देवकुंड धबधबा परिसरात प्रतिबंधात्मक आदेश


अलिबाग,जि. रायगड,(जिमाका) दि.14- पावसाळ्याच्या कालावधीत पर्यटकांची, नागरिकांची जीवित, मालमत्ता हानी होऊ नये, तसेच सार्वजनिक आरोग्य व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून मौजे भिरा ता. माणगावच्या हद्दीत येणाऱ्या  देवकुंड धबधबा व आजूबाजूच्या एक कि.मी.परिसरात फौजदारी प्रक्रिया कलम 144 (1)(4)  अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. उपविभागीय दंडाधिकारी माणगाव प्रशासली जाधव दिघावकर यांनी हे आदेश जारी केले असून येत्या 12 सप्टेंबर पर्यंत हे आदेश लागू राहतील, असेही त्यांनी कळविले आहे.
या प्रतिबंधात्मक आदेशान्वये, धबधब्याचे परिसरामध्ये मद्यपान करणे किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश  करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे, उघड्या जागेवर मद्य सेवन करणे.  पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इत्यादी ठिकाणी सेल्फी काढणे व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे, रहदारीवर परिणाम करणाऱ्या ठिकाणी फोटोग्राफी करणे.   पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या धोकादायक पाण्यात,खोलपाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे.धोकादायक स्थिती व जिवितहानी होईल अशा धबधबे किंवा तलाव याठिकाणी पाण्यात उतरणे.वाहन अतिवेगाने चालविणे तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे वाहन चालविणे.सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ कचरा, काचेच्या व प्लॅस्टिकच्या बाटल्या, थर्माकोलचे व प्लॅस्टिकचे साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणे.  महिलांची छेडछाड करणे, टिंगळटवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य व अश्लिल हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे.  मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजवणे, ङिजे.सिस्टीम वाजवणे, गाडीमधील स्पिकर,उफर वाजविणे त्यामुळे ध्वनीप्रदूषण करणे.  ज्या कृतीमुळे ध्वनी,वायू व जल प्रदूषण होईल असे कोणतेही कृत्य करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. धबधबा व 1 किमी परिसरात (अत्यावश्यक सेवा वगळून) वाहने नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या आदेशाचा भंग झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही उपविभागीय दंडाधिकारी माणगाव, उपविभाग माणगाव यांनी दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड