राज्यस्तरीय मास्टरट्रेनर प्रशिक्षण; क्रीडा शिक्षकांकडून अर्ज मागविले



        अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10 : क्रीडा व युवक सेवा संचानालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेवतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील निवडक (प्रती जिल्हा 10) क्रीडा शिक्षकांना मास्टर ट्रेनरचे दहा दिवसीय प्रशक्षिण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण शिबीरामध्ये भोजन, निवास, प्रशिक्षण गणवेश, प्रशिक्षण साहीत्य इत्यादी सुविधा शासनाच्यावतीने पुरविण्यात येणार आहेत. या प्रशिक्षण शिबीरामध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांकडून विविध खेळांचे तांत्रिक व अत्याधुनिक प्रशिक्षण क्रीडा शिक्षकांना देण्यात येणार आहे.सन 2018-19 मध्ये सदरचे प्रशिक्षण हे श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे - बालेवाडी येथे होणार असून येथील जागतिकस्तरावरील क्रीडा सुविधांव्दारे या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याची संधी जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांना मिळणार आहे.
              रायगड जिल्ह्यातील ज्या क्रीडा शिक्षकांची सेवा किमान 10 वर्षे शिल्लक आहे व ज्या क्रीडा शिक्षकांनी यापुर्वी मास्टर ट्रेनरचे प्रशिक्षण घेतलेले नाही अशा क्रीडा शिक्षकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेकडे विहीत नमुन्यात अर्ज सादर करावा. ज्या क्रीडा शिक्षकांनी जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीरामध्ये सहभाग घेतलेला आहे, अशा क्रीडा शिक्षकांना तसेच फुटबॉल या खेळाचे मार्गदर्शन करण्याचा अनुभव असलेल्या क्रीडा शिक्षकांना यासाठी प्राधान्य देण्यात येईल.
              अर्जाचा विहीत नमुना  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे उपलब्ध आहे. तरी इच्छुकांनी शुक्रवारदि.12 पर्यंत विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास सादर करावेत असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी सचिन निकम यांचेशी 8856093608 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेहीआवाहनकरण्यातआलेआहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक