पी.एन.पी कॉलेज वेश्वी येथे युवा दिन कार्यक्रम संपन्न



अलिबाग-दि.21(जिमाका) - 18 जानेवारी, 2020 रोजी 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन  व पंधरवड्यानिमित्त पी.एन.पी कॉलेज वेश्वी येथे एच आयव्ही, एडस विषयावरील विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वादविवाद स्पर्धेचे उद्धाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी, पीएनपी कॉलेज प्राचार्य सौ.संजिवनी नाईक व जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री.संजय माने यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या वाद-विवाद स्पर्धेमध्ये पीएनपी कॉलेज वेश्वी  येथील विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
यावेळी श्री.संजय माने यांनी युवक युवतींमध्ये एचआयव्ही, एडस विषयी जनजागृती व्हावी याकरीता त्यांना रेड रिबन क्लबच्या माध्यमातून गावपातळीवर एचआयव्ही समुपदेशन व तपासणी करण्यात यावी असे सांगितले. तसेच एचआयव्ही संसर्गित असणाऱ्या व्य्क्तींना लवकरात लवकर एआरटी उपचाराकरीता एआरटी केंद्रामध्ये संदर्भित करावे असे सांगितले. एचआयव्ही संसर्गित व्यक्तीशी कोणताही भेदभाव न करता त्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून चांगली वागणूक द्यावी असे सूचित केले.
तसेच डॉ. अजित गवळी यांनी युवा पिढीसाठी संतुलित आहार, व्यायाम, योग यांचे महत्व सांगून दररोज सकाळी तीन ते चार किलोमीटर चालणे गरजेचे असून शरीर तंदुरुस्त राहणेकरीता वरील बाबींची अत्यंत आवश्यकता असल्याचे सांगितले. स्पर्धा परीक्षा, इतर मैदानी खेळ याकडे युवावर्गाने जास्त लक्ष देऊन चांगल्या सवयी आपल्या अंगी बाळगून वाईट सवयींना दूर ठेवले पाहिजे. तसेच एचआयव्ही, एडस आजाराविषयी शास्त्रीय माहिती घेऊन त्याचा प्रतिबंध करणे गरजेचे आहे.
यावेळी पीएनपी कॉलेज प्राचार्य सौ.संजीवनी नाईक यांनी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग यांच्यामार्फत नवनवीन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असल्याबद्दल या विभागाचे विशेष आभार मानले. त्यामुळे पीएनपी कॉलेजमधील युवक युवतीच्या ज्ञानामध्ये भर पडत असल्याचे सांगितले. तसेच कॉलेजमधील युवक युवतींना पॅथॉलॉजी, रक्तपेढी, पाणी नमुना तपासणी केंद्र या विभागामध्ये ॲप्रेन्टीसशिप देऊन सहकार्य करावे. जेणेकरुन विद्यार्थ्यांना विविध तपासण्या विषयी माहिती तसेच प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळेल व त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडून त्यांना नोकरी मिळणेस उपयोग होईल. यावेळी जिल्हा शलयचिकित्सक डॉ.अजित गवळी सर यांनी प्रयोगशाळा, रक्त पेढी, पाणी तपासणी, क्षकिरण, ईसीजी, डायलेसीस विभागामध्ये विद्यार्थ्यांना माहिती व प्रत्यक्ष काम करण्याची संधी देण्याबाबत प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
00000



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक