Posts

Showing posts from July 8, 2018

केळवणे येथे शिधापत्रिका वाटपः विकास योजनांचा लाभ घ्या -ना.रविंद्र चव्हाण

Image
अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.14 -   केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा जनतेने लाभ घ्यावा व आपले जीवन सुखकर करावे, असे आवाहन राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण  यांनी आज केळवणे ता. पनवेल येथे केले. आज केळवणे येथे अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत खारफुटी बाधित शेतकऱ्यांना शिधापत्रिका वितरण ना. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास आ.प्रशांत ठाकूर, केळवणे सरपंच अश्विनी घरत, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, जिल्हा पुरवठा अधिकारी दुपारे, तहसीलदार दीपक आकडे, गटविकास अधिकारी तेटगुरे, पुरवठा अधिकारी अस्मिता जाधव  तसेच अरुणशेठ भगत आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.   आपल्या मार्गदर्शनात ना. चव्हाण म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना अभिप्रेत असलेल्या डिजिटल क्रांतीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र वाटचाल करीत आहे.कल्याणकारी कामे करताना शे

उरणमध्ये सीएनजी पंप स्टेशनचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Image
अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.14 -   महानगर गॅस आणि इंडियन ऑइल यांच्या सहकार्याने फुंडे ता. उरण येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर सुरू करण्यात आलेल्या सीएनजी पंप स्टेशनचे लोकार्पण  आज राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. उरण येथे आयोजित या कार्यक्रमास ना. चव्हाण यांचे समवेत आ.प्रशांत ठाकूर, जेएनपीटीचे ट्रस्टी महेश बालदी, सरपंच जयवंती म्हात्रे, सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दामगुडे, तहसिलदार   कल्पना गोडे, समीर मढवी, जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, चंद्रकांत घरत, रविशेठ भोईर, कौशिक शहा, महानगर गॅसचे व्यवस्थापकीय संचालक संजीब दत्ता, इंडियन ऑईलचे महाव्यवस्थापक पार्थ बोरा आदी मान्यवर उपस्थित होते. औद्योगिकदृष्ट्या झपाट्याने विकसित होणाऱ्या उरण परिसरात सीएनजी पंप स्टेशनची सुविधा आवश्यक होती ती आज पासून उपलब्ध होत आहे. तर या इंधनाच्या वापराने प्रदुषणालाही आळा बसेल, असे मनोगत ना. चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले.              या

भूकंपाचे हादरेःरायगड जिल्ह्यात सर्व सुखरुप, दरडप्रवण गावांत सतर्कता बाळगा- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.14 -   शुक्रवारी रात्री साडेनऊ च्या सुमारास रायगड जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य  हादरे  जाणवले ते 2.8 रिक्टर स्केल इतक्या तीव्रतेचे होते. यामुळे जिल्ह्यात जिवित वा मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त नाही, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तथापि, भूकंप हादऱ्याच्या पार्श्वभुमिवर जिल्ह्यात दरडप्रवण गावातील जिवीत व मालमत्तेच्या सुरक्षेबाबतीत अधिक सतर्कता बाळगावी, असे  निर्देश  जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातून प्राप्त माहितीनुसार,भारतीय प्रमाण वेळेनुसार दि.13 रोजी रात्री 9 वा.31 मि. नी   रायगड, ठाणे व डोंबिवली – कल्याण परिसराला भूकंपाचे सौम्य  हादरे  जाणवले. त्याचे केंद्र   19.1 उत्तर अक्षांश, 73.2 पूर्व रेखांश, पाच किमी खोलवर होते.   हे धक्के 2.8 रिक्टर स्केल इतक्या तीव्रतेचे होते. या  हादऱ्यांमुळे   जिल्ह्यात कोणतीही जिवित वा मालमत्तेची हानी झालेली नाही, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.   यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडून आढावा घेऊन जिल्

देवकुंड धबधबा परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

अलिबाग,जि. रायगड,(जिमाका) दि.14- पावसाळ्याच्या कालावधीत पर्यटकांची, नागरिकांची जीवित, मालमत्ता हानी होऊ नये, तसेच सार्वजनिक आरोग्य व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून मौजे भिरा ता. माणगावच्या हद्दीत येणाऱ्या  देवकुंड धबधबा व आजूबाजूच्या एक कि.मी.परिसरात फौजदारी प्रक्रिया कलम 144 (1)(4)  अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. उपविभागीय दंडाधिकारी माणगाव प्रशासली जाधव दिघावकर यांनी हे आदेश जारी केले असून येत्या 12 सप्टेंबर पर्यंत हे आदेश लागू राहतील, असेही त्यांनी कळविले आहे. या प्रतिबंधात्मक आदेशान्वये, धबधब्याचे परिसरामध्ये मद्यपान करणे किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश   करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे, उघड्या जागेवर मद्य सेवन करणे.   पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इत्यादी ठिकाणी सेल्फी काढणे व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे, रहदारीवर परिणाम करणाऱ्या ठिकाणी फोटोग्राफी करणे.    पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या धोकादायक पाण्यात,खोलपाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे.धोकादायक स्थिती व जिवितहानी होईल अशा धबधबे

मुलूंड येथे गुरुवारी रोजगार मेळावा

अलिबाग,जि. रायगड, (जिमाका)दि.14- कौशल्य विकास व उद्योजकता विभाग व राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान बृहन्मुंबई, महानगरपालिका मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.19 रोजी सकाळी आठ ते सायं.  पाच यावेळात औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) नवीन इमारत मिठागर रोड, मुलंड (पूर्व) मुंबई येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात अल्पशिक्षित दहावी, बारावी पास,नापास व पदवी पर्यंतचे शिक्षण घेतलेले आणि आयटीआय मधून प्लंबर, इलेक्ट्रीशियन, एअर कंडिशनिंग, रेफ्रीजरेशन रिपेअरींग याच ट्रेडचे प्रशिक्षण घेतलेल्या अठरा ते पस्तीस वर्षे वयोगटातील कुशल, अकुशल तसेच दिव्यांग युवक-युवतींकरिता   हॉटेल, रेस्टॉरंन्ट, पर्यटन, हाऊस किंपिग, फॅसिलिटी मॅनेजमेंट, क्रूझ लाईन या आस्थापनांवरील रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. इच्छूक उमेदवारांनी   मुलाखतीस येताना स्वत:चा बायोडाटा, दोन फोटो, सर्व शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे व त्यांच्या छायांकित प्रतींसह औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) नवीन इमारत मिठागर रोड, मुलंड (पूर्व) मुंबई   या मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन, सहायक संचालक, जिल्हा क

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 61.71 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.14 -   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 61.71 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 1850.60 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 29.00 मि.मि., पेण-126.00 मि.मि., मुरुड-45.00 मि.मि., पनवेल-43.20 मि.मि., उरण-26.00 मि.मि., कर्जत-29.20 मि.मि., खालापूर-57.00 मि.मि., माणगांव-82.00 मि.मि., रोहा-58.00 मि.मि., सुधागड-47.00 मि.मि., तळा-66.00 मि.मि., महाड-84.00 मि.मि., पोलादपूर-52.00 म्हसळा-120.60 मि.मि., श्रीवर्धन-19.00 मि.मि., माथेरान-103.30 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 987.30 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 61.71 मि.मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   58.89    टक्के इतकी आहे.

जुलै-ऑगस्ट मध्ये होणाऱ्या 10 वी, 12 वी परीक्षा 17 पासून

अलिबाग,जि. रायगड, (जिमाका)दि.13- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ वाशी नवी मुंबई यांनी माहे जुलै व ऑगस्ट 2018 मध्ये होणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेबाबतचे नियोजन केले आहे.   त्यानुसार इयत्ता दहावीची परीक्षा दि.17 जुलै ते 2 ऑगस्ट 2018 दरम्यान होणार आहे. तर इयत्ता बारावीची परीक्षा दि.17 जुलै ते 4 ऑगस्ट 2018 दरम्यान होणार आहे.   जिल्ह्यात इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी उरण, पनवेल,कर्जत,खोपोली,पेण,रोहा, श्रीवर्धन, महाड, माणगाव, अलिबाग अशी दहा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत.   तर इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी पनवेल, खोपोली,पेण, अलिबाग, महाड असे पाच केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.   यापरीक्षा केंद्रावर इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी 3023 तर इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी 2872 विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) बी.एल.थोरात यांनी कळविले आहे. 0000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 37.47 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.13 -   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 37.47 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 1788.89 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 16.00 मि.मि., पेण-16.00 मि.मि., मुरुड-7.00 मि.मि., पनवेल-12.60 मि.मि., उरण-2.00 मि.मि., कर्जत-56.20 मि.मि., खालापूर-43.00 मि.मि., माणगांव-46.00 मि.मि., रोहा-33.00 मि.मि., सुधागड-14.00 मि.मि., तळा-53.00 मि.मि., महाड-112.00 मि.मि., पोलादपूर-64.00 म्हसळा-64.00 मि.मि., श्रीवर्धन-13.00 मि.मि., माथेरान-47.70 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 599.50 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 37.47 मि.मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   56.92   टक्के इतकी आहे. 00000

पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचा जिल्हादौरा कार्यक्रम

अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.13 -   राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रायगड जिल्हा रविंद्र चव्हाण हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.             शनिवार दि.14 रोजी सकाळी साडे आठ वा. डोंबिवली येथून शासकीय वाहनाने उरण जि.रायगडकडे प्रयाण.   सकाळी साडे दहा वा. उरण येथे आगमन व सीएनजी स्टेशनचे उद्घाटन. स्थळ : द्रोणगीरी उरण.   दुपारी बारा वा. उरण येथून केळवणे ता.पनवेलकडे प्रयाण.   दुपारी साडे बारा वा. केळवणे येथे आगमन व अन्न सुरक्षा योजने अंतर्गत शिधापत्रिका वितरणाचा कार्यक्रम. स्थळ : केळवणे ता.पनवेल.   दुपारी एक वा. केळवणे येथून पनवेलकडे प्रयाण. दुपारी अडीच वा. जेएसडल्ब्यू कंपनी वडखळ कंपनीमधील नोकरी भरतीबाबत बैठक.    स्थळ : चांगू कान्हा ठाकूर महाविद्यालय, सेक्टर-11 प्लॉट न.1 खांदा कॉलनी पनवेल. दुपारी   तीन वा. सुदर्शन कंपनी येथे स्थानिकांना रोजगार/कंत्राट मिळणेबाबत बैठक.   स्थळ : चांगू कान्हा ठाकूर महाविद्यालय, सेक्टर-11 प्लॉट न.1 खांदा कॉलनी पनवेल.   दुपारी साडे तीन

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 35.14 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.12 -   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 35.14 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 1751.43 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 2.00 मि.मि., पेण-11.40 मि.मि., मुरुड-8.00 मि.मि., पनवेल-5.60 मि.मि., उरण-10.00 मि.मि., कर्जत-67.30 मि.मि., खालापूर-42.00 मि.मि., माणगांव-54.00 मि.मि., रोहा-47.00 मि.मि., सुधागड-16.00 मि.मि., तळा-64.00 मि.मि., महाड-60.00 मि.मि., पोलादपूर-44.00 म्हसळा-67.40 मि.मि., श्रीवर्धन-20.00 मि.मि., माथेरान-43.50 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 562.20 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 35.14 मि.मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   55.73   टक्के इतकी आहे. 00000

जिल्ह्यात मनाई आदेश

अलिबाग,जि. रायगड, (जिमाका)दि.11- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता   जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत (पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र वगळून) दि.12 जुलै रोजी 08.00 ते दि. 25जुलै रोजीचे 24.00 वाजेपर्यंत   मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) चे मनाई आदेश अपर जिल्हादंडाधिकारी रायगड अलिबाग यांनी मनाई आदेश लागू केले आहे. या मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येईल असे अपर जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे. 00000

अनुकंपा प्रतिक्षा यादी प्रसिद्ध

अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.11 - जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात येणाऱ्या एकत्रित गट-क व ड संवर्गातील सामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या उमेदवारांची प्रतिक्षा यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर   संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्या कार्यालयात व जिल्हा संकेतस्थळ ( www.raigad.gov.in ) यावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर यादीतील नाव व क्रमांकाबाबत उमेदवारांची हरकत/आक्षेप असल्यास उमेदवारांनी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्या मार्फत आपले हरकत अर्ज 25 जुलै पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत. यानंतर आलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. याची नोंद घेण्यात यावी , असे तहसिलदार (महसूल) जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे. 0000

जागतिक लोकसंख्या दिन : जिल्हा रुग्णालयात प्रभात फेरी; पंधरवडाभर कार्यक्रम

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.11 - जागतिक लोकसंख्या दिन (दि.11 जुलै) निमित्त   जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड अलिबाग व रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थींनी व रुग्णालयातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या वर्षाचे घोषवाक्य   ‘ एका अर्थपूर्ण भविष्याची सुरुवात करु या-कुटुंब नियोजनाची साथ धरु या’ हे आहे. या प्रभातफेरी मध्ये लोकसंख्या नियंत्रणाविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच बाह्यरुग्ण विभागात आयोजित करण्यात आलेल्या जागतिक लोकसंख्या दिन कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई यावेळी उपस्थित होते.             जिल्हा रुग्णालय प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थींनींनी जागतिक लोकसंख्या दिनाविषयी पथनाट्याद्वारे जनजागृती केली. स्त्रि रोग तज्ज्ञ डॉ.मेघा घाटे यांनी कुटुंब नियोजन पध्दतीबाबत माहिती दिली. यानिमित्ताने 27 जून ते 10 जुलै, 2018 हा दांम्पत्य संपर्क पंधरवडा म्हणून साजरा करण्यात आला. या पंधरवड्यामध्ये आरोग्य कर्

मातृसुरक्षा दिनानिमित्त गरोदर,स्तनदा मातांना मार्गदर्शन

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.11 - जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथील बाह्यरुग्ण विभागात मंगळवारी (दि.10)मातृ सुरक्षा दिन साजरा करण्यात आला.   कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी, व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल भुसारे, यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. मातृ सुरक्षा दिनामिनिमित्त   गरोदर माता यांना गरोदरपणात घ्यावयाची काळजी याबाबत डॉ.अनिल फुटाणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच आहारतज्ज्ञ शंकर फुलवाले यांनी गरोदरपणात घ्यावयाचा पोषक आहार याबाबत माहिती दिली. जिल्हा रुग्णालय अलिबाग येथील परिचर्या प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थींनीनी मातांनी प्रसुतीपश्चात स्तनपान कसे करावे याची माहिती छायाचित्राद्वारे दिली.                                                          या   कार्यक्रमास   गरोदर माता, जिल्हा रुग्णालयातील अधिसेविका श्रीमती मोरे, सर्व आंतरुग्ण कक्षातील परिसेविका व माताबाल संगोपन विभागातील कर्मचारी उपस्थित होते. 00000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 92.57 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.11 -   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 92.57 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 1716.29 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 35.00 मि.मि., पेण-155.00 मि.मि., मुरुड-9.00 मि.मि., पनवेल-140.00 मि.मि., उरण-125.00 मि.मि., कर्जत-115.80 मि.मि., खालापूर-122.00 मि.मि., माणगांव-115.00 मि.मि., रोहा-147.00 मि.मि., सुधागड-65.00 मि.मि., तळा-72.00 मि.मि., महाड-114.00 मि.मि., पोलादपूर-108.00 म्हसळा-45.20 मि.मि., श्रीवर्धन-11.00 मि.मि., माथेरान-102.10 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 1481.10 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 92.57 मि.मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   54.61   टक्के इतकी आहे. 00000

13 कोटी वृक्ष लागवड अभियान : जिल्ह्यात आतापर्यंत 13 लाख 94 हजार रोपांची लागवड

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.11 -    राज्य शासनाच्या 50 कोटी वृक्ष लागवड अभियानात या वर्षी 13 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यात यावर्षी 31 लक्ष वृक्ष लागवड करायचे उद्दिष्ट आहे.   जिल्ह्यात मंगळवार दि. 10 जुलै अखेर 13 लाख 94 हजार 402 रोपांची लागवड करण्यात आली आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक अलिबाग वन विभाग, अलिबाग यांच्या कार्यालयातील नियंत्रण कक्षातून प्राप्त झाली आहे.   त्यात वन विभागाने 8 लाख 43 हजार 569 तर सामाजिक वनीकरण विभागाने 2 लाख 48 हजार 30 रोपांची लागवड केली आहे.   ग्राम विकास विभागाने अद्याप 1 लाख 31 हजार 203 तर अन्य विभागांनी मिळून 88 हजार 890, महसूल विभागाने 9485 असे विविध विभागांनी रोपांची लागवड केली आहे. येत्या 31 जुलै पर्यंत हे अभियान सुरु असून त्यात नागरिकांनी सहभागी होऊन एक तरी रोप लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 00000

अतिवृष्टी इशाऱ्याच्या पार्श्वभूमिवर प्रशासनाची सतर्कता

अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.11 -   जिल्ह्यात गेले तीन दिवस अतिवृष्टी होत असून येते काही दिवसही अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.              जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नदी किनाऱ्यावरील, सखल भागातील तसेच दरडग्रस्त गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभुमिवर संभाव्य दरडग्रस्त गावांमध्ये   तलाठी, मंडळ अधिकारी , सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, वरिष्ठ भूवैज्ञानिक यांनी पाहणी करावी. डोंगरावरील मनुष्यवस्तीच्या भागातील गावांमध्ये जमिनीला भेगा पडणे, जमिनीखालून माती मिश्रीत पाणी येणे, घरांच्या भिंती खचणे,   पोल, झाड वाकडे होणे, डोंगरमाथ्यावर पाणी साचून राहणे, मोठे दगड हलणे या परिस्थितीची तात्काळ पाहणी करावी. आवश्यकतेनुसार दरडग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करावे. तसेच आपापल्या परिसरातील धोकादायक, जुन्या पुलांची पाहणी करुन आवश्यकतेनुसार पुलांवरील वाहतुक सुरु किंवा बंद ठेवण्

गेल(इंडिया) चे वरसोली समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता अभियान व वृक्षारोपण

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.10- उसर ता. अलिबाग येथे कार्यरत गेल (इंडिया) लिमिटेड , या कंपनीतर्फे वर सो ली ता. अलिबाग येथील समुद्र किनाऱ्यावर सोमवार (दि.9 ) स्वच्छता अभियान राबविण्यात आले तसेच वृक्षारोपणही करण्यात आले. स्वच्छ भारत अभियान ा अंतर्गत गेल कंपनी संपूर्ण देशभर आपल्या सर्व युनिट्समध्ये स्व च्‍छ भ ा रत मिशन अंतर्गत लोकांमध्‍ये स्वच्छतेविषयी ची जन जागृतीसाठी विविध उपक्रम राबवित आहे .   त्याअंतर्गत वरसोली   समुद्रकिना ऱ्या ची स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.   यावेळी उप विभागीय अधिकारी सर्जेराव सोनवणे , गेल कंपनीचे मुख्‍य सरव्यवस्थापक प्रसून कुमार , तहसिलदार प्रकाश सकपाळ , वरसोलीचे सरपंच मिलिंद क वळे , महाप्रबंध क के . त्‍यागराजन हे मान्यवर उपस्थित   होते .   तसेच गेल कर्मचारी , स्थानिक लोक , वरसोली ग्रामपंचायत सदस्‍य , अलिबाग येथील जे . एस . एम . महाविद्यालयातील एन . एस . एस . कॅडेट व अन्‍य विद्यार्थी- विद्यार्थिनी सहभागी झाले होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी साऱ्यांसह स्वच्छतेची शपथ घेतली.   यावेळी वरसोली समुद्रकिना ऱ्याच्या परिसरात नारळाचे 1

विशेष विवाहासाठी ऑनलाईन नोटीस बंधनकारक : 1 ऑगस्ट पासून अंमलबजावणी

            अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.10: विशेष विवाह कायदा 1954 नुसार विवाह संपन्न करण्यासाठी विवाहेच्छुक वर-वधू यांनी आपल्या नियोजित विवाहाची नोटीस ऑनलाईन पद्धतीने बंधनकारक करण्यात आले असून येत्या 1 ऑगस्टपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.              यासंदर्भात नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक, कोकण विभाग ठाणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,   विशेष विवाह कायदा 1954 नुसार विवाह संपन्न करण्यासाठी विवाह इच्छुक वर-वधू यांनी आपल्या नियोजित विवाहाची नोटीस, वय व रहीवाशी यासाठीच्या पुराव्याच्या कागदापत्रांसह संबंधित जिल्ह्याचे विवाह अधिकारी यांना सादर करावी लागते आणि नोटीस फी भरावी लागते.   सदर वर-वधू संबंधित अटींची पूर्तता करीत असल्यास विवाह अधिकारी सदर नोटीस स्वीकारतात व त्याची प्रत नोटीस बोर्डावर लावतात.   तसेच वर   किंवा वधू या दोघांपैकी एकजण अन्य जिल्ह्यातील असल्यास या नोटीसींची एक प्रत त्या जिल्ह्याच्या विवाह अधिकाऱ्यांकडे नोटीस बोर्डवर लावण्यासाठी पाठविली जाते.               विवाह अधिकारी यांच्याकडे नोटीस दिल्यानंतर तीस दिवसांच्या आत नियोज