Posts

Showing posts from May 21, 2023

जिल्ह्यात मासिक पाळीदिनानिमित्त जनजागृती सप्ताहाचे आयोजन

    अलिबाग,दि.25(जिमाका):-  जागतिक पातळीवर 28 मे हा दिवस मासिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षीच्या जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त ‘आम्ही कटिबद्ध आहोत’ ही या सप्ताहाची थीम असणार आहे. या दिनाचे औचित्य साधून दि.22 मे ते दि.28 मे 2023 या कालावधीत जिल्ह्यात मासिक पाळी व्यवस्थापन जनजागृती सप्ताह जिल्ह्यात राबविले जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी दिली. मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया असून त्याबाबत असलेल्या अज्ञानापोटी निर्माण झालेल्या विविध रूढी परंपरांमुळे मुली-महिलांना मोठ्या प्रमाणात मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन हा मासिक पाळी व्यवस्थापनाचा महत्त्वाचा घटक आहे. या पार्श्वभूमीवर या दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात रॅली, चर्चासत्रे, प्रशिक्षणे, प्रात्यक्षिक, प्रबोधन उपक्रमांद्वारे जनजागृती सप्ताह जिल्हा, तालुका व ग्रामपंचायतस्तरावर राबविण्यात येणार आहे.  या अनुषंगाने महिला व किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळी दरम्यान स्वच्छता व त्यांचे आरोग्य या बाबींना केंद्रस्थानी ठेवून जनजागृती केली जाणार आ

80 वर्षावरील कुटूंब निवृत्तीवेतनधारकांनी स्वत:च्या आधारकार्ड, पॅनकार्ड व बँक पासबुकची छायाकिंत प्रत जमा करावी

    अलिबाग,दि.24(जिमाका):-  रायगड जिल्ह्यातील 80 वर्षावरील जे कुटूंब निवृत्ती वेतनधारक रायगड कोषागार कार्यालयाकडून निवृत्तीवेतन घेत आहेत, त्यांनी अतिरिक्त निवृत्तीवेतनाचा लाभ देण्याकरिता जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधारकार्ड व पॅनकार्डची आवश्यकता आहे. तरी जिल्ह्यातील 80 वर्षावरील कुटूंब निवृत्तीवेतनधारकांनी स्वत:च्या आधारकार्ड, पॅनकार्ड व बँक पासबुकची छायाकिंत प्रत जिल्हा कोषागार कार्यालय किंवा नजिकच्या तालुक्यातील उपकोषागार कार्यालयात जमा करावी,  असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी रायगड अलिबाग यांनी केले आहे. ००००००००  

जिल्हा कोषागराकडून निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांसाठी सन 2023-24 पासून नवीन आयकर प्रणाली लागू

    अलिबाग,दि.24(जिमाका):-  रायगड जिल्हा कोषागराकडून निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतनधारकांसाठी सन 2023-24 पासून नवीन आयकर प्रणाली लागू करण्यात आली आहे. जे निवृत्तीवेतनधारक आयकर कपात पात्र आहेत (ज्यांचे वार्षिक निवृत्तीवेतन रु.सात लाखापेक्षा जास्त अधिक आहे, असे निवृत्तीवेतनधारक) अशा निवृत्तीवेतनधारकांचे नियमानुसार आयकर कपात त्यांच्या निवृत्तीवेतनातून माहे जून 2023 पासून करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.  तसेच ज्या निवृत्तीवेतनधारकांना जुनी आयकर प्रणाली स्वीकारायची आहे त्यांनी चालू आर्थिक वर्षासाठी (सन 2023 -24) केलेल्या गुंतवणुकीच्या तपशीलासह जुनी आयकर प्रणाली स्वीकारण्याबाबतचा लेखी अर्ज जिल्हा कोषागार कार्यालयाकडे त्वरित सादर करावा. अर्ज तपशील सादर न केल्यास, नियमानुसार आयकर कपात निवृत्तीवेतनातून करण्यात येईल. निवृत्तीवेतनधारकांनी सदरची माहिती  तात्काळ  कोषागार सादर करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी रायगड अलिबाग यांनी केले आहे. ००००००००

शेतकऱ्यांनी भात बियाणे उगवण क्षमता चाचणी करावी --उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे

  अलिबाग,दि.24(जिमाका):-  खरीप हंगामात भात हे पीक महत्त्वाचे आहे. पिकाची उत्पादकता चांगली येण्यासाठी बियाणे हा घटक महत्वाचा आहे. पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासणे गरजेचे आहे. आपण पेरणीसाठी वापरत असलेल्या बियाण्याची   उगवण क्षमता तपासणे, पेरणीसाठी किती बियाणे वापरावे हे ठरवता येते यासाठी बियाणे उगवण क्षमता चाचणी  करावी.   उगवण क्षमता तपासणी प्रकार  :- वृत्तपत्राच्या किंवा गोणपाटाच्या सहाय्याने- 100 भात बियाणे मोजून घेऊन ते पेपर मध्ये 10 च्या क्रमाने 10 रांगेत ठेवावे व पेपर गुंडाळून त्यावर रबर बँड किंवा भाग्याने बांधावे व त्यावर हलके पाणी शिंपडून ते सर्वसाधारण तापमानात 3-4 दिवस ठेवावे. त्यावर पाणी शिंपडून ओलसरपणा ठेवावा व 3-4 दिवसानंतर त्यास मोड आल्यावर त्यातील किती बियाणे उगवले ते मोजून घ्यावे.   बियाणे पेरणी करून - पसरट भांड्यामध्ये किंवा ट्रे मध्ये माती, शेणखत यांचे योग्य प्रमाण घेऊन 100 भात बियाणे मोजून ते पेरावे व पाणी द्यावे. 5-6 दिवसानंतर त्यातील उगवलेले बियाणे मोजून घ्यावे. 100 बियातील 92 बिया उगवल्या तर 92 टक्के उगवण क्षमता होते.92 टक्के बियाणे उगवले म्हणजे बियाणे पेरतान

शेतकऱ्यांनी बियाणे,खते, औषधे खरेदी करताना काळजी घ्यावी --उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे

  अलिबाग,दि.24(जिमाका):-  खरीप हंगामात भात हे पीक महत्त्वाचे आहे. पिकाची उत्पादकता चांगली येण्यासाठी बियाणे, खते, औषधे हे घटक महत्त्वाचे आहेत. बियाणे, खते व कीटकनाशके खरेदी करताना काळजी घेणे आवश्यक आहे. या अनुषंगाने पुढील प्रमाणे काळजी घ्यावी.  परवानाधारक विक्रेत्याकडून बियाणे, खते, औषधे खरेदी करावे, विक्रेत्याकडून पक्के बिल घ्यावे, बिलावर दुकानदाराचे नाव, बिल क्रमांक, उत्पादकाचे नाव, बियाणे नाव, लॉट नंबर, किंमत इत्यादी असल्याची खात्री करावी.  बियाणे पिकावरील उगवण शक्ती, भौतिक व अनुवंशिक शुद्धता टक्केवारी, चाचणी तारीख, वैधता, वर्ष, वजन इत्यादी तपासून घ्यावे,  छापील किंमतीपेक्षा जास्त दराने बियाणे, खते, औषधे खरेदी करू नये,  खरेदी केलेल्या बियाणांची पावती पीक कापणी पर्यंत जपून ठेवावी.  बियाणाची पिशवी फोडताना खालील बाजूंनी फोडावी त्यामुळे पिशवीचे लेबल व प्रमाणीकरण यंत्रणेचा टॅग व्यवस्थित राहील, बियाण्याच्या पिशवीचा टॅग व लेबल पीक काढणीपर्यंत जपून ठेवावे,  पिशवीत मुठभर बियाणे शिल्लक राखून पीक काढणी पर्यंत जपून ठेवावे,  मुदत संपलेले पॅकिंग फोडलेले किंवा सुटे बियाणे खरेदी करू नये, बियाणे उगव

5 टक्के दिव्यांग कल्याण निधीमधील वैयक्तिक अर्थसहाय्य लाभाच्या योजनेसाठी पात्र दिव्यांग व्यक्तींनी अर्ज सादर करावेत

    अलिबाग,दि.24(जिमाका):-  रायगड जिल्हा परिषदेच्या सन 2023-24 च्या अर्थसंकल्पात 5 टक्के दिव्यांग कल्याण निधीमधून वैयक्तिक अर्थसहाय्य लाभाच्या योजना डीबीटी तत्त्वावर राबविण्यात येत आहेत. वैयक्तिक अर्थसहाय्य लाभाच्या योजना डीबीटी तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या योजना पुढीलप्रमाणे- दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे (व्हेन्डींग स्टॉल, पीठ गिरणी, शिलाई मशिन, मिरची कांडप मशिन, झेरॉक्स मशिन इत्यादी),  दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय देणे (पापड मशिन, पिशव्या बनविण्याचे मशिन, पत्रावली बनविण्याची मशिन, काजू सोलण्याची मशिन इत्यादी), दिव्यांग-अव्यंग व्यक्तींशी विवाहितांना आर्थिक सहाय्य देणे (दि.1 एप्रिल 2014 नंतरचे विवाहित जोडपे असणे आवश्यक आहे.), दिव्यांग क्षेत्रात कार्यरत व्यक्ती /नोंदणीकृत संस्था यांना दिव्यांग प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानीत करणे,  दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या गरजेनुसार थेरपीसाठी अर्थसहाय देणे (अदा. फिजीओथेरपी, स्पीच थेरपी, ॲक्युपंचर इत्यादी), मतिमंद व्यक्तींकरिता नॅशनल ट्रस्ट मार्फत राबविण्यात येणाऱ्या निरामय योजनेचे हप्ते भरण्याकरिता अर्थसहाय्

आय आय एच टी बरगढ / वेंकटगिरी येथे प्रथम व द्वितीय वर्षाकरीता प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत

    अलिबाग,दि.24(जिमाका):-  केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील  सन 2023-24  या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाचा प्रथम व द्वितीय वर्षाकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडीशा) करीता 13 जागा व आर्थिक दृष्या दुर्बल घटकाकरीता 1 जागा तसेच वॅकटगिरी करीता 2 जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरीता प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर/सोलापूर/मुंबई/औरंगाबाद यांच्या मार्फत विहीत नमुन्यात प्रवेश अर्ज दि. 20 जून 2023 पर्यंत मागविण्यात येत आहेत. त्यानुषंगाने इच्छुक उमेदवारांनी याबाबतचे आपले परिपूर्ण अर्ज दि. 20 जून 2023 पर्यंत संबंधित प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग कार्यालयाकडे सादर करावे. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे  http.www.dirtexmah.gov.in  वर उपलब्ध आहे. तसेच या अर्जाचा नमूना सर्व प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग यांचे कार्यालयात देखील उपलब्ध आहे, असे आयुक्त, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, नागपूर एम.जे. प्रदिप चंदन, भा.प्र.से. यांनी कळविले आहे. ००००००००

सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील सामाजिक न्याय विभागाच्या पनवेल येथील मुलींचे शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु

      अलिबाग,दि.24(जिमाका):-  सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, हे सेक्टर 10, प्लॉट नं.21 ग्रीन पार्क सोसायटी समोर कळंबोली,  ता.पनवेल, जि. रायगड येथे कार्यरत आहे. या वसतिगृहामध्ये इयत्ता 8 ची पासून गरीब, हुशार, होतकरु, मागासवर्गीय अनु.जाती, अनु.जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्टया मागास, अनाथ व अपंग यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. वसतिगृहात विद्यार्थीनींकरिता मोफत निवासव्यवस्था असून नाष्टा दररोज पोहे/शिरा/उपीट इ. पैकी एक,उकडलेली दोन अंडी, सफरचंद, आणि ऋतुमानानुसार एक फळ व दूध तसेच  भोजन व्यवस्थेमध्ये जेवण ( डाळ, भात, चपाती, भाजी/ उसळ, लोणचे, पापड इ.सह आठवडयातून दोन वेळा मासांहार ) देण्यात येतो. अभ्यासाकरिता लागणारी वह्या, पुस्तके, शैक्षणिक व लेखन साहित्य देखील  विनामुल्य पुरविले जाते. तसेच दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता म्हणून रु.600/- निर्वाहभत्ता दिला जातो.  शालेय विद्यार्थीनींना रुपये 1 हजार व महाविद्यालयीन विद्यार्थीनींना रुपये 2 हजार गणेश भत्ता दिला जातो. सर्व विद्यार्थीनींना छत्री, रेनकोट व गमबुटसा

सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील सामाजिक न्याय विभागाच्या पाली-सुधागड येथील मुलींचे शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु

    अलिबाग, दि.24(जिमाका):-  सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, हे मधली आळी, राम मंदिर रोड तळ्याशेजारी ता.पाली-सुधागड, जि. रायगड येथे कार्यरत आहे. या वसतिगृहामध्ये इयत्ता 8 ची पासून गरीब, हुशार, होतकरु, मागासवर्गीय अनु.जाती, अनु.जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्टया मागास, अनाथ व अपंग यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. वसतिगृहात विद्यार्थीनींकरिता मोफत निवासव्यवस्था असून नाष्टा दररोज पोहे/शिरा/उपीट इ. पैकी एक,उकडलेली दोन अंडी, सफरचंद, आणि ऋतुमानानुसार एक फळ व दूध तसेच  भोजन व्यवस्थेमध्ये जेवण ( डाळ, भात, चपाती, भाजी/ उसळ, लोणचे, पापड इ.सह आठवडयातून दोन वेळा मासांहार ) देण्यात येतो. अभ्यासाकरिता लागणारी वह्या, पुस्तके, शैक्षणिक व लेखन साहित्य देखील  विनामुल्य पुरविले जाते. तसेच दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता म्हणून रु.600/- निर्वाहभत्ता दिला जातो.  शालेय विद्यार्थीनींना रुपये 1 हजार व महाविद्यालयीन विद्यार्थीनींना रुपये 2 हजार गणेश भत्ता दिला जातो. सर्व विद्यार्थीनींना छत्री, रेनकोट व ग

जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा तक्रारीबाबत धडक मोहीम राबविण्याकरिता जिल्हास्तरीय भरारी पथकाची स्थापना

    अलिबाग,दि.23 (जिमाका):- जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा तक्रारीबाबत धडक मोहीम राबविण्याकरिता रायगड जिल्ह्यात सन- 2023 24 साठी जिल्हास्तरीय भरारी पथकाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी दिली आहे. जिल्हास्तरावर नियुक्त केलेली ही भरारी पथके कृषी निविष्ठांच्या गुणवत्ता नियंत्रणाचे काम शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे करणार असून या पथकामध्ये नियुक्त केलेले अधिकारी पुढीलप्रमाणे :- प्र.कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद रायगड, श्री. मिलिंद चौधरी,पथक प्रमुख, मो.क्र.8983511359,  उपविभागीय कृषी अधिकारी,अलिबाग श्री.कैलास वानखेडे, सदस्य, मो.क्र.9822769617, प्र.उपविभागीय कृषी अधिकारी, खोपोली श्रीमती अर्चना सूळ, सदस्य, मो.क्र.8972197060, प्र.उपविभागीय कृषी अधिकारी, माणगाव श्री.आनंद कांबळे, सदस्य, मो.क्र.9423049678, प्र.उपविभागीय कृषी अधिकारी, महाड, श्री.दत्तात्रय काळभोर, सदस्य, मो.क्र.9561509089,  मोहिम अधिकारी, जिल्हा परिषद रायगड, श्री.मिलिंद चौधरी, सदस्य, मो.क्र.8983511359,  निरीक्षक वैद्य मापन शास्त्र, श्री.बी.आर.चव्हाण, सदस्य,मो.क्र.99305

बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा “आपल्या गावातच” मोहीम कालावधीस दि.30 मे पर्यंत मुदतवाढ

               अलिबाग,दि.23 (जिमाका):-  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटूंबास रु.2 हजार प्रति हप्ता याप्रमाणे रु.6 हजार प्रतिवर्षी लाभ देण्यात येतो. या योजनेच्या 14 व्या हप्त्याचा लाभ मे किंवा जून 2023 मध्ये जमा होणार आहे.  केंद्र शासनाने 14 व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांचे लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले असून आयपीपीबी मार्फत गाव पातळीवर सर्वत्र मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा कालावधी दि.30 मे 2023  पर्यंत वाढविण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा समन्वय अधिकारी श्री.संदेश शिर्के यांनी दिली आहे.    रायगड जिल्ह्यात सद्य:स्थितीत 23 हजार 5 लाभार्थ्यांची बँक खाती त्यांच्या आधार क्रमांकास जोडलेली नाहीत. तसेच 12 हजार 430 लाभार्थ्यांचे e-KYC प्रमाणिकरण झालेले नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांच्या खात्यात 14 व्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही.             लाभार्थींना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाची जोडण्याची सुविधा त्यांच्या गावातील पोस्ट मास्तर यांच्यामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. य

रोव्हर मशीनव्दारे मोजणी प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

    अलिबाग,दि.23 (जिमाका) :-   भूमी अभिलेख विभागात अचूक व जलद गतीने मोजणी करण्यासाठी रोव्हर मशीन पुरविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यामध्ये पुरविण्यात आलेल्या रोव्हर मशीनव्दारे मोजणीचे प्रात्यक्षिक जिल्हाधिकारी रायगड डॉ.  योगेश म्हसे यांना दि. 20 मे 2023 रोजी अलिबाग तहसिलदार कार्यालयाच्या आवारात दाखविण्यात आले. यावेळी अलिबाग उपविभागीय अधिकारी श्री. प्रशांत ढगे, अलिबाग तहसिलदार विक्रम पाटील व उप अधीक्षक भूमी अभिलेख श्री.भोला कोकणे तसेच भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  उप अधीक्षक भूमी अभिलेख श्री.भोला कोकणे यांनी रोव्हर मशीनव्दारे कमी वेळेत आणि अचूक पद्धतीने मोजणीचे प्रात्यक्षित तसेच D.G.P.S (रोव्हर व बेस) (Differential Global Positioning System) यंत्राद्वारे भू-करमापक (सर्वेअर) यांनी घेतलेली अक्षांश रेखांक्ष याचा वापर करुन सद्य:स्थितीत इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या संगणक प्रणालीव्दारे KML Files तयार करणे शक्य झाले आहे. राज्यात 77 ठिकाणी CORS - Stations स्थापित करण्यात आली आहेत. यापैकी रायगड जिल्ह्यातील उरण व माणगाव तालुक्यात अशा दोन ठिकाणी केंद्र स्थापित केले आहेत. या मश

नोकरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांसाठी “शासन आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन

                 अलिबाग,दि.23 (जिमाका) :-   जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यां च्या मार्फत दि .27  मे  202 3  रोजी सकाळी 10 ते  सायंकाळी   4  या वेळेत  श्री समर्थ मंगल कार्यालय, समर्थ ढाबा शेजारी, जाधव फार्म,मुंबई-पुणे हायवे, खोपोली, ता.खालापूर  या ठिकाणी  नोकरी  इच्छुक बेरोजगार उमेदवारांसाठी  “ शासन आपल्या दारी ”  या उपक्रमांतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय  महारोजगार मेळाव्याचे   आयो जन  करण्यात  आले  आहे.               जिल्ह्यातील नामांकित आस्थापनांकडील रिक्त पदांच्या भरतीसाठी महारोजगार मेळावा आयोजित केला आहे. या महारोजगार मेळाव्यात एस.एस.सी./एच.एस.सी पास, आय.टी.आय.डिप्लोमा इंजिनियर, पदवी इंजिनियर, व इतर पदवीधारक नोकरी इच्छुक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. या पंडित दीनदयाळ महारोजगार मेळाव्यास स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या बेरोजगार युवकासाठी जिल्हयातील विविध महामंडळे यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजना विषयीची माहीती उमेदवारांना दिली जाणार आहे. या विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पध्