डाक अदालत 14 मार्च रोजी



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.27- रायगड विभागातील डाक सेवेसंबंधीत तक्रारींच्या निराकरणासंदर्भात 14मार्च 2018 रोजी  सकाळी ठिक अकरा वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. डाक विभागातील सेवेसंदर्भात तक्रारी, समस्या ज्याचे निवारण सहा आठवडा कालावधीत झालेले नाही अशा टपाल,स्पीडपोस्ट्,काऊंटर सेवा, बचत बँक,मनीऑर्डर बाबत या डाक अदालतीत कामकाज होईल. तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांक, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा इ. माहिती असणे आवश्यक आहे. इच्छुक ग्राहकांनी आपली तक्रार दोन प्रतीत व्ही.एस.घोलकर,अधिक्षक डाकघर रायगड विभाग यांच्याकडे दिनांक 9मार्च पर्यंत पोहचेल अशारितीने पाठवावी.असे आवाहन व्ही.एस.घोलकर,अधिक्षक डाकघर, रायगड विभाग, अलिबाग यांनी केले आहे. 
०००००



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक