पोलादपूर तालुक्यातील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, करंजेसाठी मौजे देवळे येथील शासकीय जागा हस्तांतरित

 


अलिबाग, जि.रायगड दि.28 (जिमाका):- पोलादपूर तालुक्यातील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, करंजे या इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष घालून संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.

              या पार्श्वभूमीवर मौजे देवळे ता.पोलादपूर येथील स.नं. 109 क्षेत्र 00- 16-00 हे. आर. या जागेपैकी 00- 05-00 हे.आर. ही जमीन ग्रामपंचायत देवळे यांच्याकडून शासनाकडे पुर्नग्रहण करुन जमीन महसूल मुक्त व सारामाफीने नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, करंजेकरिता पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत.

             पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने ही बाब महत्वाची आहे. 

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक