Posts

Showing posts from October 7, 2018

जिल्हा नियोजन समिती बैठक मर्यादित कालावधीत कामे पूर्ण करा- पालकमंत्री ना. चव्हाण

Image
अलिबाग,जि. रायगड, दि.12,(जिमाका)- जिल्हा वार्षिक योजनेच्या सन 2018-19 या आर्थिक वर्षा करीता प्राप्त निधीतून व मर्यादित कालावधीत  कामे पुर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी काटेकोर नियोजन करावे व कामे पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे गृहनिर्माण बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांनी आज येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिले. जिल्हा नियोजन समितीची सभा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे, विधानपरिषद सदस्य आ. निरंजन डावखरे, आ. बाळाराम पाटील,आ. अनिकेत तटकरे, विधानसभा सदस्य आ. सुरेश लाड, सिडको अध्यक्ष आ. प्रशांत ठाकुर, आ. भरत गोगावले, आ. सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, आ. मनोहर भोईर, आ. धैर्यशिल पाटील, जि.प. उपाध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील तसेच जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, पनवेल

शनिवार पासून कार्यालयीन स्वच्छता पंधरवाडा

अलिबाग, जि. रायगड, दि.12 (जिमाका)- सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात   स्वच्छता रहावी व आनंदी वातावरण रहावे या अनुषंगाने   राज्यात 13 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत जिल्हा तसेच तालुकास्तरावरील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता पंधरवाडा राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज या संदर्भात आयोजित बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी साळुंखे, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण रविकिरण पाटील,   जिल्हा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गजेंद्र केंद्रे,   जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडुरंग शेळके तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.   यावेळी   उपस्थितांना माहिती देण्यात आली की, यासंदर्भात राज्य शासनाच्या पाणी पुवरठा व स्वच्छता विभागाच्यावतीन शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले असून   त्यानुसार, कार्यालयप्रमुखांनी   कार्यालयीन स्वच्छतेसंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने   कार्यालयीन जागा सुटसुटीत नीटनेटकी ठेवणे,   मोकळ्

अल्पसंख्याक शाळांमधील पायाभुत सुविधा विकासासाठी अनुदान; 30 पर्यंत प्रस्ताव मागविले

अलिबाग, जि. रायगड, दि.12 (जिमाका)- जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक   विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा. कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा   पुरविण्यासाठी राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून अनुदान दिले जाते. रायगड जिल्ह्यातील इच्छूक शाळांनी   सन 2018-19 या आर्थिक वर्षा करीता विहित नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड- अलिबाग यांच्याकडे येत्या 30 ऑक्टोबर पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा सदस्य सचिव उच्चस्तरीय निवड समिती रायगड अलिबाग यांनी केले आहे.   00000

कळंबोली येथे रोजगार मेळाव्यात 242 उमेदवारांना नोकरीची संधी

अलिबाग,जि. रायगड, (जिमाका)दि.11- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड-अलिबाग व सक्षम स्कील ॲकेडमी कळंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने आणि के.एल.ई. उच्च महाविद्यालय  यांच्या सहकार्याने  पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात विविध सेक्टर मधील 20 आस्थापना आपल्याकडील 450 उमेदवारांच्या मुलाखतीकरिता उपस्थित होते.  मेळाव्यात 545 उमेदवार हजर होते त्यापैकी 242 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.  या मेळाव्यात https://mahaswayam.gov.in वेबपोर्टलचे सादरीकरण करण्यात येऊन आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ योजनेचे सादरीकरणाद्वारे करुन मुद्रा योजनेची माहिती उपस्थितांना देण्यात आली. मेळाव्यासाठी सहा कौशल्य प्रशिक्षण संस्था उपस्थित होत्या. 000000

मराठी भाषा समिती सोमवार पासून जिल्हा दौऱ्यावर

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.11 -    महाराष्ट्र विधानमंडळाची मराठी भाषा समिती सोमवार दि.15 व मंगळवार दि.16 या कालावधीत जिल्हा दौऱ्यावर येत आहे.  सविस्तर दौरा कार्यक्रम याप्रमाणे- सोमवार दि.15 रोजी स. 10 वा. अलिबाग शासकीय विश्रामगृह.  स. 11 ते दुपारी एक पर्यंत जिल्हाधिकारी रायगड यांच्यासमवेत बैठक. स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग.  दु.एक ते दु.दोन वा. राखीव.   दु.दोन ते दु.साडे तीन वा. दरम्यान जिल्हा परिषद रायगड  मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमवेत बैठक.  स्थळ : जिल्हा परिषद सभागृह, रायगङ,    दु. साडे तीन ते दु.साडेचार वा. दरम्यान रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक.   स्थळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभागृह,  रात्री शासकीय विश्रामगृह अलिबाग येथे मुक्काम. मंगळवार दि. 16 रोजी सकाळी साडे दहा ते दु. 12 वा. पोलिस अधिक्षक यांच्यासमवेत बैठक. स्थळ : पोलिस अधिक्षक कार्यालय.    दु. 12 वा. ते दु. दोन वा. दरम्यान नगरपरिषद, अलिबाग व जिल्ह्यातील इतर नगरपरिषदाच्या मुख्याधिकारी यांच्यासमवेत बैठक.स्थळ : नगरपरिषद सभागृह अलिबाग.  दु. दोन वा. ते दु.तीन वा. र

गोवर- रुबेला लसीकरणः सुदृढ बालपणासाठी आवश्यक

केंद्र शासनाने गोवर रुबेला अर्थात मिजेल्स रुबेला (एमआर) एकत्रित   लस देण्याची मोहिम हाती घेतली आहे. स्वास्थ्य मंत्रालय, युनिसेफ यांच्यावतीने ही मोहिम राबविली जात आहे. भारतातील सर्व राज्यांमध्ये एमआर लसीकरणाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. नोव्हेंबर महिन्यात 14 तारखेपासुन महाराष्ट्रात ही मोहिम राबविली जाणार आहे. एमआर मोहिमेद्वारे यापूर्वी गोवर, एमआर, एमएमआर लस घेतलेली असली तरी 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील सर्व बालकांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.   बालकांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम करणाऱ्या या आजारांवर प्रतिबंधात्मक लसीकरण हाच उपाय आहे. त्यामुळे बालकांचे आरोग्य चांगले राखून सुदृढ बालपण जपण्यासाठी गोवर रुबेला लसीकरण आवश्यक आहे. शासन ते विनामूल्य उपलब्ध करुन देत आहे. त्याअनुषंगाने गोवरअर्थात मिजेल्स आणि रुबेला या आजारांबद्दल माहिती करु घेऊ या. गोवर- गोवर हा प्राणघातक आजार आहे आणि बालकांमधील शारिरीक दुबळेपणा अथवा बालमृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. रोगप्रतिकार शक्तीचे कमी प्रमाण असलेल्या व्यक्ती, कुपोषित बालके आणि ‘अ’ जीवनसत्वाची कमतरता असलेल्या व्यक्ती

राज्यस्तरीय मास्टरट्रेनर प्रशिक्षण; क्रीडा शिक्षकांकडून अर्ज मागविले

         अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10 : क्रीडा व युवक सेवा संचानालय , महाराष्ट्र राज्य , पुणे यांचेवतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील निवडक (प्रती जिल्हा 10) क्रीडा शिक्षकांना मास्टर ट्रेनरचे दहा दिवसीय प्रशक्षिण देण्यात येणार आहे.   या प्रशिक्षण शिबीरामध्ये भोजन , निवास , प्रशिक्षण गणवेश , प्रशिक्षण साहीत्य इत्यादी सुविधा शासनाच्यावतीने पुरविण्यात येणार आहेत. या प्रशिक्षण शिबीरामध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावरील त ज्ज्ञां कडून विविध खेळांचे तांत्रिक व अत्याधुनिक प्रशिक्षण क्रीडा शिक्षकांना देण्यात येणार आहे.सन 2018-19 मध्ये सदरचे प्रशिक्षण हे श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल , म्हाळुंगे - बाले वाडी येथे होणार असून येथील जागतिकस्तरावरील क्रीडा सुविधांव्दारे या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याची संधी जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांना मिळणार आहे.                रायगड जिल्ह्यातील ज्या क्रीडा शिक्षकांची सेवा किमान 10 वर्षे शिल्लक आहे व ज्या क्रीडा शिक्षकांनी यापुर्वी मास्टर ट्रेनरचे प्रशिक्षण घेतलेले नाही अशा क्रीडा शिक्षकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेकडे विहीत नमुन्यात अर्ज सादर करावा. ज्या

राष्ट्रीय लोकअदालत 8 डिसेंबर रोजी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10 : जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन 8 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे.     या लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, 138 एन आय.ॲक्ट.खालील प्रकरणे, दिवाणी अपिले, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे व अपिले ठेवली जाणार आहेत. तसेच नगरपालिका व ग्रामपंचायत यांच्या घरपट्टी व पाणीपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूरसंचार निगम लिमिटेड, वीजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था यांच्याकडील थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे तडजोडीने निकाली केल्यास लोकांचा पैसा आणि वेळ यांचा अपव्यव होत नाही.   पक्षकारांना तात्काळ न्याय मिळतो.   त्यामुळे जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि या लोकअदालतीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मु.गो.सेवलीकर यांनी केले आहे. 00000

केंद्रीयमंत्री ना.अनंत गिते यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10 -    केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना.अनंत गिते हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम याप्रमाणे- शुक्रवार दि.12 रोजी सकाळी अकरा वाजता पाली येथे आगमन.   दुपारी साडेबारा वा.पाली येथून महाराष्ट्र सिमलेस सुकेली नागोठणेकडे प्रयाण.    पावणे एक वा.   महाराष्ट्र सिमलेस सुकेली नागोठणे येथे आगमन. दु.दोन वा. महाराष्ट्र सिमलेस सुकेली नागोठणे येथून   पाटपन्हाळे ता.गुहागर, जि.रत्नागिरीकडे प्रयाण. शनिवार दि.13 रोजी सकाळी साडे नऊ वाजता हॉटेल कोहिनूर ता.दापोली, जि.रत्नागिरी येथून विन्हेरे ता.महाडकडे प्रयाण.   साडे दहा ते सायंकाळी पाच पर्यंत विन्हेरे विभाग ता.महाड येथे स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती.   सायं.सव्वा पाच वा.विन्हेरे विभाग येथून दादलीकडे प्रयाण.    सायं.साडेपाच वा.दादली येथे आगमन.   सायं.सात वा. सुकेली (कुणबीवाडी)   ता.खेड, जि.रत्नागिरीकडे प्रयाण. रविवार दि.14 रोजी सायंकाळी चार वाजता हेदली ता.खेड येथून हॉटेल रेडिसन ता.अलिबाग, जि.रायगडकडे प्रयाण.   सायं.साडे सात वा. हॉटेल रेडिसन ता.अलिबाग येथे आगमन व मुक्काम. सो