रोहा तालुक्यातील भुवनेश्वर येथे 100 खाटांचे स्त्री रुग्णालय उभारण्यासाठी शासकीय जमीन हस्तांतरित करण्याचे आदेश पारित

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे जिल्ह्याच्या विकासकामाबाबत आणखी एक यश

 

अलिबाग,दि.23(जिमाका):- पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकटीकरणाचा ध्यास घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मौजे भुवनेश्वर, ता.रोहा, जि. रायगड येथे 100 खाटांचे स्त्री रुग्णालय विशेष बाब म्हणून स्थापन करण्यास शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. लवकरच येथे 100 खाटांचे अद्ययावत स्त्री विशेष रुग्णालय उभे राहणार आहे.

हे स्त्री रुग्णालय उभारण्यासाठी शासकीय जमीन मिळण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांनी शासनाला विनंती केली होती. या विनंतीच्या अनुषंगाने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या बाबीचा नियमितपणे पाठपुरावा केला. याबाबत पालकमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार रोहा उपविभागीय अधिकारी यांनी तात्काळ पडताळणी करुन रोहा तालुक्यातील मौजे भुवनेश्वर येथे 100 खाटांचे स्त्री रुग्णालय बांधकामासाठी शासकीय जागा प्रस्तावित केली.

मौजे भुवनेश्वर, ता.रोहा येथे 100 खाटांचे स्त्री रुग्णालय स्थापन करण्यासाठी येथील सर्व्हे नंबर हिस्सा नंबर 68/09/1 क्षेत्र 2.47.31 हेक्टर आर पैकी 1.68 31 हेक्टर आर इतकी शासकीय मिळकत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत.

पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचा नुसता ध्यासच घेतला नाही तर टप्प्याटप्प्याने त्या जिल्ह्यातील विकासकामांची एकामागे एक यशस्वीपणे पूर्तताही करीत असल्याचे दिसून येत आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक