5 टक्के दिव्यांग कल्याण निधीमधील वैयक्तिक अर्थसहाय्य लाभाच्या योजनेसाठी पात्र दिव्यांग व्यक्तींनी अर्ज सादर करावेत

 

 

अलिबाग,दि.24(जिमाका):- रायगड जिल्हा परिषदेच्या सन 2023-24 च्या अर्थसंकल्पात 5 टक्के दिव्यांग कल्याण निधीमधून वैयक्तिक अर्थसहाय्य लाभाच्या योजना डीबीटी तत्त्वावर राबविण्यात येत आहेत.

वैयक्तिक अर्थसहाय्य लाभाच्या योजना डीबीटी तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या योजना पुढीलप्रमाणे-दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे (व्हेन्डींग स्टॉल, पीठ गिरणी, शिलाई मशिन, मिरची कांडप मशिन, झेरॉक्स मशिन इत्यादी),  दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय देणे (पापड मशिन, पिशव्या बनविण्याचे मशिन, पत्रावली बनविण्याची मशिन, काजू सोलण्याची मशिन इत्यादी), दिव्यांग-अव्यंग व्यक्तींशी विवाहितांना आर्थिक सहाय्य देणे (दि.1 एप्रिल 2014 नंतरचे विवाहित जोडपे असणे आवश्यक आहे.), दिव्यांग क्षेत्रात कार्यरत व्यक्ती /नोंदणीकृत संस्था यांना दिव्यांग प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानीत करणे,  दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या गरजेनुसार थेरपीसाठी अर्थसहाय देणे (अदा. फिजीओथेरपी, स्पीच थेरपी, ॲक्युपंचर इत्यादी), मतिमंद व्यक्तींकरिता नॅशनल ट्रस्ट मार्फत राबविण्यात येणाऱ्या निरामय योजनेचे हप्ते भरण्याकरिता अर्थसहाय्य देणे,दिव्यांग व्यक्तींना सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञान याकरिता अर्थसहाय देणे, कर्णबधिर मुलांच्या क्वॉक्लिअर इंम्प्लांट  शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय देणे.

 या योजनांसाठी विहित नमुन्यातील अर्ज, रायगड जिल्ह्याचा रहिवासी दाखला किंवा रेशनिंगकार्डची झेरॉक्स प्रत, ऑनलाईन वैश्विक प्रमाणपत्र (UDID) वैद्यकीय मंडळाकडील किमान 40 टक्के दिव्यांगत्वाचा दाखला, बीपीएल घटकातील लाभार्थ्यास प्राधान्य, समक्ष सक्षम प्राधिकाऱ्याचा उत्पन्नाचा दाखला (रुपये 1 लाखाच्या आतील) अथवा कुटुंब दारिद्रय रेषेखाली असल्याचा संबंधित ग्रामसेवकाचा दाखला, मतिमंद व बहुविकलांग पाल्याचा पालकांस लाभासाठी पात्र ठरविण्यात येईल (पाल्याचा अपंगत्वाचा दाखला सादर करणे अनिवार्य), यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा, बँक पासबुकाची झेरॉक्स प्रत असे एकत्रित सर्वसाधारण आवश्यक निकष आहेत.

या योजनेच्या निकषानुसार पात्र असलेल्या दिव्यांग व्यक्तींनी साधारणतः दि. 30 सप्टेंबर 2023 पूर्वी संबंधित तालुक्याच्या गटविकास अधिकारी, पंचायत समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घ्यावा व आवश्यकत्या सर्व कागदपत्रांच्या प्रतीसह परिपूर्ण अर्ज गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्या मार्फत समाज कल्याण विभागाकडे सादर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी केले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक