यासह सर्व उपविभागीय व तहसिल कार्यालयांतील निवडणूक कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपजिल्हाधिकारी बोधे यांनी प्रास्ताविकात सांगितले की,   दिव्यांग मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी

श्री.सिद्धीविनायक मंदिर न्यासातर्फे जिल्हा प्रशासनाला 1 कोटी रुपये: लोकसेवेतच ईश्वर सेवा- आदेश बांदेकर

Image
        अलिबाग, जि. रायगड, दि.28 (जिमाका)- श्री. सिद्धीविनायक मंदिर न्यासाकडे समाजातील दानशूर लोकांकडून आलेल्या दानाचा सत्पात्रि विनियोग व्हावा; यासाठी समाजातील गरजू लोकांना आरोग्य, शिक्षण सुविधांसाठी मंदिर न्यास मदत देत असते. हा पैसा लोकांच्या उपयोगी यावा लोकसेवेतच ईश्वर सेवा आहे, या ध्येय्याने मंदिर न्यास कार्य करीत असते, असे प्रतिपादन श्री. सिद्धी विनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी आज येथे केले.   राज्यशासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत   होणाऱ्या जलसंधारण कामांसाठी श्री सिद्धी विनायक मंदिर न्यासातर्फे   आर्थिक मदत दिली जाते. त्याअंतर्गत आज रायगड जिल्ह्याला एक कोटी रुपयांच्या निधीचा धनादेश   जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यासाठी मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर हे अलिबाग येथे आले होते. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे त्यांनी एक कोटी रुपयांचा धनादेश सुपुर्द केला.   त्यांचे समवेत मंदिर न्यासाचे विश्वस्त तसेच जिल्हा प्रशासनातील उपजिल्हाधिकारी श्रीधर बोधे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव,, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा अधिक्षक क

अपघात टाळण्यासाठी अधिसूचना मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर कमी वेगाने वाहन चालविण्यास मनाई

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.27 - यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील पहिल्या लेन मधुन प्रवास करतांना विहित गतीपेक्षा (ताशी 80 किमी) कमी वेगाने वाहन चालविण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबतची अधिसुचना   अपर पोलिस महासंचालक (वाहतूक)   यांनी जारी केली आहे. या अधिसुचनेनुसार, यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील अपघात वाहतूक कोंडी होवू नये यासाठी द्रूतगती मार्गावरील प्रत्येक वाहिनीत तीन लेन असतात. त्यापैकी कार,जीप, टेम्पो या हलक्या वाहनांनी द्रूतगती मार्गाच्या मध्य लेन मधून, जड-अवजड वाहनांनी सर्व्हीस लेनला लागून असलेल्या सर्वात डाव्याकडील लेन मधून प्रवास करणे   अपेक्षित असते. तसेच त्यांनी केवळ पुढील वाहनास ओलांडतांना (ओव्हरटेक) उजवीकडील लेनचा अवलंब करुन लेन मधून उजवीकडील लेन कायम रिकामी ठेवणे आवश्यक आहे. थोडक्यात पहिली लेन ही ओव्हरटेक करीता आहे. तथापि बरीच वाहने पहिल्या लेन मधून प्रवास करतांना आवश्यक असणाऱ्या विहीत गतीचा (ताशी 80 कि.मी.) वापर न करता त्यापेक्षा कमी गतीने वाहने चालवितात. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या चालकांना वाहन चालविण्यास अडथळा निर्माण होऊन अपघात

मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.27 - मुरुड पोलीस ठाणे हद्दीत दि.19 रोजी अज्ञात पुरुषाचा मृतदेह समुद्र किनाऱ्यावर कुजलेल्या स्थितीत आढळला आहे. यासंदर्भात मुरुड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या इसमाचे वय 50 ते 55 वर्ष, अंगाने मध्यम, नेसूस काळया कलरची हाफ पॅन्ट,गळयात लाल रंगाचा सुती धागा असे कुजलेल्या स्थितीत एकदरा गायमुख येथे समुद्रकिनारी खडकाळ भागात समुद्राचे पाण्यातून वाहत येवून दिनांक 19 मार्च रोजी सायंकाळी चार वाजता हा मृतदेह सापडला आहे. या मयताचे कमरेला चादर व ब्लँकेट बांधून त्यास खालील बाजूस रेती,दगड,माती,लोखंडी साखळ्या असे सुमारे 15 किलो 200 ग्रॅम वजन भरलेले नायलॉन गोणी (पोती) बांधून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अज्ञात ,ठिकाणाहून समुद्राच्या पाण्यात टाकून दिले आहे. या पोत्यावर गाईचे चेहऱ्याचा लोगो व इंग्रजीत GAAY, BAKERY SPECIAL MAIDA तसेच BHAGWAIT FLOUR MILLING PVT.LTD लिहीले आहे. यासंदर्भात माहिती असल्यास संपर्क साधावा व मृतदेहाची ओळख पटवावी,असे के.पी.साळे, सहा. पोलीस निरीक्षक मुरुड पोलीस ठाणे   यांनी कळविले आहे. ०००००

माथेरान इको सेन्सेटीव्ह झोन सनियंत्रण समितीची 7 एप्रिल रोजी बैठक

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.27 - पर्यावरण व वन मंत्रालयाच्या अधिसुचनेद्वारे गठित माथेरान ईको सेन्सिटिव्ह झोन नियंत्रण समितीची बैठक येत्या 7 एप्रिल रोजी माथेरान येथे आयोजित करण्यात आली आहे. या समितीकडे करावयाच्या तक्रारी, तसेच या क्षेत्रात करावयाच्या विकासकामांचे प्रस्ताव दिलेल्या मुदतीत जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रायगड यांनी केले आहे. भारत सरकार, पर्यावरण भवन, नवी दिल्ली परिपत्रकान्वये वासुदेव जी.गोरडे (भा.प्र.से.) सेवा निवृत्त यांच्या अध्यक्षतेखाली एकूण 9 सदस्यांची सनियंत्रण समिती दोन वर्षाकरीता गठीत करण्यात आली असून जिल्हाधिकारी रायगड हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. सदर समितीची दुसरी बैठक 7 एप्रिल 2018 रोजी सकाळी 10.30 वाजता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एम.टी.डी.सी.) विश्रामगृह दस्तुरी माथेरान ता.कर्जत, जि.रायगड येथे आयोजित करण्यांत आलेली आहे. या संदर्भात भारत सरकारच्या पर्यावरण व वन विभागाकडील दि.04 फेब्रुवारी 2003 च्या अधिसूचनेन्वये रायगड व ठाणे जिल्हयातील एकूण 89 (काही पूर्ण व काही भागत:) गावांचा प्रदेश संवेदनशील क्षेत्र म्हणून घो