रास्तभाव दुकानात बायोमेट्रिक ओळख पटवून शिधावस्तू वितरण यशस्वी अंमलबजावणीसाठी सुचना जारी


            अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.13-राज्यात  प्रकल्पांतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत उपाययोजनांच्या अंमलबजावणीमुळे धान्य वाटपामध्ये पारदर्शकता येण्यासाठी सर्व रास्त भाव दुकानात ई-पॉस (POS)  मशीन बसविण्यात आल्या आहेत त्याद्वारे पात्र लाभार्थ्यांची बायोमेट्रीक ओळख पटवून सर्व  लाभार्थ्यांना शिधावस्तूचे वितरण करण्यात येऊन नियमित व दरमहा योग्य प्रमाणात धान्य मिळणार आहे.
 राज्यातील 30 जिल्हास्तरीय पुरवठा कार्यालयांच्या क्षेत्रातील रास्तभाव दुकानात (Aadhar enabled public Distribution System(AePDS)  प्रणाली सुरु करण्यात आली असून माहे मे 2018 पासून संपूर्ण राज्यात ही प्रणाली सुरु करण्यात येणार आहे.
या प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी उपाययोजना पुढीलप्रमाणे-
रास्तभाव दुकानातील ई-पॉस मशीनद्वारे कुटूंबातील कोणत्याही एका सदस्याचे आधार संलग्निकरण (Aadhar Authentication) झाले तरी धान्य वितरण करण्यात यावे. आधार संलग्निकरण नाही झाले तरी ग्राहक ओळख (ekyc-e-Know  Your Customer) करुन धान्य वितरण करावे. आधार नोंदणी (Aadhar Sedding) नसलेल्या सदस्यांचे eKYC करुन धान्य वितरण करावे. 
वरील तीन पर्याय शक्य नसल्यास क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या (Route Office Nominee) व्यक्तिच्या  आधार संलग्निकरण (Aadhar Authentication) च्या आधारे धान्य वितरण करावे. शिधापत्रिकेवरील माहिती ई-पॉस मशीनवर उपलब्ध नसल्यास पुढील पर्याय एकदाच वापरावा. शिधापत्रिका,आधार नोंदणी प्रत, शासकीय ओळखपत्र, बँकेचे फोटो पासबुक इ. विभागाच्या वेबसाईटवरील घोषित कागदपत्रे शिधापत्रिकेवरील प्रत्येक सदस्याकडून प्राप्त करुन घेऊन धान्य वितरण करावे. आपणाकडून नेटवर्क नसलेले क्षेत्र  (No Network FPS) घोषित केले असल्यास त्या दुकानात पर्याय व्यवस्था होईपर्यंत पुर्वीप्रमाणे  (Manual) पद्धतीने धान्य वितरण करावे. या उपाययोजनांमुळे धान्य वाटपात पारदर्शकता येऊन  सर्व लाभार्थ्यांना नियमित व दरमहा योग्य प्रमाणात धान्य मिळण्याची हमी मिळणार आहे. तरी ई-पॉस धान्य वितरणाचा नियमितपणे आढावा घेऊन कोणताही घेऊन कोणताही पात्र लाभार्थी अन्न् धान्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक