मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.27- मुरुड पोलीस ठाणे हद्दीत दि.19 रोजी अज्ञात पुरुषाचा मृतदेह समुद्र किनाऱ्यावर कुजलेल्या स्थितीत आढळला आहे. यासंदर्भात मुरुड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या इसमाचे वय 50 ते 55 वर्ष, अंगाने मध्यम, नेसूस काळया कलरची हाफ पॅन्ट,गळयात लाल रंगाचा सुती धागा असे कुजलेल्या स्थितीत एकदरा गायमुख येथे समुद्रकिनारी खडकाळ भागात समुद्राचे पाण्यातून वाहत येवून दिनांक 19 मार्च रोजी सायंकाळी चार वाजता हा मृतदेह सापडला आहे. या मयताचे कमरेला चादर व ब्लँकेट बांधून त्यास खालील बाजूस रेती,दगड,माती,लोखंडी साखळ्या असे सुमारे 15 किलो 200 ग्रॅम वजन भरलेले नायलॉन गोणी (पोती) बांधून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अज्ञात ,ठिकाणाहून समुद्राच्या पाण्यात टाकून दिले आहे. या पोत्यावर गाईचे चेहऱ्याचा लोगो व इंग्रजीत GAAY, BAKERY SPECIAL MAIDA तसेच BHAGWAIT FLOUR MILLING PVT.LTD लिहीले आहे. यासंदर्भात माहिती असल्यास संपर्क साधावा व मृतदेहाची ओळख पटवावी,असे के.पी.साळे, सहा. पोलीस निरीक्षक मुरुड पोलीस ठाणे  यांनी कळविले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज