महाड येथील रुग्णालयात दाखल बाधित रुग्णांची भेट घेऊन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केली विचारपूस


अलिबाग, जि.रायगड, दि.22 (जिमाका)- गुरुवार, दि.21 जानेवारी  सायंकाळी महाड येथील इंडो अमाईन्स लिमिटेड कंपनीत वायुगळती झाल्यामुळे काही जणांना त्याची बाधा झाली होती. बाधित 7 लोकांना महाड येथील डॉ.फैजल देशमुख नर्सिंग होम या ठिकाणी दाखल करण्यात आले होते.

      आज पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या दाखल रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली व  त्यांना देण्यात येणाऱ्या उपचारांबद्दलची  माहिती घेतली.  यावेळी त्यांच्याबरोबर आमदार भरत गोगावले हेदेखील उपस्थित होते.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक