Posts

Showing posts from January 17, 2021

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा रायगड जिल्हा दौरा

    अलिबाग, जि.रायगड, दि.21 (जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री जयंत पाटील यांचा जिल्हा दौरा खालीलप्रमाणे--             सोमवार, दि.25 जानेवारी 2021 रोजी, सकाळी 10.00 वा. आर.सी.एफ.हेलिपॅड अलिबाग येथून खाजगी हेलिकॉप्टरने माणगावकडे प्रयाण. सकाळी 10.20 वा. माणगाव येथे आगमन (माणगाव सार्वजनिक बांधकाम रेस्ट हाऊस समोर अक्षांश-18 13 50 रेखांश 73 17 0.00) व राखीव.   सकाळी 10.30 वा. माणगाव येथील जलसंपदा भवन कार्यालयाचे उद्घाटन समारंभास उपस्थिती. स्थळ : माणगाव. दुपारी 1.00 वा. माणगाव येथून खाजगी हेलिकॉप्टरने कवठेमहंकाळ, जि.सांगलीकडे प्रयाण. ०००००००

महाड येथील रुग्णालयात दाखल बाधित रुग्णांची भेट घेऊन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केली विचारपूस

अलिबाग, जि.रायगड, दि.22 (जिमाका)- गुरुवार, दि.21 जानेवारी  सायंकाळी महाड येथील इंडो अमाईन्स लिमिटेड कंपनीत वायुगळती झाल्यामुळे काही जणांना त्याची बाधा झाली होती. बाधित 7 लोकांना महाड येथील डॉ.फैजल देशमुख नर्सिंग होम या ठिकाणी दाखल करण्यात आले होते.       आज पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या दाखल रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली व  त्यांना देण्यात येणाऱ्या उपचारांबद्दलची  माहिती घेतली.  यावेळी त्यांच्याबरोबर आमदार भरत गोगावले हेदेखील उपस्थित होते. ००००००

छत्रपती शिवरायांच्या जयजयकारात रोहा येथे शिवसृष्टी भूमीपूजन समारंभ उत्साहात संपन्न शिवसृष्टीतून संस्कारीत होऊन त्यामधून नवीन पिढीने बोध आणि प्रेरणा घ्यावी---पालकमंत्री कु.आदिती तटकरे

Image
    अलिबाग, जि.रायगड, दि.22 (जिमाका)- रोहे शहरात कुंडलिका नदीच्या तीरावर महत्वाकांक्षी नदी संवर्धन प्रकल्पामध्ये साकारत असलेल्या शिवसृष्टीतून संस्कारीत होऊन त्यामधून नवीन पिढीने बोध आणि प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांनी (दि.21 जानेवारी ) रोहा येथे केले. रोहे शहरात कुंडलिका नदीच्या तीरावर साकारत असलेल्या शिवसृष्टी भूमीपूजन कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ.अमोल कोल्हे तर   कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रायगडचे खासदार सुनिल तटकरे उपस्थित होते.   या कार्यक्रमाला आमदार अनिकेत तटकरे, नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, उपनगराध्यक्ष महेश कोल्हटकर, रोहा पंचायत समिती उपसभापती रामचंद्र सकपाळ, सुरेश लाड, मधुकर पाटील, विजयराव मोरे, विनोद पाशिलकर, अंकित साखरे, महेंद्र गुजर, रोह्याचे प्रांताधिकारी डॉ. यशवंतराव माने, पोलीस उपअधीक्षक किरण सूर्यवंशी, तहसिलदार कविता जाधव,पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर, अमित उक

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

  अलिबाग, जि.रायगड, दि.21 (जिमाका)- राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा  जिल्हा दौरा खालीलप्रमाणे--             शुक्रवार, दि.22 जानेवारी 2021 रोजी, सकाळी 9.00 वा सुतारवाडी निवासस्थान येथून शासकीय वाहनाने पुनाडे तर्फे नाते, महाडकडे प्रयाण. सकाळी 10.30 वा. पुनाडे तर्फे नाते येथे आगमन व रायगड व्हॅली फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि.आयोजित निसर्गायण प्रक्रिया केंद्र उद्घाटन व शुभारंभ सोहळ्यास उपस्थिती. स्थळ : पुनाडे तर्फे नाते ता.महाड. सकाळी 11.30 वा. पुनाडे तर्फे नाते येथून शासकीय वाहनाने  पोलादपूरकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. पोलादपूर येथे आगमन व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते भूमिपुजन कार्यक्रमास उपस्थिती. आड ते किनेश्वर रस्ता, रा.मा.138 कापडे बु. ते महाळुंगे रस्ता, पळचिल सावरीची वाडी ते जलाची वाडी रस्ता ता.पोलादपूर, दुपारी 1.45 वा. पळचिल सावरीची वाडी ते प्राथमिक आरोग्य केंद्र पळचिलकडे प्रयाण. दुपारी 2.00 वा. प्राथमिक आरोग्य केंद्र, पळचिल उद्घाटन

पेण परिवहन कार्यालयाच्या वतीने शिकाऊ वाहनचालकांसाठी मुरुड येथे रस्ता सुरक्षा अभियान उपक्रम संपन्न

Image
  अलिबाग,जि.रायगड, दि.21 (जिमाका)   :- परिवहन कार्यालय, पेण (रायगड) च्या वतीने दि.20 जानेवारी   रोजी   मुरुड येथील शिबीर कॅम्प येथे शिकाऊ अनुज्ञप्ती आणि वाहनचालक चाचणीसाठी आलेल्या अर्जदारांना मोटार वाहन निरीक्षक यांनी 32 वे रस्ता सुरक्षा अभियान 2021 च्या निमित्ताने माहितीपत्रके वाटली. तसेच वाहतूक नियमांचे महत्व विषद करणारे व्याख्यान आयोजित   केले.               32 व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे घोषवाक्य “ सडक सुरक्षा जीवन रक्षा ” असे असून सडक सुरक्षा जीवन रक्षा हे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे व सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करावे ,याबद्दल मोटार वाहन निरीक्षक श्री. किरण पाटील व श्री. दिपक कोकणे यांनी मार्गदर्शन केले. मोटार वाहन निरीक्षक श्री.पाटील व कोकणे यांनी यावेळी वाहतूक नियमांची व चिन्हांची माहिती असलेली माहितीपत्रके वाटली. तसेच “ जीवनदूत' म्हणून कार्य करणे आवश्यक आहे, याबाबतचे महत्व विषद केले. विशेषतः अपघातग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी दिली. ००००००

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा रायगड जिल्हा दौरा

  अलिबाग, जि.रायगड, दि.21 (जिमाका)- राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा खालीलप्रमाणे--             शनिवार, दि.23 जानेवारी 2021 रोजी, सकाळी 7.45 वा. शासकीय निवासस्थान बी-5,मुंबई येथून मोटारीने गेट वे ऑफ इंडियाकडे प्रयाण. सकाळी 8.00 वा. गेट वे ऑफ इंडिया येथे आगमन व स्पीड बोटने मांडवाकडे प्रयाण. 8.30 वा. मांडवा येथे आगमन व इंदापूर ता.माणगावकडे प्रयाण.   सकाळी 10.30 वा. शेखरशेठ देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. स्थळ : इंदापूर ता.माणगाव. सकाळी 10.45 इंदापूर येथून शासकीय विश्रामगृह म्हसळाकडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. शासकीय विश्रामगृह म्हसळा येथे आगमन. सकाळी 11.30 वा पंचायत समिती कार्यालय, म्हसळा, नवीन प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा.   स्थळ : नवीन प्रशासकीय पंचायत समिती कार्यालय, म्हसळा. दुपारी 1.30 वा. राखीव. नझीम हसवारे यांच्या निवासस्थानी. दुपारी 2.30 वा. शासकीय विश्रामगृह म्हसळा येथून शासकीय वाहनाने मांडवाकडे प्रयाण. सायं.5.30 वा. मांडवा येथून स्पीड बोटने गेट वे ऑफ इंडिया, मुंबईकडे प्रयाण. ०००००००

नियमांचे पालन केल्यास अपघात रोखता येतील रस्ते सुरक्षा अभियान उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे प्रतिपादन

Image
  अलिबाग,जि.रायगड, दि.18 (जिमाका)   :-   अपघातामुळे 15 ते 25 वयोगटातील 30 टक्के वाहन चालकांचा मृत्यू होतो, ही मोठी गंभीर बाब आहे. जिल्हयामध्ये 35 टक्के अपघात रोखण्यास प्रशासनाला यश आले आहे. अपघात रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक असून नियमांचे पालन केल्यास अपघात रोखता येतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आज येथे व्यक्त केले.                 पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व रायगड जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी पोलीस मुख्यालयातील जंजिरा सभागृहात 32 व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा उद्घाटन समारंभ जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते व जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या.              यावेळी पोलीस अधीक्षक अशोक दुधे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी   डॉ. किरण पाटील, पेण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार, सार्वजिनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे आदी मा

प्रादेशिक परिवहन प्रशिक्षण केंद्राच्या ब्रेक टेस्ट ट्रॅकसाठी माणगाव तालुक्यातील मौजे जावळी येथील जागा हस्तांतरण कार्यवाही पूर्ण काम लवकर सुरु करण्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे संबंधितांना निर्देश

Image
अलिबाग,जि.रायगड दि.18 (जिमाका) :- माणगाव तालुक्यातील जावळी येथे प्रादेशिक परिवहन प्रशिक्षण केंद्रासाठी ब्रेक टेस्ट ट्रॅक बांधणीसाठी राज्यमंत्री तथा   पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर महिन्यात मंत्रालयात बैठक संपन्न झाली होती.              या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने मौजे जावळी, ता. माणगाव येथील गट क्र. 73 क्षेत्री 9.12.00 हे.आर. मधील 2.00.00 हे.आर. जागा उप प्रादेशिक परिवहन कर्यालय, पेण यांनी ब्रेक टेस्ट ट्रॅक व इमारतीसाठी महसूल मुक्त सारामाफीने हस्तांतरण करण्यास मंजूरी दिलेली होती. परंतू या जमिनीमध्ये ब्रेक टेस्ट ट्रॅक बसत नसल्यामुळे माणगाव तालुक्यातील जावळी येथे सुधारित जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जावळी येथील सर्व्हे नं. 73 येथील एकूण 9.12.00 हे.आर. क्षेत्रापैकी 1.30.00 हे.आर. व सर्व्हे नं. 17 येथील   एकूण 0.86.50 हे.आर. क्षेत्रापैकी 0.70.00 हे.आर. क्षेत्र जमीन शासनाकडे पुर्नग्रहीत करण्यात आली असून ही जमीन प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल अंतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण यांना   ब्रेक टेस्ट ट्रॅक करिता हस्तांत

पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी श्रीवर्धनमधील मौजे रानवली येथील जागा हस्तांतरित जिल्हा विकासासाठी पालकमंत्री आदिती तटकरेंचा आणखी एक महत्वाचा निर्णय

Image
  अलिबाग, जि.रायगड दि.18 (जिमाका) :- जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, ता.अलिबाग, जि.रायगड यांनी पशुवैद्ययकीय दवाखाना श्रेणी-1, रानवली, ता.श्रीवर्धन या इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी केली होती.   याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष घालून संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.      तद्नंतर या प्रकरणी ग्रुप ग्रामपंचायत रानवली यांनी पशुवैद्ययकीय दवाखाना श्रेणी-1, रानवली, ता.श्रीवर्धन, जि.रायगड या इमारतीसाठी मा.आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे जमीन वर्ग करण्यासंदर्भात विनंती केली होती. या जमिनीबाबत चौकशी करुन उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन यांनी राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना रानवली, ता.श्रीवर्धन, या इमारतीसाठी मौजे रानवली, ता.श्रीवर्धन, जि.रायगड येथील गट नं.292, क्षेत्र 00-20-00 हे.आर पैकी 0-04-00 हे.आर.ही जमीन ग्रामपंचायत रानवली यांच्याकडून शासनाकडे पुनर्ग्रहण करण्यात आली असून महसूलमुक्त व सारामाफीने मा.आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना राज्यस्तरीय पशुवैदयकीय दवाखाना रानवली, ता.श्रीवर्धन, जि.रायग

रायगडकरांना लवकरच उपलब्ध होणार अद्ययावत कौटुंबिक न्यायालयाची सुविधा

Image
             अलिबाग,जि.रायगड, दि.18 (जिमाका) :-  विधी व न्याय विभागाच्या दि.18 ऑगस्ट, 2017 च्या शासन निर्णयान्वये 14 व्या वित्त आयोगांतर्गत राज्यात 5वर्षाच्या कालावधीकरिता 9 कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यामध्ये रायगड-अलिबाग येथील कौटुंबिक न्यायालयाचाही समावेश होता. तद्नंतर हे कौटुंबिक न्यायालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्याकरिता पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी विविध बाबींसाठी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार 14 व्या वित्त आयोगांतर्गत अलिबाग, जिल्हा रायगड येथील प्रस्तावित कौटुंबिक न्यायालयाकरीता फर्निचर पुरवठा करण्यासाठी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग यांनी प्रस्तावित केलेल्या 24 लक्ष 4 हजार 413 रुपये इतक्या रक्कमेच्या अंदाजपत्रकातून 5 % Centage Charges वगळून   23 लक्ष 91 हजार 876 रुपये इतक्या रक्कमेच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आता लवकरच रायगड जिल्ह्यातील जनतेला उत्तम अशा कौटुंबिक न्यायालयाची सुविधा उपलब्ध होणार आहे. 000000