कोविड-19 सानुग्रह अनुदानासाठी अपील केलेल्या नातेवाईकांनी कागदपत्रे जमा करावीत -- जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने

 


 

अलिबाग,दि.17(जिमाका):- राज्य शासनामार्फत महाराष्ट्र राज्यामध्ये जी व्यक्ती कोविड-19 आजाराने निधन पावली आहे. त्या मृत व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु.50 हजार इतके सानुग्रह सहाय्य्य राज्य आपत्ती मदत निधीमधून प्रदान करण्यासाठी mahacovid१९relief.in, हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले होते.

रायगड जिल्ह्यामध्ये सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी ज्या नातेवाईकांनी mahacovid१९relief.in, या संकेतस्थळावर अर्ज केला असून त्यांचा अर्ज काही अपुऱ्या कागदपत्राविना अपात्र ठरविण्यात आला आहे, अशा नातेवाईकांनी Appeal to GRC साठी अपिल केले आहे त्यांनी बाह्यरुग्ण कक्ष क्र.24 जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे मयत व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, कोविड-19 चा आरटीपीसीआर/अँटीजेन/एचआरसिटी अहवाल अथवा रुग्णालयातील मृत्यूचा दाखला (फॉर्म-4), मयत व्यक्तीचे आधार कार्ड, अर्जदाराचे आधार कार्ड, अर्जदाराचे बँक खाते तपशील या सर्व कागदपत्रासहित दि.28 फेब्रुवारी  2023 पर्यंत सोमवार ते शनिवार सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 या वेळेत उपस्थित राहावे.

राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही ऑनलाईन प्रणाली  दि.28 फेब्रुवारी  2023  पासून बंद होणार आहे. Apeal  to GRC साठी अपिल केलेल्या अर्जदाराची यादी जिल्हाधिकारी रायगड-अलिबाग यांच्या raigad.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी नातेवाईकांनी डॉ.समीर पोटे (9881307729), श्री.गणेश भोसले (9158160176), श्री.कैलास सोमवंशी (7030422588) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास द. माने  यांनी केले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड