Posts

Showing posts from March 20, 2022

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विषयक कार्यशाळा संपन्न

Image
अलिबाग,दि.25(जिमाका):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील पुरवठा विषयक बाबींसंदर्भात रास्त भाव धान्य दुकानदार, पेट्रोल पंप व डिझेल पंपधारक, एल.पी.जी. गॅस वितरक, खाद्यतेल व खाद्यतेलबियांचे व्यापारी, शिवभोजन केंद्र चालक/मालक, ऑईल कंपन्यांचे जिल्हा संघटक व असिस्टंट मॅनेजर, तालुका पुरवठा शाखेतील अधिकारी-कर्मचारी यांची आज दि.25 मार्च 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.मधुकर बोडके यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये उप नियंत्रक, वैधमापन शास्त्र श्री.राम राठोड, अन्न व औषध प्रशासन विभाग, रायगडचे सहाय्यक आयुक्त श्री.लक्ष्मण दराडे, भारत पेट्रोलियम गैस कंपनीचे मॅनेजर श्री.विशाल काबरा, आय.ओ.सी. कंपनीचे श्री.मणिकंदन मुरलीधरण यांनी मार्गदशन केले. तर रायगड जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे कार्याध्यक्ष श्री.शेखर देशमुख, पेट्रोल पंप धारक श्री.बाळकृष्ण पाटील, शिवभोजन केंद्र चालक श्रीमती जेधे, रास्त भाव धान्य दुकानदार, सुधागड तालुका अध

महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्हा, प्रादेशिक परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे निरीक्षण गृह, बाहगृह कर्जत येथील संस्थेत रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावेत.

    अलिबाग,दि.25(जिमाका):- जिल्हा प्रादेशिक परिवीक्षा अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे निरिक्षण गृह, बालगृह कृषी उत्पन्न बाजार समिती आवार कर्जत मुरबाड रोड, एच. पी. पेट्रोल पंपाजवळ दहिवली, कर्जत या ठिकाणी खालील अ.क्र. 1 ते 7 पदे, बाल न्याय मंडळ कर्जत व बाल कल्याण समिती कर्जत येथे अ.न.8 ही सर्व पदे 11 महिन्याच्या कंत्राटी तत्वावर भरावयाचे आहेत. त्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. समुपदेशक-1 पद, मासिक मानधन रु.17 हजार 500, शैक्षणिक अर्हता -मान्यताप्राप्त विद्यापीठाची मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी किंवा समाजकार्य विषयात पदव्युत्तर पदवी, एम.एस.सी.आयटी किंवा तत्सम अर्हता, वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष, अनुभव - बालकांच्या क्षेत्रात कामकाज अनुभव असल्यास प्राधान्य.   परिवीक्षा अधिकारी- 1 पद, मासिक मानधन रु.17 हजार 500, शैक्षणिक अर्हता- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (एम.एस.डब्ल्यू असल्यास प्राधान्य.) एम.एस.सी.आयटी किंवा तत्सम अर्हता, वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष, अनुभव- शासकीय किंवा स्वयंसेवी संस्थेत बालकांसोबत कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.   भांडार रक्षक तथा ल

आपत्कालीन स्थितीत आवश्यक असणारे रेस्क्यू (विमोचन) साहित्य होमगार्ड संघटनेस जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते सुपूर्द

Image
    अलिबाग,दि.24(जिमाका):- होमगार्ड संघटना ही मानसेवी संघटना ही मानसेवी स्वरुपाची असून पोलीस दलास सहाय्यकारी म्हणून कार्यरत आहे. आपत्कालीन स्थितीत स्थानिक प्रशासनाला मदत कार्यातही सहकार्य करते. त्या उद्देशाने मानसेवी होमगार्ड सदस्यांना प्रशिक्षण देण्यात येवून त्यांना मदत कार्यात सहभागी करून घेतले जाते. आपत्कालीन स्थितीत आवश्यक असणारे रेस्क्यू (विमोचन) साहित्य होमगार्ड कार्यालयाकडे उपलब्ध असल्यास त्याचा उपयोग होमगार्डना प्रशिक्षण देण्यासाठी करता येवू शकतो. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेनुसार जिल्हा समादेशक, गृहरक्षक दल तथा अपर जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगड यांना हायबीम सर्च लाईट – 4, एल.ई.डी फ्लड लाईट विथ बॅटरी ऑपरेटर – 4, 8mm रोप, 10mm रोप, 12mm रोप (प्रत्येकी 100 मीटर), वॉकी टॉकी हॅण्ड सेट - 4, फर्स्ट एड बॉक्स - 5, तंबू - 5, मेगा फोन - 2, चेन सॉ/वूड कटर – 2 हे साहित्य आज दि.24 मार्च 2022 रोजी उपलब्ध करुन देण्यात आले. साहित्य वाटप कार्यक्रमावेळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा समादेशक तथा अपर

शासकीय अर्थसहाय्याचा लाभ घेण्याकरीता पात्र कलावंतांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तर कला संस्थांनी सांस्कृतिक संचालनालयाकडे तात्काळ अर्ज करावेत -जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

अलिबाग,दि.24(जिमाका):- प्रयोगात्मक कलेवर अवलंबून असलेल्या कलाकार / संस्था यांना कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर अर्थसहाय्य करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हे अर्थसहाय्य एकरकमी एकदाच पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. प्रति लाभार्थी (एकल कलाकार) रु.5 हजार आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यास्तव प्रयोगात्मक क्षेत्रातील एकल कलावंत यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज संबंधित तालुक्याचे तहसिलदार किंवा गटविकास अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, रायगड यांच्याकडे तर समूह / फड / पथक यांनी त्यांच्या आवश्यक कागदपत्रांसह अर्ज संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, विस्तार भवन, एम.जी.रोड, मुंबई- 400032/ सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, पहिला मजला, विमानतळ मार्ग, येरवडा, पुणे 411006 यांच्याकडे दि.23 मार्च ते 28 मार्च 2022 या कालावधीत सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर तसेच जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री.गजानन लेंडी यांनी केले आहे. संबंधित योजनेच्या दोन्ही अर्जांचे नमुने, या योजनेकरीता पात्रता, निकष,

श्रीवर्धन पर्यटन महोत्सव 2022; पर्यटन महोत्सवातून सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

Image
    अलिबाग,दि.24(जिमाका):- श्रीवर्धनला अतिशय सुंदर असा समुद्र किनारा लाभला असून हा समुद्र किनारा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक श्रीवर्धन बीचला भेट देत असतात. ही बाब लक्षात घेवून राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने या वर्षी श्रीवर्धन पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागांतर्गत पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग, नवी मुंबई आणि “ श्रीवर्धन पर्यटन संस्था-श्रीवर्धन ” यांच्या संयुक्त विद्यमाने “ श्रीवर्धन पर्यटन महोत्सव – 2022 ” आयोजित करण्यात आला आहे. दि.26 व 27 मार्च 2022 रोजी “ श्रीवर्धन बीच ” येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाची सर्वांनाच उत्सुकता लागली असून, या पर्यटन महोत्सवात सर्व पर्यटक व नागरिकांना विनामूल्य प्रवेश असणार आहे. दि.26 मार्च 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यमंत्री पर्यटन तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे रायगड यांच्या हस्ते होणार असून, या महोत्सवात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. दि.26 मार्च रोजी वाळूशिल्प प्रदर्शन, कोकण खाद्य संस्कृती स्टॉल, गिधाड संवर्धन, सर्प मित्र ओळख

छोट्या व्यवसायातून गगनभरारी घेण्यासाठी सरसावल्या बचतगटाच्या महिला

Image
    अलिबाग,दि.24(जिमाका):- महिला आर्थिक विकास महामंडळ, रायगड तसेच युनायटेड वे मुंबई फाउंडेशन यांच्या वतीने दि.21 मार्च 2022 रोजी नवी मुंबई व पनवेल महानगरपालिकेतील ज्या महिलांचे कोरोना कालावधीत उद्योग व्यवसाय बंद झाले किंवा ज्यांना नव्याने घरगुती व्यवसाय चालू करणे आहे किंवा टेलरिंग येते पण मशीन घेऊ शकत नाही अशा एकूण 94 महिलांना नुकतेच त्यांना छोट्या छोट्या व्यवसायातून गगनभरारी घेता यावी यासाठी वस्तू रुपात साहित्य वाटप करण्यात आले. त्यातील 47 महिलांना शिलाई मशीन, 20 महिलांना घरघंटी, 12 महिलांना ब्युटी पार्लर किट, 1 महिलांना केक तयार करण्याचे किट तसेच 14 महिलांना फूड सर्व्हिसचे किट असे साहित्य वाटप करण्यात आले. तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ व युनायटेड वे मुंबई फाउंडेशन यांच्याकडून ही या महिला बचतगटातील महिलांचा पाठपुरावा करण्यात येईल. जेणेकरून या किट किंवा या मदतीमुळे त्यांना कसा फायदा झाला किंवा होत आहे हे माहीत करून घेतला जाईल, असे सांगण्यात आले. या किट वाटप कार्यक्रमास पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त श्री.गावडे, सहायक आयुक्त श्री.विधाते, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहायक जिल

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा शाखेकडून पुरवठाविषयक बाबींसंदर्भात कार्यशाळेचे आयोजन

अलिबाग,दि.23(जिमाका):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पुरवठाविषयक बाबींसंदर्भात रास्त भाव धान्य दुकानदार, पेट्रोल पंप व डिझेल पंपधारक, एल.पी.जी. गॅस वितरक, खाद्यतेल व खाद्यतेलबियांचे व्यापारी, शिवभोजन केंद्र चालक/ मालक, ऑईल कंपन्याचे जिल्हा संघटक व असिस्टंट मॅनेजर, तालुका पुरवठा शाखेतील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी कार्यशाळा शुक्रवार, दि.25 मार्च 2022 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 02.00 या वेळेत जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेमध्ये अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे नाविन्यपूर्ण उपक्रम, योजना, सुधारीत ग्राहक संरक्षण कायदा 2019 मधील सुधारणा, ग्राहकांचे हित जोपासण्याच्या अनुषंगाने आवश्यक बदल यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच भारत सरकारची डिजिटल इंडिया ही महत्वाकांक्षी योजना असून तिचा उद्देश नागरिकांना सर्व शासकीय सुविधा या इलेक्ट्रॉनिक पध्दतीने (Online) उपलब्ध करुन देणे हा आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री.छगन भुजबळ तसेच पुरवठा

आंबेत पूल दुरुस्तीच्या कामाकरिता सर्व प्रकारच्या वाहतुकीस पुढील दोन महिन्यांकरिता राहणार बंद

अलिबाग,दि.23(जिमाका):- कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार म्हाप्रळ आंबेत पुरार रस्त्यावरील सावित्री खाडीवरील कि.मी.0/800 मधील आंबेत पूल दुरुस्तीच्या कामाकरिता सर्व प्रकारच्या वाहतुकीस पुढील दोन महिन्यांकरिता बंद करणे आवश्यक असल्याची जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांची खात्री पटल्याने त्यांनी दि.04 मार्च 2022 पासून दोन महिन्यांकरिता हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांनी म्हाप्रळ आंबेत पुरार रस्त्यावरील सावित्री खाडीवरील कि.मी. 0/800 मधील आंबेत पूल हा सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद करण्याबाबत केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांनी (1) मंडणगड व दापोली येथून मुंबई पुणेकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी म्हाप्रळ महाड रस्ता व दापोली लाटवण करंजाडी महाड (2) मुंबई व पुणे येथून मंडणगड व दापोलीकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी महाड म्हाप्रळ मंडणगड व महाड करंजाडी लाटवण दापोली या पर्यायी मार्गाने मार्गस्थ करता येईल, असे अभिप्राय दिलेल

प्रयोगात्मक कलाकारांना कोविड-19 दिलासा पॅकेज; राज्यात 35 कोटी रुपयांची तरतूद: पाच हजार ते दोन लाखांपर्यंत अनुदान

  अलिबाग,दि.23(जिमाका):- लॉकडाऊनच्या काळात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन बंद असल्याने विविध कलाकारांना उत्पन्नापासुन वंचित राहावे लागले. प्रयोगात्मक कला प्रकारातील कलाकार, कलासमूह यांना एकरकमी कोविड दिलासा पॅकेज देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील कलावंतांसाठी 35 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कलावंताना गटविकास अधिकारी, पंचायत समिती मार्फत किंवा तहसिल कार्यालयामार्फत जिल्हा समाज कल्याण विभाग, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांच्याकडे अर्ज सादर करावे लागणार आहे व या योजनेचा विहित नमुन्यातील अर्ज हा पंचायत समिती व तहसिल कार्यालय, जिल्हा समाज कल्याण विभाग, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांच्याकडे उपलब्ध आहे. तसेच रायगड जिल्ह्याच्या https://raigad.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रति कलाकार पाच हजार रुपयांपर्यंत एकरकमी अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी कलावंताना विहित नमुन्यातील अर्ज गट विकास अधिकारी, पंचायत समिती मार्फत किंवा तहलिस कार्यालयामार्फत जिल्हा समाज कल्याण विभाग रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांच्याकडे सादर करावे लागणार आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव झ

रोहा तालुक्यातील भुवनेश्वर येथे 100 खाटांचे स्त्री रुग्णालय उभारण्यासाठी शासकीय जमीन हस्तांतरित करण्याचे आदेश पारित

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे  जिल्ह्याच्या विकासकामाबाबत आणखी एक यश   अलिबाग,दि.23(जिमाका):- पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकटीकरणाचा ध्यास घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मौजे भुवनेश्वर, ता.रोहा, जि. रायगड येथे 100 खाटांचे स्त्री रुग्णालय विशेष बाब म्हणून स्थापन करण्यास शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. लवकरच येथे 100 खाटांचे अद्ययावत स्त्री विशेष रुग्णालय उभे राहणार आहे. हे स्त्री रुग्णालय उभारण्यासाठी शासकीय जमीन मिळण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांनी शासनाला विनंती केली होती. या विनंतीच्या अनुषंगाने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या बाबीचा नियमितपणे पाठपुरावा केला. याबाबत पालकमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार रोहा उपविभागीय अधिकारी यांनी तात्काळ पडताळणी करुन रोहा तालुक्यातील मौजे भुवनेश्वर येथे 100 खाटांचे स्त्री रुग्णालय बांधकामासाठी शासकीय जागा प्रस्तावित केली. मौजे भुवनेश्वर, ता.रोहा येथे 100 खाटांचे स्त्री रुग्णालय स्थापन करण्यासाठी येथील सर्व्हे नंबर हिस्सा नंबर 68/09/1 क्षेत्र 2.47.31 हेक्टर आर पैकी 1.68 31 हेक्टर आर इतकी शासकीय मिळकत जिल

ऑनलाईन रोजगार मेळाव्याकरीता खाजगी आस्थापनांनी रिक्त पदे जाहीर करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे आवाहन

अलिबाग,दि.23(जिमाका):- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यां च्या मार्फत दि.28 ते 29 मार्च 2022 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 या वेळेत “ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ” च्या निमित्ताने जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी या कार्यालयाच्या वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आस्थापनांनी या विभागाचे वेबपोर्टल https://rojgar.mahaswayam.gov.in वर प्रथम आपल्याकडे हवे असलेले कुशल / अकुशल मनुष्यबळाची माहिती भरावी.   ही माहिती भरताना प्रथम उपरोक्त वेबपोर्टलवरील Employment-Employer (List a Job)-Employer Login या क्रमाने जाऊन आपल्या आस्थापनेचा युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपल्या आस्थापनेची माहिती पहावी. त्यातील Pandit Dindayal Upadhyay Job Fair या ऑप्शनमधून दिसणा-या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील आपल्या जिल्हयाच्या नावावरील View Details-Job Details-Agree and Post Vacancy-Add New Vacancy ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर रिक्त पदांची माहिती भरुन शेवटच्या पानावरील Save Vacancy वर क्लिक करावे, त्या

शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना जिल्हा प्रशासनाचे अभिवादन

Image
  अलिबाग,दि.23(जिमाका):- शहीद दिनानिमित्त क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. 00000

आदिवासी कातकरी समाजाच्या उत्थानाची जबाबदारी सर्वांची - विभागीय आयुक्त विलास पाटील

Image
अलिबाग,दि.22(जिमाका):- समाजातील सर्वच वंचितांसाठी नियोजनबद्ध व कालबद्ध उत्थान कार्यक्रमाची गरज आहे, आदिवासी कातकरी बांधवांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे प्रतिपादन कोकण विभागीय आयुक्त श्री.विलास पाटील यांनी आज पनवेल येथे केले. पनवेल मधील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे जिल्हाधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग यांच्या विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतील "कातकरी उत्थान" अभियानांतर्गत "सप्तसूत्री" कार्यक्रमाद्वारे विविध योजनांचा लाभ वाटप कार्यक्रम संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण विभागीय आयुक्त श्री.विलास पाटील हे होते तर जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, अलिबाग उपवनसंरक्षक आशिष ठाकरे आणि पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते हे लाभ वाटप करण्यात आले. यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेणच्या प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, पनवेल उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके, कर्जत उपविभागीय अधिकारी अजित नैराळे, श्रीवर्ध

चवदार तळे सत्याग्रह वर्धापनदिनी डॉ.बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हजारों आंबेडकर प्रेमींची उपस्थिती

Image
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा  अधिकाधिक प्रसार करण्याचा प्रयत्न  -- पालकमंत्री कु.आदिती तटकरे   चवदार तळे ऊर्जा स्रोतच  -- गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड   अलिबाग , दि. 20( जिमाका):- जातीयवादाची दरी संपुष्टात यावी , यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. 20 मार्च 1927 रोजी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले होते.   भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अधिकाधिक प्रसार करण्याचा प्रयत्न पालकमंत्री या नात्याने माझ्याकडून आणि शासनाकडून निश्चितच केला जाईल , असे प्रतिपादन पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी आज महाड येथे केले. चवदार तळे सत्याग्रह या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतीनिमित्त आज चवदार तळे सत्याग्रहाचा 95 वा वर्धापनदिन महाडमध्ये साजरा करण्यात आला , त्या कार्यक्रमानिमित्त पालकमंत्री कु.आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही चवदार तळे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे म्हणाल्या , दि. 20 मार्च 1927 र