Posts

Showing posts from February 25, 2018

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 अर्ज भरण्याची पुन्हा संधी

अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.1 - राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 अंतर्गत शेतकरी सभासदांनी राज्य शासनाने पोर्टलवर ऑनलाईन माहिती भरुन यापूर्वी अर्ज सादर केले आहेत.  तरी  जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची पुन्हा संधी देण्यात आली आहे. अर्ज करण्याचा कालावधी हा 1 मार्च ते 31 मार्च 2018 पर्यंत आहे. मात्र यापूर्वी या योजनेंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा अर्ज करता  येणार नाही. या कालावधीत आपले सरकार सेवा केंद्रामार्फत  शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज मोफत स्वीकारण्यात येणार आहेत. यासाठी https://csmssy.mahaonline.gov.in या वेबपोर्टलवर स्वत: नोंदणी करुन युजर आयडी व पासवर्डच्या आधारे अर्ज सादर करावेत तसेच या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,रायगड अलिबाग यांनी केले आहे. 000000

पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1-     राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण हे रविवार दि.4   रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे- रविवार दि. 4 रोजी सकाळी साडे दहा वा. इंदापूर ता.माणगांव येथे आगमन व तळा मौजे सोनसडे येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या एलआर-11 रस्त्याचे भूमीपूजन. सकाळी सव्वा आकरा वा. जिल्हा नियोजन विकास निधीतून मंजूर करण्यात आलेल्या बोरघर  येथील रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे उद्घाटन. जिल्हा नियोजन विकास निधीतून मंजूर करण्यात आलेल्या ग्रा.मा.28 बोरघर फाटा ते भानंग (तळा) रस्त्याचे भूमीपूजन. सकाळी साडे आकरा वा. जिल्हा नियोजन विकास निधीतून मंजूर करण्यात आलेल्या मौजे मालाठे,  येथील विविध विकास कामांचे भूमीपूजन. दुपारी बारा वा. मौजे चरे खुर्द, गौळीवाडी-भानग कोंड उसर,  येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या एलआर-116 रस्त्याचे भूमीपूजन. दुपारी पाऊणे एक वा.मौजे आनंदवाडी, येथील भाजपा चषक-2018 या क्रिकेट स्

केंद्रीय मंत्री ना.अनंत गिते यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1:-   केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गिते हे दि. 3 व 4 मार्च   रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. शनिवार दि. 3   रोजी दुपारी दीड वा. महाड एम.आय.डी.सी. ता.महाड येथे आगमन. दुपारी साडे तीन वा. महाड एम.आय.डी.सी, ता.महाड येथून बेबाळघर ता.महाड कडे प्रयाण. दुपारी चार वा. बेबाळघर ता.महाड येथे आगमन. सायं. साडे पाच वा. बेबाळघर ता.महाड येथून एम.आय.डी.सी. महाड कडे प्रयाण. सायं. सव्वा सहा वा. महाड एम.आय.डी.सी. येथे आगमन व मुक्काम. रविवार दि.4 रोजी सकाळी साडे नऊ वा. महाड एम.आय.डी.सी. येथून कुर्डुस ता.अलिबाग कडे प्रयाण. सकाळी आकरा वा. कुर्डुस ता.अलिबाग येथे आगमन. दुपारी दोन वा. कुर्डुस ता.अलिबाग येथून मुंबईकडे प्रयाण. 0000

जिल्ह्यात येत्या 48 तासात उष्णतेच्या लाटेची शक्यता

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.28-  जिल्ह्यात काही भागात येत्या 48 तासात उष्णतेची लाट येऊ शकते,असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नागरीकांनी वाढत्या उन्हापासून बचाव करण्याची दक्षता घ्यावी,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन कक्षाने जारी केलेल्या उपाय योजना- उष्माघातापासून बचाव करण्यासाठी  जास्तीत जास्त पाणी प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बुट व चपलाचा वापर करावा.  प्रवास करतांना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. उन्हात काम करीत असाल तर टोपी किंवा रुमालाने डोके झाकावे, बाहेर पडताना छत्रीचा वापर करावा. ओल्या कपड्याने डोके, मान व चेहरा झाकावा. अशक्तपणा, स्थुलपणा असणाऱ्यांनी डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा चटका बसण्याची चिन्हे ओळखावीत.  चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 00000

जिल्हा युवा पुरस्कार:20 मार्च पर्यंत अर्ज करावेत

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.28-   आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध विषयात युवांनी पार पाडलेल्या भुमिका , दिलेले योगदान यामुळे युवांची एक अद्वितीय समूह अशी ओळख समाजात झालेली आहे . युवांना मानव संसाधन विकासाचा मुख्यस्त्रोत म्हणून देखील मान्यता देण्यात आलेली आहे . युवा हा समाजाचा अविभाज्य घटक असून विकास प्रक्रियेतील आवश्यक भाग आहे . वैश्विकरणाच्या युगात नवीन आव्हानांना तोंड देण्याकरिता युवांच्या सक्षमीकरणाची गरज आहे . त्याअनुषंगाने राज्याचे युवा धोरण - 2012 मधिल शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आले आहे . जिल्हयातील युवांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हास्तर युवा पुरस्कार प्रतिवर्षी देण्यास खाली नमुद विहित केलेल्या तरतूदीनुसार शासनाने मान्यता दिली आहे . Ø   पुरस्काराचे स्वरुप   जिल्हास्तर युवा पुरस्कार   जिल्हास्तरावर एक युवक , एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना पुरस्कार देण्यात येईल . सदरचा पुरस्कार गौरवपत्र , सन्मानचिन्ह , रोख रक्कम - रु . 10 हजार ( प्रति युवक व युवतींसाठी ), प्रति सं

जतन, संवर्धनाची कामे करतांना खबरदारी बाळगावी-खा. संभाजी राजे

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.28-   रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून किल्ले रायगड विकासाच्या कामांना गती द्यावी. किल्ले रायगडावरील ऐतिहासिक वास्तूंचे  जतन, संवर्धनाची कामे करताना ती भारतीय पुरातत्व विभागाच्या देखरेखीत व खबरदारी बाळगून करावीत, असे निर्देश रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजी राजे यांनी मंगळवारी (दि.27) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित आढावा बैठकीत दिले. यावेळी कोकण विभागीय आयुक्त जगदिश पाटील, रायगड जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, माजी कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, निमंत्रित सदस्य रघुजीराजे आंग्रे, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव तसेच प्राधिकरण समितीचे सदस्य आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी खासदार संभाजी राजे यांनी रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखड्याचा आढावा घेतला. तसेच प्राधिकरणातील संबंधित अधिकाऱ्यांना किल्ले रायगड आणि परिसर विकासाची कामे करताना कोणात्या तांत्रिक अडचणी येतात याची माहिती करुन घेतली. अंदाजपत्रक, तांत्रिक

डाक अदालत 14 मार्च रोजी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.27- रायगड विभागातील डाक सेवेसंबंधीत तक्रारींच्या निराकरणासंदर्भात 14मार्च 2018 रोजी   सकाळी ठिक अकरा वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. डाक विभागातील सेवेसंदर्भात तक्रारी, समस्या ज्याचे निवारण सहा आठवडा कालावधीत झालेले नाही अशा टपाल,स्पीडपोस्ट्,काऊंटर सेवा, बचत बँक,मनीऑर्डर बाबत या डाक अदालतीत कामकाज होईल. तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांक, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा इ. माहिती असणे आवश्यक आहे. इच्छुक ग्राहकांनी आपली तक्रार दोन प्रतीत व्ही.एस.घोलकर,अधिक्षक डाकघर रायगड विभाग यांच्याकडे दिनांक 9मार्च पर्यंत पोहचेल अशारितीने पाठवावी.असे आवाहन व्ही.एस.घोलकर,अधिक्षक डाकघर, रायगड विभाग, अलिबाग यांनी केले आहे.   ०००००