Posts

Showing posts from April 8, 2018

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जिल्हा प्रशासनातर्फे विनम्र अभिवादन

Image
अलिबाग,जि. रायगड, (जिमाका)दि.14- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त आज अलिबाग येथील एस.टी.स्टॅण्ड,महेश टॉकीजच्या बाजूला असलेल्या पुतळ्यास केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.   यावेळी आमदार पंडितशेठ पाटील, जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांनीही भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना  अभिवादन        डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात समिती सभागृहात जिल्हा प्रशासनातर्फे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीधर बोधे  यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन  केले.  यावेळी तहसिलदार के.डी.नाडेकर तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हास्तरीय बॅंक समन्वय समिती बैठक पिक कर्ज योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.13- जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामात   शेतीची कामे करण्यासाठी पेरणीपूर्व   अर्थसहाय्य देण्यासाठी पिककर्ज योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज येथे जिल्हास्तरीय बॅंक समन्वय समितीच्या बैठकीत दिले.   जिल्हास्तरीय बॅंक समन्वय समितीची बैठक राजस्व सभागृहात पार पडली. यावेळी   जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर,   रिजर्व बॅंकेचे बी.एम कोरी, नाबार्डचे सुधाकर राघवथन, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक नंदनवार तसेच विविध बॅंकांचे व्यवस्थापक उपस्थित होते. यावेळी बॅंकांनी जिल्ह्यासाठी करावयाच्या विविध अर्थसहाय्य योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्याचा कृति आराखडा दिला आहे. त्यानुसार 2022 पर्यंत कृषि क्षेत्राला विविध योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय्य पुरवून शेतकऱ्यांना सक्षम केले पाहिजे.   यावेळी बॅंकांच्या जमा- कर्ज तपशिल,   पिक कर्ज आढावा,   वार्षिक पत आराखड्यानुसार झाले

मतदार याद्या शुद्धीकरण मतदारांचे रंगीत छायाचित्रे गोळा करण्याचे काम सुरु

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.13- मतदार याद्या शुद्धिकरण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगामार्फत राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात ज्या मतदारांचे मतदार यादीत फोटो नाहीत किंवा ब्लॅक ॲण्ड व्हाईट फोटो आहेत अशा मतदारांचे रंगीत फोटो गोळा करण्याचे काम सुरु आहे. त्यानुसार मतदारांनी मतदार यादीत आपला फोटो आहे किंवा नाही आणि असल्यास तो रंगीत आहे की नाही याची खात्री करावी. त्यासाठी ceo.maharashtra.gov.in   या संकेतस्थळावर जाऊन खात्री करावी. पनवेल उरण भागात हे काम सुरु असून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी , तलाठी यांचे मार्फत रंगीत फोटो गोळा करण्याचे काम सुरु आहे. मतदारांना या संदर्भात काही अडचण असल्यास तहसिल कार्यालय, पनवेल येथे संपर्क करावा, असे आवाहन सहा. मतदार नोंदणी अधिकारी पनवेल, उरण विधानसभा मतदार संघ यांनी केले आहे. ०००००

राज्यस्तरीय विज्ञानप्रदर्शनात सुकेळीची हनान म्हसलई प्रथम

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.13- चाळीसगाव, जि. जळगाव येथे   दि.7 एप्रिल ते 10 एप्रिल या कालावधीत पार पडलेल्या 43 व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विद्यार्थी गटातून जिंदाल माऊंट लिटेरा झी स्कूल, सुकेळी, ता. रोहा या शाळेतील हनान हसन म्हसलई, इयत्ता 7 वी.   या विद्यार्थीनीने महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. या प्रदर्शनामध्ये 'वॉटरपॉनिक्स' हा प्रकल्प तिने उत्कृष्टपणे सादर केला. जळगावचे खासदार ए.टी.पाटील, चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते हनान हसन म्हसलई हिला रोख रक्कम रु. पाच हजार,ट्रॉफी,चॅम्पियन्स ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच रायगड जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक डी. जी.हरकळ यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. हनान हसन म्हसलई हिच्या यशाबद्दल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदितीताई तटकरे, उपाध्यक्ष आस्वाद पाटील,शिक्षण सभापती नरेश पाटील,आदी मान्यवरांनी व जिल्हा परिषदेतर्फे विद्यार्थिनीचे अभिनंदन केले,असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांनी कळविले आहे. ०००००

रास्तभाव दुकानात बायोमेट्रिक ओळख पटवून शिधावस्तू वितरण यशस्वी अंमलबजावणीसाठी सुचना जारी

            अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.13- राज्यात   प्रकल्पांतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत उपाययोजनांच्या अंमलबजावणीमुळे धान्य वाटपामध्ये पारदर्शकता येण्यासाठी सर्व रास्त भाव दुकानात ई-पॉस (POS)   मशीन बसविण्यात आल्या आहेत त्याद्वारे पात्र लाभार्थ्यांची बायोमेट्रीक ओळख पटवून सर्व   लाभार्थ्यांना शिधावस्तूचे वितरण करण्यात येऊन नियमित व दरमहा योग्य प्रमाणात धान्य मिळणार आहे.   राज्यातील 30 जिल्हास्तरीय पुरवठा कार्यालयांच्या क्षेत्रातील रास्तभाव दुकानात (Aadhar enabled public Distribution System(AePDS)   प्रणाली सुरु करण्यात आली असून माहे मे 2018 पासून संपूर्ण राज्यात ही प्रणाली सुरु करण्यात येणार आहे. या प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी उपाययोजना पुढीलप्रमाणे- रास्तभाव दुकानातील ई-पॉस मशीनद्वारे कुटूंबातील कोणत्याही एका सदस्याचे आधार संलग्निकरण (Aadhar Authentication) झाले तरी धान्य वितरण करण्यात यावे. आधार संलग्निकरण नाही झाले तरी ग्राहक ओळख (ekyc - e-Know   Your Customer ) करुन धान्य वितरण करावे. आधार नोंदणी (Aadh

ना.चव्हाण यांनी केली राजपुरी जेट्टीची पाहणी

अलिबाग, जि. रायगड, (जिमाका)दि.12-   दरम्यान काल (दि.11) सायं. 6 वा. मुरुड तालुक्यातील राजपुरी येथील जेट्टीची पाहणी राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी केली. यावेळी पालकमंत्री चव्हाण यांनी जेटीची पहाणी करून जलवाहतुकीच्या समस्या जाणून घेतल्या. सर्व जलवाहतूक व्यवस्थापकांनी नियमाचे पालन करून प्रवाशांना चांगल्या सुविधा द्याव्यात. ज्या शिडाच्या बोटींना परवानगीसाठी लागणारी मदत अधिकाऱ्यांनी करावी . प्रवाशाची कुचंबना होऊ नये,असे निर्देश त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना व वाहतुकदारांना दिले. यावेळी ना. चव्हाण यांच्या समवेत सतीश धारप ,कृष्ण कोबक, मिलिंद पाटील,महेश मोहिते,संजय कोनकर,वृषाली कोचरेकर ,प्रवीण बैकर,महेश मानकर ,आदी उपस्थित होते.   ०००००