Posts

Showing posts from February 12, 2023

शासनमान्य राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा खोपोली येथे संपन्न

  अलिबाग,दि.17(जिमाका):-  महाराष्ट्राच्या क्रीडा परंपरेतील अत्यंत मानाची आणि महत्त्वाची अशी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्ह्य क्रीडा अधिकारी रायगड यांच्या वतीने राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा 2022-23 ही  कुस्तीमहर्षी भाऊसाहेब कुंभार क्रीडा नगरी, समर्थ मंगल कार्यालय खोपोली  येथे संपन्न झाली. या स्पर्धेत 14 व 17 वर्ष वयोगटातील महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, लातूर या आठ विभागतील महिला खेळाडूंनी सहभाग घेऊन आपल्या कौशल्याचे दिमाखदार प्रदर्शन केले. . या स्पर्धेचे उद्घाटन माजी ऑलम्पियन मारुती आडकर, जिल्हा क्रीडाधिकारी रविंद्र नाईक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह खोपोली शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार, टाटा स्टील कंपनीचे,कपिल मोदी,शशी भूषण, भावेश रावल  खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, कार्यवाहक किशोर पाटील, खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष सुनील पाटील, शि

कोविड-19 सानुग्रह अनुदानासाठी अपील केलेल्या नातेवाईकांनी कागदपत्रे जमा करावीत -- जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने

    अलिबाग,दि.17(जिमाका):- राज्य शासनामार्फत महाराष्ट्र राज्यामध्ये जी व्यक्ती कोविड-19 आजाराने निधन पावली आहे. त्या मृत व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु.50 हजार इतके सानुग्रह सहाय्य्य राज्य आपत्ती मदत निधीमधून प्रदान करण्यासाठी mahacovid१९relief.in, हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले होते. रायगड जिल्ह्यामध्ये सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी ज्या नातेवाईकांनी mahacovid१९relief.in, या संकेतस्थळावर अर्ज केला असून त्यांचा अर्ज काही अपुऱ्या कागदपत्राविना अपात्र ठरविण्यात आला आहे, अशा नातेवाईकांनी Appeal to GRC साठी अपिल केले आहे त्यांनी बाह्यरुग्ण कक्ष क्र.24 जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे मयत व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, कोविड-19 चा आरटीपीसीआर/अँटीजेन/एचआरसिटी अहवाल अथवा रुग्णालयातील मृत्यूचा दाखला (फॉर्म-4), मयत व्यक्तीचे आधार कार्ड, अर्जदाराचे आधार कार्ड, अर्जदाराचे बँक खाते तपशील या सर्व कागदपत्रासहित दि.28 फेब्रुवारी   2023 पर्यंत सोमवार ते शनिवार सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 या वेळेत उपस्थित राहावे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही ऑनलाईन प्रणाली   दि.28 फेब्रुवारी   2023   पासून बंद

कॉपीमुक्त महाराष्ट्र अभियान “रायगड जिल्हा होणार कॉपीमुक्त”

Image
    अलिबाग,दि.14(जिमाका):  उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2023, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता (12 वी) मंगळवार दि.21 फेब्रुवारी 2023 ते मंगळवार दि.21 मार्च 2023  तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता (10 वी)  गुरुवार दि.2 मार्च 2023 ते शनिवार दि. 25 मार्च 2023 या कालावधीत होणार आहेत. यासाठी जिल्हानिहाय मुख्य परीक्षा केंद्र, परिरक्षण केंद्राची माहिती पुढीलप्रमाणे- परिरक्षण केंद्र संख्या 14+1=15(माथेरान), उच्च माध्यमिक परीक्षा केंद्र संख्या-46, माध्यमिक परीक्षा केंद्र संख्या-74 अशी आहे. तसेच इयत्ता 12 वी च्या परीक्षेला बसणारे विद्यार्थी एकूण संख्या 31 हजार 272 तर  इयत्ता 10 वी चे परीक्षेला बसणारे विद्यार्थी एकूण संख्या-35 हजार 733 इतकी आहे. उरण तालुक्यातील  इयत्ता 12 वी प्रविष्ठ विद्यार्थी संख्या 2 हजार 101 तर इयत्ता 10 वी  प्रविष्ठ विद्यार्थी संख्या-2 हजार 430 आहे.  पनवेल तालुक्यातील  इयत्ता 12 वी प्रविष्ठ विद्यार्थी संख्या 10 हजार 454 तर इयत्ता 10 वी  प्रविष्ठ विद्यार्थी संख्या-12 हजार 411 आहे.  खालापूर तालुक्यातील  इयत्

विद्यार्थ्यांसाठी सर्प आणि निसर्गासोबत सहजीवन विषयावर कार्यशाळा संपन्न

  अलिबाग,दि.14(जिमाका):  जेएसएम महाविद्यालय,अलिबाग येथे वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग तर्फे विद्यार्थ्यांसाठी सर्प आणि निसर्गासोबत सहजीवन या विषयावर शनिवार, दि.11 फेब्रुवारी रोजी कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत सापांबद्दल शास्त्रीय माहिती, अलिबाग आणि भोवतालच्या परिसरात आढळणारे साप तसेच सर्पदंश कसे टाळावेत आणि सर्पदंश झाल्यास करावयाच्या उपाययोजना याबाबतचे सविस्तर विश्लेषण करण्यात आले., यावेळी डॉ.प्रसाद दाभोळकर, ओमकार कामतेकर आणि अदिती सगर यांनी संगणकीय सादरीकरणाराद्वारे याबाबतची माहिती उपस्थितांना दिली. वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून अलिबाग तालुक्यात वन्यजीव विशेषत: साप,पक्षी यांचा बचाव तसेच प्रथमोपचार करण्याचे सेवाभावी कार्य करत आहे. यावेळी जेएसएम महाविद्यालयाचे अध्यक्ष ॲड.गौतम पाटील, मुख्याध्यापक डॉ.अनिल पाटील, उपमुख्याध्यापिका डॉ. सोनल पाटील, जीवशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.अद्वैत घाटपांडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.सुनील आनंद, डॉ. मीनल पाटील तसेच वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग चे सक्रिय कार्यकर्ते पारस घरत, सुजित लाड आणि समीर प

नोकरी करण्यास इच्छुक उमेदवारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा

    अलिबाग,दि.14(जिमाका):  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड अलिबाग कार्यालयाकडून जिल्ह्यातील नामांकीत आस्थापनांकडील रिक्त पदांच्या भरतीसाठी  www.mahaswyam.gov.in , या संकेतस्थळावर गुरुवार दि.16 फेब्रुवारी 2023 रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित केला आहे.  या रोजगार मेळाव्यात 10 वी, 12 वी उत्तीर्ण, आय.टी.आय., डिप्लोमा, पदवी, इत्यादी पात्रताधारक नोकरी करण्यास इच्छुक उमेदवारांनी  www.mahaswyam.gov.in  या संकेतस्थळावर job Seeker या टॅबवर जाऊन आपला User ID व Password वापरून लॉग इन करावे. पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा या टॅबवर क्लिक करुन आपला जिल्हा निवडून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध असलेल्या पदासाठी नोंदणी करावी.   रोजगार मेळाव्यातील रिक्त पदांची माहिती  www.mahaswyam.gov.in  या वेबपोर्टलवर उपलब्ध आहे. जास्तीत जास्त बेरोजगार युवकांनी या ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती अमिता पवार यांनी केले आहे. ०००००००

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वादपूर्व व दाखल अशी एकूण 37 हजार 763 प्रकरणे निकाली 13 कोटी 29 लाख 08 हजार 526 रूपयाची तडजोड रक्कम वसूल

  अलिबाग,दि.13(जिमाका):-  दाखलपूर्व आणि प्रलबिंत खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत या हेतूने रायगड जिल्ह्यात शनिवार, दि.11 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित केलेल्या लोकन्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून वादपूर्व व दाखल अशी एकूण 37 हजार 763 प्रकरणे सामंजस्याने मिटवण्यात यश आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश श्री. अमोल अ. शिंदे यांनी  दिली. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण भारतभर राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये न्यायालयांतील प्रलंबित प्रकरणे तसेच न्यायालयांत वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. रायगड जिल्ह्याच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एस. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रामगड जिल्ह्यातील वादपूर्व प्रकरणे व प्रलंबित अशी एकूण 98 हजार 623 प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी वादपूर्व प्रकरणे 36 हजार 225 व प्रलंबित प्रकरणांपैकी 1 हजार 538 प्रकरण

कृषी महोत्सवातून होत आहे तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आयुक्त कृषी श्री.सुनील चव्हाण यांचे प्रतिपादन

  अलिबाग,दि.13(जिमाका):-  महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा कृषी महोत्सव 2023 चे आयोजन 9 ते 13 फेब्रुवारी या कालावधीत सेक्टर 27, कामोठे, पनवेल येथे करण्यात आले आहे, तरी सदर कृषी महोत्सवांना मा.आयुक्त कृषी यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. रविवार, दि. 12 फेब्रुवारी 2023 रोजी मा.आयुक्त कृषी श्री.सुनील चव्हाण यांनी रायगड जिल्हा कृषी महोत्सव-2023 कामोठे,नवी मुंबई  येथे सपत्नीक भेट दिली.  यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी त्यांचे स्वागत केले  मा.आयुक्त, श्री.चव्हाण यांनी कृषी विभागाच्या दालनामधील जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण कृषी  उत्पादनाच्या नमून्यांची त्याचप्रमाणे विभागाने केलेले जलकुंड, SRT, पॉलिहाऊस यांचे  मॉडेल्स यांची पाहणी केली.  तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त कृषी विभागांनी तयार केलेल्या पौष्टिक तृणधान्य  दालनातील  कृषी विभागाच्या जिल्ह्यातील  महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तयार करून आणलेल्या पौष्टिक तृणधान्यांच्या विविध स्टॉललाही भेट दिली. यावेळी पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व पटवू

साडे चार लाख बालके, विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीस झाली सुरुवात जिल्हा परिषदेची जागरूक पालक- सुदृढ बालक मोहीम

    अलिबाग,दि.13(जिमाका):-  शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये विविध आजारामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत असतो. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह बाळाकांच्या आरोग्या विषयी जागरूकता निर्माण करणे साठी जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या समन्वयाने जागरूक पालक सुदृढ बालक मोहिमेला जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी सुरुवात केली.                ही मोहीम पुढील दोन महिने राबविली जाईल. मोहीम यशस्वी करण्यासाठी एकून 257 आरोग्य पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील 30 वैद्यकीय अधिकारी, 161 समुदाय आरोग्य अधिकारी, 66 प्राथमिक आरोग्य केंद्रातील/ ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातील अंगणवाडी आणी शाळांना भेट देऊन आरोग्य तपासणी करतील.                जिल्ह्यातील एकूण 2 हजार 528 शासकीय, 385 निमशासकीय आणि 246 खासगी शाळांमधील 3 लाख 21 हजार बालकांची तपासणी केली जाणार आहे. तसेच 3 हजार 59 अंगणवाड्या व 72 खासगी नर्सरी शाळेमधील 1 लाख 40 हजार बालकांची तपासणी होणा