Posts

Showing posts from May 23, 2021

सुयोग्य बदलासह पीक स्पर्धा खरीप हंगाम 2021 साठी नव्याने स्पर्धा जाहीर शेतकऱ्यांनी मूग व उडीद पिकासाठी दि.31 जुलै पूर्वी तर इतर खरीप पिकासाठी 31 ऑगस्ट पूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन

  अलिबाग,जि.रायगड, दि.28 (जिमाका) : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास त्याचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल. हा उद्देश ठेवून राज्यात कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. या खरीप हंगामापासून पूर्वीच्या पीकस्पर्धेच्या निकषांमध्ये शिथिलता आणि सुयोग्य बदल करून नव्याने स्पर्धा राबविण्यात आहे. सध्याच्या पीक स्पर्धेतील महत्वाच्या बाबी खालीलप्रमाणे आहेत :- पीक स्पर्धेसाठी पीकनिहाय तालुका हा एक घटक आधारभूत धरण्यात येईल. खरीप हंगामासाठी स्पर्धेतील समाविष्ट पिके भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी). तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल अशी एकूण 11 पिके आहेत.

केंद्र शासनाच्या महिला आणि बालविकास मंत्रालयांतर्गत “संवेदना” दूरध्वनीद्वारे कोविड-19 मुळे प्रभावित मुलांना समुपदेशन 1800-121-2830 या टोल फ्री क्रमांकावरुन कोविड-19 मुळे तणावग्रस्त असलेल्या मुलांना दिला जातो मानसिक आधार

    अलिबाग,जि.रायगड, दि.28 (जिमाका) : कोविड-19 मुळे प्रभावित   मुलांना मानसिक प्रथमोपचार आणि भावनिक आधार देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (एनसीपीसीआर) संवेदना   (भावनिक विकासाच्या माध्यमातून मानसिक आरोग्याबाबत   संवेदनशील कृती) दूरध्वनीद्वारे समुपदेशन केले जात आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (एनसीपीसीआर) ही एक वैधानिक संस्था असून महिला व बालविकास मंत्रालय, भारत सरकारच्या अखत्यारीत कार्यरत आहे. कोविड-19 महामारीच्या काळात पीडित मुलांसाठी मनोवैज्ञानिक -सामाजिक मानसिक आधार देण्यासाठी टोल-फ्री हेल्पलाइन सुरू केली आहे. कोविड - 19 संदर्भात विविध मनोविकार विषयक मुद्द्यांना बालक आणि किशोरवयीन मानसोपचार विभागाचे प्रा.डॉ.शेखर शेषाद्री यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित पात्र तज्ञ/समुपदेशक/मानसशास्त्रज्ञांच्या नेटवर्कद्वारे दूरध्वनीवरून हे समुपदेशन दिले जात आहे. महामारीच्या संकटात तणाव, चिंता, भीती आणि इतर समस्या सोडवण्यासाठी मुलांना मानसिक आधार देणारी संवेदना ही समुपदेशन सेवा   आहे. ही सेवा टोल-फ्री क्रमांक: 1800-121-2830 वर सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते दुपारी 1 व

खालापूर तालुक्यातील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र,सावरोलीसाठी मौजे सावरोली येथील शासकीय जागा हस्तांतरित

  अलिबाग, जि.रायगड दि.28 (जिमाका):- खालापूर तालुक्यातील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, सावरोली या इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष घालून संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.                या पार्श्वभूमीवर मौजे सावरोली ता.पोलादपूर येथील स.नं. 38/23, क्षेत्र 7-84-00 हे.आर. पैकी 0-05-00 हे. आर. ही जमीन भोगाधिकारी   मूल्यरहित व महसूल मुक्त किंमतीने नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, सावरोलीकरिता पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत.               खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने ही बाब महत्वाची आहे.   ०००००

रोहा तालुक्यातील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, भातसईसाठी मौजे शेणवई येथील शासकीय जागा हस्तांतरित

  अलिबाग, जि.रायगड दि.28 (जिमाका):- रोहा तालुक्यातील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, भातसई या इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष घालून संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.                या पार्श्वभूमीवर मौजे शेणवई ता.पोलादपूर येथील स.नं. 134अ क्षेत्र 3-96-00 हे.आर. पैकी 0-10-00 हे. आर. ही जमीन महसूल मुक्त व सारामाफीने नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, भातसईकरिता पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत.               रोहा तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने ही बाब महत्वाची आहे.   ०००००

पोलादपूर तालुक्यातील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, करंजेसाठी मौजे देवळे येथील शासकीय जागा हस्तांतरित

  अलिबाग, जि.रायगड दि.28 (जिमाका):- पोलादपूर तालुक्यातील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, करंजे या इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष घालून संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.                 या पार्श्वभूमीवर मौजे देवळे ता.पोलादपूर येथील स.नं. 109 क्षेत्र 00- 16-00 हे. आर. या जागेपैकी 00- 05-00 हे.आर. ही जमीन ग्रामपंचायत देवळे यांच्याकडून शासनाकडे पुर्नग्रहण करुन जमीन महसूल मुक्त व सारामाफीने नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, करंजेकरिता पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत.               पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने ही बाब महत्वाची आहे.   ०००००

मुरुड तालुक्यातील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, मांडलासाठी मौजे तळवली येथील शासकीय जागा हस्तांतरित

  अलिबाग, जि.रायगड दि.28 (जिमाका):- मुरुड तालुक्यातील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, मांडला या  इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष घालून संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.               या पार्श्वभूमीवर मौजे तळवली ता.मुरुड येथील गट नं.373, क्षेत्र 0-21-00 पैकी 0-05-00 हे.आर. ही जमीन महसूल मुक्त व सारामाफीने मौजे तळवली, ता.मुरुड येथील जागा नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, मांडला करिता पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत.              मुरुड तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने ही बाब महत्वाची आहे.  000000

महाड तालुक्यातील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र,दाभोळसाठी मौजे दाभोळ येथील शासकीय जागा हस्तांतरित

अलिबाग, जि.रायगड दि.28 (जिमाका):- महाड तालुक्यातील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, दाभोळ (पाटीलवाडी) इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष घालून संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.               या पार्श्वभूमीवर मौजे दाभोळ ता.महाड येथील गावठाण क्षेत्र 9-93-00 हे. आर. या मिळकती पैकी क्षेत्र 0-04- 41 हे.आर. ही जमीन ग्रामपंचायत दाभोळ यांच्याकडून शासनाकडे पुर्नग्रहण करुन जमीन महसूल मुक्त व सारामाफीने ही जागा नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, दाभोळ (पाटीलवाडी) करिता पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत.              महाड तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने ही बाब महत्वाची आहे.  000000

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त अभिवादन

            अलिबाग,जि.रायगड, दि.28 (जिमाका) : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी(रोहयो) रविंद्र मठपती, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, तहसिलदार (सर्वधारण) सतिश कदम आदी उपस्थित होते. 000000

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत तसेच शेतकरी योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना माहे जून 2021 करिता सवलतीच्या दराने अनुदानाचा लाभ

    अलिबाग, जि.रायगड,दि.28 (जिमाका):- राज्यातील करोना विषाणू प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत तसेच शेतकरी योजनेंतर्गत समाविष्ट झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना माहे मे 2020 ते ऑगस्ट 2020 महिन्यांच्या कालावधीकरिता सवलतीच्या दराने (गहू 8/- रुपये प्रति किलो   व तांदूळ रुपये 12/- प्रति किलो)   प्रति माह प्रति व्यक्ती 3 किलो गहू   व 2 किलो तांदूळ याप्रमाणे 5 किलो अन्नधान्याचा लाभ देण्यात आलेला आहे.        मात्र बऱ्याच जिल्ह्यांमध्ये या योजनेतील अन्नधान्य शिल्लक असल्यामुळे शासन, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडील दि.25 मे च्या पत्रान्वये जिल्ह्यातील शासकीय गोदामांमध्ये तसेच          रास्तभाव धान्य दुकानांमध्ये शिल्लक अन्नधान्याचे (गहू व तांदूळ) वाटप प्रति किलो राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत तसेच शेतकरी योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना प्रति माह प्रति व्यक्ती 1 किलो गहू व 1 किलो तांदूळ याप्रमाणे 2 किलो अन्नधान्य माहे जून 2021 करिता सवलतीच्या दराने (गहू 8/- रुपये प्रति किलो

सामाजिक कर्तव्य भावनेने हिंदाल्को कंपनीने जिल्हा प्रशासनास दिले 20 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर्स

    अलिबाग, जि.रायगड,दि.28 (जिमाका):- कोविड-19 या आपत्कालीन काळात कोविड रुग्णांसाठी उपयोगी पडावेत यासाठी आदित्य बिर्ला ग्रुपच्या तळोजा येथील हिंदाल्को कंपनीने जिल्हा प्रशासनाला 20 माक सीजन सिलेंडर्स देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांनी आज (दि.28 मे) रोजी 20 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर्स जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकड़े जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्द केले.               यावेळी तहसिलदार सचिन शेजाळ, हिंदाल्को इंडस्ट्रीजचे सीएसआर चे लहू रौधल उपस्थित होते.             हिंदाल्को इंडस्ट्रीजचे   युनिट सीएसआर चे लहू रौधल यांनी यावेळी सांगितले की, आमचे युनिट हेड सोमोजीत डॉन, युनिटचे एच. आर. हेड सुधीर मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली   काही दिवसांपूर्वी आरसीएफ येथील कोविड केअर सेंटरला 20 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर देण्यात आले होते. त्यावेळी सांगितल्याप्रमाणे   20 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर्स आज जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अलिबाग तालुक्यात करोना रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणांवरील ताण पुन्हा वाढला. तो ताण कमी व्हावा व रुग्णांना ऑक्सिजनची कमत

राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांनी दि.07 जून पर्यंत महाडीबीटी प्रणालीवर कागदपत्रांची पूर्तता करावी

    अलिबाग,जि.रायगड,दि.27 (जिमाका):- राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थी निवडीची राज्यस्तरावरुन महाडीबीटी पोर्टलवर तिसऱ्यांदा लॉटरी काढण्यात आली. त्यामध्ये माणगाव-5, कर्जत-10, रोहा-5, महाड-8, सुधागड-3, अलिबाग-2, खालापूर-5, मुरुड-1, पनवेल-1, पोलादपूर-5, श्रीवर्धन-1, तळा-3 या तालुक्यातील अशा एकूण 49 लाभार्थ्याची निवड करण्यात आली आहे.                निवड झालेल्या लाभार्थ्यास त्याच्या आधार लिंक असलेल्या मोबाईलवर एसएमएस संदेश पाठविण्यात आला आहे.      तरी या लाभार्थ्यांनी दि.07 जून 2021 पर्यंत महाडीबीटी प्रणालीवर कागदपत्रांची पूर्तता करावी तसेच संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत कृषी अवजार खरेदी करण्यासाठी पूर्वसंमती घेऊन कृषी अवजारे खरेदीची प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया पूर्ण करण्यात काही अडचण उद्भवल्यास संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले यांनी केले आहे. ०००००

रायगड जिल्हा परिषदेचे वृक्ष लागवडीस प्राधान्य वृक्ष लागवड मोहिमेत सर्वांनी मोठा सहभाग नोंदविण्याचे जिल्हा परिषदेचे आवाहन

  अलिबाग,जि.रायगड,दि.27 (जिमाका):- मागील वर्षी "निसर्ग" व यावर्षी "तौक्ते" चक्रीवादळामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.विशेषत: समुद्र किनाऱ्यालगतच्या गावांचे मोठे नुकसान झाले असून झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.      जैवविविधतेचे अस्तित्व ठेवून निसर्गासोबतची जीवनशैली निश्चित करण्यासाठी शासन आग्रही आहे. जागतिक तापमान वाढीचे संकट व हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी जंगलांची वाढ ही काळाची गरज आहे.   या बाबींना प्राधान्य देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड मोहीम राबविण्याचा संकल्प रायगड जिल्हा परिषदेने केला आहे.   रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा कु.योगिता पारधी, उपाध्यक्ष श्री.सुधाकर घारे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी लक्ष्मण खुरकुटे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड, माहिती शिक्षण व संवाद तज्ञ सुरेश राजाराम पाटील   व सर्व गटविकास अधिकारी यांच्या समन्वयातून ही मोहीम यशस्वी करण्याचा निर्धार करण्य

जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना दिले जाणार रॅपिड ॲटिजेन चाचणी प्रशिक्षण

    अलिबाग,जि.रायगड,दि.27 (जिमाका):- जिल्ह्यात करोना विषाणू प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुढील कालावधीत करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून, याचा संसर्ग विशेषतः लहान मुलांमध्ये होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना रॅपिड अँटीजेन चाचणी प्रशिक्षण व करोना वैयक्तिक सुरक्षितता किट उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांना दिले आहेत.             ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका आरोग्य विभागाचा कणा म्हणून ओळखल्या जातात. जिल्हयात सद्य:स्थितीत 1 हजार 727 आशा स्वयंसेविका कार्यरत असून, त्यांच्यामार्फत मागील वर्षात जिल्ह्यात “ माझे कुटुंब, माझी जबाबदारी ” या मोहिमेमध्ये व्यापक जनजागृती करून प्राथमिक तपासणीचा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. कोविड विषाणूचा ग्रामीण भागात होणारा प्रसार थोपविण्यासाठी मोठया प्रमाणावर कोविड चाचणी व लसीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आशा स्वयंसेविकाना रॅपिड अँटीजेन चाचणी प्रशिक्षण व करोना वैयक

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे अथक परिश्रम

    अलिबाग,जि.रायगड,दि.27 (जिमाका):- सन 2001 च्या लोकसंख्येच्या आधारे आरोग्य संस्था मंजूर करण्यासाठी बृहत आराखडा तयार करुन सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे नव्याने निर्माण करण्यात आली आहेत.तसेच विशेष बाब म्हणून त्यानंतरही काही संस्था मंजूर करण्यात आल्या आहेत.                जिल्ह्यामध्ये पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या विशेष प्रयत्नांनी मंजूर प्राथमिक आरोग्य व उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये, पशुवैद्यकीय दवाखाने व वैद्यकीय महाविद्यालये यांच्या इमारतीच्या बांधकामासाठी तालुकानिहाय शासकीय जमिनी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.                अलिबाग तालुक्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.               खालापूर व सुधागड   तालुक्यातील ग्रामीण   रुग्णालयाच्या बांधकामासाठी प्रत्येकी एक अशा एकूण दोन जागांचे वाटप करण्यात आले आहे.                प्राथमिक आरोग्य केंद्र पेण-2, मुरुड-1 रोहा-1,   माणगाव-1, श्रीवर्धन-1,    कर्जत-1, खालापूर-1,   पोलादपूर-1 अशा एकूण 9

रोहा तालुक्यातील विविध तलाठी कार्यालयांकरिता जागा हस्तांतरित महसूल प्रशासन अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे धडाडीचे निर्णय

    अलिबाग, जि.रायगड दि.25 (जिमाका):- तलाठी कार्यालय हे नागरिकांसाठी ग्रामीण स्तरावरील अत्यंत महत्त्वाचे कार्यालय मानले जाते. या कार्यालयातून जनतेची महसूलविषयक सर्व प्रकारची महत्त्वाची कामे केली जातात.   ग्रामीण भागातील जनतेची महसूलविषयक कामे सुलभ व्हावीत, प्रशासन गतिमान व्हावे तसेच येथील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या व या कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीने या तलाठी कार्यालयाची इमारत सुसज्ज व अद्ययावत असणे, ही काळाची गरज होती, या दृष्टीने पालकमंत्री या नात्याने कु.आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष देण्यास सुरुवात केली.      या पार्श्वभूमीवर शेणवई, चांडगाव, खांब, खारगाव, धामणसई, दुरटोली, सारसोली, बेलखार, पुगाव, वाली या तलाठी कार्यालयांच्या इमारतींच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी केली होती. याबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी   संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.       त्यानुसार तलाठी सजा शेणवईसाठी क्षेत्र 0.03.00 हे.आर., तलाठी सजा चांडगावसाठी क्षेत्र 0.03.00 हे.आर.,   तलाठी सजा खांबसाठी क्षेत्र 0.03.00 हे.आर., तलाठी सजा खारगावसाठी क्ष

खालापूर तालुक्यातील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, वासांबे करिता मौजे वासांबे येथील जागा हस्तांतरित

    अलिबाग, जि.रायगड दि.25 (जिमाका):- खालापूर तालुक्यातील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, वासांबे इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष घालून संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.               या पार्श्वभूमीवर मौजे वासांबे ता.खालापूर येथील स.नं.52/1अ/1 क्षेत्र 4.09.76 हे.आर.पैकी 0-05-0 हे.आर. या जमीनीचे शासनाकडे पुर्नग्रहण करुन जमीन भोगाधिकार मूल्यरहित व महसूल मुक्त किंमतीने मौजे वासांबे ता.खालापूर येथील जागा नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र,वासांबे करिता पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत.                 खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने ही बाब महत्वाची आहे.   000000

खालापूर तालुक्यातील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र,आसरे साठी मौजे धारणी येथील जागा हस्तांतरित

    अलिबाग, जि.रायगड दि.25 (जिमाका):- खालापूर तालुक्यातील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र,आसरे इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष घालून संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.      या पार्श्वभूमीवर मौजे धारणी ता.खालापूर येथील स.नं.15/0 क्षेत्र 3.49.00 हे.आर.पैकी 0-05-0 हे.आर. या जमिनीचे शासनाकडे पुर्नग्रहण करुन जमीन भोगाधिकार मूल्यरहित व महसूल मुक्त किंमतीने मौजे धारणी ता.खालापूर येथील जागा नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आसरे करिता पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत.      खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने ही बाब महत्वाची आहे.   000000

पनवेल तालुक्यातील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र,कोनसाठी मौजे शिरढोण येथील जागा हस्तांतरित

  अलिबाग, जि.रायगड दि.25 (जिमाका):- पनवेल तालुक्यातील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कोनच्या इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष घालून संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.                या पार्श्वभूमीवर मौजे शिरढोण ता.पनवेल येथील स.नं.31/0 क्षेत्र 0.48.00 हे.आर.पैकी 0-05-0 हे.आर. या जमिनीचे शासनाकडे पुर्नग्रहण करुन जमीन भोगाधिकार मूल्यरहित व महसूल मुक्त किंमतीने मौजे शिरढोण ता.पनवेल येथील   जागा नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कोन करिता पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत.               पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने ही बाब महत्वाची आहे.   000000

करोनाने अनाथ झालेल्या बालकांसाठी जिल्हा कृतीदल चाईल्ड हेल्पलाईनच्या 1098 या क्रमांकावर माहिती द्यावी - जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी

  अलिबाग,जि.रायगड, दि.24(जिमाका):   करोनामुळे निधन झाल्यानंतर त्या पालकांवर अवलंबून असलेल्या बालकांच्या जीवनावरही गंभीर परिणाम होत आहेत. अशा बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी कृती दल (Task Force) तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.       यानुषंगाने कोविड-19 साथीच्या पार्श्वभूमीवर बालकांची काळजी व संरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या कृतीदलाची बैठk नुकतीच जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.          या बैठकीस जिल्हा परिविक्षा अधिकारी अशोक पाटील, बाल कल्याण समिती सदस्य, रोशनी ठाकूर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती सुजाता सपकाळ, चाईल्ड लाईन सदस्य उपस्थित होते.         करोनामुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यानंतर निराधार झालेल्या बालकांची माहिती जनतेने द्यावी. निराधार बालकांच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी जिल्हा कृती दलामार्फत घेण्यात येणार असून निराधार बालकांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. जिल्हा कृती दलाच्या माध्यमातून या बालकांच्या संरक्षणासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात येवून त्या बालकास बालगृहात दाखल करून घे

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

                अलिबाग,जि.रायगड,दि.24(जिमाका):-   जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग या कार्यालयामार्फत जिल्ह्यातील कुशल /अकुशल उमेदवारांसाठी ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा दि. 27 व 28 मे 2021 या कालावधीत सकाळी 10.00   ते सायंकाळी 06.00 या वेळेत फक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता या विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in   या वेब पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.   जिल्ह्यातील सर्व बेरोजगार उमेदवारांनी https://www.rojgar.mahaswayam.gov.in या कौशल्य विकास व उद्योजकता   विभागाच्या वेब पोर्टलवर यापूर्वीच नोंदणी केलेली असेल तर या वेबपोर्टलवरील Employment-Job Seeker (Find a Job)-Jobseeker Login यामध्ये आपला नोंदणी क्रमांक म्हणजेच युजर आयडी व पासवर्ड वापरुन नोंदणीतील आपली सर्व माहिती अद्यावत करावी. तसेच ज्या उमेदवारांनी   या विभागाच्या वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर Employment-Job Seeker (Find a Job)-Register या ऑप्शन्सवर क्लीक करुन सर्व अद्यावत माह

जिल्ह्यातील खाजगी आस्थपनांनी ऑनलाईन रोजगार मेळाव्याकरिता रिक्तपदे अधिसूचित करावीत-सहाय्यक आयुक्त शा.गि.पवार

               अलिबाग,जि.रायगड,दि.24(जिमाका):- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांच्यामार्फत दि.27 व 28 मे 2021 या कालावधीत सकाळी 10.00 ते सायं. 6.00 या वेळेत जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापनांसाठी ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासा़ठी या कार्यालयाच्या वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आस्थापनांनी प्रथम आपल्याकडे हवे असलेले कुशल / अकुशल मनुष्यबळाची माहिती या विभागाचे वेबपोर्टल https://rojgar.mahaswayam.gov.in वर दिनांक 26 मे 2021 पर्यंत भरावी.   ही माहिती भरताना प्रथम उपरोक्त वेबपोर्टल सुरु करावे. त्यातील Employment-Employer (List a Job)-Employer Login या क्रमाने जाऊन आपल्या आस्थापनेचा युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपल्या आस्थापनेची माहिती पहावी. त्यातील   Pandit Dindayal Upadhyay Job Fair   या ऑप्शनमधून दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील आपल्या जिल्हयाच्या नावावरील View Details-Job Details-Agree and Post Vacancy-Add New Vacancy ऑप्शनवर क्लीक केल्यानंतर रिक्तपदांची माहिती भरुन शेवटच्या पानावरील   Save Vacancy वर क्लीक करावे त्

“प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना” अंतर्गत भारतीय अन्न महामंडळाकडून गहू/तांदळाचे वितरण मोफत

    अलिबाग,जि.रायगड,दि.24 (जिमाका) :- करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने केंद्र सरकार तर्फे “ प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना –III ” अंतर्गत मे आणि जून महिन्यात प्रत्येक पात्र लाभार्थ्याना पाच किलो तांदूळ /गहू मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सुमारे 17 हजार 924 मे.टन अन्नधान्याचे रायगड जिल्ह्यातील पात्र लाभार्थीसाठी वितरण करण्यात येणार आहे.यापैकी 7 हजार 497 मे.टन धान्याची उचल भारतीय खाद्य निगम च्या गोदामातून करण्यात आली आहे,अशी माहिती विभागीय व्यवस्थापक श्री.बाबाराव राऊत यांनी दिली. अन्न महामंडळ गोदामाचे काम नियमित सुरू असून गोदामात अन्नाचा साठा मुबलक आहे. कार्यालयाचे कर्मचारी लॉकडाऊनच्या परिस्थितीत सर्वांना धान्य मिळावे,यासाठी कार्यरत आहेत.       केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या "सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास" या संदेशानुसार भविष्यातही हा विभाग काम करीत राहील. 000000

श्रीबाग येथे अलिबाग नगरपरिषदेतर्फे उभारण्यात येणाऱ्या स्व. नमिता प्रशांत नाईक क्रीडा संकुलच्या कामाला पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी दिली भेट

Image
  अलिबाग,जि.रायगड,दि.24(जिमाका):- येथील श्रीबाग येथे अलिबाग नगरपरिषदेतर्फे उभारण्यात येणाऱ्या स्व. नमिता प्रशांत नाईक क्रीडा संकुलच्या कामाला पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी आज भेट दिली. या कामाची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले. हे काम आता अंतिम टप्प्यात असून उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करू देण्याबाबत नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी पालकमंत्री महोदयांना विनंती केली होती.    ही मागणी मान्य करीत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आवश्यक तो निधी तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबत संबंधीत अधिकाऱ्यांना निर्देश दिले. या क्रीडा संकुलात सेमी ऑलिंपिक स्विमींग पूल, बॅडमिंटन कोर्ट, अत्याधुनिक सोयी-सुविधांसह प्रशस्त जिम, योगा रूम, कॅरम व टेबल टेनिस रूम आदी सुविधा असणार असून हे काम आता अंतिम टप्प्यात आहे. यावेळी पोलीस अधीक्षक श्री. अशोक दुधे, उपनगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे, गटनेते प्रदीप नाईक, जिल्हा परिषद बांधकाम सभापती अजय झुंजारराव, नगरसेवक अनिल चोपडा, वृषाली ठोसर, चित्रलेखा पाटील, संजना कीर आदी उपस्थित होते.   ००००००

जिल्हा वार्षिक नियोजन निधीच्या माध्यमातून पोलीस विभागाचे बळकटीकरण पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते 4 स्कॉर्पिओ, 10 बोलेरो जीप व 10 मोटारसायकली रायगड पोलीस विभागाकडे सुपूर्द

Image
    अलिबाग,जि.रायगड,दि.24(जिमाका):- जिल्हा वार्षिक नियोजनच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या 4 स्कॉर्पिओ, 10 बोलेरो जीप व 10 मोटारसायकली पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते आज पोलीस कवायत मैदान, अलिबाग येथे पोलीस विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी खासदार सुनिल तटकरे, सर्वश्री आमदार भरतशेठ गोगावले, महेंद्र दळवी, अनिकेत तटकरे, महेंद्र थोरवे, जि.प.अध्यक्षा योगिता पारधी, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती दिलीप भोईर, जिल्हा परिषद बांधकाम सभापती अजय झुंजारराव, नगराध्यक्ष   प्रशांत नाईक, जिल्हाधिकारी   निधी चौधरी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ,पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम, तहसिलदार सचिन शेजाळ, पोलीस विभागाचे अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वप्रथम पोलीस कवायत मैदानात आगमन झाल्याबरोबर पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांना पोलीस दलाकडून सलामी देण्यात आली. त्यानंतर नव्या वाहनांचे उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे नव्या वाहनांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.