Posts

Showing posts from January 19, 2020

शेतकरी सन्मान व मार्गदर्शन केंद्रांचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा-कृषिमंत्री ना.दादाजी भुसे

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.23- जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना येणाऱ्या अडचणी, समस्याचे निवारण करणे,योग्य सल्ला देणे व तोही आदर आणि सन्मानपूर्वक यासाठी जिल्हा अधीक्षक कृषि कार्यालयात शेतकरी सन्मान व मार्गदर्शक कक्षाची सुरुवात करण्यात आली असून याचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे प्रतिपादन  राज्याचे कृषि,माजी सैनिक कल्याण मंत्री ना.दादाजी भुसे यांनी आज येथे केले.   जिल्हा नियोजन भवन, अलिबाग येथील सभागृहात आयोजित शेतकऱ्यांना संबोधन कार्यक्रमात ते बोलत होते.             यावेळी आमदार महेंद्र दळवी, जि.प.सदस्य सुरेंद्र म्हात्रे, राजा केणी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, तहसिलदार सचिन शेजाळ, वि.कृ.स.सं. ठाणे श्री. प्रमोद लहाळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडूरंग शेळके, कृषि उपसंचालक सतिश बोराडे, कृषि विकास अधिकारी श्री. लक्ष्मण खुरकुटे आदि उपस्थित होते.              यावेळी मार्गदर्शन करताना कृषिमंत्री श्री.भुसे म्हणाले की,  शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.   त्याच्या जीवनशैलीतून समाजाला अन्नधान्य व उपजिविका पुरवली जाते.  शेती ही त्याची जीवन पध्दती असून त्याने त्याकड

रायगडच्या जिल्हाधिकारी पदी श्रीमती निधी चौधरी रुजू

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.22- रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांची अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पुणे महानगर परिवहन महामंडळ पुणे येथे बदली झाली आहे.   त्यांच्या जागी रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी   म्हणून श्रीमती निधी चौधरी   (भा.प्र.से.) यांनी आज पदभार स्वीकारला. श्री मती चौधरी या 2012 पासून भारतीय प्रशासन सेवेच्या अधिकारी आहेत.   त्यांनी यापूर्वी रायगड जिल्ह्यात पेण उपविभागीय अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.   मंत्रालयात देखील जलसंधारण विभागात उपसचिव म्हणून काम केले आहे.   000000

25 जानेवारीला 10 वा राष्ट्रीय मतदार दिवस

अलिबाग-दि. 21(जिमाका) भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे निर्देशाप्रमाणे दरवर्षी प्रमाणे 25 जानेवारी 2020 रोजी 10 वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येणार आहे. या दिवसासाठी Electoral Literacy for Stronger Democracy हा विषय आयोगाने निश्चित केलेला आहे. हा कार्यक्रम जिल्हा स्तरावर, मतदार संघस्तरावर, तालुका स्तरावर व मतदान केंद्रस्तरावर साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय मतदार दिवसाची मराठी भाषेतील शपथ घेणे, नविन नोंदणी झालेल्या मतदारांना बॅच वितरीत करणे, मतदार नोंदणी जागृती बाबत चित्रफित दाखविणे, युवक मतदार महोत्सव साजरा करणे, निवडणूक साक्षरता क्लबच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय मतदार दिवसाच्या अनुषंगाने जिल्हा स्तरावर तसेच मतदारसंघ स्तरावर शाळा, कॉलेजमध्ये विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेमधील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावरील कार्यक्रम 25 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता पी.एन.पी. नाट्यगृह अलिबाग बायपास रोड येथे आयोजित करण्यात

अन्न व औषध प्रशासन म.रा.रायगड पेण तर्फे प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखू रु.80 लाखाचा साठा जप्त

अलिबाग-दि. 21(जिमाका) गुटखा, पान मसाला, चघळण्याची तंबाखू यांच्या रुपात आढळून आलेल्या तंबाखू, सुपारी व त्यात वापरण्यात येणारी अनेक अपमिश्रकांच्या घातक परिणामुळे ॲक्युट हायपर मॅग्नेशिया, ह्दयरोग, मुखाचा कर्करोग, अन्न नलिकेचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, जठर, आतडे व श्वसन या संबंधिचे आजार होत असून गुटखा, पान मसाला, चघळण्याची तंबाखू यांचे व्यसन लागत असल्यामुळे खाणाऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा हिताच्या दृष्टीने अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत कलम 30(2)(अ) नुसार अन्न सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन म.रा.मुंबई यांनी गुटखा, पान मसाला, स्वादिष्ट/सुगंधित तंबाखू, स्वादिष्ट/सुगंधित सुपारी, अपमिश्रकेयुक्त उत्पादित चघळण्याची तंबाखू, खर्रा, मावा यांची निर्मिती, साठवण, वितरण किंवा विक्री यास दि.20 जुलै 2019 पासून 1 वर्षाच्या कालावधीसाठी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध करण्यात आला आहे. गुरुवार दि.9 जानेवारी, 2020 रोजी किरवली टोलनाका, तळोजा, ता.पनवेल परिसरात अन्न व औषध प्रशासन म.रा.पेण-रायगड व वस्तू आणि सेवाकर विभागातील अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीवरुन प्र

पी.एन.पी कॉलेज वेश्वी येथे युवा दिन कार्यक्रम संपन्न

अलिबाग-दि. 21(जिमाका) - 18 जानेवारी, 2020 रोजी 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन   व पंधरवड्यानिमित्त पी.एन.पी कॉलेज वेश्वी येथे एच आयव्ही, एडस विषयावरील विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वादविवाद स्पर्धेचे उद्धाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी, पीएनपी कॉलेज प्राचार्य सौ.संजिवनी नाईक व जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री.संजय माने यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या वाद-विवाद स्पर्धेमध्ये पीएनपी कॉलेज वेश्वी   येथील विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी श्री.संजय माने यांनी युवक युवतींमध्ये एचआयव्ही, एडस विषयी जनजागृती व्हावी याकरीता त्यांना रेड रिबन क्लबच्या माध्यमातून गावपातळीवर एचआयव्ही समुपदेशन व तपासणी करण्यात यावी असे सांगितले. तसेच एचआयव्ही संसर्गित असणाऱ्या व्य्क्तींना लवकरात लवकर एआरटी उपचाराकरीता एआरटी केंद्रामध्ये संदर्भित करावे असे सांगितले. एचआयव्ही संसर्गित व्यक्तीशी कोणताही भेदभाव न करता त्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून चांगली वागणूक द्यावी असे सूचित केले. तसेच डॉ. अजित गवळी यांनी युवा पिढीसाठी संतुलित आहार, व्यायाम, योग या

केंद्र शासनाच्या योजना ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहचवा---खासदार श्रीरंग बारणे

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29 -   केंद्र शासनाच्या अनेक महत्वाकांक्षी योजना असून त्यांची अंमलबजावणी करुन त्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहचवा, असे निर्देश खासदार तथा अध्यक्ष जिल्हा विकास   समन्वय व सनियंत्रण (दिशा) समिती श्रीरंग बारणे यांनी आज येथे दिले.   जिल्हा नियोजन भवन सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीच्या बैठकीत ते बोलत होते.             यावेळी खासदार सुनिल तटकरे, आमदार सर्वश्री आ. भरतशेठ गोगावले, आ.महेंद्र थोरवे, आ.महेंद्र दळवी, आ.रविशेठ पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती योगिता पारधी,   कोकण विभागीय अधिकारी शिवाजी दौंड, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवऋषी, तसेच सर्व शासकीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी,कर्मचारी, जिल्हा विकास   समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.             यावेळी खा.श्री.बारणे म्

जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्ह्यासाठी 247 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर विकास कामांच्या योजना निधीला प्राधान्य -ना.श्रीमती तटकरे

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20- जिल्हा नियोजन समितीने सन 2020-21 या वित्तीय वर्षासाठी (सर्वसाधारण) 189.64 कोटी, टी.एस.पी. 32.98 कोटी, एस.सी.पी. 24.94 कोटी अशा एकूण 247 कोटी 56 लक्ष रुपयांच्या जिल्हा विकास आराखड्यास आज मान्यता देण्यात आली.   विकास आराखड्याचे नियोजन करतांना जिल्ह्यात राबवावयाच्या विकास कामांसाठी राज्य व केंद्राकडून मिळणाऱ्या निधीला अधिकाधिक प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती   राज्याच्या उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा श्रीमती आदिती तटकरे यांनी उपस्थित सदस्यांना दिली. येथील जिल्हा नियोजन समितीची बैठक आज जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली. या बैठकीस   पालकमंत्री ना. श्रीमती आदिती तटकरे या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती योगिता पारधी,   खासदार श्रीरंग बारणे, खा.सुनिल तटकरे,   आमदार सर्वश्री आ. भरतशेठ गोगावले, आ.महेंद्र थोरवे, आ.महेंद्र दळवी, आ.रविशेठ पाटील, कोकण विभागीय अधिकारी शिवाजी दौंड, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदे

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम नवीन पिढी सदृढ आणि निरोगी होण्यासाठी लाभदायक ----पालकमंत्री श्रीमती आदिती तटकरे

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.19 (जिमाका)- शासनाच्या आरोग्य विभागाकडील राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम शहरी व ग्रामीण राबविण्यात आली असून यामध्ये 0 ते 5 वयोगटातील   बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला आहे. त्यामुळे शासनाचा हा स्तुत्य उपक्रम असून ही लसीकरण मोहिम नवीन पिढी सदृढ आणि निरोगी होण्यासाठी लाभदायक असल्याचे,   प्रतिपादन राज्याच्या उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा श्रीमती आदिती तटकरे यांनी आज येथे केले.    पनवेल येथे रोटरी क्लब पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन व लाईफ लाईन हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पल्स पोलिओ लसीकरण मोहिम कार्यक्रमात त्या बोलत होत्या.             यावेळी पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, उपविभागीय अधिकारी पनवेल दत्तू नवले,पोलीस उपायुक्त अशोक दुधे,जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.अजित गवळी आदि मान्यवर उपस्थित होते.               यावेळी पालकमंत्री श्रीमती तटकरे म्हणाल्या की, 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ सा